Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक युट्युब व्हिडीओ बघितला म्हणजे ऐकला, ती युट्युबर बडबडत होती. अपुर्वा सांगत होती, ती पाणीपुरी रोज खायची, अगदी लॉकडाऊनमधेही, आता तिला इथे मिळत नाही. ती म्हणाली आईच्या पोटात असताना पण खायचे, तर युट्युबर खिल्ली उडवत म्हणाली, हे कसं शक्य आहे, तुम्हाला समजलं का. अक्कलशुन्य युट्युबर, अग बाई तिची आई खात असेल ना, ती तिला मिळणार नाही का.

अजुन एक अपुर्वा चा एक्स्ट्रा शॉट पाहिला त्यात ती सांगत होती की तिच्या भाची ला ३० हजार चं एक डॉल हाउस आवडलं होतं आणि ती हट्ट करत होती हवय म्हणुन पण इतकं महाग घेणं शक्य नव्हतं. म्हणुन भाची साठी अपुर्वा ने स्वतः घरी ३ मजली डॉल हाउस बनवलं. त्यात काय काय कसं कसं केलं ते ती छान रंगवुन सांगत होती. तिच्या भाची च्या रीअ‍ॅक्शन बघुन कसं वाटलं ते पण सांगत होती. ते सगळं ऐकताना पण मस्त वाटलं मला म्हणुन मी तिचं इंस्टा अकाउंट जाउन पाहिलं तर त्यावर फोटो आणि व्हिडिओ आहेत खरच या डॉल हाउस आणि भाची चे. असे सीन पाहिले की अपुर्वा एकदम गर्ल नेक्स्ट डोअर वाटते. आवडते एकदम.

ती आरडाओरडा अति करते म्हणून मागे पडते बाकी, एन्टरटेनर आहे .

इथल्या बऱ्याच जणांना जास्त पैसे देऊन आणलं असणार, कंटेट देण्यासाठी भांडतात, फ्लर्टींग करतात, नाहीतर काढतील.

यावेळी वूट वर वोटींगचे काही कळत नाही...... किती वोट्स दिले किती राहिलेत काही काउंटरच नाही!!
वोट्स देऊन देऊन हात दुखायला लागल्यावर बंद केले वोट्स द्यायचे!!

मागच्या वर्षी तिथे काउंटर होता!!

मी अजून गेले नाही वोटिंग करायला, मागे केलेलं नंतर गेलेच नाहीये.

दोन तीन देणार, ९९ नाही सध्या, हात दुखतो, हाहाहा.

सगळे कन्टेस्टन्ट्स आधीच्या सीझन्स ची कॉपी करण्याच्या नादात ओरिजिनॅलिटी आणि स्पोन्टॅनियसनेस हरवून बसलेले आहेत. आता एका प्रोमोत अमृता धोंगडेने टास्क मधे काहीतरी माळ की काहीतरी घेण्यासाठी जेल तोडले लाथ मारून असे दाखवत होते. ऑब्व्हियसली कॉपी कॅट अटेम्प्ट . विशाल ने विकाससाठी केले तेव्हा कसले ड्रामॅटिक झाले होते ते, त्या एपिसोड चा टीआरपी छप्परतोड झाला होता.

लाइव्ह मधे माने बाहेर आलेले दिसले आत्ता. बाकी लोक अजुनही जोड्या जोड्या नी फिरत आहेत.
फारच लवकर बाहेर आणले माने ना.वीकेंड पर्यंत तरी ठेवायचे.

लाइव्ह मधे माने बाहेर आलेले दिसले आत्ता>>> अरे बापरे...म्हणजे फक्त नॉमिनेशनपासून वाचवण्यासाठी मानेला सीक्रेट रूम मध्ये पाठवले की काय ? पुन्हा काहीही...यावेळी मला बिग बॉससाठी 'काहीही' या शब्दाशिवाय शब्दच सुचत नाहिये...गंडलेला बिग बॉस... Lol
बाकी तुम्ही लोक खरंच व्होटिंग वगैरे करता? मी फक्त पहिल्या सीझनला केले होते...नंतर लक्षात आलं की आपल्या वोटवर काहीच अवलंबून नसते...चॅनल आपल्या सोयीनुसार एलिमिनेट करते....म्हणून मग आपला वेळ वाया घालवणं सोडून दिलं...मागच्या सीझनला नवर्‍याने सोनालीला खूप वोट दिले होते...अगदी माझ्या, आईंच्या मोबाईलवरून देखील ...आणि त्याच वीक मध्ये सोनाली बाहेर गेली...मी खूप चिडवलं मग त्याला. Happy

तो प्रसाद म्हणाला धोंगडेला जेल तोड आणि तिने ऐकलं चक्क. काही फार शिक्षा नाही दिली. दोन आठवडे कॅप्टन होऊ शकणार नाही फक्त. असंही उमेदवार असली तरी कुठे होते कॅप्टन. नंतर धोंगडे केवढी ती रडत होती आणि तेजु मूर्खपणे समजावत होती.

बिग बॉसच्या प्रॉपर्टीचे जाणूनबुजून नुकसान हा एक मोठा जोक आहे.

उद्या राणी मुंगी म्हणजे माने यांनी थेट विकासला कॅप्टन करावं, तो भारी खेळत होता.

मानेंना जर फक्त देशमुखला नॉमिनेट करायला सिक्रेटरुममध्ये ठेवल असेल तर खरच बिबॉसची कीव करावीशी वाटते.
आज अगदी त्यांनी आज येऊन अपूर्वाच कौतुक जरी केल तरी तिलि माने कसे आहेत हे माहित आहे.
माने काही फार गेम चेऔज करणार नाहीत.पण त्यांनी केवळ नॉमिनेट करुन जर या वीकमध्ये देशमुख बाहेर गेली तर मात्र ते अनफेआर असेल.

बाहेर आल्यावर माने जे रँकींग वगैरे देतील ते bb च्या सांगण्यावरुन असेल. खरंतर bb ने माने याचं माकड केलंय, त्यांच्या तालावर नाचणार आता. माने तसे स्वत:चे जे काही निर्णय असत ते स्वत: घेत होते.

अक्षय वोटिंगमध्ये सर्वात शेवटी आहे. देशमुख दोन नंबर. प्रसाद कसाही वागो, त्याचे फॅन्स त्याला तारून नेणार, तो एक नंबरवर असतो.

मी यावेळी कदाचित अक्षय आणि समुला वोटिंग करेन. अक्षय दादागिरी करतो, निगेटिव्ह शेड आहे पण तो बरेचदा positive असतो, एक्स्ट्रा शॉटस मध्ये दिसते तसं.

मारामारी आणि तोडफोड शिवाय काहीच येत नाही या लोकांना. आणि टास्क पण भंगार आहेत.
मागे ते कॅसेट भरायचा टास्क होता त्यात आणि कालच्या टास्क मधे तसं बघितलं तर काय वेगळं होतं ?
हत्तीला कसं गोंजारतात यावरुन पण काय ठरणार होतं ? काहीही.
जेल तोडणे वगैरे आता बोअर झालं.
प्रसाद सोबत राहाणे म्हणजे तेजा ची परीक्षा आहे. काल भांडी घासताना तेजा शी भांडत होता तेव्हा तो वेडा वाटला.
तेजा - प्रसाद , मी तुला मदत करु का ?
प्रसाद - काय मदत करणार तु ?
तेजा - भांडी घासुन देते, विसळते. काहीपण.
प्रसाद - करु शकते पण मला माहिती आहे की हे दोन जणांचं जरी असलं काम... ( पॉज) त्यापेक्षा मला कापुस्कोंड्याची गोष्ट सांग.
तेजा - तुला इरीटेट होतंय हे मला कळतंय
प्रसाद - ( मग काहीतरी अगम्य बोलला. कळलं नाही ) तुझ्या टास्क च्या वेळी मी मधे मधे केलं का ? ई ई ई
आणि मग मधेच घासायच्या भांड्यात डोकं बुडवुन बसला. ईतका पण स्वतः वर ताबा नसतो का माणसाचा. काय लेव्हल चा राग आहे हा. तेजा ला खरतर खुप चान्स आहे सतत लाईम लाईट मधे रहायचा पण ती बहुतेक शांत बसुन घालवते Wink प्रसाद सोबत अपुर्वा असती तर आठवडाभर घरात दंगा झाला असता. Wink
या सगळ्या सीन वर किरण चा डाय्लॉग भारी होता - वेळ न वखत आन गाढव चाललंय भुकत हा हा हा
प्रसाद वेडा आहे यावर आता माझा पक्का विश्वास बसलाय...
अ दे रडली तेव्हा खरच वाईट वाटलं काल. कोण ही राणी मुंगी,माझा काय संबंध असं बिचारी म्हणत बसली होती.

हो देशमुख नको जायला यावेळी असं वाटलं.

प्रसादने एवढं कामही नाही केलेलं बाहेर, इथेही तो विचित्र वागतो मग एवढे फॅन्स कुठून जमवले. हे त्यालाही माहिती असणार की आपल्याला सपोर्ट आहे बाहेर, manage केलं असावं. त्यामुळे तो सेम टू सेम वागत राहतो. केवळ वोट्स वर त्याला जिंकवले बिग बॉसने तर धन्य सीझन होईल. आधीच हा सीझन खड्ड्यात गेलाय.

प्रसाद ला २ मिनिट बघणेही टॉर्चर आहे माझ्यासाठी तरी. त्यालाही बहुतेक माहित नसावे त्याचे इतके फॅन्स झालेत. ते फॅन्स म्हणजे मागच्या सीझन च्या विनर्स ना या सीझन मधे शोधणारे लोक आहेत मोस्टली. का तर पहिल्या दिवशी सगळे त्याच्याशी भांडले म्हणुन त्याला सपोर्ट.
अत्यन्त फालतू सुरु आहे हा सीझन. पूर्ण न बघताच बंद केले जातात बरेच एपिसोड.

बिग बॉसने धोंगडेला दोन आठवडे कॅप्टन होता येणार नाही ही शिक्षा दिली आहे मग मानेंनी खालचा नंबर दिला तर एवढा सीन क्रिएट का करतेय. ग्रुपचा डीसीजन तिने फॉलो केला, तिला अक्कल नव्हती का जेल तोडायचं नाही ते, का विशाल व्हायला गेली, हाहाहा.

बिग बॉस खेल जाते है. विकास मात्र ठाम होता दाद्या येणार, दाद्या राणी मुंगी असेल. अपुर्वा, अक्षय मठ्ठ निघाले, हाहाहा.

आज बिग बॉसनेच साखर उर्फ मसुराची डाळ फुकट घालवण्याचा टास्क दिला. आता म मां विकेंडला कोणाला बोलतील.

नॉमिनेट होऊन,डेंजर झोनमध्ये असून घराबाहेर न जाता ,सिक्रेटरुममध्ये जाऊन पर्सनल राग काढून नॉमिनेट करून काहीही न करता घराचा कँप्टन होणारे माने हे पहिलेच सदस्य असतील.
प्रसाद नाही तर आता बिबॉसच कन्फ्यूज्ड वाटत आहे.
अगदीच टुकार सिझन.

मानेंनी काल तेवढ्यातल्या तेवढ्यात होस्टींगची ऑडिशन देऊन घेतली.... मांजरेकर असल्याच्या थाटात सगळ्यांचे ॲनालिसिस केले नंबर देताना Wink
सॅम दुसरी आणि रोहित चौथा? ये बात कुछ हजम नही हुई...... अक्षय अपूर्वाचा नंबर नक्कीच यांच्यापेक्षा वरचा लागतो!!
धोंगडे आधी तेजस्विनीबद्दल पझेसिव्ह वाटायची..... आताआता जेलस पण वाटतीय!!
UP, तुझ्या वरच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन!! या आठवड्यात सिक्रेट रुमच्या नावाखाली चक्क नॉमिनेशनपासून वाचवले त्यांना!!
पण बिगबॉसचा पण नाईलाज असेल कंटेंटसाठी काय काय करावे लागते.
नंबर बिगबॉसनेच दिले असावेत जेणेकरुन तेजस्विनी आणि धोंगडे मध्ये वादाची ठिणगी पडावी, किरण माने अपूर्वाच्या गूडबुक्समध्ये जाऊन अक्षय-अपूर्वा मध्ये वाद व्हावेत, सॅमला त्याच्यापेक्षा वरचा नंबर दिल्यामुळे विकास मानेंवर नाराज व्हावा, दहावा नंबर दिल्यामुळे (आणि तो देताना जे काही टोचून बोलले जाईल त्यामुळे) अमृता देशमुखला चावी मिळावी पण यातला फक्त एकच फटाका फुटला!!
तेजस्विनीला विनर म्हणून प्रोजेक्ट केले जातेय पण फक्त चांगुलपणाच्या पुढे जाऊन तिने आता आपला खेळ दाखवावा..... मुख्य म्हणजे मानेंच्या कह्यात जाऊ नये!!
प्रसाद काल चक्क विरघळलेला दिसत होता..... धोंगडेला काय समजावत होता आणि चक्क मानेंच्या कॅप्टनरुममध्ये जाऊन त्यांच्याशी बोलत होता!!

मानेंनी काल तेवढ्यातल्या तेवढ्यात होस्टींगची ऑडिशन देऊन घेतली.... मांजरेकर असल्याच्या थाटात सगळ्यांचे ॲनालिसिस केले नंबर देताना >>> exactly....ते बघताना जाणवलं की मांजरेकरला ऑप्शन पाहिजे असेल तर किरण मानेचा विचार करायला हरकत नाही Happy

माने ची काही न करता ऐश चालु आहे. नॉमिनेट झाले, बाहेर जाउन सीक्रेट रुम मधे मजा केली , परत येउन आता चक्क कॅप्ट्न ?
त्यात आणि वर गेम च्या नावाखाली लोकांना रेटींग वगैरे.
अमृता धोंगडे चा राग मी समजु शकते. २ मैत्रिणी पहिल्या दिवसापासुन सेम खेळत आहेत. पण तेजा सगळ्यांशी गोड गोड वागुन गुड्बुक्स मधे जाते आणि दुसरी फाटक्या तोंडामुळे डायरेक्ट ७ नंबर ? अजिबात नाही पटलं. शिक्षा मिळाली म्हणुन कॅप्ट्न नाही होउ शकत मान्य पण म्हणून वाईट वाटणारच ना. ऱोहीत आणि सॅम चा काय संबंध आहे २ आणि ४ नंबर वर. आणि प्रसाद पेक्षा धोंगडे नक्कीच चांगली आहे. तो पण तिच्या वर म्हणजे धन्य.
तेजा मला खुप आतल्या गाठीची वाटु लागली आहे आता. सतत सगळ्यांसमोर येउन धोंगडे च्या चहाड्या करुन स्वत: किती चांगली हे दाखवत राहाते.
रोहीत आणि सॅम ला किती वेळा कॅप्टन पदाची उमेदवारी देणार हे लोक. काल अपुर्वा बरोबर बोलली की सारखं सारखं काय आम्ही तुमच्या साठी खेळायचं.

तेजा मला खुप आतल्या गाठीची वाटु लागली आहे>>> हो ना...काल तर तिने अक्षय आणि अपूर्वाचं ऐकून समृद्धीला आऊट केलं...बहुतेक तेजस्विनी आणि रोहित झालेत उमेदवार...रोहितच होईल मग कॅप्टन...कारण तेतेजस्विनीला समृद्धी अजिबात सपोर्ट करणार नाहिये...विकासला पण तिनेच टारगेट केलं...अमृताशी वाजलंय....कठीण आहे तेजस्विनीचं...

आज तेजा हेट डे . तेजा कशी वाईट आहे हे धोंगडे सांगत होती आणि वेगवेगळ्या कारणाने तेजाला आता समु, अप्पू हेट करतायेत. आज पूर्ण सिंपथी तेजु आणि प्रसाद घेणार. अक्षय पण विरोधात, एक वाक्य मात्र म्हणाला की ती तिचा गेम खेळत होती का तत्सम म्हणाला काहीतरी.

तेजा गेम खेळू लागली आहे, चलाखी दिसू लागली आहे.

समहाऊ तेजाच जिंकेल हा सीझन वाटत आहे. मेघा धाडेबाबत असंच झालं होतं. तेजु त्या लेवलची खेळाडू नसली तरी महत्वाची ठरतेय.

चार वाईल्ड कार्ड एन्ट्रीज.बापरे....खरच होणार अहेत की आधीच्या सिझनचे गेस्ट येणार आहेत.
खरच चार वाईल्ड कार्ड असतील तर इतका सिझन फ्लॉप जात आहे?फायनली तेजुला कळल सरळ खेळून बिबॉस नाही खेळता येत.
प्रसाद कसाही असो,पण आजही खरतर त्याचा संबंध फार नसताना त्याचच नाव घेतल जात आहे ,तेजू तर आज बिबॉसच्या घरात हैदोस घालत होती,सगळ्यांच्या तोंडी एकच नाव तेजु.
माझ्या मते टॉप 2 मध्ये प्रसाद आणि तेजु असणार ,कदाचित प्रसाद ऐवजी अक्षय सुध्दा असेल,मला तर विनर वाटत होता,पण गेले तीन आठवडे काय झाल आहे कळत नाही.
अपूर्वा बहुतेक एंटरटेनमेंट करण्यासाठी आहे असच वाटत आहे.
आठव्या आठवड्यात बहुतेक विनर कळली,तेजुच असावी.

प्रसाद कसाही असो,पण आजही खरतर त्याचा संबंध फार नसताना त्याचच नाव घेतल जात आहे >>> हो.

त्याला सिंपथी मिळणार अजून.

अक्षयला votes नाही मिळत, तो पाचात गेला तरी खूप, यावेळी danger झोन मध्ये आहे. तेजु प्रसाद पहिले दोन असं मलाही वाटतं. पाचात जायला हवा अक्षय.

धोंगडेची सई होत चाललीय पण मेघा सई भांडण फार नंतर झालं, इथे आधीच.

चार वाईल्ड कार्ड एन्ट्रीज. >>> मी बघितला नाही प्रोमो. हे खरं असेल तर अक्षय किंवा अपूर्वा बाहेर जातील.

अपूर्वा कंटेट देते पण बडबड खूप करते, अतिच. त्या विकासच्या कागाळया किती करते, त्याच्याकडून शिक की हळूहळू बोलून कसं मनासारखं करून घ्यायचं ते.

अक्षयचे पण काय सुरू असतं की अपूर्वा लोकं बघतायेत, तुझा खरेपणा दिसतोय etc जणू जनता ह्यांच्या बाजूने जाणारच आहे. पहिल्या आठवड्यात जे व्हिलन ठरलेत ते कायम पब्लिकसाठी.

इथे मायबोलीवरच जास्तीतजास्त फेअर असतं पब्लिक बाकी एकदा ठरवलं की ठरवलं.

मागच्या सीझनची सोनाली पाटील शंकर महाराजांवर असलेल्या सिरियलमध्ये काम करतेय, आत्ता एक प्रोमो बघितला.

तेजस्विनीचे काल जरा चुकलेच..... अपूर्वा बरोबरची डील का मोडली म्हणे!!
रोहित किसीका सगा नही है!! दोघींनी मिळून त्याला उडवायचा ना मग फायनल राउंडला जे होईल ते होईल!!
फेअर दिसली असती...... काल उलट अपूर्वा आवडली; तेजस्विनीने दगा देऊन पण जिगरीने खेळली..... नंतरची बडबड जरा जास्त होती पण ठीक आहे!!
धोंगडे अगदीच रडूबाई आहे..... काल तेजस्विनीकडून खेळली असती तर तिच महान झाली असती पण लोक अश्या संधी वाया घालवतात.
रोहित अगदीच सेफ खेळत होता.... जिंकला तरी असे लोक नाही आवडत पब्लिकला!!

Pages