भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑस्कर ने फारच भाबरवुन टाकले कि ... ओडिन आणि हॅरी पण सेम ... आता मला आमच्या एलोन ला बिना लीश चे फिरायला घेऊन जाताना भीती वाटेल

तुम्हाला अगदीच त्याला बरोबर न्यायची प्रचंड इच्छा होत असेल ना असला क्यूटनेस पाहून - मला तर रोज इलॉनला ऑफिसला घेऊन यावेसे वाटते
एकदा नवरा आणि मुले बाहेरगावी गेले होते . नवरा रोज ऑफिसला निघताना एलोनला गाडीतून चक्कर मारून आणतो. त्यादिवशी नवरा बाहेरगावी होता म्हणून मी त्याला चक्कर मारून आणली . एलोन घरी गेला मी ऑफिसला आले . दुसऱ्यादिवशी पण मी त्याला चक्कर मारायला घेऊन गेले परत घरी आले तर साहेब कुठे गाडीतून उतरायला तयार .. ढीम्म हलेना . मी बाहेर आले , गाडी बंद केली ... ओढून बघितला , मी गाडी उघडी ठेवून घरी गेले , गॅलरी मधून त्याला हाक मारल्या , ट्रीट दिल्या , मी गाडीत बसून आणि बाई बाहेरून त्याला ओढतीये ... पण नाहीच ... जवळजवळ तास भर हा खेळ चालला ... तितक्यात माझी बहीण तिचा भूभू घेऊन आमच्या घरी आली ... खरतर एलॉनला आमच्या घरी कोणताही भुभु आलेले चालत नाही पण त्यादिवशी तो आमच्या घरी गेला तरी एलोन गाडीतुन उतरला नाही ... शेवटी मी त्याचे सामान खाऊ गाडीत भरले आणि त्याला ऑफिस मध्ये घेऊन आले ..ऑफिसपाशी आल्यावर मात्र एका मिनिटात खाली उतरला ... दिवसभर माझ्या केबिन मध्ये बसून राहिला एक मिनिट मला सोडले नाही.
आता दुसरा दिवस .. कालच्या अनुभवावरून मी असे ठरवले कि सकाळीच त्याला टेकडीवर चक्कर मारून आणावी , घरी त्याला ठेवावे आणि हळूच त्याची नजर चुकवून ऑफिसला जावे. सकाळी चक्कर झाली .. घरी आलो ... मी खाली उतरले पण एलोन कुठे उतरतोय ... सकाळचे ७.३० वाजले असावेत .. मी गाडी उघडी ठेवून घरी आले .. माझे सगळे आवरले तरी हा गाडीत बसून होता . चुकूनही खाली उतरला नाही ... आता मी जास्त वेळ न घालवता परत त्याला ऑफिसला घेऊन आले .
दुसऱ्यादिवशी मुले परत आली मग काही हा मागे लागला नाही.
आणि घरी कोणीच नसते असं नाही हा .. आजी आजोबा बाई असे सगळे असतात

अरे कसलं मस्त, एलॉन ची आयडीया भारी आहे. पण ऑफीसमध्ये त्रास नाही दिला काही, आणि बाकिच्या लोकांची काय रिएक्शन???

आज लोकसत्ताला गिरीश कुबेर यांचा लेख आला आहे. खूप सहीये, त्यातले जर्मन शेफर्डचे वर्णन अगदी चपखल आहे. त्यांनी लिहीलं आहे की त्यांच्यात एक रॉयल अलिप्तता असते. मी पाहिलेले सगळेच जर्मन शेफर्ड असेच होते. Happy

अरे कसलं मस्त, एलॉन ची आयडीया भारी आहे. पण ऑफीसमध्ये त्रास नाही दिला काही, आणि बाकिच्या लोकांची काय रिएक्शन???---- तो सतत माझ्याबरोबर माझ्या केबिन मध्ये बसून होता ... मी जिथे जाईल तिथे माझ्या मागेमागे .... बाकीचे लोक जरा घाबरले पण नंतर सवय झाली त्यांना

आमचा एकदा मी डिलीवरी पॅकेज दारासमोरुन घरात घेई पर्यंंत दार उंघडले तर
बाहेर गेला. पण घाईत लक्शात आलं नाही. २ मिनटांनी दरवाजा वाजतोय म्हणुन
उघडला तर बाहेर उभा राहुन पंज्याने दार वाजवत होता.
>>>>>>

ओड्याचे हेही करून झालं आहे. Happy एकदा कुणीतरी इलेक्ट्रीशयन बोलवला होता. ओड्या त्याच्या अंगावर जाऊ नये म्हणून बाबांनी त्याला खोलीत ढकललं, आणि त्या कामाच्या नादात बाबांचे दुर्लक्ष झाले. नंतर तो दिसला नाही तर त्यांना वाटलं वरती गेला असेल कारण मी वरती काम करत बसलेलो असतो, त्यामुळे ओड्या कधी खाली कधी वर असा कुठेही हिंडत असतो. आणि बाबांनी जाताना इलेक्ट्रिशयनला सांगितले की आठवणीने मेन गेट बंद कर, आमचा भुभ्या बाहेर पळेल नाहीतर. आणि तोही नीट गेट बंद करून गेला.

नंतर कधीतरी बाबा बाहेर निघाले तेव्हा हा गेटच्या बाहेर उभा. त्यांना एकदम धक्काच, हा बाहेर कधी गेला आणि आपल्याला कळलं कसं नाही. तोही निवांत होता अगदी. बाबा म्हणे मनसोक्त हिंडून आलेला वाटत कुठून तरी आणि कुणीतरी गेट उघडेल याची वाट बघत बसलेला. गेट उघडताच शांतपणे आत आला आणि नेहमीच्या जागेवर बसला.

नो गिल्ट, नो रिग्रेट्स

आज लोकसत्ताला गिरीश कुबेर यांचा लेख आला आहे. आशुचँप लिंक देता का? मी ऑनलाईन शोधला पण सापडत नाही.

खूप गोंडस फोटो
माव्या तर फुल्ल स्टाइल मध्ये चीझ म्हणतोय असं वाटतंय Happy

गिफ्ट म्हणून काय मिळालं त्याला यावेळी

माव्याची फार मज्जा आली. त्याच्यासाठी छोट्या टॉइज चं गिफ्ट पॅक मिळतं ते आणलेलं होतं. त्याच्यासोबत घरातल्या सगळ्यांचीच गिफ्ट रात्री ट्री जवळ ठेवली होती. सकाळी उठून मी खाली आले तेव्हा माझ्यासोबतच माऊई आला खाली, आणि तडक ट्रीजवळ गेला! कसे इतके चटकन समजले असेल की रूम मधे काहीतरी बदलले आहे ते!! इतकेच नाही तर त्याचे गिफ्ट कोणते हे ही त्याला समजले आणि तेच पंजाने ओढून ओढून काढले बाहेर!! उघडून देते थांब म्हणले तर ऐकेना. शेपुट जोरदार हलवत ते घेऊन घरभर फिरला आधी. मग लक्षात आले असावे की बाबा आपल्याला मदत च करायची ऑफर देतोय. मग आणुन ठेवले त्याच्या पायापाशी. पण ते उघडेस्तोवर दम नव्हता त्याला! उघडल्यावर घेऊन पळाला आणि लांब जावून एक एक टॉय काढत बसला Happy फार मज्जा आली त्याला बघायलाच. हा एक व्हिडिओ केला त्याचा :
https://youtu.be/2gk8mgltCzw
Happy

कसला क्युट आहे व्हिडिओ
माव्या च्या चेहऱ्यावर खट्याळ आणि डामबीसपणा चे मिश्रण आहे

गोंडस!

आमच्याकडून बिलेटेड विशेस Happy

2AFE262A-2EEF-46D9-8628-1D06CF43240E.jpg826EAA78-CD7C-4F69-8E3E-E23F22D28507.jpg

हा सगळ्यात पहिला ख्रिसमस ट्री ते आल्यानंतर. धुमाकुळ घातला होता खरं वाटलं की काय झाड माहित नाही. गदागदा हलवून सगळे ऑनमेंट्स घरभर पसरले.

https://www.youtube.com/shorts/IdSXG4ae5NU

Pages

Back to top