( मायबोली टंकनास येत असलेल्या अडचणींमुळे व अप्रकाशित सुविधा नसल्याने तसेच इतर एडीटर्सचा सराव नसल्याने इथेच पुढचा भाग अपडेट करत पूर्ण केले जाईल. वाचनखूण म्हणून संपादन १, २ हे कीवर्डस दिले जातील ).
एक.
मुरबाडच्या पुढे डोंगरदर्यात समतलपृष्ठावर सेट लागलेला आहे.
एक गाव दिसते. गावाकडे जाणारी नागमोडी वाट. वाटेवर एक भली थोरली शिळा. या शिळेवर बसून काही महान लोकांनी तंबाखू मळली असेल. शिळेला नागमोडी वळसा घालून वाट पुढे गावात शिरते.
गावात शिरताना एक मनुष्य कापूस पिंजत बसलेला आहे. बहुधा हा विणकर असावा. विणकर कापूस पिंजतात. त्यामुळे बहुधा हा शब्द इथे अनाठायी समजावा. हा विणकरच आहे. विणकराने गावाच्या सुरूवातीला बसावे ही प्रथा महान राजे रमेशचंद्र सिप्पी, प्रथम , विसावेघशतक यांच्या कारकिद्रीत सुरू झाली. कारण कापूस पिंजतानाचा आवाज आणि त्याचे एकतारी गांडीवासमान (अक्षरे गाळू नयेत) टणत्कार यामुळे वातावरणनिर्मिती होते हे सिप्पींचे दरबारी संगीत कोहिनूर राहुलदेव बडमन यांनी सांगून ठेवले आहे. तर हा टुंग टुंग आवाज वातावरणात भरलेला आहे. लोहार तापलेल्या लोखंडी सळईवर घणाचे घाव घालत आहे. या दोन आवाजांनी ताल धरला आहे. यावर मायबोली नामक संस्थळावर हा झपताल असावा कि केरवा कि सात मात्रेचा विलंबित अशुद्ध ताल ही चर्चा रंगण्याची दाट शक्यता असल्याने सध्याचे संगीतमंत्री विशाल ददलाणी (वाचनमित्र) यांनी मुद्दामच गूढताल टाकला असावा.
लोहार लोखंड का तापवत आहे, त्याला ग्राहक कोण असे प्रश्न पडत असताना एक लहान मूल नेमाने रस्त्यात येते. त्याची आई कामात गुंगलेली आहे. बाजार सुरू होताना अनेक विक्रेते आपापला माल घेऊन बसले आहेत. या सर्वांना प्रतिदिन चाळीस रूपये सिप्पीकाळात मिळत असत. आता चाळीस रूपयात कोण येतं ? निवडणुकीच्या काळात रोजचे दीडहजार मिळतात असे या कलाकारांनी सांगितले आहे. यावर वाद झाले तेव्हां शाहरूख खानास शंभर कोटी आणि आम्हाला बाबा आदमच्या जमान्यातले का असा आर्त सवाल कलाकार संघाने विचारला.
आता घोडे गावात प्रवेश करणात असे वाटत असतानाच गावात मोटरसायकल्स शिरतात.
प्रत्येकाकडे स्टेनगन आहे. याचाच अर्थ यांच्या मुखियाकडे Vickers machine gun ७२० मिमी २३ किग्रॅ, १.१२ मीटर लांब अॅटोमॅटिक गन असणार हे उघडच आहे. गावकर्यांकडे फारतर फार एअरगन असतात. त्यावर ते किती काळ तग धरणार ?
बाजारपेठेत असलेल्या बिक्रेत्यांना मोटारसायकल स्वार विचारायला लागतात.
"कितना धंदा हुआ ?"
" एक एलएसडी गया "
" बस्स ? "
" अभी ग्राहक आ रहे है ?"
" और तेरा रे कालिया ?"
" हेरॉईन ३ किलो बेच दी "
" शाब्बास "
सगळ्यांचा आढावा घेतल्यावर उपखलनायकासारखा वाटणारा पण प्रत्यक्षात उप उपांत्य खल पुरूषाचा तूतीय सहाय्यक असलेला पण सध्याचा चमूनायक म्हणतो " सरदार बहुत खूस होगा, साबासी देगा "
" जी हां. ३०० करोड का धंदा इदरच हुआ है "
" लेकीन बायकॉट का क्या करेंगे ?"
" अरे इस माल कि एक बार नशा हो जाये तो बायकॉट क्या तावडे भी कुछ नही कर सकता "
" तावडे कौन ? विनोद ?"
" नही नही, उन्हें तावरे कहना था शायद "
" अबे पढने के नाम पे भूखे नंगो साहबजादों, वो तो टंग ऑफ स्लीप हो गयी. मुझे ट्यावरे कहना था. नाम सुना है कि नही ? सिप्पी जमाने का बहुत ही ताबडतोब खिलाडी था "
" ताबडतोड ?"
" अबे क्या फेकता है बे ? बायकॉट ट्यावरे ने पांच दिन खेलकर सौ रन बनाए थे "
" चुप बे, हम डाकूओं के विशेष ग्यान पर टिप्पणी नही किया करते "
" तो आगे क्या करे सुभेदार मेजर ?"
" शाम तक रूक के कलेक्शन ले जाते है "
" शाम तक यहा पर रूकना रिस्की है "
" तो चलो छमिया के अड्डे पर "
" आं आं आं मेजर बडे आशिकमिजाज निकले आप तो. चलिए आज बेशर्म रंग है "
" चलिए लंगोट पहन के "
" लंगोट क्युं "
" अबे बेशर्म , ऐसी जगहों पर वेल ड्रेस्ड होकर जाना पडता है. तू तो साला डाकू का डाकू ही रहेगा, धोती सदरा और मॅग्झीन वाला "
सीन टू
मुरबाडच्या मुरमाड जमिनीत हिरवीगार फार्महाउसेस आहेत आणि तिथे पंचमहातलावाचे दर्शन एरीयल व्ह्यू मधून होतेय. अनेक वेल ड्रेस्ड (लंगोट नेसलेल्या) ललना आपल्या अॅसेटसना झोके देत नृत्य करत आहेत. तिथे एक केसाचा केविलवाणा अंबाडा बांधलेला पुरूष पोटाला एफरापीचे टेन पॅक्स लावून फिरताना दिसत आहे. ( या धटिंगणा सोबत आता जी नाभिंगना नृत्य करणार आहे तिच्या पहिल्या सिनेमा च्या वेळी या महाशयांना सिक्स पॅक होते. त्या चित्रपटानंतर जन्मलेल्या पिढीतल्या एका बालकाने काही वर्षांनी हा चित्रपट पाहिल्यावर कळते झाल्यावर "बाबा बाबा मला एक पॅक आला असे पोट दाखवून म्हटले होते. ते बालक लेखकाचे सुपुत्र होत जे आता शाळेत जाणे येणे करत असतात).
हे गाणे सुरू होते आणि थेटरात हर हर महादेव, जला दो जला दो च्या घोषणा सुरू होतात. एकच तांडव माजते. पडद्यावरचा भीमपराक्रम पहावयास आलेले प्रेक्षक भीतीने अर्धमेले होतात. गाणे पॉज होते तेव्हां नाभींगणा दीपिका पादुनको ही भगव्या रंगाचा लंगोट नेसलेली आहे असा आरोप होतो. त्यावर एक प्रेक्षक " मी बोलू का थोडं ? हा रंग सोनेरी आहे, भगवा नाही "
यावर खवळलेले लाठीभगवे म्हणतात " जास्त माज आला का ? महाराजांनी सांगितले भगवा म्हणजे भगवा. मग हिरवा का असेना "
यावर कुणीच प्रतिवाद करत नाही.
आता थेटर जाळण्याची तयारी सुरू होते.
इतक्यात " जय जय रघुवीर आचार्य " अशी हाळी ऐकू येते .
एक भगवा लंगोट नेसलेले तेजःपुंज मळकटसे गृहस्थ प्रवेश करतात.
लाठीभगवे त्यांना नमन करतात.
"आपण कोण महाराज ?"
लंगोटधारी स्मित करतात.
"उठ मूढबालक. मीच तो या धाग्याचा लेखक "
" आचार्य !"
"बालक "
" आपण स्वतः का येणे केलेत ?"
" बालका जिथे मीच हे वस्त्र परिधान करतो. तिथे या बालिकेस ना बरे बंदी ?"
" आचार्य, आपली आणि बालिकेची तुलना कशी बरे व्हावी "
" कोण बालिका मूढबालक "
जीभ चावत " माफ करा बालिका आपणासाठी. आमच्या साठी अश्लील नृत्यनिपुण धिंगाणाक्वीन नाभींगना दीपिका"
" बालक, तिचा काय दोष त्यात ? चि. बालक रणवीर जे राष्ट्रजावई आहेत ते तर इतकेही वस्त्र नको म्हणतात. ते कसे बरे चालले आपणास ?"
" महाराज, ते निर्वस्त्र होऊन फिरले हे आम्हास मान्य आहे. पण त्यांनी भगवे वस्त्र परिधान करून त्याचा अवमान नाही केला. शिवाय ते जे एन यूत सुद्धा गेलेले नाहीत. अर्थात function at() { [native code] } त्यांनी फंक्शन कोड नेटिव्ह कोड जरी भगवे परिधान केले तरी हरकत का असावी ?"
" फंक्शन कोड ? आम्हास उमजले नाही "
एक भगवा कानात काहीतरी कुजबुजतो. आचार्यांचे डोळे विस्फारतात.
"यू मीन कंडोम ?"
"कंट्रोल सर कंट्रोल "
" हम जानते है, हम जानते है . हम सब कुछ जानते है. हम देख रहे थे कि आप जानते है या नही "
" जी सर "
" तो हम कह रहे थे कि कंडोलन्स "
" कंडोम सर कंडोम "
" बाई द वे पेक्षा बरं नाही का हे ?"
" एक डाव माफी असावी डॅडी "
" चुकीला माफी नाही "
" आचार्य हमने आपकी कसम खाई है "
" अब गोली खा "
असे म्हणून आचार्य हमजोलीच्या गोळ्या देतात. ( इथे हजमोला पाहीजे होतं हे सांगण्यात अर्थ आहे का ?"
" तर मुद्दा असा आहे कि आम्ही स्वत:च भगवा लंगोट परिधान करून भ्रमण करत असताना आपण या बालिकेस लंगोट नेसून यत्र तत्र सवत्र भ्रमंती करण्याचा हक्क नाकारू शकत नाही. "
" महाराज प्रत्यक्ष आपल्याबरोबर बालिकेची बरोबरी ?"
" बालिका ? कोण बालिका ?"
जीभ चावत " माफ करा. बालिका आपल्यासाठी. आम्हासं तर साक्षात अश्लील नृत्यनिपुण धिंगाणादेवी नाभिंगणा दीपिकाच "
" असे का बरे बोल लावता ? आपणास स्मरत असेल तर बालिकेचा पती राष्ट्रजावई लंगोटहीन अवस्थेत प्रकाशचित्र यंत्रात कैद झाला होता "
कट कट .. हे संवाद झाले आहेत.
मग स्क्रीप्ट मधे का ?
ओह ते लूपलपेटा मुळे झाले असावे. माफी असावी.
पुढचा संवाद घ्या .
"मूढ बालक , जर नृत्यनग्निकेस ( बाई दि वे ७८६ ) नृत्यगणिकेस नृत्यांगणेस जर आपण सुखैनैव नृत्य करू दिले नाही तर आम्ही या कूपमंडीकेतील जल आपणावर शिंपडून सर्वांना भस्म करू"
" कमंडलू म्हणायचे होते का सर आपणास "
" उप - मर्द बालक ! याचा आयडी घालवा आदमखोर शिष्यगण "
आचार्यांचा रूद्रावतार पाहून चित्रपट पुन्हा सुरू होतो.
पुढे..
वाह..!!
वाह..!!
भारी लिहिलेय
भारी लिहिलेय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त... पुढे लिहा लवकर...
मस्त...
पुढे लिहा लवकर...
जबरदस्त
जबरदस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
येवू द्या पुढचे भाग !!!!!!!
अशक्य:) काहीही लिहिलं आहे हे
अशक्य:)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काहीही लिहिलं आहे हे
बाई दि वे ७८६ >> एका दगडात
बाई दि वे ७८६ >> एक फासा आणि दोन मासे.. शाहरूख आणि ऋन्मेष
येऊ द्या अजून ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धमाल, एकसेएक पंचेस आचार्य!!!
भारावून गेलेल्या जनांसाठी
भारावून गेलेल्या जनांसाठी आचार्यांनी चरणस्पर्शाची सोय देखील येथे उपलब्ध करून दिली आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भक्तांच्या सोयीसाठी बाबाजींनी
भक्तांच्या सोयीसाठी बाबाजींनी चरणांचे खास फेशीयल करून घेतलेले दिसते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लेखातील संदर्भ अजून पूर्ण
लेखातील संदर्भ अजून पूर्ण समजले नाहीत. बहुधा इथलेच पठाण बद्दलचे बाफ बघून व बहिष्कार बातम्या वाचून आणखी समजेल पण सध्या समजलेल्याची नोंदः
धनुष्याच्या नावातील अक्षरे वगळू नयेत हे आणि कलाकार संघाने या दोन शब्दांमधली अर्थपूर्ण स्पेस, तसे उपमर्द मधली स्पेस हे सगळे सुपरलोल आहे
रमेश सिप्पी संदर्भात तो सगळा पॅराच भारी आहे. बॉयकॉट टॅवरेही मस्त.
काहीही अशक्य लिहिलयं ....
काहीही अशक्य लिहिलयं ....![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
येऊ द्यात अजुन.. !!!
तुफान आहे. बाई दवे
तुफान आहे.
बाई दवे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तुम्ही इतर सिनेमाचे हि असेच
तुम्ही इतर सिनेमाचे हि असेच परीक्षण लिहा , फारच गमतीदार आहे लिखाण।
सॉलिद. एक्दम मस्त धमाल
सॉलिद. एक्दम मस्त धमाल लिहिले आहे. ते " चरणस्पर्शाची सोय" पन धमाल.
विसरूनच गेलो होतो या
विसरूनच गेलो होतो या धाग्याला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
पूर्ण करतो इकडे तिकडे प्रतिसाद देण्याचा मोह आवरून.
पुढचा भाग कधी?
पुढचा भाग कधी?
अरेच्चा ! या धाग्याचं आता
अरेच्चा ! अमित, या धाग्याचं आता काही उरलेलं नसताना का बरं उकरून काढला वर ?
पुढच्या भागाचे रूपये २५०० पडतील. घाईचे चार्जेस वेगळे पडतील.
माझे नाव कसे ओळखले
माझे नाव कसे ओळखले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सीक्रेट होतं का ?
सीक्रेट होतं का ?
( विषयांतराच्या कमेण्ट्स उडवून टाका)
काल वेळ जात नव्हता म्हणून
काल वेळ जात नव्हता म्हणून 'बेशरम रंग' पाहिले. ती भगवी बिकीनी काय लक्षात राहिली नाही. पण गोल्डन बिकिनीत ती आणि पूर्ण गाण्यात शाहरुख दोघेही इतके कळकट्ट दिसत होते की हमाम साबण लावून लूफाने घासून काढले असते तर एखादा सार्वजनिक गणपती बनवण्याइतका मळ निघाला असता.