Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरतर या सिझनला विनरच नाही.हे बिबॉसलाही कळले असेल.त्यामुळे बिबॉसच कन्फ्यूज्ड झाला असेल प्रसादसारखा की कोणाला विनर कराव.
दहा वीस करून ठरवा आता.
अक्षय ,अपूर्वा, माने धोंगडे यांना रिजेक्ट करण्याच एकमेव कारण बिबॉस देऊ शकतो ते म्हणजे चावडीवर ममांशी उध्दटपणाने वागण.
बाकी राहिलेल्यांपैकी सुध्दा कोणीही नाही.
बिबॉसचीच कसोटी आहे.म्हणूनच प्राईजमनी कमी केली असेल.

धोंगडे डोक्यात जाते. दिसतेय छान पण कित्ती बोलते. आज प्रसाद योग्य बोलतोय तिला. ती परवा नऊवारीतही छान दिसत होती पण आवडत नाहीच ती मला.

नॉमिनेशन टास्कमध्ये राखीने मजा आणली.

माने, अपूर्वा, अक्षय, आरोह फिनाले वीकला पोचले. आरोह आधीच पोचलेला. प्रसाद, धोंगडे, राखी नॉमीनेट.

अक्षय म्हणाला महाराष्ट्रातील रसिकांचे आभार, अरे रसिक तुला votes नाही देत. बिग बॉसचे आभार मान.

आज सुरुवातीला अक्षय अपूर्वाने भांडून trp दिला आणि नंतर धोंगडे प्रसादने भांडून दिला. राखी देतेच trp . माने कमी पडले .

फायनल मधे राहिलेले लोकं पहाता सिझन बघायचा सोडून दिलं ते चांगलं केल म्हणायचं !
राखीला द्या ट्रॉफी, बाकी लोक युसलेस अ‍ॅट अनदर लेव्हल !
पुढच्या सिझनला फॉर्म्युला बदला ,फिजिकल टास्क्स ऐवजी हिन्दी सारखे माइन्ड गेम्स आणा किंवा फालतु सेलेब्ज ऐवजी कॉमनर्स आणा म्हणजे काहीतरी वेगळे फ्लेवर्स दिसतील, तसेही हे पब्लिक सेलिब्रिटी दिसतच नाहीत !

प्रिफिनँले वीकच्या नॉमिनेशनसाठी जर बाराव्या आठवड्यातील कार्याचा निकष ठेवला असेल तर यावरूनच कळत की उरलेल्या चार जणांना ,आरोह सोडून,ज्यांना कमी वोटिंग होत आहे त्यांना कसतरी करून फिनँलेमध्ये न्यायच आहे.
या वीकसाठी संपूर्ण खेळातील कार्याचा निकष हवा.होता ,पण बिबॉसला ते नको होत.
राखीला बहुधा काढतील कारण तिचा रोल आता अँक्च्युअली संपला आहे.आणि प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे एकंदरीत तिची वागणूक बघता तिचाच पत्ता कट करतील.
धोंगडेला आता कदाचित टॉप 3.मध्ये पण नेतील.
पण राखीला 1तारखेला ,रविवारी काढलेल.दाखवणार नाहीत, 31 तारखेला पण दाखवतील का,मध्येच काढतील.पण वोटिंग लाईन्स शुक्रवारपर्यंत चालू आहेत म्हणजे त्याच रात्री पण एव्हिक्शन करू.शकतात.

राखीला काढण्याऐवजी तिलाच द्या ट्रॉफी.

तिचे बिलो द बेल्ट आवडत नाहीत मला अजिबात पण तिने शो त प्राण फुंकलाय.

प्रसाद केवळ सिंपथीवर जिंकणार, विनिंग मटेरीयल तोच काय, कोणीही नाही. प्रसाद जिंकला तरी त्याला पुढे किती रोल मिळतील याबाबत साशंकता आहे मात्र. बाकी सर्वांची कामं सुरु रहातील .

मेघा तशी धडाडीची, स्वगुणा़ंवर बरेच रंग दाखवून जिंकली, काम कुठे तिला. त्यापेक्षा आस्ताद, स्मिता बिझी आहेत. शिवपेक्षा वीणा बिझी आहे, रुपाली, किशोरी बिझी आहेत. शिव हिंदीत गेला हे बरं झालं, कामं तरी मिळतील पुढे.

विशाल, विकास दोघेही बिझी आहेत मात्र.

ट्रॉफी तात्पुरती आणि थोडं काम मिळवून देते, करीयर करतेच असं नाही.

अन्जु....अनुमोदन
खरतर बिबॉस शोचा किंवा तो जिंकण्याचा काम मिळण्याशी काहीही संबंध नाही.
त्यासाठी अँक्टिंग स्किल, नशीब तुमची मेहनत,आणि काही रोल्ससाठी वयही हे फँक्टर्स महत्वाचे असतात.
बिबॉस मराठीचा विचार केला असता विनर्स फार पुढे आले नाहीत शिव रिअँलिटी शोजच करत आहे,विशालला आता ममांचा पिक्चर मिळाला आहे.
आता या सिझनच बघू.

मांजरेकरांच्या पिक्चरमध्ये विशाल, जय , उत्कर्ष आहेत. पण मांजरेकर बिग बॉस होस्ट करतात यामुळे तो चित्रपट मिळाला असं म्हणायला हवं.
विकास आधीपासूनच रेग्युलर काम करत होता. एक मालिका संपवून इथे आला होता.
मीराला एका सिरियलमध्ये blink and you miss it रोल मिळाला. आरोहची एक मालिका आली कधी आणि गेली कधी तेही कळलं नाही.
तेव्हा यांना काम मिळालं तर ते त्यांच्या वकुबावरच मिळतं. बिग बॉसने काही फायदा होत नाही.
एवढे इंडियन आयडॉल, गाण्याच्या स्पर्धांचे विनर्स झाले . किती जणांना स्वतंत्र काम मिळाले? बहुतेक लोक स्टेज शोजमध्येच दिसतात.

काम एखादं बारीकसं मिळतंही सीझन च्या आठवणी ताज्या असेपर्यत. नंतर काही नाही. ममां रोल फेकतात ते कसले किरकोळ असतात. त्यातल्या त्यात आय थिंक रुपाली भोसले ने लोकप्रियता आणि यश मिळवले थोडेफार. बाकी सगळे जिथे जसे होते तसेच आहेत.

विकास आधीपासूनच रेग्युलर काम करत होता. एक मालिका संपवून इथे आला होता. >>> हो. तो बिझी असतो.

वीणाही इथे तिथे काम करत असते, मी बघत नाही पण भाची सांगते, वीणा इकडे होती वगैरे. पोटापाण्यापुरतं तरी मिळवते बहुतेक.

मांजरेकर यांच्या फिल्ममधे जय विशाल सो सो च दिसतायेत, उत्कर्ष शोभतोय मावळा म्हणून. मांजरेकर शिवलाही काम देणार होते ते ह्यातच होतं की काय, तो हिंदी बिग बॉसमधे बिझी झालाय सध्या म्हणून दिलं नसेल.

त्यातल्या त्यात आय थिंक रुपाली भोसले ने लोकप्रियता आणि यश मिळवले थोडेफार. >>> ती आधीही बिझी असायची, हिंदीत सुमित राघवन बरोबर होती. नंतर बहुतेक लग्न करुन लंडनला गेली त्यामुळे इंडस्ट्री सोडली होती.

>>हल्ली स्वरूप बघत नाहीत का
हो.... सोडले बघायचे बिग बॉस कारण आता जे उरलेत त्यातल्या कुणाशीच कनेक्ट व्हायला होत नाही किंवा त्यातले कुणीच डिझर्व्हिंग वाटत नाही Wink

>>बाकी सगळे जिथे जसे होते तसेच आहेत.
असे कसे? बिचकुले झाले की स्टार Wink
आजच त्यांनी मुक्ताफळे उधळलीत की पठाण मधला लूक शहारुखने त्यांचा बघून कॉपी केलाय म्हणे Wink

आज पहीलं बराच वेळ बघितलं नाही. अपूर्वा गेली का डायरेक्ट फिनालेत, तीच असेल कारण तिचा बड्डे होताना, गिफ्ट मिळालं असेल.

रक्कम परत मिळवायच्या टास्कमध्ये प्रसाद अक्षय जोडी कमाल खेळली. राखी अपूर्वा सर्वात बेकार . अपूर्वाला समजलं असेल की अक्षयशिवाय ती टास्कमध्ये अगदीच डल आहे. धोंगडेही चांगली खेळली, आरोह शेवटी जरा सोडला तर त्यानेही चांगलं मार्गदर्शन केलं.

धोंगडेच्या लक्षात आलं की अपूर्वाला तिच्या आई आणि मामाने काहीतरी सांगितलं त्यामुळे ती अक्षयपासून दूर जातेय.

त्यातले कुणीच डिझर्व्हिंग वाटत नाही >>> खरं आहे, पण मी सवयीने बघायचं सोडत नाही, हाहाहा.

आजच त्यांनी मुक्ताफळे उधळलीत की पठाण मधला लूक शहारुखने त्यांचा बघून कॉपी केलाय म्हणे >>> हो का, भारीच.

भारी होता आजचा टास्क....असे tasks आधी का नाही ठेवत? आरोहने सगळ्यात छान गाईड केले...प्रसाद,माने,अक्षय,धोंगडे सगळेच मस्त खेळले...राखी फक्त entertainच करू शकते...डोकं लावण्याचे. टास्क नाही जमत तिला... Lol तरी त्यांची त्यांची जोडी जिंकली असती पण आधीच राखीच्या guidance मुळे वैतागलेली अपूर्वा ऐन शेवटी आल्यानंतर तिचं अजिबात न ऐकता भरभर चुकीच्या दिशेने पुढे गेली.आणि हरली बिचारी...
थोडं विषयांतर: तो आरोह किती ढगळ कपडे घालतो...

खरं सांगू का राखी स्टार्ट पॉइंटला एकदाच चुकली, नंतर ती नीट सांगत होती पण अपूर्वा कन्फयूज्ड . राखीपेक्षा अपूर्वा जास्त जबाबदार आहे. ती टास्क नाहीच नीट खेळत . अक्षयमुळे जिंकत होती पण तिला उलट वाटतं आणि मानेही चढवत होते आज तिला, तू बेस्ट असं म्हणत .

प्रसाद अक्षयला शेवटी ठेवल्याचा पण फायदा मिळाला.

तो आरोह किती ढगळ कपडे घालतो... >>> तो दिसायला स्मार्ट आहे पण चम्या वाटतो. स्कार्फ वगैरे अजिबात सूट होत नाही, नुसत्या टीशर्टवर (ढगळ नसणाऱ्या) चांगला दिसेल तो.

खरं सांगू का राखी स्टार्ट पॉइंटला एकदाच चुकली, नंतर ती नीट सांगत होती पण अपूर्वा कन्फयूज्ड .>>>अजिबातच नाही...आम्ही आत्ता राखी आणि अपूर्वाची क्लिप पुन्हा बघितली आणि तुफान हसलो...ती राखी नुसती right-left असं सांगत होती आणि झेंडा आला की नुसती "झेंडा झेंडा झेंडा "असे म्हणून वेड्यासारखी किंचाळत होती...त्यामुळे अपूर्वा वैतागली होती...अरे कुठे आहे झेंडा ? जरा शांतपणे सांग की, पण नाही...अगदी अपूर्वाने swimming pool जवळून परत एंट्री केल्यानंतरही 3 झेंडे अगदी तिच्या हाताजवळ होते पण राखीने तेही तिला नीट सांगितले नाही....

हो का. मी voot वर बघेन, लवकर पोस्ट करत नाहीत तिथे एपिसोडस .

यावेळी राखी evict होईल. तिला तेवढाच वेळ असेल म्हणून ती जाता जाता सर्व ड्रामा करतेय.

कालचा राखी आणि अपूर्वाचा टास्क म्हणजे 2मि.38 सेकंदाच एक धमाल स्किट होत.हसून हसून पोट दुखायला लागल.आणि कहर म्हणजे दगड बाजूला होऊन अपूर्वा थेट चक्रव्यूहाच्या बाहेर गेली,लागल बिचारीलापण राखीचा एकंदरीत अवतार बघण्यासारखा होता,शेवटीशेवटी तर राखीला लेफ्ट राईट हे पण कळत नव्हत.कम्युनिकेशन चा तर पूर्णपणे अभाव होता.
बाकी सगळेच छान खेळले.
अक्षयला अपूर्वाने विचारल्यावर ,मला विचार करू दे, अस उत्तर अक्षयने का दिल ते कळल नाही. कारण आधीच्याच गाजराच्या टास्कमध्ये दोघही एकत्रच खेळत होते.
मला अजछनही वाटत की धोंगडे,प्रसादला ठेवून राखीला काढाव.तिला तिची प्राईजमनी बिबॉस देईलच कारण काही काळासाठी का होईना पण तिनेच शो जिवंत ठेवला.पण आता मात्र राखीपुराण बास.

राखीमुळे काल अपुर्वाने स्वतः चं हसं करुन घेतलं. खरतर अशा टास्क मधे राखीचा काही उपयोग नाही हे अपुर्वा ला कळु नये इतकी ती मूर्ख नाही पण केवळ अक्षय च्या रागापायी चुकीचा निर्णय घेतला असे वाटले. अक्षय विचार करतो म्हणाला तेव्हा अपुर्वा ने निदान माने ना तरी विचारायचं.गेला बाजार धोंगडे पण चालली असती. पण ते म्हणतात ना की रागात घेतलेले निर्णय घात करतात तसं झालं.अपुर्वा च्या घरच्यांनी येउन विनाकारण अक्षय बद्दल बोलुन तिला कंन्फ्युज केलंय. खरतर अक्षय अपुर्वाच्या पाठीत खंजीर वगैरे खुपसतोय असं इतके दिवस कधी दिसलं नाहिये. तिचा सगळा फोकस हलला हे असं सांगितल्या मुळे. दोघं एकमेकांना सांभाळुनच आलेत इथवर. असो. बिबॉ ने सांगितलं असेल तसं सांगायला तर माहित नाही.

प्रसाद काल कधी नव्हं ते नीट खेळला. शांतपणे सांगत होता. एरवी गोंधळल्यासारखं वागणारा प्रसाद हाच का असा प्रश्ण पडावा. आरोह पण मस्त खेळला. शेवटच्या ३० हजाराच्या मोहात पडलो असं लगेच बरोबर स्वत: चं अ‍ॅनॅलिसिस पण केलं आणि प्रसाद ला शेवटच्या राउंड साठी योग्य सल्ला पण दिला.

संपुर्ण सिझन मधे कालचा टास्क पहिल्यांदाच आवडला. डोकं लावुन छान बनवला होता. असे अजुन ३-४ टास्क बनवले असते तर हा सिझन पण जरा बरा झाला असता.

काल अपुर्वा चं वाढदिवस सेलिब्रेशन का नाही दाखवलं ? बाकी सगळांचं दाखवलं आहे आतापर्यंत. पण कालच नाही दाखवलं. वूट वर मस्त प्रिन्सेस ड्रेस वगैरे घालुन दिसली अपुर्वा. छान दिसत होती एकदम.

राखीमुळे काल अपुर्वाने स्वतः चं हसं करुन घेतलं. खरतर अशा टास्क मधे राखीचा काही उपयोग नाही हे अपुर्वा ला कळु नये इतकी ती मूर्ख नाही पण केवळ अक्षय च्या रागापायी चुकीचा निर्णय घेतला असे वाटले.>>>exactly...नको तिथे इगो दाखवणे चांगलेच महागात पडले तिला...
प्रसादचं जरा अतीच कौतुक होतंय सोशल मीडिया वर...त्याने एकट्याने 5 लाख मिळवले वगैरे...खरंतर तो इतरांसारखाच खेळला...पहिल्या चान्स मध्ये त्याने झेंडेच गोळा केले...अक्षय सोबत second चान्स मिळाल्यामुळे त्याला अजून गेम improve करता आला.. तो छानच खेळला पण सोशल मीडियावर त्याच्यावर जी स्तुती सुमने उधळली जात आहेत ती जरा जास्त वाटली...

काल अपुर्वा चं वाढदिवस सेलिब्रेशन का नाही दाखवलं ?>>हो ना..actually एक promo पण आला होता ना ज्यात प्रसादने अपूर्वा साठी एक कविता सादर केली होती..

प्रसाद टाईम कॅल्क्युलेशनमधे चांगला असावा, त्याने घड्याळ टास्कमधे पण थोडक्या सेकंदासाठी चुकवलं होतं, नाहीतर अपुर्वापेक्षा उत्तम होता तो.

प्रसाद फॅन तो चुकला की जुजबी बोलतात, काल कौतुकाची वेळ आली तेव्हा भरभरुन ओसंडून कौतुक. अक्षय पण चांगला खेळला की, प्रसाद पटपट सांग असं तो खेळताना सांगत होता.

अक्षयला अपूर्वाने विचारल्यावर ,मला विचार करू दे, अस उत्तर अक्षयने का दिल ते कळल नाही >>> त्याआधी धोंगडेशी बोलताना, धोंगडे म्हणालीना तिची आई आणि मामा काहीतरी सांगून गेलेत तिला त्यामुळे अक्षयने योग्य केले आणि माने यांनी तिचा समज करुन दिला की अक्षय तुझ्यामागे खेळतो, खरंतर उलट आहे. अक्षय बरोबर नसेल तर अपूर्वा कधीच टास्क नीट खेळत नाही, काल अक्षयने योग्य निर्णय घेतला, तोंडावर आपटली अपूर्वा. टास्कमध्ये अगदी 90 टक्के अक्षय छान खेळतो. अपूर्वाने धोंगडेला सोबत घ्यायला हवं होतं.

बिग बॉसने काल प्रसाद फॅन साठी प्रसाद अक्षय जोडी करायला लावली की काय एकीकडे वाटतं . प्रसाद fans हवेत . प्रसादने शेवटचा निर्णय बरोबर घेतला अक्षयवेळी, तीस हजाराच्या मोहात न पडता exit सांगितलं.

समहाऊ जिंकवतील प्रसादलाच असं वाटायला लागलं.

.actually एक promo पण आला होता ना ज्यात प्रसादने अपूर्वा साठी एक कविता सादर केली होती.. >>> हो मस्त होती आणि अपूर्वा खरोखर एका परीसारखी सुंदर दिसत होती .

राखी ला काढा आता.. काय राडा केला काल... धोंगडे ला पण काढा.. डबल एविक्शन होउदेत... यडपट बायका..
प्रसाद इज बॅक... काल गेम सुरु व्हायच्या आधी संचाकल म्हणुन धान्याच्या त्या टब मधे कसली तरी काटकी/रुलबुक घालुन उंची मोजत होता. बिबॉ वरच डायरेक्ट अविश्वास ... मग मधेच म्हणाला की स्लायडर सरकवुन धान्य भरायचं आहे.. मग स्वतः च हसला.. मुद्दाम करतो का ओरिजिनलच आहे काय कळतच नाही.... आणि नंतर अपुर्वा च्या बाजुने खेळताना अक्षय ची स्लाईड उघडायची सोडुन उलट बाजुला ढकलुन अजुनच फिट करुन टाकली.... पैसे मिळवायच्या गेम मधला प्रसाद आणि हा प्रसाद मॅच च होत नाहित एकमेकांना...
अपुर्वा आणि अक्षय ने मैत्री निभावली शेवटी.. आता दोघात कोणाला तिकिट मिळतय फिनाले च बघु. पण कालचा गेम चा शेवट बघुन अक्षय ला मिळाले असेल असे वाटते आहे.

अक्षय ची स्लाईड उघडायची सोडुन उलट बाजुला ढकलुन अजुनच फिट करुन टाकली.....
अक्षयची स्लिट स्मूथली सरकतच नव्हती.प्रसादने आधी ट्राय केल होत पण झाल नाही म्हणून तो पूर्णपणे तोडायला गेला ,जे अशक्य होत.
अपूर्वाला सुध्दा नंतर ती नीट ओपन करता येत नव्हती.
आधीच्या राऊंडमध्ये सुदा मानेंना इझिली ती ओपन करता आली नव्हती.

डीजे तेजु पाहुणी म्हणून आली आहे. तिला कदाचित पुढच्या सीझनला वाइल्ड कार्ड म्हणून घेतील . आज असेल तिचा एपिसोड, कसली गोड दिसतेय ती. मला तीच एकमेव आवडत होती.

काल अजून पाच मिनिटं पुढे दाखवायला काय झालेलं, बावळटपणा.

काहीही म्हणा अक्षय अपूर्वामध्ये अक्षय टास्क उत्तम खेळतो . धोंगडे अपूर्वाला भारी पडत होती. प्रसादचे वेगळंच चाललेले संचालक म्हणून, प्रसाद कमी पडला अक्षयपुढे, प्रयत्न चांगले करत होता पण माने भारी पडले अक्षयवर, अपूर्वाला तिथे जावं लागलं. अक्षयचे डोकं टास्कमध्ये भारी चालते. त्याने सरकत सरकत अपूर्वाचे कसे काढलं, प्रसाद त्याला अडवू शकला नाही . काल लगेच काही प्रसाद fans त्याने मुद्दाम केलं, अपूर्वा त्याला सतत टार्गेट करायची असं म्हणत होते. संचालक म्हणून प्रसाद कसला गोंधळ घालत होता, मुद्दाम करत होता का कळायला मार्ग नाही.

अक्षयची स्लाईड घट्ट असेल तर माने यांनी ऑब्जेक्शन घ्यायला हवं होतं . प्रसाद नंतर पूर्णच पाडायला निघाला होता, आधीच्या सीझनच्या अनुभवावरुन बिग बॉस ने ते मशीन एकदम फिट बसवलेले .

आता प्रसाद आणि अक्षयमध्ये निवडीची वेळ आली तर मी प्रसादला नाही निवडणार.

राखी जाईल नक्कीच, धोंगडेला पण काढा. तिला काढायचे नाहीत, ती अपूर्वा पुढे जावेत म्हणून देशमुखला काढलं या लोकांनी.

प्रसादला राखी छान मार्गदर्शन करत होती, प्रसादच्या शेवटच्या गहू भरण्यामुळे अपूर्वा जिंकली. प्रसाद फॅन्स जबरदस्त खुश आज .

अक्षय बाजूची खिटी फिट नव्हती, पडले गहू नीट तिथून.

अपूर्वाने अक्षयला शेवटी छान पकडलं.

राखीने अपूर्वासाठी किती आरडाओरडा केला!
त्यामुळे अक्षयचं मोराल डाउन झालं असेल. नाहीतर तो प्रसाद पेक्षा फिट वाटतो.
राखीने निकालसुद्धा छान सांगितला.

Actually मला वाटलेलं बिग बॉस तिलाच बड्डे गिफ्ट देईल फिनालेचं, अक्षयला जिंकवायचं असतं तर आधी बझर दाबला असता.

अक्षय खेळला छान, अपूर्वा होती म्हणून शेवटी फार ताकद लावली नसेल, नाहीतर त्याला ऐकून घ्यायला लागतं ना, मुलीना कसा पकडतोस, ताकद लावतोस.

तेजुला थोडाच वेळ आणली. गोड दिसत होती.

आता बोअर चाललंय. नेहा बोअर करतेय. स्मिताला बघून छान वाटलं, ती चमकते दिसण्यात. उत्कर्ष ऐवजी विकास किंवा मिनलला बघायला आवडलं असतं. मेघाला नाही बोलावलं .

Pages