भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना

ओड्या आणि दादूची धमाल होती आज नुसती
ओड्याला एक रंगीत लाईट लागणारा च्युई बॉल आणलेला गिफ्ट म्हणून
गडी इतका खुश झाला की विचारूच नका

दादू आणि मित्रांसोबत भरपूर खेळुब झालं
त्याला दादूचे एक जुने जॅकेट घालण्यात यशस्वी झालो पण केक कापेपर्यंत कसं तरी त्याने धीर धरला
मग काढून मोकळा ढकला झाला

यावेळीही त्याला श्वान फूड चा केक आणि त्यावर तीन स्टिक लावलेल्या

मग सगळ्यांसोबत बसून खाल्लं, एकदमच गुड बॉय होता आज

WhatsApp Image 2022-12-06 at 9.30.29 PM.jpeg

-

WhatsApp Image 2022-12-06 at 10.31.23 PM.jpeg

कालच्या जास्तीच्या एक्साईटमेंटचा आज परिणाम

सकाळी ओड्याला काय चालता येईना, उठता बसताना त्रास होताना दिसत होता, अक्षरश खुरडत खुरडत चालायला बघत होता. धास्तावलोच

अरे म्हणलं हे रे काय ओड्या? सगळीकडे बघीतलं कुठं जखम झालीये का, तर काहीच नाही, मांडीपाशी किंचित फोड असल्याचे वाटलं पण तिकडे दाबून पाहिले तर काही कुई नाही काही नाही.

त्याला पायरी पण उतरता येईना. पॉटी गच्चीतच केली. मग शेवटी हे बाळ उचलून खाली आणलं. तिकडे सगळ्यांकडून लाड करून घेतले. पण इतका अचानाक काय झालं कळेना. शेवटी व्हेट ना फोन केला, ते नेमके बिझी होते, म्हणाले संध्याकाळी ७ नंतर जमेल तोवर त्याला विश्रांती घेऊ द्या.

मग दादू आल्यावर त्याने पाहिलं आणि म्हणाला मसाज करतो त्याला. म्हणलं नको, उगाच काहीतरी भलतेच होईल. पण त्याने ऐकलं नाही म्हणाला, तो जराही अस्वस्थ वाटला तर लगेच थांबेन. मग त्याने मसाजर घेऊन त्याच्या पायावर, मांडीवर फिरवला.

मग मीही त्याला ढुंबीपासून अंगठ्याने चेपत चेपत पाय, शीरा मोकळ्या केला. ते केल्यावर महाराजांना गुंगी आली आणि मस्त तणावून झोपले.

संध्याकाळी उठला तेव्हा बऱ्यापैकी ओके वाटत होता. गंमतीत म्हणलं जायचं का ग्राऊंडवर. तर उड्या मारत तयार. मी अवाक, म्हणलं अरे सकाळी तुला पाय उचलत नव्हता एक, आता उड्या मारतोयस. काही लाज लज्जा बाळग. तिकडे ग्राउंडवर पण भरपूर पळापळी केली, पण काही झालं असेल तर उगाच लोड नको म्हणून आवर घातला आणि घरी आलो.

व्हेटकडे नेलं ते म्हणे अहो हा तर ओक्के आहे एकदम. म्हणलं सकाळी व्हिडीओ काढायला पाहिजे होता. कंबरेपासून लुळा पडल्यासारखं करत होता. म्हणाले जास्त व्यायाम केला का काल. म्हणलं वाढदिवस होता त्याचा, म्हणून खूप खेळला. म्हणाले हा, मग त्यामुळेच कुठंतरी मसल स्पाझम आला असेल आणि इक्साईटमेंट मध्ये त्याच्या लक्षात आलं नसेल. सकाळी लॉक झाला असेल त्यामुळे.

मला तरी अजिबात काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. मग तो फोडपण दाखवला, तेही म्हणे अगदी किरकोळ आहे.

मग काय वाढदिवसाबद्दल डॉ कडून पण ट्रीट वसूल केली, त्यांना शेकहँड करून महाराज घरी आले.

म्हणलं उगाच च्यायला जीवाला घोर

अर्रर्र ओडिन ने चांगलेच घाबरवले की! चला पण फारसं काळजी करण्याचे कारण नव्हते ते बरं झालं! फार टेन्शन देतात ही मंडळी Happy

फार सुंदर लिहलं आहे
शेवटचा पार्ट तर अगदी काळजाला घर पाडणारा
भुभूपायी काय सोसलं आहे बाईंनी

मला हे वाचून मामींचीच आठवण झाली

अरुणा अंतरकर>>>>>>> सिने पत्रकार आहेत या.
भुभूपायी काय सोसलं आहे बाईंनी>>>>>>>> खरंय.. अनकंडिशनल लव फोर अ‍ॅनिमल्स
अगदी ‘गेला माधव कुणीकडे’ सिच्युएशन!>>>>>>>> या वाक्याला तर फुटलेच मी Lol

मांजरं काहीही वागू शकतात. त्यांच्या बाबतीत लिहिलेला शब्द न शब्द खरा आहे. तेच आपल्याला पाळतात. त्यांची मर्जी तोरा अलिप्तता निर्विकारपणा सगळं आहे पण तरीही लाडके.

सॅमीच्या बाबतीत असंच होतं. ती खूप बुजरी आहे पहिल्यापासूनच. फार लोकं असली की लपूनच बसते तासन तास. पण घरात आमच्यापैकी एकच कोणी असेल तिथे तिथे जाते मग . सोडत नाही. मंकीने फार मागे लागलेलं आवडत नाही. टपल्या मारते त्याला सारखी आणि हिस्सफिस्स चालूच असतं. पण तो बाहेरून खूप वेळाने आला की त्याच्या मागे मागे करते. Proud

मंकी थोडा माणसाळू आहे. त्याला चालतं नवीन लोकं आली की उलट वास घ्यायला जातो. मुलाशी फार त्याचे लाड चालू असतात. मुलगा आंघोळ करून आला की त्या दोघांचा अगदी दिनक्रम ठरलेला आहे. दमट टॉवेलच्या आजूबाजूला लोळत राहणार, मुलाच्या डोक्याला डोकं घासणार, पायात पायात करणार. मजाच सगळी.
माझ्याकडे कधीही लहानपणापासून कोणतेही पेट्स नव्हते. मांजरी यायच्या त्यांचा उच्छाद आणि भिती दोन्ही कॅटेगरी वाटायच्या. भारतातले कुत्र्यांचे अनुभवही फार काही प्लेझंट नाहीयेत.
पण इथे आल्यावर समहाऊ पेट्स दिसणं, बघणं इतकं अंगवळणी पडलेय की आता भिती गेली बर्‍यापैकी. तरी आधी मी अजिबात घरात पेट्स नको याच विचारांची होते . पण आता या २ माऊंनी मला पूर्ण बदलवलं. आता मुलगी म्हणते पण आई तू आधी किती घाबरत होतीस. आता तुच जास्त लाड करते. Happy

हे स्टँडर्डच आहे बहुतेक, घरातले जे मेंबर पेट्स नको म्हणातात त्यांनाच हे भुभूज आणि माऊज जोरदार कन्वर्ट करून टाकतात Happy
आमच्या इथे आल्या आल्या काहीच दिवसांत आज्जी आणि आबांचेही रीतसर कन्वर्जन झालेले आहे! सकाळी उठल्या उठल्याच माउई आणि ऑस्कर ची जोडगोळी हॅ हॅ करत स्वागताला तयार असते. ते बाहेर वॉक ला निघाले की आम्हाला पण न्या असा हट्ट आणि ते परत आले की दारातच झोंबाझोंबी Happy आता आजी आबांनाच करमत नाही ते दोघे झोपले किंवा बाहेर गेलेले असले की.
.
परवा आम्ही फॅमिली फोटो सेशन करत होतो. अर्थातच माउई ऑस्कर चे भरपूर फोटो झाले पण पैठण्या वगैरे नेसून आम्हाला वेगळे फोटो काढायचे होते. खुर्ची , टेबलावर फोन ठेवून टायमर लावून सेल्फ्या घेणे सुरु होते तर ही जोडगोळी प्रत्येक फोटोत लुडबुड! पोज घेतली की अगदी लास्ट मोमेन्ट ला मधेच येऊन पार्श्वभाग दाखवणे किंवा फोनलाच जाऊन हुंगणे - ( अ‍ॅज अ रिजल्ट आमच्या फोटो ऐवजी यांच्याच डोळे आणि / किंवा नाकाचा क्लोजप काढून घेणे!) असे सुरु होते. शेवटी त्यांना दोघांना उचलून वर नेले आणि जिन्याला पपी गेट लावले तर उलट पावली दोघे खाली येऊन पपी गेट पाशी हे असे बसले आमच्याकडे बघत Lol चेहर्‍यावर लुडबुडायला न मिळाल्याची नाराजी स्पष्ट दिसते आहे!IMG_5034.jpg

अगदी ‘गेला माधव कुणीकडे’ सिच्युएशन!>>>>>>>> या वाक्याला तर फुटलेच मी>>>> हो ना, कसलं दंबिस असेल ते Happy

आता मुलगी म्हणते पण आई तू आधी किती घाबरत होतीस. आता तुच जास्त लाड करते>>> सेम माझ्या बायकोसोबत
ओड्या सगळ्यात जास्त तिचा लाडोबा झालाय

माव्या आणि ओश्कु चे इंस्टा व्हिडीओ धमाल आहेत
दोघे एकदम शहाण्या बाळासारखे एकेक घास भरवून घेत आहेत तो
आणि तो बागेत खरूताईकडे खिडकीतुन बघताना

अशक्य धिंगाणा घालत असणारेत दोघे मिळून

हो ना, फार मजा करताहेत दोघे. सगळे एक साथ. पॅक मेन्टॅलिटी दिसत आहे. ऑस्कर ला त्याच वेळी जेवायला नाही दिले तर माउई जेवणाला तोंड लावेना. अशी तर्हा.
परवाची अजून एक मजा, दोघे बॅकयार्ड मधे होते. माउई चे बहुधा पोट ठीक नव्हते, गवत खाऊन उल्टी काढत होता. नेमका तेव्हाच एक कोल्हा बॅकयार्ड च्या फेन्स च्या पलिकडे पण अगदी जवळ आला. माउई जरा वीक सिचुएशन मधे आहे ते बघून ऑस्कर धावून जाऊन इतका जोरदार त्या कोल्ह्यावर भुंकला!! पार जमिनीवर अ‍ॅग्रेसिवली पाय घासून वगैरे हाउलिंग करत होता. कोल्ह्याला पळवून लावले त्याने एकट्याने!! आम्हाला बघायला फार मजा वाटली. एवढासा तो जीव पण एकंदर अवतार असा होता की हा कुणीतरी मोठ्ठा पावरफुल कुत्रा आहे! Happy
आता पुढच्या आठवड्यात ऑस्कर घरी जाणार परत. माउई चे आता कसे होणार याची आत्ताच चिंता लागली आहे!!

मै.. हा फोटो इन्स्टावर बघितला होता त्याची गोंड्स बॅकग्राऊंड आत्ता समजली Lol
फार गोड आहेत यार हे दोघं. खरंच कसं होणार ऑस्कर घरी गेला की.

कोल्ह्याला पळवून लावले त्याने एकट्याने!!>>>
कसलं।भारी, खरीखुरी भावंड झाली ही तर

हो ऑस्कर घरी गेल्यावर माव्या हैराण करणार तुम्हाला
आमच्या इथं तो बुलेट शेजारच्या घरून दुसरीकडे गेला तरी ओड्या अजून तिथं जाऊन बघतो आलाय का परत म्हणून

त्यांचं बॉंडिंग फार डीप असतं आपल्याला कल्पनाही येणार नाही इतकं डीप

ओडु बाळाचा तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला व्हिडीओ >>> फार फार आवडला व्हिडीओ. किती गोड बाळ आहे हे!

सॅमी आणि मंकीच्या तर्‍हा वाचताना मजा आली.

मै, फोटो बाँबिंगच्या या नवनवीन आयडीया वाचून गंमत वाटली. फोटोत कसले निराश दिसतायत दोघे लुडबूड करता येत नाही म्हणून. ऑस्कर आणि माऊईचं बाँडिंग उत्तम जमलेलं दिसतंय. ऑस्कर घरी गेला की दोघांचंही कसं होणार अशी काळजी वाटायला लागली.

ओडिन चा व्हिडिओ कसला मस्त! सगळे मूड्स बघायला मिळतायत Happy चंपी मालिश चा फार क्यूट! दादूबरोबर अभ्यास, स्विमिंग चा पार्ट पण मस्त!
भारी झालाय फुल व्हिडिओ.

Pages