मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वर्णिता, छान परिचय. मी ती डॉक्युमेण्टरी पाहिली आहे. तेव्हा बहुधा हॉटस्टार वर होती. आता इथे डिस्नेवर कदाचित मिळेल. ती डॉक्युमेण्टरी सुद्धा बघण्यासारखी आहे.

वर्णिता, छान परिचय. >>> अगदी अगदी.

झिन लहानपणापासून जवळ लायब्ररी लाऊन, रद्दीवाल्याकडून स्वस्त मिळणारी पुस्तकं घेऊन तसंच म टा घरात येत असल्याने त्यातलं वाचन असं सुरू केलेलं मग डोंबिवलीत कॉर्पोरेशन लायब्ररी नंतर नालासोपारा, श्रीरामपुर इथे तिथल्या कॉर्पोरेशन लायब्ररीज आणि परत डोंबिवलीत आल्यावर इथली कॉर्पोरेशन लायब्ररी असं वाचन केलंय, ती लायब्ररी कोरोनाआधी बंद केली, ह्या सगळ्या माफक किंमत असलेल्या लायब्ररीज . हल्ली काहीच वाचलं जात नाही. स्वत: विकत खूप कमी पुस्तकं घेतली आहेत.

वर srd यांनी लिहिल्याप्रमाणे पै आमच्या डोंबिवलीचे, त्यांनी वाचन चळवळ सगळीकडे छान रुजवली आहे. मी कधी त्यांची मेंबर नव्हते.

झिन, तुमची प्रतिसाद द्यायची स्टाईल (हाताने लिहून त्याचा फोटो टाकायचा) एकदम भारी आहे, खूप आवडली. त्यातून फाऊंटन पेन वापरणारे अभावानेच. मी स्वतः फाऊंटन पेन वापरतो, म्हणून अप्रूप वाटले.

झिन, हाताने लिहिलेलं वाचायला खूप गंमत वाटत आहे. प्रतिसादही कॉमिक पुस्तकातल्या बबलमध्ये लिहिल्याने आणखीच गंमत.

राज्य सरकारने मराठी देवनागरीचा 'श' आणि 'ल' लिहिण्याचा काय अधिनियम काढला आहे?

झिन , मजा येतेय तुमचे प्रतिसाद वाचायला. आता पुस्तकांवरचे अभिप्राय येऊ द्या.
SRD , कुमार यांच्या भाषेसंबंधी धाग्यावर यावर चर्चा होते आहे.

उबोंशी सहमत.

झिन Happy
तुमच्या वळणदार हस्ताक्षरातून व या मनमोकळ्या शैलीतून काहीतरी उबदार मिळतंय. शिवाय हे असं वाचून कुणी पोच द्यायची अपेक्षाही नव्हती, त्यामुळे मोठीच गंमतही वाटतेयं. माझ्या पोस्टीमुळे तुम्हाला अकाऊंट काढावे वाटले हे वाचून मला फार आनंद झाला. _/\_ मनापासून आभार. सोशल मिडिया लोकांच्या मनापर्यंत पोचायचे किती ताकदीचे माध्यम आहे !!! सुक्ष्म ऍनेलिसिसचे श्रेय अनेक वर्षांच्या ध्यानातल्या प्रगतीला जाते. त्याने सगळं लख्खं होतं व वाचणाऱ्यांच्या मनातही सहज पोचता येतं. माझे परिक्षण तितके अनुकूल नव्हते पण तुम्हाला त्यावर विचार करावासा वाटला याचेही समाधान वाटले. तुम्हीही वाचून नक्की लिहा, मी वाट बघेन. तोपर्यंत मराठी टायपिंगचे रुचतील ते पर्याय बघून ठेवा.

शासनाने नेमलेल्या एका समितीने श आणि ल ची तुम्ही लिहिलेली रूपे आता चूक ठरवलीत. या प्रतिसादातलीच रूपे बरोबर मानली जातील.
मीही तुमच्यासारखाच श काढत आलोय.

अ‍ॅडमिन मोड ऑन - तुम्हांला प्रतिसाद देता येतोय आणि त्यात गंमत वाटतेय, हे चांगले आहे. पण कृपया इथे आपण वाचलेल्या पुस्तकांबद्दल लिहा.
अवांतर प्रतिसाद वाहत्या पानांवर द्या.
मोड ऑफ Light 1

झिन, तुमच्या श,ल मध्ये चूक नाही.
पण सरकारने काढलेला अधिनियम शोधत आहे. गूगल सर्च मध्ये लिंक येत आहेत पण त्या वेगळ्या काढल्यावर चालत नाहीत.
भरत,तो धागा उघडला पण कोणत्या पानावर चर्चा मागे गेली आहे?

आपल्याला वि.का. राजवाडे इतिहासकार म्हणून माहिती आहेत पण त्यांचे मराठी लिपी, व्याकरण,उच्चार यावरही पुस्तक आहे. ते oudl.org वर फ्री डाऊनलोड होते.पण ती साईट ओस्मानाबाद युनी. ओपन डिजिटल लाइब्रीने बंद केली. माझ्याकडे पुस्तक सापडल्यास ड्राइव्हवर टाकेन.

हाताने काढलेल्या ईमोजी म्हणजे दिवाळीतले फटाक्यांतले अनार/झाड पाहिल्याचा आनंद होत आहे.

या अधिनियमाच्या बाबत शालेय वर्गमित्राने पाठवलेली कविता- (परवानगीने)
(१)//
----------अधिनियम--------------
( शेण्डीदाण्डीगाठपाक्ळीचेप्रक्रण )

मायमराठीमध्ये माझ्या
नवनियमांची लागे रांग
नवीन नवथर देवनागरी
जुन्या अक्षरां देई टांग

'श 'ची गाठ गळून पडली,
बदल्यात तयाला शेंडी मिळे
लाॅटरीत 'ल' ला मिळे पाकळी,
हाय ! तयाचा दण्ड गळे

वाह ! 'श'ला शेंडी मिळता
मान वाढला शहामृगाचा
'ल'ला लोभस पाकळी मिळे,
चविष्ट होई ठेचा लसणाचा

नवीन नियम विद्वान बनवीती
मी तर आहे ठार अडाणी
बिचकत लिहितो आणि बोलतो
माझी ओबडधोबड वाणी

दुसरे काही विद्वान सांगती
खटाटोप हा आहे व्यर्थ
गाठ सुटो वा शेंडी तुटो,
बदलत नाही उच्चार नी अर्थ

उच्च स्तरावर चर्चा चाले
प्रत्यक्षात काय ?
किती जणांना आपली वाटे
आज मराठी माय ?
किती जणांना आपली वाटे
आज मराठी माय ?
//
*******************************
१७ नोव्हेंबरला शाळांना एक पत्र आले - १९ नोव्हेंबरचा जागतिक शौचालय दिवस कसा साजरा करावा. निबंध आणि सेल्फी. हास्यास्पद आणि विषाद आणणारी आहे.
ही बातमी वृत्तपत्रात वाचल्यावर ही एक कविता केली. (परवानगीने देत आहे)
(२)//
----------शैक्षणिक सेल्फी-----------

शिक्षणखाते आदेश देते
शौचगृहासह काढा सेल्फी
रांग पाहूनी परंतु तिथली
मघार घेतली तेथूनी मी

अगणित विद्यार्थी नी शिक्षक
तिथे ताटकळती
भ्रमणध्वनी अन् टमरेलासी
हातांत सांभाळती

चुळबुळ चाले रांगेमध्ये
कधी येतसे आपला नंबर
विचार करीती आपण सेल्फी
' आधी ' काढूया की त्या ' नंतर '

साफ करावे उदरासी कैसे
गहन समस्या उभी मनी
गायब कडी नी दार मोडके
थेंबही नव्हते नळास पाणी

गाजावाजा करून प्रशासन
वाजवी कर्तृत्वाचा डंका
कसा काढूया येथे सेल्फी
बालांच्या मनात मोठी शंका

शिक्षणखात्याचा आदेश
सर्वांवर बंधनकारी
तरी सेल्फीविन सर्व परतले
उगा फुकटची घडली वारी

मी तर गेलो दुसरीकडे अन्
तिथे काढला माझा सेल्फी
सुलभतेने देऊन तिथली
एक बंदा रुपया फी
एक बंदा रुपया फी
//

झिन तुमची शैली फार आवडली. खरच दांडगे स्क्रिबलर आहात. खतरनाक सुंदर वाटतय वाचायला. एक जिवंतपणा. सगळी टांकसाळीतली सुबक अक्षरे वाचून कंटाळा येतो. चित्रेसुद्धा डुडल करा. रंगित स्केचपेन वापरा.

बटरफ्लाय इफेक्ट (गणेश मतकरी)
कथासंग्रह

पुस्तक मस्त आहे. सगळ्या कथा आवडल्या. अनेक कथांच्या बाबतीत 'या विषयावर इतकी मस्त कथा लिहायला कशी काय सुचली असेल' असं झालं.
गणेश मतकरींच्या कथांची मी फॅन आहेच. त्यात आणखी एका पुस्तकाची भर पडली. ते सातत्याने छान छान कथा लिहितात.

हे मी वाचलंय असं वाटतं. जिन्यात सापडलेल्या मृतदेहाबद्दलची कथा यात आहे का?
कथांमधली पात्रं आजच्या काळातली शहरी उच्च मध्यमवर्गीय आहेत. त्यांच्या तोंडी इंग्रजी शब्दांचा, वाक्यांचा भरणा आहे.
मी इथे मराठी साहित्यात येत असलेल्या इंग्रजी शब्दांबद्दल निषेधात्मक लिहिलं आणि हे पुस्तक हाती लागलं. तिथे तशी भाषा मला उलट योग्य वाटली. इंग्रजी मिश्रित मराठी हीही एका वर्गाची बोली भाषा होऊ घातली आहे.

फारएन्ड, अंजू धन्यवाद.

झिन, जरूर वाचा. माझ्या आयडी नावाचा अर्थ वगैरे काही ठरवून नाव नाही घेतलेलं. ती कीबोर्ड ची कृपा आहे Lol ऑटो करेक्त मध्ये झालंय ते.
अर्थ घ्यायचाच झाला तर मराठी श्लोकात हा शब्द येतो बरेचदा. 'वर्णन केले असता', 'वर्णन करताना ' असा अर्थ होतो.

इंग्रजी मिश्रित मराठी हीही एका वर्गाची बोली भाषा होऊ घातली आहे.>> अगदी अगदी. बऱ्याच दिवाळी अंकात ल्या कथांमध्ये अशीच भाषा असते.

बटरफ्लाय इफेक्ट कालच वाचून संपवले.सुरेख कथा आहेत.काही सशक्त वाचायला मिळाले.
माझ्यापुरते म्हटले तर गणेश मतकरींच्या एक किंवा दोन कथा वाचल्या की आणखी वाचू शकत नाही.वाचल्यावर थांबावेच लागते.

अनेक कथांच्या बाबतीत 'या विषयावर इतकी मस्त कथा लिहायला कशी काय सुचली असेल' असं झालं......+१.

बटरफ्लाय इफेक्ट गेल्या भारत भेटीत मी ही आणलय आणि आवडलं.
त्यात फक्त आता मला बरोबर आठवत असेल तर ... प्रथम पुरुष आणि तृतीय पुरुष असं narrative अचानक बदलतं. मी ते काळ दर्षवायला आहे, का परस्पेक्तीव्ह म्हणून आहे इ. इ. समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण तरी काही समजलं नाही. लेखक संपादनात चूक नसावी... आता परत वाचून बघतो काही वेगळं जाणवलं तर.

गणेश मतकरी यांचं इतर साहित्य

1.चौकटीबाहेरचा सिनेमा
2.खिडक्या अर्ध्या उघड्या
3. installations
4.(kadachit) इमॅजिनरी
5. शेल्फी
6. रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा भाग 1 आणि 2

Hi लिस्ट बटरफ्लाय इफेक्टच्या पुस्तकात आहे.यातील एकही मी वाचलेले नाही.

अर्थ घ्यायचाच झाला तर मराठी श्लोकात हा शब्द येतो बरेचदा. 'वर्णन केले असता', 'वर्णन करताना ' असा अर्थ होतो. >>> हो व्यंकटेशस्तोत्रात कायम ऐकला आहे. घरी आई म्हणत असल्याने नेहमी कानावर पडत असते हे स्तोत्र Happy इथे २७ वा श्लोक आहे. "वर्णिता शिणली वैखरी" Happy इथे आयडी पाहिला तेव्हा पहिले तेच आठवले होते.
https://onehindudharma.org/sri-vyankatesh-stotra-lyrics-in-marathi/

Pages