Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल समृद्धीच्या आई बाबा आणि
काल समृद्धीच्या आई बाबा आणि मावशीची मुलाखत बघितली. तिचे बरेच गुण घरात अजून दिसत नाहीयेत. स्पोर्ट पर्सन आहे ते कळून येतं (तिने सहा वर्षाच्या खालच्या गटातली ऑल इंडिया sketing चॅम्पियनशिप जिंकली आहे, लहान असतानाच ती दूरदर्शनवर दम दमा दम मध्ये येऊन गेलिय. तिने भरतनाट्यमच्या परीक्षा दिल्यात, अरंगेत्रम राहिलंय. शास्त्रीय संगीत शिकलीय, त्याच्या परीक्षा दिल्यात. गाणी इंग्लिश जास्त म्हणते मात्र. तिचा आवाज चांगला आहे, ते अजून घरात दिसलं नाही असं तिचे आई बाबा म्हणाले.
एकंदरीत multitallented आहे पोरगी.
आज प्रसादला वाचवले तर प्रसाद confused नाहीये, डोक्याने गेम खेळतोय आपला बरोबर. तेजु धोंगडे यांच्यासोबत राहून सहानुभूती मिळेल पण गेम मध्ये पुढे जायला मोठ्या grp चा सपोर्ट हवा हे त्याला समजून चुकलं आहे.
यावेळी मला दोन वि आणि मिनल आठवतात, हरलो तरी चालेल पण जयकडे कधी गेले नाहीत, सोनालीचे सुरू असायचे, तिकडे वाव मिळतोय का बघणे पण हे तिघे कधीच नाहीत.
आज टीम छान पाडलेल्या.
आज टीम छान पाडलेल्या.
माने as a संचालक टोटली अनफेअर, प्रसादवर राग काढला आणि त्याला बाद केलं कॅप्टनसी टास्कमधून, तेजु स्वतः सांगत होती, मी बाद आहे पण नाही ऐकलं. सगळे प्रसादच्या बाजूने होते पण नाही ऐकलं.
प्रसाद आणि विकास टास्कस सॉलिड खेळले. स्नेहलता, तेजु त्यानंतर येतील.
बेस्ट आहे की! सारखं फेअर झालं
बेस्ट आहे की! सारखं फेअर झालं की काय मजा.
अर्थात मी हल्ली सोडुन दिलं आहे बघणं त्यामुळे डायनॅमिक्स माहित नाहीत, पण माने जेन्युअनली खेळतात. नाही आवडत तर राग काढलाच पाहिजे ना! मला टिकायचं आहे म्हणून मी याला काढला हे उत्तर पुरेसं आहे की.
प्रसाद छान खेळत होता,
प्रसाद छान खेळत होता, त्यामुळे नाही पटलं.
उद्या प्रसादला संचालक करुन बदला घ्यायला देतील, हाहाहा.
ओके.
ओके.
) चक्रम आहे. बदला घ्यायला दिला तरी काही तरी भलतंच करतो. अपूर्वाशी पटत नाही जगजाहीर असताना भलतीच नावं घेतो नॉमिनेशनला.
हो! पण प्रसाद (सॉरी परसाद
मला प्रसाद आवडत नाहीच पण
मला प्रसाद आवडत नाहीच पण चांगला खेळला , मानेनी फार अनफेअर निर्णय दिला.
आता अपुर्वा आणि प्रसाद एकत्र.
टीम्स शफल केल्या ते छान झालं.
टीम्स शफल केल्या ते छान झालं. बाकी आता पुन्हा टॉर्चर टास्क. म्हणजे विकास चांगला खेळेल. प्रसाद अज्जिबात म्हणाजे अजिबात आवडत नाही. मानेंनी त्याला आउट केले असेल तर मला आवडेलच.
अपूर्वा किती टोर्चर झेलते बघू आता. मागच्या वेळी ती बसलीच नव्हती सीसॉ वर.
बाकी रुचिराचे इन्टरव्ह्यू बघितले का बाहेर आल्यावर. ती सतत स्वतः चा उल्ल्एख "रुचिरा" असा थर्ड पर्सन मधे करते
अपूर्वा किती टोर्चर झेलते बघू
अपूर्वा किती टोर्चर झेलते बघू आता. >>> तिने माघार घेतली, हिरव्या मिरच्या तिला आणि स्नेहलताला खायला दिल्या तेव्हा तिने एक दोन खाऊन, नाही खाऊ शकत मला त्रास होतो सांगितलं. आधी कसले कसले ज्युस प्यायले, मिरच्या नाही खाऊ शकली.
मला प्रसाद बाद झाल्यामुळे
मला प्रसाद बाद झाल्यामुळे वाईट नाही वाटलं...मागच्या आठवड्यात तो सुद्धा फार वाईट वागला होता...त्यामुळे जशास तसे झाल्यासारखे वाटले...काल नुसते काय काहीबाही खायला प्यायला लावत होते...अपूर्वाचे expressions पाहून कसंतरीच होत होतं ...सगळे मागच्या season सारखं repeat करत आहेत...काहीच नवीन ideas नाहीत यांच्याकडे...3 seasons झाल्यावरही या टास्क मध्ये sympathy मिळवणे हे cruelty दाखवण्यापेक्षा जास्त चांगलं असतं हे अक्षयला अजून कळलेलं दिसत नाही...आज अपूर्वा पुन्हा तेच repeat करणार....कठीण आहे...
माझ्यामते डोक वापरून
माझ्यामते डोक वापरून खेळण्याचे टास्क यांना जमणार नाहीत म्हणूनकरा सहन टॉर्चर असे टास्क देत आहेत.
खरतर हुकुमशहा आणायला पाहिजे घरात सिझन 1सारखा.मजा येईल.
प्रसाद मलाही आवडत नाही,पण काल तो छान खेळत होता.मुळात चारातला एक काढायचा होता तर यांनी दोघातलाच एक काढणार काढला.
त्यांच्या वोट्सवर नक्की परिणाम होणार.
मागच्या आठवड्यात फाटताफाटता
मागच्या आठवड्यात फाटताफाटता राहिलेला मानेंचा चांगुलपणाचा बुरखा गद्दारीच्या शिक्क्यानंतर फाटलाच..... किती ते विकासला बोलले.... आणि त्याने माफी मागितली तर सहानभूती त्याच्याकडे जाईल म्हणून त्याला माफीही मागून देत नव्हते की त्याची बाजूही ऐकून घेत नव्हते ..... परत वर अजुन अपूर्वाशी बोललास तर आपली मैत्री तुटली असले इमोशनल ब्लॅकमेलिंग (ही चुगली नक्की येणार जर आठवड्याभरात हे अपूर्वाला कळले नाही तर)..... किती इनसिक्युअर आहेत हे!!

विकासला कॅप्टन करुन बघ माझ्यामुळेच कॅप्टन झालास नाहीतर तुला कुणी उभे पण केले नसते हेच ऐकवायचा प्लॅन असणार त्यांचा आणि त्यामुळेच काल त्यांनी इतका उघडउघड अनफेअर डिसीजन दिला..... अर्थात त्याचा फायदा प्रसादलाच होणार आहे..... मागच्या आठवड्यात त्याच्या विरुद्ध गेलेल्या तेजस्विनी आणि धोंगडे पण त्याच्या बाजुने बोलताना दिसल्या!!
प्रसादपेक्षा भारी करेल अश्या विकासकडे अनेक गोष्टी होत्या..... वेगवेगळे डान्स करुन बझर होईपर्यंत लोकांचे मनोरंजन करायला लावायचे किंवा कार्टव्हील किंवा अश्या काहीतरी डान्समूव्हज करायला लावायच्या ज्यात विकास उघडउघड सरस ठरला असता आणि माने पण फेअर दिसले असते .... डोक्याने खेळणाऱ्या मानेंकडून इतक्या बेसिक चुकीची अपेक्षा नव्हती!!
तेजस्विनी काल पण आवडली..... अगदी टास्कमध्ये सुद्धा ती फुकटची खुन्नस आणि उगाचा माज दाखवत नाही..... ती आपणहून मानेंना म्हणत होती की प्रसाद माझ्यापेक्षा चांगला खेळला आणि त्यांनी तिला बाहेर काढायला हवे होते आणि ते कुठेही गेमसाठी वाटले नाही..... जेन्युअनलीच तिचे नेचर चांगले असावे
क्रिकेटमध्ये काही विकेट्स कश्या नुसत्या स्लेजिंगमुळे पडतात तशी काल अपूर्वाची बडबड वाटली..... नुसते उद्या आमचा टर्न आहे ही दहशतच समोरच्या टीमला त्यातल्या त्यात सौम्य टास्क देण्यास भाग पाडण्यासाठी असावी!
बाकी ते खरेच मिरच्या वगैरे खायला लावतात का? दहा मिरच्या खाणे किंवा बचकभर आले खाणे 'खायचे काम' नाही
स्नेहलता टॉर्चर टास्क चांगले खेळते हे काल परत एकदा सिद्ध झाले!
आणि अश्या टास्कमध्ये यशश्री आणि धोंगडे जास्त क्रूर होतात हेही दिसले!!
तेजस्विनी काल पण आवडली.....
तेजस्विनी काल पण आवडली..... अगदी टास्कमध्ये सुद्धा ती फुकटची खुन्नस आणि उगाचा माज दाखवत नाही..... ती आपणहून मानेंना म्हणत होती की प्रसाद माझ्यापेक्षा चांगला खेळला आणि त्यांनी तिला बाहेर काढायला हवे होते आणि ते कुठेही गेमसाठी वाटले नाही..... जेन्युअनलीच तिचे नेचर चांगले असावे >>> कित्ती अगदी अगदी. ह्यासाठीच तेजुच जिंकावी. एकतर कोणीही परफेक्ट विनर मटेरीयल नाहीये, त्यामुळे कोणाहीबद्द्ल आत्मियता वाटत नाही, एकटी तेजु सोडून, ती तिच्या नेचरमुळे आवडते. यावेळी एखादी महीला आणि तीच जिंकली तर आवडेल.
आणि अश्या टास्कमध्ये यशश्री आणि धोंगडे जास्त क्रूर होतात हेही दिसले!! >>> हो आज अपुर्वा, स्नेहलता होतील. तेजु बिचारी कसं देऊ असं करत बसेल.
पुढच्या season ला या टास्कला
पुढच्या season ला या टास्कला टक्कल वगैरे करायला सांगायचे नाही असं bigg बॉसनेच सांगावे....पहिले दोन season कोणी टक्कल केलं की "अरे बापरे!!" असं वाटायचं...तिसर्या season ला विशाल विकासने ठरवून का होईना दोघांनी पण टक्कल करून मैत्रीची नवीन व्याख्या मांडली त्यामुळे पाहायला मजा आली...या season मध्ये मात्र प्रसाद,विकासने टक्कल केल्यावर काहीच वाटलं नाही...त्यामुळे आता बस करा...बोअर होतंय तेच ते...next season ला नकोच ते टक्कल बिक्कल ...फालतू नाटकं...
या सीझन ला कुणाची अशी मैत्रीच
या सीझन ला कुणाची अशी मैत्रीच नाही दिसत त्याग बिग करायला लावण्याइतकी त्यामुळे स्वत:साठी च खेळण्याचा टास्क होता.
अपूर्वा ची स्ट्रॅटेजी असेलच बडबड करून दुसर्याला इन्टिमिडेट करण्याची. पण ती एकूणच गर्विष्ठ आहे, मला असे देताच कसे , मला बोलताच कसे असे, वगैरे अॅटिट्यूड. सीसॉ टास्क च्या वेळी "आम्ही हे काल केले नव्हते , तुम्ही पण करायचे नाही" असा कांगावा केला तिने पण आता तिची टॉर्चर करायची टर्न सेकंड आहे त्यामुळे आता आधीच तिच्या टीम ला सांगत होती "आम्ही केले नाही म्हणून अमूक चालणार नाही असले आपण चालूच द्यायचे नाही" अॅक्चुअल टास्क खेळताना पण तिचा चेहरा आणिआविर्भाव असा असतो की जन्मभराचा काहीतरी रीव्हेन्ज घेतेय!
त्यामुळे काही वाट्टेल ते टोर्चर झाले तरी आश्चर्य वाटायला नको. तसेही वीकेन्ड चावडी ला ऐकायला लागेल म्हणून कुणीही घाबरत नाहीत.
>>या season मध्ये मात्र
>>या season मध्ये मात्र प्रसाद,विकासने टक्कल केल्यावर काहीच वाटलं नाही
अगदीच!! त्या दोघांनाही त्याचे काही विशेष वाटलेले दिसले नाही...... बहुतेक लोक आता त्या तयारीनेच बिगबॉसमध्ये येतात!!
>>पण ती एकूणच गर्विष्ठ आहे,
ते आहेच!!
तसे ती आणि माने हे दोन व्हिलन एस्टायब्लिश झालेत पण अजुन हिरोचा पत्ताच नाही
मी सोडलं बिबॉ मराठी बगह्णं पण
मी सोडलं बिबॉ मराठी बघणं पण टिझर पाहिलं , कोणाच्या टक्कल करण्याचे काहीही वाटले नाही. कोणी आवडतच नाहीये आणि कोणाचे बॉन्डिंगही अपिल होत नाही !
नॉमिनेटेड सदस्यही कायम तेच असतात , काहीच एक्सायटिंग नाही या सिझनला
आजही फालतू टास्कस.
आजही फालतू टास्कस.
एकंदरीत काल आज बघून विकास, प्रसाद, स्नेहलता, यशश्री, दोन्ही अमृता चांगल्या खेळल्या. धोंगडे मुलीत जास्त छान खेळली. विकासपण ग्रेट. धोंगडे कॅप्टन होईल. तेजुपण चांगली खेळली पण या मुलींपेक्षा कमी. समु एवढी नाही आणि अपुर्वा शेवटी नंबर लागेल. मुलांच्यात विकास आणि प्रसादचं नाव घ्यायला लागेल. रोहीत, माने, केळकर फुसकेच.
अक्षय बडबड जास्त करतो. तो लस्सी टास्क इतका फालतू खेळला की बास रे बास. फॅमिली फोटो त्याने टॅक्टफुली वाचवला, त्याच्या फॅमिलीचा एकत्रित तो शेवटचा फोटो होता, त्याचे आई बाबा वेगळे रहातात त्यामुळे त्याने एकीकडे टास्क पुर्ण केला, फोटोही वाचवला. माने क्विट जास्त करत होते.
काही क्रिएटीव्ह नाही. त्यातल्या त्यात अक्षय अंड खात नाही, त्याला अंड्याचं देणं एवढीच काय ती क्रिएटीव्हीटी वाटली. त्याने तोंडही लावलं नाही. त्यात तो धोंगडेला सांगत होता की मी पिणार नाहीये, तू सावकाश पी, तिला काही खरं वाटलं नसावं, ती भरभर पीत राहीली. अक्षयने अंड ज्युस का काय ते ओतलंच. मला ते आवडलं त्याचं. उगाच कॅप्टन्सीसाठी जी गोष्ट खात नाही, ती खाल्ली नाही.
बाकी कसले ज्युस देत होते ते समजलं नाही. आजची टीम कालच्यांइतकंही डोकं लढवत नव्हती.
मुली विशेषतः यशश्री, अमृता धोंगडे जीव तोडून खेळत होत्या मात्र. यशश्री हरल्यावर धावत बाथरुममधे जाऊन रडली. दोन्ही अमृता मधे उद्या सामना कोण पुढे जाणार यासाठी पण युट्युबवर समजलं की धोंगडे, विकासमधे कॅप्टन्सी टास्क होणार, त्यात धोंगडे जिंकणार आणि कॅप्टन होणार.
प्रसादची आजपण सटकली, त्याचं आणि स्नेहलताचं वाजलंच.
बाकी अनफेअर संचालक असण्यासाठी माने आणि अन्नाची नासाडी यासाठी केळकर यांची चांगलीच तासडंपट्टी करणार म मां.
अन्नाची नासाडी कसली आली आहे!
अन्नाची नासाडी कसली आली आहे!
पाणी, साबण, शांपू, अंडी.... आणि असंख्य गोष्टींची नासाडी करायला (हो! आणि रिकामा वेळ) तर बिबॉ उचकवतात. अन्नाची नासाडी वरुन बोलले तर त्याला काही अर्थ तरी आहे का?
हो बरोबर. तेच अक्षय म्हणत
हो बरोबर. तेच अक्षय म्हणत होता, जेव्हा त्याच्यावर आरोप केले तेव्हा की आधी किती वाया घालवलं आहे वेगवेगळ्या टास्कमधे. ही आमची स्ट्रॅटेजी आहे.
पण म मां बोलतील असं वाटतंय मला. त्याने आणि टीमने टास्कसाठीचे त्रासदायक होतील असे बरेचसे पदार्थ स्विमिंग पुलमधे ओतले, हाहाहा. आदल्या दिवशी अंडी फोडूनही कचऱ्यात टाकली. एकीकडे नासाडीबद्दल वाईटही वाटलं मला आणि एकीकडे हसूही येत होतं.
तो पूल कोण स्वच्छ करतं!
तो पूल कोण स्वच्छ करतं!
घराला आग लावा एकदाची!
मला वाटतं सफाई कामगार टीम
मला वाटतं सफाई कामगार टीम येऊन सर्व साफसफाई करत असेल, हे सर्व कसले करतात. दोन दिवस टास्कमध्ये या लोकानी एवढी अस्वच्छता केलीय की त्यांनाच साफ करायला लावायला हवं पण नसेल तसं.
बघायचा प्रयत्नं केला पण
बघायचा प्रयत्नं केला पण बघवेना, उगीच ओकार्या, तोडफोड, केसांची साफसफाई.. पण काही इमोशसन्स नाहीत , दंगा नाही कि एन्टरटेन्मेन्ट नाही.. नथिंग इज वर्किंग धिस सिझन !
मराठी आणि हिन्दी बिगबॉसने थोडी मॅनेजमेन्ट टिम शफल करा, तिथे टास्क्स ची गरज आहे आणि इथे ड्रामा-एन्टरटेन्मेन्ट किंवा अर्चना सारख्या घर हादरवून सोडणार्या फटाक्याची
लोल
लोल
मी हे बघणे केव्हाच बंद केलं आहे.. पण इकडे वाचायला नक्की येतेय...
मला मजा आली कालचा एपिसोड
मला मजा आली कालचा एपिसोड बघताना...खूप मनसुबे रचून आलेल्या अपूर्वाला मानेंनी गपगार केले...स्नेहलता संचालक असल्यावर काय होणार याची कल्पना येऊन आणि already विकास एक उमेदवार असल्यामुळे स्वतः वर फालतू अत्याचार सहन न करता त्यांनी टास्कच quit केले...पहिल्यांदा कोणी चॅलेंज quit केले तरी त्याचा आनंद झाला...मजा आ गया...अक्षय तर धम्माल entertainer होता काल...challenge देणार्यांना चांगलंच जेरीस आणले त्याने...लस्सी टास्कला खूप हसलो आम्ही
challenge पूर्ण करणार्यांपेक्षा challenge देणारी टीम बिचारी वाटत होती... 
स्नेहलता-प्रसादच्या भांडणात प्रसाद बरोबर वाटला... स्नेहलताचे उगाच खाजवून खरूज काढणे चालू होतं...
फारच उथळ दिसतायत या वेळेचे
फारच उथळ दिसतायत या वेळेचे स्पर्धक. थोडं युट्यूबवर पाहिलं. आजीबात इंटरेस्टिंग नाहीयेत त्यांच्या गप्पा वगैरे. पहिल्या व तिसऱ्या सिझनमध्ये त्यांचे इतर वेळेचे शॉट्स दाखवत त्यात चांगल्या गप्पा असत. आस्ताद, भूषण, आऊ, किशोर, रेशम आणि तिसऱ्यामधील विकास, उत्कर्ष, सोनाली, मीनल, तृप्ती यांच्याकडे चांगले किस्से असायचे. हे सध्याचे फारच बोर दिसतायत माने, अपूर्वा सोडल्यास.
अत्यंत ओंगळ टास्क होता यावेळी
अत्यंत ओंगळ टास्क होता यावेळी कॅप्ट्नशीप चा. बघवत नव्हतं. खा आणि ओका... ईईईईई....
कोणालाच काही नवीन सुचत नाही करायला.फक्त वाट्टेल ते खाणं देणं किंवा कपडे वस्तु फाडणं यात काय गंमत आहे.
लसुण सोलणे हा एकच टास्क काल मला आवडला. त्या निमित्ताने लसुण सोलुन झाले. असेच कांदे चिरणे, भाजी निवडणे किंवा कणीक मळुन जास्तीत जास्त पोळ्या करणे किंवा कमी वेळात जास्तीत जास्त भांडी घासणे असा टास्क दिला असता तर घरची कामं पण झाली असती
एक शब्द मराठी-एक शब्द ईंग्रजी असे सलग ५ वाक्य बोलणे, सुर्यनमस्कार घालायची स्पर्धा, किंवा शीर्षासनात उभे रहाणे अशा पण गोष्टी देता आल्या असत्या ना. काहीच कसं सुचत नाही या लोकांना.
करेक्ट!! माने काल परत एकदा
करेक्ट!! माने काल परत एकदा डोक्याने खेळले...... त्यांना माहित होते ते शेवटपर्यंत टिकणार नाहीत किंवा हे लोक त्यांना टिकू देणार नाहीत त्यामुळे तेल आणि तूप घालवून हाती धुपाटणे घेण्यापेक्षा त्यांनी क्विट केले..... हा आता त्याबद्दल थोडेसे चावडीवर ऐकून घ्यावे लागेल पण अशीही बोलणी खायचीच आहेत त्यामुळे अजुन कश्याला अत्त्याचार करुन घ्या असा विचार केला असेल त्यांनी..... चांगला निर्णय
अक्षय एंटरटेनर होता पण ते अंड्याचे सोडून बाकी सगळे टास्क खेळायला पाहिजे होते त्याने!!
दोन्ही अमृता आणि यशश्री अनपेक्षितरित्या चांगल्या खेळल्या!!
स्नेहलताने चुक सुधारली ते चांगले केले..... तो पहिला निर्णय देताना नेमके काय निकष लावले होते कुणास ठाऊक!! वेळीच निर्णय बदलला म्हणून नाहीतर तिला पण शिव्या बसल्या असत्या.... आता तिचे उदाहरण देऊन मानेंना झापतील मांजरेकर!!
विकास एकतर पालथ्या घड्यावर पाणी आहे किंवा एकदम उच्च दर्जाचा प्लेयर आहे.... मानेंनी उगीच सहानुभूती घेऊ नये म्हणून लगेच मिठ्या बिठ्या मारुन मोकळा

त्याला माहित आहे उद्या कॅप्टन्सीसाठी त्याला सपोर्ट लागणार आहे
यावेळी कुणी जिमबिम वाले फारसे दिसत नाहिये!!
नाही, मागच्या वर्षी उलट
नाही, मागच्या वर्षी उलट मांजरेकरांनी टक्कल करणार्या विकासला म्हंटले होते कि स्नेहा जयलाच वोट देणार होती , काही गरज नव्हती सॅक्रिफाइस करायची, तुझे केस वाचले असते !
मला वाटतं मांजरेकर या पॉइंटवर उलट मानेंना बरोबर म्हणतील !
काल अक्षय काय करत होता त्याच
काल अक्षय काय करत होता त्याच त्यालाच माहित.
एकतर तब्बल सहा आठवड्यांनतर बिबॉसने कँप्टन्सीसाठी साप्ताहिक कार्यातल योगदान,घरातील वावर या निकषांवरील बहुमत असे फालतू टास्क न देता चक्क वैयक्तिक कार्य दिल होत.
तसच दुसर्या राउंडला मानेंना संचालक न करता स्नेहलताला संचालक केल होत.तेव्हा अपूर्वाने जल्लोष केला होता कारण त्याआधी अपूर्वा आणि अक्षयमध्येच बोलण झाल होतक की कितीही चँलेंज दिले थरी निर्णय माने देणार.पण बिबॉसने ट्विस्ट टाकला.
अपूर्वाला सुरुवातीपासूनच धोंगडे ,यश ,कदाचित देशमुख नको होती म्हणून त्यांच्याच मागे लागली होती.
मानेंनी विकासला आणून ऑलरेडी गेम खेळला होता ,त्यामुळे त्यांना इंटरेस्ट नव्हताच.पण सम्रुध्दी आणि अक्षय हे लाईटली का घेत होते.का नीट टास्क खेळत नव्हते.
बरं,वेळकाढूपणा करून किंवा एंटरटेनमेंट करून काय होणार होत? दरफेरीला एकजण बाद होणारच होता ना.मग मानेंचा धोंगडेला आणायचा प्लँन खोडून काढण्यासाठी जेणेकरुन ती बाहेर जाईल अस काहीतरी प्लँन करायला हव होत.
कँप्टन आमचाच होणार अस हाच अक्षय म्हणत होता आणि गेल्या दोन चावडीवर ममांनी सम्रुध्दी आणि रोहित हे तुमच्या नाहीतर त्यांच्या टीमचे कँप्टन झाले अस सांगितले होत.
अपूर्वा आणि प्रसादलाही ते नको होत.
आता जर धोंगडे जिंकली तर कँप्टन पहिल्यांदाच तेजू ग्र्रुपचा होईल,म्हणजे माने खेल गये.
मास्टरमाइंड अक्षयला हे कळल नाहीक की पहिल्यांदाच अपूर्वाच्या विरोधात आणि तेही ती आणि प्रसाद एकत्र न भांडता खेळले कारण अपूर्वा आणि प्रसादच वाजल नाही,हे त्याला सहन झाल नाही म्हणून भरकटला.
बिबॉस जर चाणाक्ष असेल तर अक्षयला अपूर्वाच्या विरोधात खेळवणार.
तेहा खरी मजा येईल.
सुर्यनमस्कार घालायची स्पर्धा,
सुर्यनमस्कार घालायची स्पर्धा, किंवा शीर्षासनात उभे रहाणे अशा पण गोष्टी देता आल्या असत्या>>>> व्यायामाचे टास्क देणं allow नाहिये त्यांना...
Pages