सु. शि. : एक अनुभव

Submitted by सूलू_८२ on 15 October, 2019 - 08:53

सु. शि अर्थात सुहास शिरवळकर ह्यान्च्या साहित्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण जसे सुगम संगीत किंवा भावगीत म्हणतो तश्या टाईप या कांदंबर्‍यांमध्ये पण प्रकार आहेत. सुशीची म्हणून ही कथा पण मला खूप आवडली होती. निव्वळ गैरसमजातुन त्या मुलीला काय प्रसंगांना तोंड द्यावे लागते.

सनसनाटी ही ममी कथा पण मस्त होती.

छान धागा सूलू ........
सु शि लिखित संमातर कसे आहे ?
वाचून झालेल्या दोस्तानी अभिप्राय द्यावा..

छान धागा सूलू ........
सु शि लिखित संमातर कसे आहे ?
वाचून झालेल्या दोस्तानी अभिप्राय द्यावा..

छान धागा सूलू ........
सु शि लिखित संमातर कसे आहे ?
वाचून झालेल्या दोस्तानी अभिप्राय द्यावा..

धुकं धुकं वेगवेगळ्या गूढकथा आहेत.जरा रत्नाकर मतकरी स्टाइल.माझ्याकडे डेलीहंट नावाच्या साईट वरून ऑनलाइन विकत घेतलेलं होतं. बुकगंगा वर इ कॉपी असू शकेल.

ओके.. धन्यवाद.
रोज थोडा थोडा छोटा होत जाणारा माणूस यातच आहे का?

ती वेगळी कादंबरी आहे का, कणाकणाने नावाची?आता आठवत नाहीये. किंवा याच पुस्तकात शेवटचा भाग असेल.
rmd सांगू शकेल.

इथे आहे बघा.पण कथेचा जीव लहान.त्या मानाने पेपरबॅक ची किंमत जास्त वाटतेय.इतक्या पैश्यात दुनियादारी किंवा झूम 2 कादंबऱ्यांचे अनुभव एकांत देतील(ममव, यु नो.. व्हॅल्यू फॉर मनी)
https://www.amazon.in/Kanakanane-Marathi-Suhas-Shirvalkar/dp/B097TYC3JB/...

मी वाचले तेव्हां या कथेसोबत आणखी चार कथा होत्या. त्याला विस्मयकथा असे नाव दिले होते. दिलीपराज प्रकाशनाचे होते.

एक लहान मुलगी. वयाच्या मानाने तिचा मेंदू काही पटीत पुढे विकसित होत असतो. ती तीन चार वर्षाची असते तेव्हां दहा वर्षांच्या मुलांसारखी असते. वर्षाची होते तेव्हां ती बौद्धीकदृष्ट्या वयात येते. जेव्हां १६ वर्षांची होते तेव्हा ती चाळिशीची असते..

आणखी एक. एका गुप्तहेराने एक सीक्रेट आणलेलं असतं. पण येताना त्याला गोळी लागल्याने तो कोमात जातो. ते सीक्रेट कुठे आहे हे फक्त त्यालाच ठाऊक असते. त्या वेळी संशोधकांच्या एका टीमने एक शोध लावलेला असतो ज्यामुळे मनुष्य सूक्ष्मात जाऊ शकत असतो. डिफेन्स मिनिस्ट्री या शोधाचा उपयोग करायचं ठरवते. स्वेच्छेने तयार होणारा डॉक्टर मिळतो. या मशीनच्या सहाय्याने तो मेंदूतल्या शिरांमधे प्रवेश करतो...

आणखी एक होती. बहुतेक चार पाच होत्या. अशा कथांचं एक पुस्तक होतं.

अजून एक पुस्तक होतं त्यात लेखकाला मध्यप्रदेशातल्या एका जंगलातल्या गावातली गढी खुणावत असते. तिथे त्याला पोहोचवायला कुणी तयार नसते. पण तो जातो. तिथे गेल्यावर त्याला त्या गढीत त्याच्या कादंबरीतली पात्रं भेटतात. काही हिंसक असतात, काहींना न्याय हवा असतो, काहींना जाब विचारायचा असतो तर काहींना बदला घ्यायचा असतो. इथे ही पात्रं त्यांच्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागत असतात..

अनु, लिंकबद्दल धन्यवाद.
मला फ्लिपकार्टवर १५० रूपयांना मिळाले. डिलीव्हरी चार्जेस वेगळे.
एकच शिल्लक होतं.
https://www.flipkart.com/books/suhas-shirvalkar~contributor/pr?sid=bks&p...

करेक्ट मी_अनु! हीच ती कादंबरी - कणाकणाने. तो माणूस कणाकणाने झिजत जातो अशी स्टोरी. फार काही ग्रेट नाही वाटली मला.

धुकं धुकं बहुतेक कथासंग्रह आहे. खूप पूर्वी वाचलाय. कथा आठवत नाहीयेत आता.

रघु, कादंबरी मधली पात्रं भेटतात ती 'गढूळ'.ती पण आहे अमेझॉन वर.
धुकं धुकं मध्ये एक टाईम मशीन किंवा टाईम लूप सदृश गोष्ट आहे, त्यात नायक समुद्रावरून भविष्यात जातो.आणि पहिली आहे त्यात एक अदृश्य एंटिटी समुद्रात लोकांना गायब करत असते.
ती मेंदूत प्रवेश वाली कथा मला आठवते पण कोणत्या संग्रहात वाचली ते आठवत नाही.

थँक्स अनु
आता आठवली कथा धुकंधुकं. त्याला आपलं जहाज आपटून फुटणार आहे हे आधीच दिसतं. त्यानंतर बरंच विलक्षण घडतं.

वेशीपलिकडे म्हणजे बेटावर जहाज अडकतं. तिथे वेगळीच दुनिया असते तेच बहुधा.
पहाटवारा त्या वेळी खूप आवडलेली. दारा बुलंद, मंदार, अमर विश्वास या विकत घेण्यासारख्या नाहीत कथा.

जाता येता आजही आवडते.

फिरोज इराणी चा जेम्स बॉण्ड सारख्या करियर प्रोफाईल मध्ये प्रवेश याबद्दल पण एक कथा आहे.टोपाझ बहुतेक.मस्त होती ती.
दारा कथा जरा दुःखांत असायच्या.दारा ची बहीण आणि गर्लफ्रेंड तर मरण्यासाठीच जन्माला आलेली असायची.
दारा कथेसाठी मी आदित्य रॉय कपूर कास्ट करेन. किंवा विद्युत जमवाल.

छान आहे कास्टिंग.
माझे कास्टिंग--
मंदार कथा वाचताना का कुणास ठाऊक डोळ्यापुढे मोहन गोखले यायचा.
फिरोज इराणीचं वर्णन फिरोज खानशी जुळणारं होतं.
दारा बुलंद बहुधा ग्रेगरी पेकचा भारतीय अवतार असावा (देव आनंद नव्हे).
अमर विश्वास कोण हे जर आत्ताच सांगितले नाही तर कुणी तरी स्वप्नील जोशी बुक करून टाकायचा.

अमर विश्वास स्वजो किंवा सुबोध भावे कास्ट होण्याआधी आपण दारा च्या घोड्याखाली स्वतःला तुडवून घेऊ.आमिर खान ला चष्मा घालून करून अमर विश्वास. फक्त त्याच्या डोक्यातला रंचो, पिके आणि लाल सिंग तेवढा साबणाचे फवारे मारून स्वच्छ धुवून काढावा लागेल.

अमर विश्वास स्वजो किंवा सुबोध भावे कास्ट होण्याआधी आपण दारा च्या घोड्याखाली स्वतःला तुडवून घेऊ >> Lol

आमीर खान पेक्षा रोनित रॉय चालेल कि. कोर्टाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.

अमर विश्वास स्वजो किंवा सुबोध भावे कास्ट होण्याआधी आपण दारा च्या घोड्याखाली स्वतःला तुडवून घेऊ.आमिर खान ला चष्मा घालून करून अमर विश्वास. फक्त त्याच्या डोक्यातला रंचो, पिके आणि लाल सिंग तेवढा साबणाचे फवारे मारून स्वच्छ धुवून काढावा लागेल. >>>
मी_अनु Rofl

अरे पण आमीर कसा चालेल? अमर विश्वास ६ फूट उंच, रूंदखांद्या, सोनेरी केस वाला वगैरे आहे. केसांचं जाऊदे, ते रंगवता येतील. बाकीच्या गोष्टींचं काय? आणि अमरला चष्मा कशाला? त्याच्या निळ्या डोळ्यांच्या जादूत अडथळा येईल की! Proud
ह्रितिक सूट होईल कदाचित.

सगळीकडे ह्रितिक घेऊन कसं चालेल?अलरेडी फिरोज इराणी म्हणून ह्रितिकच परफेक्ट आहे. Happy त्या दमयंतीला 5 नल दिसले होते तसं आपल्याला दारा पण ह्रितिक, अमर विश्वास पण ह्रितिक, मंदार पटवर्धन पण ह्रितिक, फिरोज इराणी पण ह्रितिक,मुकेश लाल पण ह्रितिक असं होईल.

मग आता काय, तो ललित किंवा गश्मीर दोनच राहिले.ललित तो मिड काहीतरी नावाचा कुक चित्रपट बघून डोक्यात जायला लागलाय.

मिडीअम स्पायसी! तो मी जाणूनबुजून स्किप केलाय Proud
गश्मीर बरा दिसेल कदाचित. ( मी हळूच आदिनाथ कोठारेचा पण विचार करून पाहिलाय मनातल्या मनात Proud )

सुहास शिरवळकरांची किमान 25 - 30 पुस्तकं वाचली आहेत . सहावी सातवीपासून वाचनात आली , ती शैली ओघवती आहे , गुंगवून टाकणारी आहे त्यामुळे पुस्तकाचा फडशा तासाभराच्या आत पाडला जाई .

गेल्या 2 - 3 वर्षात मात्र असं लक्षात आलं की ही पुस्तकं जरी स्त्री वाचकांना तेवढीच आवडत असली तरी ती खास पुरुष वाचक वर्गासाठी लिहिली आहेत आणि सगळी मर्यादा, पातळी सोडून लिहिली आहेत .

दारा बुलंद कितीही छान रंगवलेला असला , स्त्रीची अब्रू वगैरे सर्वोच्च आदर राखण्याची गोष्ट असं दाखवलेलं असलं तरी स्त्री पात्रांना बरीच खालची लेव्हल दिलेली आहे .. बुद्धीत कमी , विचारक्षमतेत कमी . कुणाचीतरी बहीण, बायको , प्रेयसी यापलीकडे स्त्री पात्रांना स्वतःचं काही व्यक्तिमत्त्व नाही . बहीण , पत्नी , एकनिष्ठ प्रेयसी या नात्यांमध्ये असणाऱ्या पात्रांनाच थोडाफार आदर , प्रतिष्ठा आहे . त्यांची स्त्री पात्रं सुगरण असतील , शुश्रूषेत तरबेज असतील , अब्रूची किंमत देऊन प्रियकराचं रक्षण करणारी असतील , अनेक त्याग करणारी असतील . पण स्वतःच्या शिक्षणाने , बुद्धीने मोठी झालेली सोडाच स्वतःचा उदरनिर्वाह उत्तमपणे चालवत आहेत अशी स्त्रीपात्रं फार मोजकी आहेत .

जी यशस्वी स्त्री पात्रं आहेत ती वेळोवेळी शरीराचा , सौंदर्याचा वापर करून श्रीमंत झालेली आहेत , कारस्थानांचा वापर करून , पुरुषांना खेळवून मोठी झाली आहेत किंवा सरळ श्रीमंत , यशस्वी , नैतिक मार्गाने यशस्वी झालेल्या पुरुषाशी लग्न केल्यामुळे श्रीमंत झालेली आहेत किंवा श्रीमंत वडलांची वारस असल्यामुळे ऑटोमॅटिक यशस्वी आहे .

एखादी नोकरी करणारी स्त्री दाखवलीच तर ती श्रीमंत बॉसला भुलवण्यासाठी ऑफीसच्या बाथरूममध्ये दरवाजा चुकून उघडा टाकून आंघोळ करणारी असते . हे पुरुष वाचकांच्या विकृत फॅटसीजना कुरवाळणं वाटतं आणि स्वतःच्या शिक्षणाने उदरनिर्वाह करणाऱ्या स्त्रियांच्या डिग्निटीचा जाणूनबुजून केलेला अपमान .

अगदी दुनियादारीतली शिरीन सुद्धा स्वतःचा काही उद्योग , व्यवसाय , नोकरी करण्याचा प्रयत्न करत नाही , प्रेयसी किंवा बायको यापलीकडे तिला काही इच्छा , आकांक्षा नाहीत , तिचा भाऊ , नवरा , श्रेयस हे सगळे मात्र आपापल्या व्यवसायात यशस्वी आहेत .

प्रतिकार या बलात्कार पीडितेच्या विषयावरील कादंबरीत इतका गंभीर विषय अत्यंत बेकार हाताळला आहे . अतिश्रीमंत कुटुंबातील मुलीला सामूहिक बलात्कारानंतर कधी एकदा बोहल्यावर उभी करतो यासाठी तिचे वडील आतुर झाले आहेत , जणू तिच्या आयुष्याची संपूर्ण इतिकर्तव्यता लग्नातच आहे .. तिला किमान इमोशनली स्थिरस्थावर होण्यासाठी काही काळासाठी कुठेतरी लांब पाठवून द्यावी , कौन्सिलिंग वगैरेची काही गरज त्यांनाही वाटत नाही आणि त्या 20 वर्षाच्या नायिकेलाही वाटत नाही . तिचंही एकमेव ध्येय लग्न आहे आणि तेही लवकरात लवकर .. हे अतिश्रीमंत कुटुंब आजूबाजूचे लोक त्रास देत असताना कुठेही बाहेरगावी शिफ्ट होऊ शकत नाही , तिथेच राहून सगळं सहन करतं . सगळंच हास्यास्पद आहे . बलात्कार पीडितेला असा त्रास सहन करावा लागतो हे लेखकाला दाखवायचं आहे की असा त्रास सहन करावा लागावा आणि तरी ती फक्त लग्नासाठी हपापलेली असावी कारण बाईला आणखी दुसरं काय हवं असणार अशी लेखकाची एक अजब फँटसी आहे असा प्रश्न पडतो ..

एका कादंबरीत ज्याने एका मुलीला जवळपास वेश्या व्यवसायात ढकलली अशा अति नीच माणसाने घातलेलं मंगळसूत्र की कुंकू यात ती मुलगी धन्यता मानते की भले तुझी बायको म्हणून नाही जगता आलं पण तुझी विधवा म्हणून जगेन , हे तू माझ्याकडून हिरावून घेऊ शकणार नाहीस .. असं काहीतरी आहे , नीट आठवत नाही . आत्मसन्मान इतका सोडलेली स्त्रीपात्रं फक्त यांच्याच कादंबऱ्यात मला आढळली आहेत .

याच्यापेक्षा अगदी बाबा कदमांच्या पुस्तकांमधल्या स्त्रियाही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व , व्यक्तिमत्त्व , इच्छा आकांक्षा ( लग्ना व्यतिरिक्त ) असलेल्या आहेत .

राधा निशा, खरं आहे.आजच्या काळात या कादंबरी मिसोजिनिस्ट वाटतात.
कदाचित त्यांनी लिहिलं त्या काळात बेस्ट व्हर्जन ऑफ सपोर्टिंग फिमेल्स तेच असेल.माहीत नाही.
मार्क ट्वेन चं हकलबरी फिन आजच्या काळात वाचलं तर प्रचंड रेसिस्ट आणि अमानवी वाटेल.लेखकाने नंतर तरी कधी अश्या लेखनाबद्दल माफी मागितली का हे माहीत नाही.गुगल करावं लागेल.

त्यांची स्त्री पात्रं सपोर्टिंग फिमेल्स पेक्षा मर्यादित स्किल्स , मर्यादित बुद्धी , मर्यादित स्वप्नं / महत्वाकांक्षा , ठराविक आयुधं - सौंदर्य , तारूण्य वगैरे वापरून स्थैर्य / समृद्धी प्राप्त करू पाहणारी अशी सामान्य पातळीच्या पुरुष वाचकाला चटकन पटतील , पचनी पडतील अशी लिहिलेली आहेत .

सामान्यतः माणूस हा जेवढा कॉम्प्लेक्स प्राणी आहे - आशा , निराशा , मान अपमान , जिद्द , चिकाटी .. बऱ्याच कॅरेक्टरिस्टिक्स साफ वजा करून , प्रत्येक स्त्री वेगळ्या स्वभावाची असणार जसा एक माणूस / पुरुष दुसऱ्याहून वेगळ्या स्वभावाचा असतो हे लक्षात न घेता दोन - तीन टेम्प्लेट मॉडेल निर्माण केली आहेत - १ . आदर्श पत्नी / प्रेयसी , एकनिष्ठ , अब्रूला जपणारी. २ . स्वैराचारी , कारस्थानी , बदफैली .. कशाला काही अर्थच नाही .

श्री ना पेंडसेंच्या गारंबीच्या बापूची आई स्वैराचारी , बदफैली आहे . पण ती जिवंत माणूस वाटते . त्याचबरोबर बापूची मावशी दुसऱ्या गावात एकटीने राहून बाग / वावर मॅनेज करणारी , सचोटीने दूध , सुपारी वगैरेचा धंदा करणारी , औषधपाणी सुचवून लोकांच्या उपयोगी पडणारी तडफदार स्त्री पात्र आहे , बापूची बायको नाईलाजाने रावजीशी संसार करणारी पण त्याला स्वतःच्या मनाला स्पर्श करू न देणारी , पुढे बापूशी लग्न , संसार झाल्यावरही त्याच्या धर्म , ध्यानधारणा वगैरेला थोतांड म्हणणारी आहे .. तिचे स्वतःचे काहीतरी ठाम विचार आहेत .. बापूवर जीवापाड प्रेम असूनही ती त्याचा मार्ग आंधळेपणाने मान्य करत नाही , लक्षाधीशाची बायको असून भजी तळून त्याचे पैसे हॉस्पिटलला गरीब रूग्णांच्या उपचाराला देण्याचा मार्ग स्वीकारते ..

तुलना करणं बहुतेक हा बहुतेक मूर्खपणा आहे . सुहास शिरवळकर यांची पुस्तकं हलक्याफुलक्या शैलीतली आहेत , पूर्ण वेगळं genre आहे . माझा पॉईंट हा होता की स्त्री स्वैराचारी किंवा बदफैली दाखवण्यात काहीच गैर नाही , तो माणसाच्या आयुष्याचा एक भाग आहे , अनेक स्त्रिया तो चॉईस घेतात आयुष्यात किंवा घ्यावा लागतो .

पण माणूस म्हणून व्यक्तिमत्त्वाचा जो कॉम्प्लेक्स भाग आहे तो वजा करून स्त्रीपात्रांना एक ऑब्जेक्ट , एक सब इंटेलिजन्स असलेला प्राणी या लेव्हलला आणून बसवणं मला पचनी पडेना .. आता त्यांची पुस्तकं वाचणं जवळपास बंद झालं आहे . शैलीतला वेगळेपणा सोडला तर खूप दर्जेदार काही कथानक असतं असंही नाही , एकच साचा , पाणचट विनोद हे सगळं पुरे झालं , आता वाचवत नाही फार .

Pages