Submitted by अनन्त्_यात्री on 2 December, 2022 - 09:09
सुपारीबाज टपोरीने खंडणीसाठी कानशिलावर टेकविलेला
निष्ठुर घोडा
घोडेबाजारात निष्ठेची झूल आडसाली बदलण्यात निर्ढावलेला
संधिसाधू घोडा
जितांनी केलेल्या जेत्यांच्या जयजयकारात गुदमरलेला
अश्वमेधी घोडा
बुद्धिबळाच्या कृष्णधवल अवकाशात अवघडलेला
अडिचक्या चालीचा घोडा
गर्निकाच्या युध्दविकल चौकटीत पिकासोने कोंडलेला
टाहो फोडणारा घोडा
व्याधविद्ध मृगनक्षत्राच्या झगमगत्या चौकटीत दडलेला
तेजोमेघरूपी घोडा
बहुरूपी घोडा
आता समजू लागलाय
थोडा
थोडा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छानच !
छानच !
धन्यवाद साद
धन्यवाद साद