Submitted by deepak_pawar on 13 November, 2022 - 02:20
साजणी आता इथे तू एकदा येऊन जा
सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा.
बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती
फूललेली ही फुले केसात तू माळून जा.
माळता केसात सुमने गगन हे गंधाळले
गंध केसातील सारा या इथे उधळून जा.
एकदा माझ्या घरी प्रीत गंध उधळित ये
एकदा माझ्या मनी प्रीत तू गोंदून जा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान. आवडली.
छान. आवडली.
वाह फारच गोड!!
वाह फारच गोड!!
केशवकूल, सामो मनःपुर्वक
केशवकूल, सामो मनःपुर्वक धन्यवाद.
सुंदर
सुंदर
मस्त साजणी.
मस्त साजणी.
स्वप्नाली, किशोर मुंढे
स्वप्नाली, किशोर मुंढे मनःपुर्वक आभार.
कविता खूपच सुंदर.
कविता खूपच सुंदर.
दुसऱ्या कडव्यात ' फुललेली ही फुले ' मीटरमध्ये बसत नाहीये.
शेवटच्या कडव्यात 'प्रीत तू गोंदून जा' ही कल्पना थोडी ऑड वाटली. त्याच्या आधीच्या ओळीत तिला प्रीत गंध उधळीत ये - इतकी सुंदर कल्पना केली आहे! तो प्रीत गंध मनापर्यंत पोहोचला की मन प्रफुल्लित होईल. तिथे गोंदणे हे क्रियापद चपखल वाटलं नाही. क्षमस्व, प्रामाणिक प्रतिक्रिया आहे. मला तुमच्या कविता आवडतात.
हरचंद पालव <<<बदल केला आहे.
हरचंद पालव <<<बदल केला आहे. जेव्हा आपल्याला आपल्या उणिवा कळतात तेव्हाच आपण त्या दूर करू शकतो, त्यामुळे प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
आवडली!
आवडली!
deepak_pawar दत्तात्रय
deepak_pawar दत्तात्रय साळुंके चौबेजी (पोएटचं हेड वाले ) आपण लोक सध्या फॉर्मात आहात. त्यामुळे आम्हा वाचकांना काव्य मेजवानी मिळत आहे. आभार!
आता वर हपा सरांनी मीटर ची गोष्ट केली.(माझ्यासाठी मीटर म्हणजे लांबी मोजायचे परिमाण) त्यावरून माझा एक अनुत्तरीत प्रश्न आठवला. माझ्या समोर "माझ्या मना बन दगड" ही किंवा "लमाणांंचा तांडा " कविता आहे.
तेव्हा गद्य हे आपल्या नकळत काव्य केव्हा होते नि हृदयाला जाऊन भिडते?
कोण आणि कशी ही जादू होते?
घाई नाही. जमेल तेव्हा मला समजाऊन सांगा.
निकु मनःपुर्वक धन्यवाद.
निकु मनःपुर्वक धन्यवाद.
केशवकूल
गद्य हे आपल्या नकळत काव्य केव्हा होते नि हृदयाला जाऊन भिडते?
कोण आणि कशी ही जादू होते?
मला सुद्धा हे प्रश्न पडलेले आहेत.
मीटर बाबत जाणून घ्यायचं असल्यास निवडक मायबोलीवर "गझल परिचय - पार्श्वभूमी, दृष्टिकोन, तंत्र व आशय" हा बेफिकीर यांचा लेख आहे. त्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आहे.
आपले मनपुर्वक आभार.
सुंदर शब्दरचना..!!
सुंदर शब्दरचना..!!
रूपाली मनःपूर्वक धन्यवाद..
रूपाली मनःपूर्वक धन्यवाद..