परोपकारी + जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी हिंदी चित्रपटातील गाणी

Submitted by रघू आचार्य on 16 November, 2022 - 04:09

चिकवाच्या धाग्यावर अवांतर नको म्हणून हा वेगळा धागा.
पूर्वीचे नायक गाण्यातून एण्ट्री घ्यायचे. या गाण्यात ते कुठूनतरी कुठेतरी जात असायचे. जाता जाता जमेल तेव्हढी मदत रंजल्या गाजल्यांना करत असत. एकाच गाण्यात विविध समाजघटकांना मदत करण्यात एक वेळ सरकार, सामाजिक संस्था कमी पडतील पण नायक कधीच कमी पडायचा नाही. जेव्हां तो मदत करत नसायचा तेव्हां सकारात्मक संदेश / जीवनाचे तत्त्वज्ञान सांगायचा. क्वचित नायिका किंवा क्लब डान्सर सुद्धा सांगायची. अशा गाण्यांची सूची या धाग्यावर करूयात.

अमिताभ बच्चनच्या चित्रपटात अशी गाणी ठासून आहेत.

१. रोते हुए आते है सब , हसता हुआ जो जायेगा : या गाण्यात नायक नेहमी एकाच मार्गाने बुलेटवरून मुंबईच्या रस्त्यांवरून हे गाणे म्हणत जायचा. नेहमीचे लोक हे गाणे थांबून ऐकायचे. एका बसस्टॉप वर विनोद खन्ना वर्तमानपत्र वाचता वाचता गाणे कानी पडले की वर्तमानपत्र खाली आणि डोळ्यावरचा गॉगल दाखवत गाणे ऐकत स्माईल द्यायचा. याच पिक्चरमधे तो नंतर सिकंदरला सांगतो कि "तुम रोज एक गाते हुए मोटरसायकल पर गुजरते थे, तो मै बसस्टॉप पर तुम्हारे गाने की दो पंक्तीया सुनता था "
त्यावरून असं वाटायचं की रोजच्या रोज हा त्याच चौकात त्याच मुलाला कडेवर घेत असेल, रोज त्याच चौकात तीच स्टाईलिश प्रेतयात्रा काचेच्या कारमधून निघत असेल, तिथेच रोज " जिंदगी तो बेवफा है" ही ओळ हा म्हणत असेल आणि पुढच्या चौकात विनोद खन्नाला त्याच त्या दोन पंक्ती ऐकू येत असतील. हे सगळं खरं वाटायचं.

https://www.youtube.com/watch?v=e18Pgofqpnc

२. नास्तिक या चित्रपटात सुद्धा बच्चन बसमधून बाहेर पडून "आज का ये दिन, कल बन जायेगा कल, तू पीछे मुडके ना देख प्यारे आगे चल" हे महान तत्त्वज्ञान सांगत असतो. दिसायला या सर्वसाधारण ओळी असल्या तरी यात अमेरिकन जीवनशैलीचे तत्त्वज्ञान आहे. An Englishman and An American मधे दोघांतला जो फरक सांगितला आहे त्यातच अमेरिकन लोकांच्या चंगळवादाचे रहस्य आहे. आजचा आज जगून घ्या, उद्या कुणी बघितलाय ? हेच आमच्या ऋषी मुनींनीही सांगितले आहे. मुंबईकर विरूद्ध पुणेकर या तुलनेत मुंबईकर नेहमी आनंदी का असतात याचे रहस्य या गाण्यात सांगितलेले आहे. मुंबईकर हा नेहमी रस्त्यात अडल्या नडल्यांना मदत करतो. कुणाचा अपमान न करता योग्य तो पत्ता सांगणे, नाराज झालेल्या प्रेयसीच्या गळ्यात हात टाकून तिला ओढून आणून तिचा हात प्रियकराच्या हातात देणे ही कामे मुंबईकर सहजच करतात.

रस्त्यात काळजी करत बसलेल्या माणसाला "एक जगह जो बैठा रह जायेगा, रास्ते का पत्थर बन जायेगा, बीते दिनों के यादों मे ना जल, शेरू आगे चल्ल" असे म्हणणारा नायक नेहमीच आपलासा वाटतो.

३. किसी कि मुस्कराहटों पे हो निसार - हे जरा क्लासिक मधे मोडतं. इथे भक्ती भावाने हात जोडले जातात. अशा गाण्यांनीच रस्त्याने गाणं म्हणत जाणारा , लोकांना थांबून जगणं शिकवणारा, मदत करणारा नायक उभा केला. वाडवडलांपासून चालत आलेली परंपरा, तिला हसू नये नाहीतर भावना दुखावल्या जातात.

४. आवारा हूं - यात नायक मी बदनाम का आहे हे अभिमानाने सांगत असतो. ते सांगतानाच परोपकारही करतो. थोडक्यात रॉबीनहूड पण असतो, इनोसन्ट पण असतो. आजच्या जमान्यात "अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहीजे, तिचा गर्व कसला बाळगतोस " असे संवाद नसतानाचा काळ तो. जे दाखवाल ते भाबडेपणी शोषून घेतलं जाई आणि दाखवणाराही भाबडेपणी दाखवला जाई. पडद्यावरचा हा इनोसन्ट नायक जेव्हा गाणं म्हणायचा तेव्हां बायाबापडी त्याच्या भोळसटपणावर खूष होऊन कानावर बोटं मोडायच्या. पण देवयानी चौबळ सारख्या काही बाया मात्र राजकपूरला कशाचं आकर्षण होतं यावर धडाकेबाज लेख लिहून लोकांच्या भावना दुखावायच्या. अर्थात त्यावेळी तोडफोड होत नसे. काही वर्षांनी एखादे मराठी संकेतस्थळ निघेल आणि आपल्यातल्या न्यूतत्वाचं भांडवल करून अनेक गाणी गाणारा गायक त्या संस्थळावर जन्माला येईल हे कदाचित आवारा हूं च्या टीमला ठाऊक असावे.

५. मेरा जूता है जपानी - हे एक कल्ट क्लासिक गाणं. इतकं सगळं मी बाहेरचं वापरतो तरी माझं हृदय मात्र देशी आहे असा देशप्रेमाचा दाखला यात मिस्टर इनोसन्ट देतो. यावरूनच इथे लोन घेऊन परदेशी जाऊन राहू मात्र दिल है हिंदुस्तानी म्हणून देशप्रेम सिद्ध करायची स्पर्धा सुरू झाली. कॅनडाचं नागरिकत्व घेऊन प्रेक्षकांना देशप्रेमाचे डोस पाजणारी संस्कृती ही पुढची पायरी.

अशी आणखीही गाणी असतील. वाचक भर घालतीलच.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचेच प्रतिसाद भारी आहेत. मोजक्या प्रतिसादांचा उल्लेख केलाय. बाकीचे सुद्धा मस्तच आहेत. काल वीज गेल्याने वायफाय नाही आणि मोबाईलवरून प्रतिसाद द्यायला कंटाळा आला होता.

मामींनी मस्त सूर पकडलाय पहिल्याच प्रतिसादात. Happy केली केटी Lol
जिंदगीने सुरुवात होणारी बहुतेक गाणी ही जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारीच असावीत>>>100%
साने गुरुजी आणि मायकल जॅक्सन हे माझे आदर्श आहेत >>> Lol
अस्मिता >> धन्यवाद
हरीभाईंचं गाणं पिशाच्चाकडे गेलं. Happy
चिडकू, भाग्यश्री मस्त.
आशुचँप > आपापल्या प्रकृतीनुसार जसं लिहायचं तसं लिहायचं.

आशुचॅंप,
शाहरूखचे ईंग्लिश गाणे मराठीत द्या आधी तुम्ही..
खरे तर मला कौतुक वाटते की लोकं शाहरूखची ईंग्लिश गाणीही अख्खी पाठ करतात. मी त्याचा एवढा प्रचंड मोठा चाहता असून मला तर नाही बाबा जमत.
कधी कधी प्रश्न पडतो त्याचा चाहता आहे की तुम्ही लोक्स Happy

ये काली काली आँखें ये गोरे गोरे गाल यात तर हीरोने परोपकाराचा कळस आहे हीरोईनची स्तुती करून. कारण ती मुळात सावळी आहे पण हा आपला गाल गोरे सांगून मोठेपणा घेऊन बसला.
ह ह पु वा...

शाहरूखच्या गाण्यातील सार पण ह ह पु वा....

मेयरसाब मधल्या टेस्टी फुड हो गाण्यात बरेच काही तत्व भरले आहे या कडे कोणी कसे नाही पाहिले कोणास ठाऊक...?
https://www.youtube.com/watch?v=fiYrq5odxks

गाणे मराठीत लिहून आणा. मला ईंग्लिश जमत नाही>>>

त्याची गुन्हेगारी बाळ लूट
जात आहे पॉप पॉप पॉप
वेडा ड्रायव्हिंग
sexy लिहिले मुलगी असावी
माझे सर्व पैसे खर्च करणे

घे घ्या सर

आशुचॅम्प बोल थोडे चुकलेत

It’s criminal…
Way that booty going
Pop pop pop
It’s criminal…
Way that body won’t
Stop stop stop

It’s criminal..
That shorty’s driving me crazy,
Sexy like a girl should be
I’m spending all my money on her..

संतकवी विशाल दधलानी यातून काय तत्वज्ञान सांगतोय हे सर्वसामान्य जणांसाठी नाही. त्यासाठी समाधीची एक वेगळी अवस्था हवी आहे. बुटी जी गुन्हेगार आहे शॉरटी जी गुन्हेगार आहे ते समजून घेणे हे निर्वाणानंतरचे निर्वाण आहे.

गुन्हेगारी आहे...
मार्ग की लूट जात
पॉप पॉप पॉप
गुन्हेगारी आहे...
तसे ते शरीर करणार नाही
थांबा थांबा

गुन्हेगारी आहे..
ती शॉर्टी मला वेड लावत आहे,
मुलीसारखी सेक्सी असावी
मी माझे सर्व पैसे तिच्यावर खर्च करतो..

सरांना इंग्रजी कळत नाही म्हणून भाषांतर करावं लागलं
Happy

btw गाण्याच्या विडिओ पाहिल्यानंतर शाहरुख ची बुटी हिप रिप्लेसमेंट झाल्यासारखी पॉप करतेय. म्हातारपणी असे साहस का करतात लोक.

हा धागा तुफान पळतोय! धमाल झालाय !

किशोरकुमारची बरीच आहेत. वर आलेली आहेतच.

ओ माझी रे, अपना किनारा.. माझे सगळ्यात फेवरिट
आनेवाला पल

साने गुरुजी आणि मायकल जॅक्सन हे माझे आदर्श आहेत >>> Lol एक्दम सखाराम गटणे मोड ऑन झालं

लॉजिक : हे गाणं चाहत्यानेच आपल्या धन्याकडून मराठीत आणायला पाहीजे. इथे मेन्शन करणार्‍यांनी इंग्लिश मधे गाणे नाही बनवलेले. त्यांना का करायला सांगितले भाषांतर ? धन्याला जाब विचारणे लॉजिकला धरून होते.
अशा वेडगळशा मागण्यांना भाव देणं थांबवलं म्हणजे अवांतर कमी होईल. अशाने शाखाच्या हिंदी गाण्यांचं पण डबिंग मराठीतच असावं. त्यातली सर्व इंग्रजी वाक्ये मराठीत असावीत. महत्वाचे म्हणजे शाखाला महत्व दिले की उदय चोप्राचे फॅन्स नाराज होतील. शाख थेट उदय चोप्राशीच बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो म्हटल्यावर ते आधीच खवळून असतात.
तात्पर्य : शाखाचे असंख्य धागे असल्याने तिकडेच हे हलवावे.

किसि की मुस्कराहटों पे हो निसा र.

जिस देश में गंगा रहती है.

एक दिन बिक जायेगा माटी के मोल.

राज कपूरला हे काय कंपल्शन होतं कोण जाणे. हिरवीणीचे देह प्रदर्शन करायचे दिग्दर्शक म्हणून पण एक function at() { [native code] }अर तरी गाणे असले इनोसंट तत्वज्ञान मी किती भोला भोला टाइप.

मुसाफिर हुं यारो. न घर है ना ठिकाना.

तात्पर्य : शाखाचे असंख्य धागे असल्याने तिकडेच हे हलवावे.>>>

ओके, यापुढे सरांना धागा भरकटत नेऊन शरूख मय करू देणार नाही

जीवनाचे सार सांगणाऱ्या लोकांना स्थळ काळ वेळेचे बंधन नसते
अनाडी चित्रपटात हिरवणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत राज कपूर आपण किती अनाडी आहोत हे आळवून आळवून सांगतो

सचं है दुनिया वालो के हम है अनाडी

वगैरे

कोणाच्याही वाढदिवसाच्या पार्टीत जाऊन असली गाणी म्हणण्याचे धाडस कसे बरे होत असेल, बर ऐकणारी जनता पण हातात ग्लास घेऊन तल्लीन होऊन ऐकत असतात
एकही म्हणत नई, बस कर यार कितना रोएगा, ले केक खा Happy

<<<किसि की मुस्कराहटों पे हो निसा र.>>

म्युझिक सकट पूर्ण कडवे लिहावे:
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
किसीका दर्द मिल सके तो ले उधार
किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है..
(म्युझिक:
बाप्पा बाप्पा बा! बाप्पा बाप्पा बा!
बाप्पा बाप्पा बाप्पा बाप्पा, बा बा बा पॉप पा पा!

मला असली गाणी आवडतात. सारखी प्रेमगीते ऐकू बोअर होते. दळण प्याकेज आहे माझे.

म्युझिक सकट पूर्ण कडवे लिहावे:
,
पॉ पॉ पॉ पॉ पॉपॉ पॉ पॉपॉ, पॉपॉ पॉ पॉपॉ पॉप पॉ
जाने कहां गये वो दिन, कहते थे तेरी याद में
नजरों को हम ...................

टिडिडिडिंग टिडिडी टिडिडिडिंग
मेरे कदम जहां पडे, सजदे किये थे राह में
मुझ को रुला रुला दिया जाती हुई बहार में

पिपाणी
टुई उईंग टुटि ऊई
टॅ टॅ टॅ टॅ टॅ टॅ टॅ टॅ टॅडॅडॅ डॅडॅडॅ डॅडॅडॅ, टॅट्याट्याडॅ डॅ डॅ डॅ टॅडॅडॅ डॅडॅडॅ डॅडॅडॅ
टॅडॅडॅ डँग, टॅडॅडँग
टॅडॅडॅ डँग, टॅडॅडँग
अपनी नजर मे आज कल .............

Lol रघ्वाचार्य !
धमाल पोस्टी आहेत सगळ्याचं !

जिंदगी की न टुटे लडी
प्यार करले घडी दो घडी
मधेच गंभीर होऊन...
ये चना है मेरी मर्जी का मर्जी का (विशेष म्हणजे हा चना भिजवतानाही कुणी दिसले नाही.)
ये दुष्मन है खुदगर्जी का खुदगर्जी का खुदगर्जी का Lol
संत मनोज कुमारला आप्लं म्हणा, मगं बघा आयुष्य कसं बदलून जातं ते. घेशील किती दोन कराने इतके पर 'उपकार' केलेयेत.

अस्मिता Lol

हे माझे दोन पैसे... आपलं ... गाणी Proud

हसते हसते कट जाये रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे
खुशी मिले या गम, बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे

आणि

यूंही कट जायेगा सफर साथ चलनेसे
के मंझिल आयेगी नजर साथ चलनेसे

शाहरूखच्या क्रिमिनल गाण्याचे ईंग्रजी बोल तसेच्या तसे मराठीत आणायला संबंधितांना अपयश आल्याने त्यातील तत्वज्ञान जगासमोर आणता येणार नाही याबद्दल दिलगीर आहे.

असो,
आजपासून रोज मी ईथे धाग्याच्या विषयाशी निगडीत असे शाहरूखचे एक गाणे देत जाईन....
बघूया कुठवर मजल जातेय Happy

सुरुवात स्वदेसमधील माझ्या आवडत्या गीताने करूया.
पल पल है भारी वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई

https://www.youtube.com/watch?v=dRWr8OsVyjA

रामायणातील एक साधासा प्रसंग. सीता गाणे गाऊन त्या प्रसंगाचे वर्णन करत आहे.
अश्यात शाहरूख अचानक गाण्यात उडी मारतो, आणि बघता बघता सुंदर अन उच्चकोटीचे तत्वज्ञान सांगून जातो..

शाहरूखच्या ओळी खालीलप्रमाणे,
(माझ्या आवडत्या ओळी बोल्ड केल्या आहेत)

राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं
राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं

राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं

राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं

- मोहन भार्गव (शाहरूख खान)

शाहरूखच्या क्रिमिनल गाण्याचे ईंग्रजी बोल तसेच्या तसे मराठीत आणायला संबंधितांना अपयश आल्याने त्यातील तत्वज्ञान जगासमोर आणता येणार नाही याबद्दल दिलगीर आहे.>>>
डोक्यावर पडला आहेस का लाळघोट्या ???
का डोळे बाद झालेत नाही ते वाचून आणि बघून?

संत मनोज कुमारला आप्लं म्हणा, मगं बघा आयुष्य कसं बदलून जातं ते. घेशील किती दोन कराने इतके पर 'उपकार' केलेये >>> Lol
अशा विभूतींना विसरून कसे चालेल ? धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल.

संत मनोजकुमारांच्या क्रांती मधले एक गाणे... सुरूवात एकदम सिरीयस नोटवर..

तन भी बदला मन भी बदला
बदल गयी है काया

नंतर एकदम चाल बदलून "लुई शमाशा उई उई उई" असे गाणे सुरू होते. यातले तत्त्वज्ञान कोणी तरी या ओळीच्या अर्थासकट सांगावे.

रूक जाना नही तू कही हार के
काँटो सें चलके मिलेंगे साये बहार के

चल अकेला चल अकेला चल अकेला
तेरा मेला पिछे छूटा राही चल अकेला

मन रे तू काहे ना धीर धरे
हो निर्मोही, मोह न जाने
जिनका मोह करे

इतनी शक्ती हमे दे ना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्ते से हमसे
भूलकर भी कोई भूल होना

गाणी ही ज्या/जी कलाकारावर चित्रित झाली आहेत, त्यांची नसून गीतकार, गायक किंवा संगीतकार ह्यांची असतात असं मला वाटतं.
तर रेखाचं गाणं नसून गुलजार चं आहे..असं!

नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पेहेचान है.. गर याद रहें

हे गाणं इथे सूट होतय का?

काल १८ नोव्हेंबरचे शाहरूख गाणे राहिले. दिलगीरी व्यक्त करतो.
कालचे शाहरूख गाणे खालीलप्रमाणे..

हे ते गाणे आहे ज्यामुळे मी स्वत:मध्ये शाहरूख आणि शाहरूखमध्ये स्वत:ला बघू लागलो.

https://youtu.be/i1KdjbCvJ2Y

वोह तो है अलबेला, हजारों में अकेला
सदा तुमने ऐब देखा, हुनर को न देखा

फुरसत मिली न तुम्हें, अपने जहाँ से
उसके भी दिल की कभी समझते कहाँ से

जाना है जिसे पत्थर, हीरा है वो तो हीरा

सदा तुमने एब देखा, हुनर को न देखा

वो तो है अलबेला,हजारों में अकेला

बंसी को लकड़ी सदा समझा किए तुम
पर उसके नगमो की धुन कहाँ सुन सके तुम

दिए की बाती देखी, देखी न उसकी ज्योति

सदा तुमने ऐब देखा, हुनर को न देखा

आजचे शाहरूख गाणे

हर पल यहाss, जी भर जिओss..
जो है समाss
कल हो ना हो !

सोनू निगम एकदा म्हणाला होता... जेव्हा तो स्वर्गवासी होईल, तेव्हा टीव्हीवर त्याच्या मृत्युची बातमी देताना हेच गाणे वाजत असेल..
पण तुम्ही मात्र आपल्या मृत्युपर्यंत वाट बघू नका.. आपले आयुष्य जगतानाच हे गाणे कायम ध्यानात ठेऊन जगा.. मी हेच करतो. शाहरूख आणि सोबत सोनूचाही चाहता असण्याचे हेच भाग्य! पुर्ण गाणे खाली देत आहे.

https://youtu.be/g0eO74UmRBs

हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी
छाँव है कभी, कभी है धूप ज़िंदगी
हर पल यहाँ जी भर जियो
जो है समाँ कल हो न हो

चाहे जो तुम्हें पूरे दिल से
मिलता है वो मुश्किल से
ऐसा जो कोई कहीं है
बस वो ही सबसे हसीं है
उस हाथ को तुम थाम लो
वो मेहरबाँ कल हो न हो
हर पल यहाँ…

पलकों के ले के साये
पास कोई जो आये
लाख सम्भालो पागल दिल को
दिल धड़के ही जाये
पर सोच लो इस पल है जो
वो दास्ताँ कल हो न हो
हर घड़ी बदल रही है…

- शाहरूख खान, कल हो ना हो !

Pages