Submitted by deepak_pawar on 10 November, 2022 - 10:25
फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी
टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी.
जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती
किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती
फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी.
किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता
कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता
पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी.
देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान
असे उठले होते वादळ उजाड हा माळरान
सडा सुकलेल्या फुलांचा गेला गंध उडुनी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान आहे ही देखील. मुख्य
खूप छान आहे ही देखील. मुख्य म्हणजे आता जास्त छान लिहीत आहात. खूपच सुधारणा वाटते मला.
खूप छान आहे ही देखील. मुख्य
खूप छान आहे ही देखील. मुख्य म्हणजे आता जास्त छान लिहीत आहात. >>>+१
आता एक कथा पण येउ द्यात.
सामो <<<आपला अभिप्राय
सामो <<<आपला अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
खूप खूप धन्यवाद.
केशवकूल <<< वेळ मिळत नसल्यामुळे कथालेखन खूप कमी होतं. पण आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळे लिहिण्यास हुरूप येतो.
खूप खूप धन्यवाद.
खूप छान आहे ही देखील. मुख्य
खूप छान आहे ही देखील. मुख्य म्हणजे आता जास्त छान लिहीत आहात.>>> सहमत.
छान कविता...
रूपाली मनःपूर्वक धन्यवाद.
रूपाली मनःपूर्वक धन्यवाद.