Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अक्षय एंटरटेनर होता पण ते
अक्षय एंटरटेनर होता पण ते अंड्याचे सोडून बाकी सगळे टास्क खेळायला पाहिजे होते त्याने!!>>> खेळला की तो...उलट हुशारीने खेळला...फोटो फ्रेम destroy करून,पाण्यात टाकूनही फोटो वाचवला त्याने हुशारीने...नंतर मानेंना दाखवत होता...अपूर्वा मात्र अपेक्षेपेक्षा फारच नॉर्मल खेळली ....अक्षय सोबत नसल्यामुळे की काय एकदम टोन डाऊन वाटली...
नवीन प्रोमोमध्ये अक्षय,रोहित आणि अमृताला म्हणतोय किरण मानेला घराबाहेर जाऊ असे वाटत असेल म्हणून त्यांनी केस काढले नसेल...किती तो गोड गैरसमज
स्नेहलताने चुक सुधारली ते
स्नेहलताने चुक सुधारली ते चांगले केले..... >>> अक्षयने आरडाओरडा केला एकट्याने आणि निर्णय बदलायला लावला, नंतर त्याने सगळ्यांना येऊन बरोबर सुनावलं की प्रसादच्या वेळी अनफेअर निर्णय आला, सर्व बोलत होते त्याविरोधात माझ्यासकट पण यावेळी कोणीच बोलायला तयार नाही, अपुर्वाने सारवासारव केली की आम्ही वाट बघत होतो. इथे अक्षयला मानावे लागेल मात्र.
विकासपेक्षा अक्षयला धोंगडे कॅप्टन म्हणून आवडेल तो टास्कमध्ये तिला मदतच करत होता.
समु काल कमी पडली. रनिंग वगैरे असेल तेव्हा ती उठून दिसते, अक्षयही. टास्कमध्ये अक्षय, ती, धोंगडे, तेजु यांचे डोकं चांगलं चालते खरंतर.
खेळला की तो...उलट हुशारीने खेळला...फोटो फ्रेम destroy करून,पाण्यात टाकूनही फोटो वाचवला त्याने हुशारीने...नंतर मानेंना दाखवत होता...अपूर्वा मात्र अपेक्षेपेक्षा फारच नॉर्मल खेळली ....अक्षय सोबत नसल्यामुळे की काय एकदम टोन डाऊन वाटली... >>> अगदी अगदी. मला लस्सी सीन आवडला नाही मात्र, पिऊ शकत नसेल तर ओतायला नको होती, तो टास्क पूर्ण करायचा प्रयत्न करायला हवा होता.
असाच खेळला तर अक्षय पाचात नक्की असेल.
सध्या वाटत असलेले पाच तेजु, प्रसाद, अक्षय, धोंगडे, विकास. हा क्रम असाच असेल असं नाही. तेजु जिंकायला हवी मात्र. आता कलर्स मराठीकडून कोणी आलं तर ओढून ताणून पाचात नेतील त्याला.
>>तसच दुसर्या राउंडला मानेंना
>>तसच दुसर्या राउंडला मानेंना संचालक न करता स्नेहलताला संचालक केल
हा ट्विस्ट का वाटला लोकांना? किती obvious होते ते!!
>>खेळला की तो...उलट हुशारीने खेळला
ते लस्सी वगैरे टास्क का क्विट केले त्याने? मला असे वाटले की इतके काही अवघड चॅलेंज नव्हते त्याला..... करायला पाहिजे होते त्याने!
जरा हलक्यातच खेळला तो असे वाटले!!
>>अपूर्वा मात्र अपेक्षेपेक्षा फारच नॉर्मल खेळली
खरय!! म्हणजे कालचे नुसते स्लेजिंगच होते तर
संगत का असर असेल..... तेजस्विनी इफेक्ट!!
>>अपुर्वाने सारवासारव केली की आम्ही वाट बघत होतो
हो मला पण असे वाटले की स्नेहलताने लगेच निर्णय फिरवला नसता तर अपूर्वा आणि तेजस्विनी तिच्या विरोधात बोलल्या असत्या!!
>>विकासपेक्षा अक्षयला धोंगडे कॅप्टन म्हणून आवडेल
मजा येणारेय!! एरवी विकासकडून खेळू शकले असते असे लोक मानेंमुळे धोंगडेला सपोर्ट करतील
पहिल्यांदा घर विदाऊट कॅप्टन.
पहिल्यांदा घर विदाऊट कॅप्टन.
आज फक्त झटापट. सगळ्या फेऱ्या ड्रॉ, अक्षय संचालक होता.
नंतर धोंगडे आणि विकास भांडण. कॅप्टन होणं म्हणजे कित्ती तो जीवनमरणाचा प्रश्न आहे.
यशने फालतू प्रँक केला. प्रसादचं चिडणं योग्य होतं. अपुर्वा, अक्षय आणि स्नेहलताने बिलकुल किंमत दिली नाही तिला, ते योग्य होतं. बाकी अवती भवती तिच्या.
बाकी रुचिराचे इन्टरव्ह्यू
बाकी रुचिराचे इन्टरव्ह्यू बघितले का बाहेर आल्यावर. ती सतत स्वतः चा उल्ल्एख "रुचिरा" असा थर्ड पर्सन मधे करते Happy≤<<<<<
<<<<
Faar ushira detey pratisad pan kharach ti third person madhech bolate.. Ruchira Ruchira kiti bolate.. khupach funny aahe te aani asa watatay baher aalyawar prove karatiye ki kas aai chi kushich chhan, kas apala apala gharach chhan.. dhakka laglay tila actually.. expect kela nasel tine baher jail mhanun
यशने फालतू प्रँक केला.
यशने फालतू प्रँक केला. प्रसादचं चिडणं योग्य होतं. >>> बरोबर, सर्किट वाटली ती यशश्री.
कोणीच कॅप्टन झाले नाही. कोणीच
कोणीच कॅप्टन झाले नाही. कोणीच होउ नये असाच टास्क वाटला. ब्लु टीक जास्तीत जास्त भरली पाहिजे असा रुल असता तर शक्य होतं पण ब्लु टीक पुर्ण भरली पाहिजे हा नियम कधीच पुर्ण होउ शकत नाही.
अपुर्वा आणि रोहीत काल बोलत होते की कोणीच कॅप्टन नाही झाला तर ? आणि तसच झालं. पण खेळताना ए टीम ने मुद्दाम कॅप्ट्न होउ दिला नाही असं मला तरी दिसलं नाही. जमेल तेवढं जीव लावुन खेळले ते. पण तरी अपुर्वा ने चावी मारली शेवटी विकास आणि प्रसाद ला की आता डीस्ट्रॉय केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून
धोंगडे आणि विकास ने आधीच डोकं लावुन काही तरी सेटींग करायला पाहिजे होती असं वाटलं पण ते दोघे खेळ संपल्यावर उगीच भांडत बसले.
यश बावळट आहे.काय तो भंगार प्रँक... काहीही.
स्मिता श्रीपाद संपूर्ण
स्मिता श्रीपाद संपूर्ण पोस्टला अनुमोदन!!
फक्त त्या दोघांनी काही सेटींग केली असती तरी त्यावरुन बोलणी खाल्ली असती की व्यक्तिगत महत्वाकांक्षा वगैरे काही आहे की नाही वगैरे!!
टीम बी वर अन्याय करुन त्यांना पब्लिकची सहानुभूती मिळावी याची सगळी सोय करतायत बिगबॉस पण टीम बी इतकी सैरभैर आहे की त्यांना ते धड एन्कॅश पण करुन घेता येत नाहिये!!
आता दोन evictions आहेत म्हणे या वीकेंडला!!
यश, माने जाऊदेत, मानेही
यश, माने जाऊदेत. मानेही सैरभैर असतात, विकाससाठी किती मोठा त्याग करतोय दाखवतात.
यशश्रीने काल एवढा फालतूपणा केला आणि जमाव जमवला, ती उतरली मनातून. ए टीममधल्या तिघांनी दुर्लक्ष केलं ते उलट जास्त उठून दिसले, असल्या फालतू मस्करीला बळी पडले नाहीत.
न्यु एन्ट्री असेल आता.
माफ करा, पण एवढी चर्चा होत
माफ करा, पण एवढी चर्चा होत आहे म्हणून विचारतोय. यशश्रीने नक्की काय केलय?
रडली, चक्कर आली, पास आऊट
रडली, चक्कर आली, पास आऊट झाली, श्वास घेता येत न्हवता का असलंच काही तरी नाटक केलं. टोटल मंद लोकं आहेत यात.
अमित शेवटचं वाक्य भारी आहे.
अमित शेवटचं वाक्य भारी आहे.
राहुल, यशश्रीने कोणीतरी आपल्याला झपाटलेय असं दाखवत फिट किंवा चक्कर आल्याचं नाटक केलं, लगेच काहींनी कांदा आणून हुंगवला मग ती शुद्धीवर आली. तिचं भांडे समुद्धीने फोडलं.
आज अक्षय प्रसाद वाचाबाची झाली. नंतर तेजु आणि धोंगडे तुफान भांडण झालं, ते बेडरूम पासून किचन पर्यंत कन्टिन्यू झालं, ते बघून किचनमध्ये असलेल्या समु आणि यश भांडू लागल्या, कारण फुटेज तिथं जात होतं ते आपल्याकडे वळवले. इतके बोअर करतात सगळे.
आता फालतू टास्क सुरू. तरी मी बघतेय
.
स्नेहलता छान करतेय.
मानेंनी शेतकरी व्यथा कविता
मानेंनी शेतकरी व्यथा कविता आणि नाटक शेवटचा अंक संपल्यानंतरची भावनामय कविता म्हटली त्याने टीम बी जिंकली. जाम टचिंग होतं हे.
कालच्या प्रँकचं रुपांतर करुन स्नेहलता अपुर्वा आणि प्रसादने छान रंगवला सीन.
माने यांच्या क्वीट शब्दाचं विकास आणि कोणी बरं छान केलं.
असे काही स्कीटस इनोव्हेटीव्ह वाटले. मानेंना मानायला हवं, काळजाला हात घालतात, कोणी आवडलं नाही म्हणू शकत नाही. स्नेहलता काही ठीकाणी उठून दिसली बोलण्यात.
अमितव व अंजुताई, एकूणच असे
अमितव व अंजुताई, एकूणच असे झाले तर. धन्य ती यशश्री. धन्यवाद.
काल माने पहिल्यांदा आवडले!!
काल माने पहिल्यांदा आवडले!!
तेच एकटे परफॉर्मन्स देत होते..... बाकीच्यांचे काय चालले होते त्यांचे त्यांना माहित!! इंडस्ट्रीतले लोक म्हणवतात आणि एंटरटेन्मेंटच्या टाक्स मध्ये पण यांना चमकता येत नाही?
स्नेहलता त्यातल्या त्यात बरी!!
प्रसाद, अक्षय, अपूर्वा आणि धोंगडे जे काही करत होते ते बघता यांना ॲक्टर म्हणावे का (का म्हणावे?) असा प्रश्न पडला!!
बिग बॉस जेंव्हा म्हणाले की हा एंटरटेन्मेंट चा टास्क का दिला होता माहित आहे का? तेंव्हा म्हणावेसे वाटले की फ्रायडेच्या एपिसोडच्या पाट्या टाकण्यासाठी
बाकी धोंगडे-तेजस्विनी, यशश्री-समृद्धी वगैरे भांडणे उगाच टीआरपी साठी वाटली!!
दोन एलिमिनेशन असतील तर सिक्रेट रुमचा चान्स दिसतोय..... मानेंना पाठवा सिक्रेट रुममध्ये म्हणजे ते परत आल्यावर विकास काय काय बोलतो मागून ते कळेल!!
दुसरा कुणी स्पर्धक योग्या वाटत नाही सिक्रेट रुमसाठी!!
निखिल राजेशिर्के स्टार
निखिल राजेशिर्के स्टार प्रवाहच्या रंग माझा वेगळा मध्ये येतोय. प्रोमोजमध्ये दिसला.
मीरा जगन्नाथ आई कुठे काय करते मध्ये येणार अशी बातमी होती. ती हूल ठरली. आता ती स्टार प्रवाहच्या आगामी 'ठरलं तर मग' मध्ये येईल अशा वावड्या आहेत.
कालचा एपिसोड खरंच खूप बोअर
कालचा एपिसोड खरंच खूप बोअर झाला...मनोरंजन करायचंय तर जनरल करावं ना...हे सगळे घरातलेच किस्से दाखवत बसले...म्हणून जास्त कंटाळवाणा झाला episode..त्यामुळे खरंच माने आणि देशमुख उठून दिसले ...मानेंनी सादर केलेल्या कविता खरंच छान होत्या...मागच्या सिझनला मस्त entertain केलं होतं सगळ्यांनी....उत्कर्षचे संचालन पण वाखाणण्याजोगे होते...
एंटरटेनमेंट टास्कचाच कंटाळा
एंटरटेनमेंट टास्कचाच कंटाळा आला आहे.तेच तेच होत.
मानेंच्या कविता चांगल्या होत्या पण अशा टास्कच्या वेळी ते बहुतेक वेळा याच मूडमध्ये असतात.
देशमुख नाहीच आवडली.
मला आवडल प्रसाद,अपूर्वा आणि स्नेहलताने यशची केलेली अँक्टिंग.चेहरा साफ पडला होता यशचा.
विकासच आय क्विट पण आवडल.खरतर टीम ए जिंकायला हवी होती.
मानेंच्या विशेषकरून शेवटच्या कवितेवर त्या टीमला जिंकवल.
असो.
मला नाही वाटत डबल एव्हिक्शन होईल.
कारण यश जाणार नक्की,पण राहिलेल्यांपैकी काढण सध्यातरी बिबॉसला परवडणार नाही.सगळेच बर्यापैकी कंटेंट देणारे आहेत.आधीच टीआरपी घसरत आहे,त्यात डबल एव्हिक्शन नाही करणार.नाहीतर मग आदिश,पराग ,शिवानीसारख्या कंटेंट देणार्या एखाद्याची एंट्री करावी लागेल.
निखिल राजेशिर्के स्टार
निखिल राजेशिर्के स्टार प्रवाहच्या रंग माझा वेगळा मध्ये येतोय. प्रोमोजमध्ये दिसला. >>> बिग बॉस मध्ये येण्याआधीही निखिल 'रंग माझा वेगळा' मध्ये होता, कदाचित परत येत असेल.
निखिलला का कोण जाणे कायमच दुय्यम भूमिका भेटत आल्यात. जवळपास दहा वर्षांपूर्वी झी मराठीवरील 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' ह्या रीयालिटी शो मध्ये तो पहिल्यांदा निलेश साबळे व इतरांसह झळकला होता. खरंतर, दोघेही BAMS डॉक्टर, त्यात निलेश साबळे 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' चा विजेताही झाला. त्यानंतर दोघेही तेव्हाच्या ईटीव्ही-मराठीवरील 'एक मोहोर अबोल' ह्या मालिकेत एकत्र होते. मात्र 'चला हवा येऊ द्या' नंतर निलेश साबळेचे ग्रहच पालटले. तो कार्यक्रम अजूनही अव्याहतपणे सुरु आहे, साबळेला खूप नावलौकिक मिळाला. ह्यादरम्यान निखिल राजेशिर्के मात्र चाचपडतच राहिला, त्याला सदैव नायक वा नायिकेच्या भावाच्या किंवा मित्राच्याच भूमिका भेटत राहिल्या, त्यातल्या बर्याचश्या तर निगेटिव्ह शेड्स च्याच होत्या (स्टार प्रवाहावरील 'छोटी मालकीण', सोनी मराठीवरील 'अजूनही बरसात आहे' किंवा अगदी अलीकडील झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ'). मात्र त्याच्या दुर्दैवाने एखादी कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहील, अशी भूमिकेत तो झळकला नाही.
>>मध्ये तो पहिल्यांदा निखिल
>>मध्ये तो पहिल्यांदा निखिल साबळे व इतरांसह झळकला होता.
निलेश साबळे
Yash mhanaje Kona?
Yash mhanaje Kona?
Yashashri na?
>>मध्ये तो पहिल्यांदा निखिल
>>मध्ये तो पहिल्यांदा निखिल साबळे व इतरांसह झळकला होता.
निलेश साबळे >>> स्वरूप, चूक सुधारली. निखिल व निलेश मध्ये साबळेच्या नावाचा माझा नेहमीच गोंधळ होतो.
निखिल होता का महाराष्ट्राचा
निखिल होता का महाराष्ट्राचा सुपरस्टार मधे. आठवत नाहीये मला. तसंही कमीच बघितलं. साबळेला झीने दत्तक घेतलं त्यामुळे चमकतोय. बाकी फारसे मुख्य भुमिकेत दिसलेच नाहीत, दुय्यम दिसतात. फार कोणी आठवत नाही आता. अक्षता गायकवाड (अॅक्टर विक्रम गायकवाडची बायको) होती ते आठवतंय, ती जय जय शंकर मधे व्हिलन आहे, याआधी माझे मन मधे मुळमुळीत वहीनी होती आणि त्याआधी उंच माझा झोकामधे होती.
योगिनी चौक का चौकेकर पहीली आलेली, तीही दिसत नाही. फायनल बघितली होती ते आठवतं. तो गॅरी होता का यात, माझ्या नवऱ्याची बायको वाला.
Yash mhanaje Kona?
Yashashri na? >>> हो आनंदी.
थोडं अवांतर: महाराष्ट्राचा
थोडं अवांतर: महाराष्ट्राचा सुपरस्टारमधील सहभागी - निलेश साबळे व योगिनी चौक (विजेते), अभिजीत खांडकेकर (गॅरी), धनश्री काडगावकर (राणादाची वहिनी), नम्रता आवटे (आताची संभेराव), निखिल राऊत (येऊ कशी तशी मी नांदायला मधला मोहीत), तेजपाल वाघ (आधी श्वेता शिंदे सोबत काही मालिकांची निर्मिती केल्यावर बहुधा देवमाणूस पासून स्वतंत्र निर्माता बनला), संकर्षण कऱ्हाडे, प्रसाद जवादे (ह्याला कसे विसरेल कारण बिग बॉस ४ मध्ये आहे), चिन्मय उदगीरकर (स्वप्नांच्या पलीकडे, नांदा सौख्यभरे, व सध्या योग योगेश्वर जय शंकरचा बहुधा निर्माता आहे), रेश्मा शिंदे (रंग माझा वेगळा), व योगेश शिरसाठ (सध्या माहित नाही, आधी कॉमेडीची बुलेट ट्रेन व चला हवा येऊ द्या मध्ये होता) एवढी आठवत आहेत.
तुम्ही लिहिल्यावर काहीजण
तुम्ही लिहिल्यावर काहीजण आठवले पण प्रसाद आठवतच नाहीये, राऊत आठवला खळीवाला. तेजपाल, संकर्षण, चिन्मय आठवले.
अंजुताई, खालील लिंकवर बघ (झी
अंजुताई, खालील लिंकवर बघ (झी मराठीची यूट्यूब वरची अधिकृत लिंक आहे), त्यावर प्रसादचा 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' मधला परफॉर्मन्स आहे.
https://youtu.be/n4TAE1JQK30
बघितलं प्रसादला, नाहीच आठवत.
बघितलं प्रसादला, नाहीच आठवत. हे बघितलं नव्हतं, म मां होते पॅनलवर हेही आठवत नाहीये, रादर मला तिघेही आठवत नाहीयेत पॅनलवरचे, क्वचित बघितलं आहे. धन्यवाद यासाठी.
मला म मां हिंदी झी सुपरस्टार साठी होते परीक्षक ते आठवतंय, अमृता खानविलकर, अर्चना लोखंडे होती तिथे आठवतंय. एनिवे खूप अवांतर झालं, म मां इथेही आहेत bb त म्हणून लिहिलं हे.
यश ताई गेल्या बाहेर.
यश ताई गेल्या बाहेर.
चावडी काही खास नव्हती आज.
चावडी काही खास नव्हती आज. यशश्री बाहेर गेली ते अपेक्षित होते. पण यूट्यूबर्स वगैरे उगीच जास्त सांगतात नेहमी. याला फाडले आणि त्याला झाडले. बहुतेकदा काहीच नसते तसे. ते यशश्री बरोबर मागे ममांचे मोठे भांडण झाले ते ही असेच वाढवून सांगितले गेले असावे असे वाटले. आज अगदीच नॉर्मल बोलत होते तिच्याशी ते. आणि कौतुक पण केले थोडेफार.
उद्या काहीतरी वेगळा ट्विस्ट म्हणे. म्हणजे सिक्रेट रूम? फारसा काही फायदा नाही होणार
आज प्रसाद ला उगीच चढवले. त्याच्या वेडपटपणाला त्याची स्ट्रॅटेजी म्हटले ते खरे की सार्कॅस्टिक ?! तो कन्फ्युज्ड आहे हेच खरं.
सीक्रेट रूम असेल तर प्रसाद
सीक्रेट रूम असेल तर प्रसाद किंवा माने असतील तिथे.
Pages