Submitted by अनन्त्_यात्री on 18 November, 2022 - 11:24
सुदूर तार्याच्या गर्भीचे
ऊर्जा वादळ लवथवणारे
उधळून देते विस्फोटातून
विकीरणांचे पिसाट वारे
दुबळी दुर्बिण अधांतरातून
अनंतात डोकावून बघते
निराकार, निर्मम, नि:संगी
स्थळकाळाचे चित्र रेखिते
आतशबाजी अवकाशातील
निरभ्रातुनी मला खुणविते
क्षुद्रत्वाचे भव्यत्वाशी
अबोध नाते अधोरेखिते
कालौघाचा अदम्य रेटा
थोपविण्याचे प्रयत्न माझे
थिटेच ठरती, रोमरोमी पण
कालजयाचा पडघम वाजे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त
मस्त
तुम्ही खरे भव्यतेचे पूजक आहात
तुम्ही खरे भव्यतेचे पूजक आहात.
rmd, सामो प्रतिसादाबद्दल
rmd, सामो प्रतिसादाबद्दल धन्यवाद.