चिकवाच्या धाग्यावर अवांतर नको म्हणून हा वेगळा धागा.
पूर्वीचे नायक गाण्यातून एण्ट्री घ्यायचे. या गाण्यात ते कुठूनतरी कुठेतरी जात असायचे. जाता जाता जमेल तेव्हढी मदत रंजल्या गाजल्यांना करत असत. एकाच गाण्यात विविध समाजघटकांना मदत करण्यात एक वेळ सरकार, सामाजिक संस्था कमी पडतील पण नायक कधीच कमी पडायचा नाही. जेव्हां तो मदत करत नसायचा तेव्हां सकारात्मक संदेश / जीवनाचे तत्त्वज्ञान सांगायचा. क्वचित नायिका किंवा क्लब डान्सर सुद्धा सांगायची. अशा गाण्यांची सूची या धाग्यावर करूयात.
अमिताभ बच्चनच्या चित्रपटात अशी गाणी ठासून आहेत.
१. रोते हुए आते है सब , हसता हुआ जो जायेगा : या गाण्यात नायक नेहमी एकाच मार्गाने बुलेटवरून मुंबईच्या रस्त्यांवरून हे गाणे म्हणत जायचा. नेहमीचे लोक हे गाणे थांबून ऐकायचे. एका बसस्टॉप वर विनोद खन्ना वर्तमानपत्र वाचता वाचता गाणे कानी पडले की वर्तमानपत्र खाली आणि डोळ्यावरचा गॉगल दाखवत गाणे ऐकत स्माईल द्यायचा. याच पिक्चरमधे तो नंतर सिकंदरला सांगतो कि "तुम रोज एक गाते हुए मोटरसायकल पर गुजरते थे, तो मै बसस्टॉप पर तुम्हारे गाने की दो पंक्तीया सुनता था "
त्यावरून असं वाटायचं की रोजच्या रोज हा त्याच चौकात त्याच मुलाला कडेवर घेत असेल, रोज त्याच चौकात तीच स्टाईलिश प्रेतयात्रा काचेच्या कारमधून निघत असेल, तिथेच रोज " जिंदगी तो बेवफा है" ही ओळ हा म्हणत असेल आणि पुढच्या चौकात विनोद खन्नाला त्याच त्या दोन पंक्ती ऐकू येत असतील. हे सगळं खरं वाटायचं.
https://www.youtube.com/watch?v=e18Pgofqpnc
२. नास्तिक या चित्रपटात सुद्धा बच्चन बसमधून बाहेर पडून "आज का ये दिन, कल बन जायेगा कल, तू पीछे मुडके ना देख प्यारे आगे चल" हे महान तत्त्वज्ञान सांगत असतो. दिसायला या सर्वसाधारण ओळी असल्या तरी यात अमेरिकन जीवनशैलीचे तत्त्वज्ञान आहे. An Englishman and An American मधे दोघांतला जो फरक सांगितला आहे त्यातच अमेरिकन लोकांच्या चंगळवादाचे रहस्य आहे. आजचा आज जगून घ्या, उद्या कुणी बघितलाय ? हेच आमच्या ऋषी मुनींनीही सांगितले आहे. मुंबईकर विरूद्ध पुणेकर या तुलनेत मुंबईकर नेहमी आनंदी का असतात याचे रहस्य या गाण्यात सांगितलेले आहे. मुंबईकर हा नेहमी रस्त्यात अडल्या नडल्यांना मदत करतो. कुणाचा अपमान न करता योग्य तो पत्ता सांगणे, नाराज झालेल्या प्रेयसीच्या गळ्यात हात टाकून तिला ओढून आणून तिचा हात प्रियकराच्या हातात देणे ही कामे मुंबईकर सहजच करतात.
रस्त्यात काळजी करत बसलेल्या माणसाला "एक जगह जो बैठा रह जायेगा, रास्ते का पत्थर बन जायेगा, बीते दिनों के यादों मे ना जल, शेरू आगे चल्ल" असे म्हणणारा नायक नेहमीच आपलासा वाटतो.
३. किसी कि मुस्कराहटों पे हो निसार - हे जरा क्लासिक मधे मोडतं. इथे भक्ती भावाने हात जोडले जातात. अशा गाण्यांनीच रस्त्याने गाणं म्हणत जाणारा , लोकांना थांबून जगणं शिकवणारा, मदत करणारा नायक उभा केला. वाडवडलांपासून चालत आलेली परंपरा, तिला हसू नये नाहीतर भावना दुखावल्या जातात.
४. आवारा हूं - यात नायक मी बदनाम का आहे हे अभिमानाने सांगत असतो. ते सांगतानाच परोपकारही करतो. थोडक्यात रॉबीनहूड पण असतो, इनोसन्ट पण असतो. आजच्या जमान्यात "अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहीजे, तिचा गर्व कसला बाळगतोस " असे संवाद नसतानाचा काळ तो. जे दाखवाल ते भाबडेपणी शोषून घेतलं जाई आणि दाखवणाराही भाबडेपणी दाखवला जाई. पडद्यावरचा हा इनोसन्ट नायक जेव्हा गाणं म्हणायचा तेव्हां बायाबापडी त्याच्या भोळसटपणावर खूष होऊन कानावर बोटं मोडायच्या. पण देवयानी चौबळ सारख्या काही बाया मात्र राजकपूरला कशाचं आकर्षण होतं यावर धडाकेबाज लेख लिहून लोकांच्या भावना दुखावायच्या. अर्थात त्यावेळी तोडफोड होत नसे. काही वर्षांनी एखादे मराठी संकेतस्थळ निघेल आणि आपल्यातल्या न्यूतत्वाचं भांडवल करून अनेक गाणी गाणारा गायक त्या संस्थळावर जन्माला येईल हे कदाचित आवारा हूं च्या टीमला ठाऊक असावे.
५. मेरा जूता है जपानी - हे एक कल्ट क्लासिक गाणं. इतकं सगळं मी बाहेरचं वापरतो तरी माझं हृदय मात्र देशी आहे असा देशप्रेमाचा दाखला यात मिस्टर इनोसन्ट देतो. यावरूनच इथे लोन घेऊन परदेशी जाऊन राहू मात्र दिल है हिंदुस्तानी म्हणून देशप्रेम सिद्ध करायची स्पर्धा सुरू झाली. कॅनडाचं नागरिकत्व घेऊन प्रेक्षकांना देशप्रेमाचे डोस पाजणारी संस्कृती ही पुढची पायरी.
अशी आणखीही गाणी असतील. वाचक भर घालतीलच.
ओह रे ताल मिले नदी के जल मे
ओह रे ताल मिले नदी के जल मे
नदी मिले सागर से
सागर मिले कौन से जल मे
कोई जाने ना
अर्थात सरळ सरळ पाहिले असता हे भौगोलिक सत्य सांगणारं गाणं आहे. शिवाय कवीनं शाळेत जलचक्राच्या तासाला झोपा काढल्या होत्या हे स्पष्ट दिसतं, नाहीतर 'समुद्राचं पाणी कुठं जातं' असा प्रश्न पडला नसता.
पण चिकटवायचंच ठरवलं तर जीवनाचं तत्त्वज्ञान चिकटवू शकतो.
रोते हुए आते है सब तत्वज्ञान
रोते हुए आते है सब तत्वज्ञान हे अजून जीवनाचा पूर्ण अनुभव घेण्या आधीचे आहे. पुढे कटु अनुभव आल्यावर मग तो नवीन बाईक घेऊन ये अंधा कानून है हे सांगत फिरतो.
शाहरूखची सगळीच गाणी !
शाहरूखची सगळीच गाणी !
शाहरूखचे एक गाणे दाखवा ज्यात जीवनाचे तत्वज्ञान नाही आणि माझ्याकडून हजार रुपये मिळवा !
ह्या धाग्याच्या विषयावरून
ह्या धाग्याच्या विषयावरून आठवलं. शाळेत असताना आमच्या एका मित्राकडे फळ्यावर सुविचार लिहायचं काम होतं. त्याने एकदा तिथे 'जो जीता वही सिकंदर' हा सुविचार लिहिला होता.
मैं जिंदगी का साथ निभाता चला
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया !!
देव आनंद यांचे गाणे
ये दुनिया पित्तल दि बेबी डॉल
ये दुनिया पित्तल दि बेबी डॉल मी सोने दि
हेदेखील एक वेगळेच तत्वज्ञान आहे.
आदमी मुसाफीर है, आता है जाता
आदमी मुसाफीर है, आता है जाता है... - अपनापन
जिंदगी प्यार का गीत है..
जिंदगी प्यार का गीत है..
जिंदगी के सफर में गुजर..
जिंदगी कैसी है पहेली..
जिंदगी का सफर..
जिंदगी एक सफर..
जिंदगीने सुरुवात होणारी बहुतेक गाणी ही जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारीच असावीत.
The whole thing is that के
The whole thing is that के भैय्या सब से बडा रुपैय्या
जिंदगीने सुरुवात होणारी
जिंदगीने सुरुवात होणारी बहुतेक गाणी ही जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारीच असावीत>>>100%
तोरा मन दर्पण केहलाये
तोरा मन दर्पण केहलाये
शाहरूखचे एक गाणे दाखवा ज्यात
शाहरूखचे एक गाणे दाखवा ज्यात जीवनाचे तत्वज्ञान नाही आणि माझ्याकडून हजार रुपये मिळवा !>>>
इतस क्रिमिनल बेबी बूटी
गोइंग पॉप पॉप पॉप
ड्राइविंग में क्रेजी
सेक्सी लिखे थे गर्ल शुड बे
स्पेंडिंग आल माय मनी >>> यातही जीवनाचे सार सामावले आहे
फक्त सर च त्याचा अर्थ उलगडून दाखवू शकतात
दिल क्यों धक् धक् करता है
दिल क्यों धक् धक् करता है
क्यों ये तुझपे मरता है
दिल क्यों धक् धक् करता है
क्यों ये तुझपे मरता है
दिल तुझको ही चाहे बार बार
अरे ओए ओए ओए ओए
हम तो दीवाने हुए यार
तेरे दीवाने हुए यार
की अब क्या करें हम हे हे
कैसे जियें हम हे हे
इतना बता दे ओ मेरे यार
हम तो दीवाने हुए यार
तेरे दीवाने हुए यार
>>>यात पण सापडेना कि जीवनसार
अमोल पालेकर ची सगळी गाणी...
अमोल पालेकर ची सगळी गाणी... अमोल पालेकर फॅन क्लब हवा इथे खरेच...
तुम बेसहारा होतो किसी का
तुम बेसहारा होतो किसी का सहारा बनों. तुमको अपने आप ही सहारा मिल जाये गा....
अनुरोध मधले गाणे..!!
अपुन बोला तु मेरी लैला ,
अपुन बोला तु मेरी लैला , इश्क कमीना इ. गाण्यांत जीवनाचे अख्खे सार सामावले आहे. ऐका कधी, परमानंदाची फिलिंग येते.
ये काली काली आँखें ये गोरे गोरे गाल यात तर हीरोने परोपकाराचा कळस आहे हीरोईनची स्तुती करून. कारण ती मुळात सावळी आहे पण हा आपला गाल गोरे सांगून मोठेपणा घेऊन बसला.
सोचना क्या जो भी होगा देखा
सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा
घायल मधील गाणे ....
इथं खरोखरच जीवनाचा सार
इथं खरोखरच जीवनाचा सार दाखवणारी गाणी लिहायची आहेत का उपरोधिक
दोन्ही प्रकारचे प्रतिसाद येत आहेत त्यामुळे कन्फ्युज व्हायला होतंय
अहो दोन तीन हजार मिळतात का
अहो दोन तीन हजार मिळतात का बघावं असंच आपलं चहा घेता घेता, म्हणून ट्राय केले .
जिंदगी कि यही रीत है ,, वरच्या जिंदगीच्या लिस्टीत अजून एक.
नफरत की दुनिया को छोडकर प्यार की दुनिया में..
तु हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा..
दुनिया में जीना है तो काम कर प्यारे .... अजून आठवले तर लाहीन.
महान तत्त्वचिंतिका केटी केली
महान तत्त्वचिंतिका केटी केली यांनीदेखिल जीवन कसे जगावे यावर सुंदर निरुपण केले आहे.
अहो दोन तीन हजार मिळतात का
अहो दोन तीन हजार मिळतात का बघावं असंच आपलं चहा घेता घेता, म्हणून ट्राय केले>>>
महान तत्त्वचिंतिका केटी केली >>>
मायकल पण
साने गुरुजी आणि मायकल जॅक्सन हे माझे आदर्श आहेत
त्यांचे man in the mirror हे मला माझं जीवनावश्यक सूत्र वाटतं
“ साने गुरुजी आणि मायकल
“ साने गुरुजी आणि मायकल जॅक्सन हे माझे आदर्श आहेत”
आशुचॅम्प
आशुचॅम्प
भाग्यश्री१२३
मस्त लिहिले आहे, रघू आचार्य!
१. राज कपूरचे सजन रे झूठ मत बोलो , खुदा के पास जाना है
२. आनंद सिनेमातली सगळीच गाणी
३. ये तो सच है के भगवान है- हम साथ साथ है. इथे प्रेक्षकांना पिळून सार काढलंय .
हे तर मनाचे श्लोक आहेत.
बाकी माणसाने परोपकारी विचार व जीवनाचे सार आचरण्याबाबत 'बालादपि सुभाषितम् ग्राह्यं वृत्ती' ठेवावी. म्हणून
हे बालाचं गाणं---
सुन, मैं हूँ थोड़ा सनकी, करूँ मन की
Baby, गाना लगा दे थोड़ा funky
नाही मन की, नाही धन की
ये बात है तेरे तन की
ऍडम स्मिथ ने हेच सांगितलंय
ऍडम स्मिथ ने हेच सांगितलंय
सोने दो ख्वाब बोने दो,
सोने दो ख्वाब बोने दो,
जागेंगे, फिर थामेंगे, कोई वजह जीने की
सिटीलाईट मधलं अतिशय आवडतं गाणं.श्रमजीवी वर्गाच्या आयुष्याचं सार सांगणारं.
>>>अमोल पालेकर ची सगळी गाणी..
>>>अमोल पालेकर ची सगळी गाणी...
येसुदास.
छोड दे सारी दुनिया किसी के
छोड दे सारी दुनिया किसी के लिए
कई बार यूं भी देखा है
कस्मे वादे प्यार वफा सब बातें है, बातों का क्या
कुछ तो लोग कहेंगे
दिये जलते है, फुल खिलते है
वो सुबह कभी तो आएगी
एक दिन बिक जाएगा माटी के मोल
महान तत्त्वचिंतिका केटी केली
महान तत्त्वचिंतिका केटी केली यांनीदेखिल जीवन कसे जगावे यावर सुंदर निरुपण केले आहे.<<<<<<
खरे आहे. खूप लोकांनी इंजिनियरिंगमध्ये याच निरुपणावर विसंबून रंगरेली मनवली आणि केटी (प्राप्त) केली.
साने गुरुजी आणि मायकल जॅक्सन हे माझे आदर्श आहेत
त्यांचे man in the mirror हे मला माझं जीवनावश्यक सूत्र वाटतं <<<<<
१) दिल क्यों धक् धक् करता है
आज आलेली शाहरूखची गाणी.
चला तत्वज्ञान शोधूया...
१) दिल क्यों धक् धक् करता है
क्यों ये तुझपे मरता है
>>>>>
@ मृणाली,
दिल म्हणजे हृदय. ते जेव्हा धकधक करत ठोके देते तेव्हा आपण जगत असतो.
पण ते स्वतः मात्र त्यावेळी कोणावर तरी मरत असते.
आपण त्याग आणि परोपकाराचे उदाहरण देताना म्हणतो की तो दिवा बघा कसा स्वतः जळतो आणि दुसर्यांना प्रकाश देतो. अरे ते झाड बघा कसे त्याला दगड मारणार्यांनाही सावली देते. पण त्याग आणि परोपकाराचे सर्वात मोठे उदाहरण तर आपल्याच आत लपलेले आपले दिल आहे. जे स्वतः कोणावर तरी मरून आपल्याला जगवत असते. म्हणून कदर करा त्या हृदयाची, त्याच्या स्पंदनाची, त्यात उमलणार्या प्रेमाची
-----------
२) इतस क्रिमिनल बेबी बूटी
गोइंग पॉप पॉप पॉप
ड्राइविंग में क्रेजी
सेक्सी लिखे थे गर्ल शुड बे
स्पेंडिंग आल माय मनी
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
@ आशुचँप,
गाणे मराठीत लिहून आणा. मला ईंग्लिश जमत नाही
-----------
३) अपुन बोला तु मेरी लैला
वो बोली फेकता है साला
>>>>>>>>>>>>>
@ भाग्यश्री,
केवळ अपुन बोला तू मेरी लैला म्हणून कोणी तुमच्यावर का विश्वास ठेवेल. जोपर्यंत तुम्ही ते प्रेम कृतीतून व्यक्त नाही करत तोपर्यंत त्याची कदर कोणी का करावी...
कारण,
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
जय जय रघुवीर समर्थ
-----------
४) कर दे मुश्कील जीना, ईश्क कमीना
>>>>>>>>>>>
ईश्क ... लव प्यार मोहोब्बत... म्हणजेच प्रेम !
आयुष्यात खरे प्रेम असो वा कुठलेही ध्येय असो, ते मिळवणे सोपे नसते.
त्यात आपले जगणे मुश्कील होणारच, आयुष्य खडतर होणारच.
पण त्यातूनही तुम्ही ते प्रेम वा ध्येय मिळवायचा प्रयत्न करणे कधी सोडू नये. त्यातच जीवनाचे सार्थक आहे.
म्हणून त्या गाण्यातही आधी आपले जगणे खडतर केलेल्या प्रेमाला कमीना म्हणणारा शाहरूखही शेवटी काय बोलतो पहा...
बट आय लव्ह ईश्क बबुवा
यावरून मला माझी आज्जी आठवली, ती नेहमी मला म्हणायची...
बाळ ऋन्मेष,
अगर तुम गलत रास्ते पर चलोगे
तो हो सकता है शुरुवात में तुम्हे बहुत कामयाबी मिले,
बहुत खुशियाँ मिले, मगर अंत में तुम्हारी हार होगी
और अगर सही रास्ते पर चलोगे, तो भले ही शुरुवात में
तुम्हे कदम कदम पर ठोकरे मिले,
मुसीबतों का सामना करना पड़े, परेशानी हो
मगर अंत में हमेशा जीत होगी
होऊ दे आयुष्य खडतर, पण तेच तर जगणे आहे मित्रा..
मिळमिळीत जगणेही काही जगणे आहे भला..
हजार रुपये पुन्हा माझ्या खिशात. उद्या पुन्हा ट्राय करा. शुभरात्री
म्हणलं ना एकवेळ शरूख मान्य
म्हणलं ना एकवेळ शरूख मान्य करेल की गाणी फालतू होती पण सर मान्य करणार नाहीत
लाळघोटेपणात त्यांची मास्टरी आहे
उद्या पॉम्प पॉम्प धीन धा झक मारली असं गाणं आलं शरूख चे तरी सर त्यातून अर्थ शोधून सांगतील
Pages