Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लाईव्हमध्ये ममां आल्याच दिसल
लाईव्हमध्ये ममां आल्याच दिसल.इतक्या लवकर.बहुतेक सांगायला आले असावेत की सिझन फ्लॉप जात आहे काहीतरी करा रे बाबांनो.
आज जितु येणार म्हणजे कवितावाचन वगैरे असेलच.
बोअर नको व्हायला.
सेकंड वाईल्ड कार्ड नाही घेणार का या वेळी कारण सुरुवातीला 16 घेतले होते.
हिंदी बिबॉसमधल्या शिवची न्यूज ऐकून परागने शिवला सपोर्ट केला आहे तर आरोहने मात्र सांगितले आहे की मला ही त्याने मारल होत पण मी त्या वेळी त्याला माफ नको करायला हव होत.
पराग आणि आरोहच्या मनातून अजूनही त्यांचा सिझन जात नाही हेच खरं.
खरंतर चावणे हे चुकच होतं.
खरंतर चावणे हे चुकच होतं. तेव्हा शिवची बहीण आरोहने इंस्टीगेट केलं म्हणत होतीना मग आता भाऊ आरोहच्या जागी आणि अर्चना शिवच्या जागी नाही का. त्यावेळी मी ही शिवला वोटींग केलेलं आणि तो जिंकायला हवा होता. यावेळी तो जिंकला तर आनंद वाटेल, वोटींगही करेन पण त्याच्यापेक्षा जर प्रियांका जास्त डीझर्विंग असेल तर ती जिंकूदे.
आज मी उशीरा बघायला सुरुवात
आज मी उशीरा बघायला सुरुवात केली, माने यांना फोन आलेला तेव्हापासून . आज जितू जोशी आलेला, गेम्स आणि इमोशनल भाग होता, घरच्यांची पत्र आलेली त्यामुळे येता जाता बघितला.
आता सगळे अक्षयची रमा कोण हे शोधत बसतील.
जितेंद्र जोशी एकदा येऊन गेला
जितेंद्र जोशी एकदा येऊन गेला ना? मला तो भाग घरी लागलेला आणि ऐकलेला वाटतोय. की मांजरेकर कसे त्याच्या मॉर्गेजसाठी गॅरेटर राहिले इ. तेच होतं का आज? का मला देजाऊ होणारे?
यावेळी घरात आला, त्यावेळी
यावेळी घरात आला, त्यावेळी चावडीवर आलेला. पत्र घेऊन आला घरच्यांनी लिहिलेली. तसा बोअरच वाटला एपिसोड मला. स्पर्धकांना इमोशनल वाटणे स्वाभाविक आहे. प्रसादच्या आईने लिहिलेलं पत्र आवडलं मला. तेही पूर्ण ऐकलं नाही. अक्षयला त्याच्या gf ने पत्र लिहिलेलं, टोपण नाव रमा. खरं सांगितलं नाही, तिच्या घरच्यांचा विरोध आहे ह्या नात्याला. तिने ट्रॉफीसाठी जागा ठेवलीय, जणू तोच जिंकणार आहे.
ती रमा म्हणजे त्या विशालच्या
ती रमा म्हणजे त्या विशालच्या सौंदर्यासारखी असायची.
विशालने शोभर सौंदर्याचा जप केला आणि मग बाहेर आल्यावर काही महिन्यांनी सांगितल की आमच ब्रेकअप झाल.
तस नाही ना?
पण हा फ्लर्टिंग तर अस काही करतो की ती रमा पण असेल तर सोडून जायची.
मराठी बिबॉसच्या घरातली शिववीणाची प्रेमकहाणी फेक का असेना पण तीच छान होती,रोहित रुचिरा खर कपल असून कपल अस वाटतच नाही.
सम्रुध्दीने खरच ग्रुप सोडला का?पण गरच पडल्यावर अपूर्वा आणि अक्षय मन व.वतील.
काल टार्गेट च्या टास्कमध्ये प्रसादने अपूर्वा आणि तेजूला अंगावर फुगा मारला नाही,पण तेजू मात्र अजूनही नाराज दिसते.पण गेमसाठी तिला फक्त धोंगडेच पुरणार नाही,मानेतर नाहीच नाही,प्रसाद लागेल.नाहीतर एखादा वाईल्ड कार्ड.
मराठी बिबॉसच्या घरातली
मराठी बिबॉसच्या घरातली शिववीणाची प्रेमकहाणी फेक का असेना >>>शिव विणाची love story बर्याच जणांना फेक का वाटते?मला तर genuine वाटली....त्या दोघांनी लगेच प्रेम केलं नाही तर दोघेही मस्त आणि individual गेम खेळायचे त्यामुळे जवळ आले...अर्थात दोघांचे स्वभाव आणि शिवच्या आईचं मत बघता दोघांचं जास्त वेळ टिकणार नाही हे show चालू असतानाच लक्षात आलेले....बाहेर आल्यावर पण ते बराच वेळ सोबत होते...वीणा शिवच्या घरी पण जाऊन आली...त्यांच्यात मोठा वाद झाला असेल....त्यांची love story फेक असती तर ते friends म्हणून तरी नक्की राहिले असते...
मोक्षूला मम.
मोक्षूला मम.
ते एकत्र रहात होते विणाच्या अंधेरीच्या रेंटल घरात, काश्मिरलापण जाऊन आले. ते फोटोही बघितले होते मी. त्याच्या बहीणीला मुलगी झाली तेव्हा तिने अभिनंदनाची पोस्ट केलेली. फेक नव्हती, ब्रेकअप झालं पण दोघांनी एकमेकांना कधी नावं ठेवली नाहीत आणि कारण गुलदस्त्यात राहीलं. ते तसंच रहावं असं मला वाटतं म्हणून वीणाने येऊ नये हिंदी बिग बॉसमधे.
कालचा एपिसोड बरा झाला!!
कालचा एपिसोड बरा झाला!!
सहज वाटतो.
जितू काही म्हणा पण मजा आणतो
तेजस्विनीच्या आईने तिला लिहलेले पत्र आणि यशने अमृताला लिहलेले पत्र आवडले!!
किरण मानेंचा चांगुलपणाचा बुरखा परवा विकाससमोर एकदा आणि काल अमृतासमोर शहरी आणि ग्रामिण वरुन फाटता फाटता राहिला
काही Extra shots मध्ये बघताना जाणवले की अपूर्वा अमृताचा बऱ्याचदा सटली अपमान करत असते आणि ती कोअर ग्रूपमध्ये नाही हे दाखवून देत असते.... पण अमृताकडे सध्या पर्याय नाही आहे.... दुसऱ्या ग्रूपशी फाटलेय त्यामुळे ती बऱ्याचदा हसण्यावारी नेते आणि बिचारी वाटते!!
बिबॉ मराठी सुरु झाल्यापासून ,
बिबॉ मराठी सुरु झाल्यापासून , गेल्या ३ सिझन नंतर पहिल्यांदाच मला एखादा आठवडा स्किप मारावा वाटला
अक्शयला आणि प्रसादला अनुक्रमे जय आणि विशालला फॉलो करायला सांगितलय का ?
सॉरी टु से, नखाचीही सर नाही दोघांना !
किती बोलताहेत मांजरेकर. कान
किती बोलताहेत मांजरेकर. कान किटले.
रुचिरा एव्हिक्ट झाली आहे.
रुचिरा एव्हिक्ट झाली आहे.
तशी जाणार होतीच.पण अक्षयने त्याच्याच टीमच्या मेंबरला नॉमिनेट करून बाहेर जाणारी दुसरी मेंबर.पहिला त्रिशुल आणि दुसरी ही.
त्या ममांनी अशी काय हेअरस्टाईल केली आहे,कुठल्या प्रोजेक्ट साठी आहे का?
कालच्या जितुच्या परत बिबॉसच्या सेटवर येण्यावरून एक गोष्ट नक्की आहे की ममांना डच्चू द्यायच ठरल तर मेकर्स आणि चँनेल जितुचा विचार नक्की करेल.
अक्षयला जरा कमी झापले असं
अक्षयला जरा कमी झापले असं वाटलं मला.
दोन्ही अमृताही मागे पुढे करतात त्याच्या, त्यांनाही जरा बोलायला हवं होतं. कशाला भाव द्यायचा.
आत्ता हिंदी रिपीट बघतेय, मगाशी आधीचं थोडं बघितलं शिवला झापले पण किती सॉफ्टली, सलमान स्टाईल अशी आहे का.
रुचिरा गेली. आता अजून घाबरतील अक्षयला, ज्याला नॉमीनेट करतो त्याच्या टीममधल्याला तो बाहेर जातो, हाहाहा.
ती खूप किरकिर करत होती मात्र, आता रोहित चांगला खेळेल बहुतेक.
तेजु, समु छान दिसत होत्या.
आज मेधा मांजरेकरने ट्रीट दिली असावी, म मां आलेले घरात. मी जरा उशिरा लावलं. शनिवारी साडेनऊला असतं लक्षात राहत नाही.
मराठी कलर्सची एखादी सिरियल
मराठी कलर्सची एखादी सिरियल संपत आली, किंवा एखादा दिसला नाही बरेच दिवस सिरियलमध्ये की तो कलाकार bb त येईल अशा न्युज असतात.
तसं आता राजा राणीची ग जोडी चा हीरो मणीराज बिग बॉस मध्ये येणार असं येतंय, ख खो देव आणि टीम जाणे.
कंटाळलेत का लोक?
कंटाळलेत का लोक?
केळकरने लोणारीला काही चुकीचं
केळकरने लोणारीला काही चुकीचं पकडलं का?
डोके न चालवता लोक आधीचे
डोके न चालवता लोक आधीचे सीझन्स कॉपी केल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे हो कंटाळावाणेच होईल नाहीतर काय.
अक्षय सगळ्या मुलींना गच्च आवळून पकडतो टास्क मधे. ये कुशीत ये माझ्या मिठीत ये असे काय काय बोलतो. हे फारसे अप्रोप्रिएट नसले तरी त्या मुली पण काही आक्षेप घेत नाहीत.त्याही उलटे मजेत फ्लर्ट करताना दिसतात मग काय दोष देणार त्याला.
रुचिरा गेल्याचे आश्चर्य वाटले मला. यशश्री जाईल असे वाटले होते.
अक्षय सगळ्या मुलींना गच्च
अक्षय सगळ्या मुलींना गच्च आवळून पकडतो टास्क मधे. ये कुशीत ये माझ्या मिठीत ये असे काय काय बोलतो. हे फारसे अप्रोप्रिएट नसले तरी त्या मुली पण काही आक्षेप घेत नाहीत.त्याही उलटे मजेत फ्लर्ट करताना दिसतात मग काय दोष देणार त्याला.>>>आधी मलाही असंच वाटलं....पण weekend ला clear झालं की अक्षयचं असं चुकीच वागणं अपूर्वा सहित सगळ्यांनाच खटकलं..पण woman card म्हणून त्याचा issue केला जाईल म्हणून त्याचं भांडवल करणे योग्य नाही असं त्यांनी ठरवलं...म्हणून त्या काही बोलल्या नाही..पण त्यांची आपापसात चर्चा नक्की झाली जी आपल्याला दाखवली नाही..
यशश्री आणि मांजरेकरांचे जोरात
यशश्री आणि मांजरेकरांचे जोरात वाजलेले ना? मग तिला ठेवून रुचिराला काढले?
म्हणजे याचा अर्थ एकतर मांजरेकरांना कुणाला घराबाहेर काढायचा अधिकार नाही किंवा त्यांचे काहीतरी वाजलेले हीच मुळात अफवा आहे.
का यशश्रीचा काहीतरी सॉलिड कनेक्ट आहे चॅनेलमध्ये?
रुचिरा, यशश्री किंवा स्नेहलता यापैकी कुणीही बाहेर पडले असते तरी आश्चर्य वाटले नसते.... पण हे लोक ज्या क्रमाने सेफ/अनसेफ जाहिर करतात त्याला काय लॉजिक असते? प्रसाद आणि रुचिरामध्ये काय सस्पेन्स राहणार? तेच जर यशश्री किंवा स्नेहलता असती तर जरातरी उत्कंठा ताणली गेली असती!!
बाकी चावडीवर तेच ते आणि तेच ते.... फोटो फाडा; सर्टिफिकेटस द्या, बिरुदे लावा आणि ठोसे मारा..... दुसरे काही सुचत नाही का यांना??
क्रिएटिव्ह ब्लॉक आला असेल तर Voot वर किंवा मायबोलीवर पोल घ्या.... लोक एक से एक आयडिया सुचवतील
मांजरेकर आत जाऊन का आले उगीचच? म्हणजे काय उद्देशच कळला नाही!!
किरण आणि विकासचा मेलोड्रामा आता किती दिवस चालणार??
रुचिरा भयंकर दुखावली आहे...
रुचिरा भयंकर दुखावली आहे....eliminate झाल्यानंतर ती ज्या पद्धतीने रोहितशी वागत आणि बोलत होती त्यावरून त्यांचे बाहेर गेल्यावर जुळेल असं काही वाटत नाही....आणि हा खरंच reality show असेल तर यामुळे एका चांगल्या नात्याची वाट लागली आणि ती पण नॅशनल television वर...
एकच दिवस चावडी ठेवा, शनिवारी.
एकच दिवस चावडी ठेवा, शनिवारी. तीच बरी असते, बाकी बोअर. त्याच दिवशी शेवटी एविक्शन करा.
अपूर्वाने अक्षयला सांगितलं फिजिकल होण्याबाबत मग त्याने माफी मागितली दोघींची. तेव्हा तेजा म्हणाली की काही नाही ठीक आहे, तू मुद्दाम नाही केलस असं काही म्हणाली वाटतं (नीट डायलॉगज आठवत नाहीत) , तू चांगला खेळलास. धोंगडे त्याला नखे मारत होती म्हणजे त्याने समजून जायला हवं होतं, आपण अति करतोय. तो तिला सांगायला आला तेव्हा ती मस्करीत असं का वागला करत राहिली, पण तेव्हा तरी तिने ठाम सांगितलं नाही आणि रोहितला जाऊन सांगितलं की त्याला समजाव. त्या टास्कआधी धोंगडे डान्स करत होती त्याच्याबरोबर.
मागेही त्याने तेजाला अडवले एका टास्कमध्ये तेव्हाही आवडलं नव्हतं मला पण तेजाही अरे माझ्या प्रेमात पडशील बघ हा म्हणाली, मग तो म्हणाला चालेल मला तू शाकाहारी आहेस, गोरी घारी आहेस.
या अशा घटना आपल्या दाखवल्या जातात तेव्हा मुलीही एंजॉय करतात त्याची कंपनी असं दिसतं ना. परवा चावडीवर धोंगडेने जे सांगितलं त्यावरून समजलं की त्यांनाही खटकते हे सर्व पण वुमन कार्ड वापरतात म्हटलं जाईल म्हणून बोलत नाहीत.
किरण आणि विकासचा मेलोड्रामा आता किती दिवस चालणार?? >>> चॅप्टर आहेत दोघे, फुटेज बरोबर घेतात, हाहाहा .
मांजरेकर आत जाऊन का आले उगीचच? म्हणजे काय उद्देशच कळला नाही!! >>> मेधा मांजरेकर वेगवेगळे पदार्थ करुन पाठवते नेहेमी, पण अगदी शेवटी जातात ते हे घेऊन भेटायला. यंदा इतक्या लवकर कोणाला टीप द्यायला गेले काय माहीती.
प्रसाद आणि रुचिरामध्ये काय
प्रसाद आणि रुचिरामध्ये काय सस्पेन्स राहणार? तेच जर यशश्री किंवा स्नेहलता असती तर जरातरी उत्कंठा ताणली गेली असती!!>>>दर आठवड्याला हेच येतं मनात...इतकं obvious का करतात?
किरण माने इतक्या
किरण माने इतक्या आत्मविश्वासाने प्रसादच्या बाबतीत जे बोलले ते जर खरं असेल आणि...मी अजून कुठेतरी वाचलं की प्रसादच्या ओळखीचे काहीजण आणि निखील सुद्धा सांगतोय की प्रसाद असा नाहिये हे जर खरे असेल तर प्रसाद खरंच धन्य आहे...काही काळाच्या captaincy साठी आणि game साठी तो स्वतः चा अख्खा गेम खराब आणि स्वत:ची image पण खराब करतोय...
होना आणि यशश्री स्नेहलता
इतकं obvious का करतात? >>> होना
यशश्री स्नेहलता मिनीमम आठवडे कबूल करून घेऊन आल्यात की काय. रुचिराला त्यांच्यापेक्षा जास्त votes होते. फार हर्ट झाली ती.
मला वाटतं प्रसाद आपला इंडिव्हीजुल गेम खेळतोय, काल माने म्हणाले त्यात तथ्य वाटतंय. डिप्रेशन मध्ये असेल तर फॅमिली पाठवणार नाही इथे, bb पण ठेवायचे नाहीत. खरंच असेल तर काऊंसेलर येत असेल इथे.
यावेळी फार कोणीच ग्रेट नाहीये त्यामुळे त्यातल्या त्यात तेजाच जिंकावी असं वाटतं. प्रसाद नकोच विनर.
बाय द वे यशश्रीशी हसून खेळून बोलत होते म मां. पडदा पडला वाटतं सर्वांवर. ती हिंदी सिरियलमधून आलेली आहे ना, त्यामुळे bb फार महत्व देत असतील, मग ती रिक्षा कधी चालवत होती आणि आर जे कधी होती.
जे कपल घरात आणल होत
जे कपल घरात आणल होत त्यांच्याकडून निश्चितच कंटेंटची अपेक्षा बिबॉसने ठेवली असणार,तस पेमेंटही ठरल असेल.पण त्यामानाने रुचिरा काहीच कंटेंट देत नव्हती आणि टास्कही फारसा काही खेळत नव्हती ,संचालक म्हणून पण फेल ठरली,त्यामानाने रोहित कँप्टन ,टास्क,संचालक या सगळ्याच पातळ्यांवर सरस ठरला.
जर यश आणि स्नेहलता पेक्षा रुचिराच पेमेंट जास्त असेल तर सहा आठवडे काहीच न करणार्या रुचिराला काढणारच.
ऐकिवात आहे कि देशमुख ही हायेस्ट पेड कंटेंस्टंट आहे,का ,अजूनही कळत नाही,पण आहे,म्हणूनच पहिल्या दोन आठवड्यात काहीच करत नाही अस दिसल्यावर बिबॉसने लास्ट वॉर्निंग दिली असावी,तर बाईंनी थेट लव्ह अँगलच चालू केला,मला तर ती अजूनही फारशी आवडत नाही,पण वोट्स प्रसादसारखेच खूप मिळतात,म्हणून काढणार नाहीत.
प्रसादचा गेम खरा की खोटा कळत नाही,पण आता त्याला काही बिबॉस लवकर काढत नाही,याची सोय मात्र त्याने केली आहे.
यश,स्नेहलता,माने,विकास हे आता हळूहळू जातील ,अस वाटत.
प्रसाद फायनलला असेल पण विनर
प्रसाद फायनलला असेल पण विनर नको व्हायला हेच वाटत राहते. देशमुख शेवटी पाचात पण नको.
सध्यातरी कलर्सचा माणूस अक्षय वाटतोय, दुसरे कोणी येत नाही तोपर्यन्त त्यामुळे त्याला नेतील फायनलला. तो खेळतो चांगला, फिजिकल होणं मात्र आवडत नाही मला, तेच तेच फालतू डायलॉगज आवडत नाहीत त्याचे.
काहीही म्हणा लवस्टोरी शिव वीणाचीच चांगली होती, बाकी कोणाला तो angle जमलाच नाही, उगाच ओढून ताणून वाटतं इतर.
काहीजण मनावर राज्य करतात माझ्या त्यापैकी स्मिता, शिव वीणा आणि मिनल यांची नावं मला विसरता येणार नाहीत.
कसला फालतू नॉमिनेशनचा फार्स
कसला फालतू नॉमिनेशनचा फार्स करतात बिग बॉस.
तेजु धोंगडे दोघी एकत्र एकट्या
तेजु धोंगडे दोघी एकत्र एकट्या लढत असतात मात्र.
अक्षय आणि समृद्धी धावण्यात एक्स्पर्ट आहेत.
पण काल टास्क ज्याअर्थी पूर्ण
पण काल टास्क ज्याअर्थी पूर्ण झाला नाही किंवा बिबॉसने पूर्ण होऊ दिला नाही त्याअर्थी आचज्या आठवड्यात एव्हिक्शन नसेल का?
तस असेल तर बिबॉसला नॉमिनेशन मध्ये स्नेहलता हवी आहे का,कारण आज प्रसाद सेफ होईल,आणि अक्षयही सेफ होईल ,म्हणजे टीम बी सोबत देशमुख आणि यश असणार ,आता त्या दोघींनाही काढायचच नसेल तर वोटिंग बंदच ठेवाव लागेल.
पण जर स्नेहलता असती तर कालच टास्क पूर्ण केला असता.
काय तेच तेच निकष आणि त्याच
काय तेच तेच निकष आणि त्याच त्याच चर्चा!!
जर बाकी काहीच बदलत नाही तर नुसती दर आठवड्याला थीम बदलून काय उपयोग? थीम काहीही असो खेळाची समज, घरातला वावर, बाजू मांडणे आणि गेममध्ये दिसणे हेच निकष दरवेळी लावायचे असतील तर थीम कश्याला कॉमन मॅन आणि कॉलेज आणि सोशल मिडिया.... उगा आपला येडपटपणा!!
आणि त्या निकषात कुणाला कसे बसवायचे हे पण ठरलेलेच असते लोकांचे..... त्यातून ट्वीस्ट च्या नावाखाली परत मॅन्युपलेशन्स..... काल आधीच्याच जोड्या चांगल्या होत्या पण मग हवे ते लोक नॉमिनेशनमध्ये आले नसते ना!!
अरे सोशल मिडिया थीम ठेवलीय तर प्रत्येकाला काहीतरी स्टेटस,स्टोरी, रील, ट्वीट ठेवायला सांगा.... मग त्याच्यावर (फक्त त्या अपलोडचेच निकष लाऊन) like, dislike, comments घ्या
Individually friend request टाकायला सांगा आणि मग कुणाचे फ्रेंड्स नेटवर्क किती वीक त्यावरुन नॉमिनेशन घ्या
कितीतरी नव्यानव्या गोष्टी करता येतील पण यांना मासळी बाजारच भरवायचा असतो..... तीच थीम ठेवा कायमची म्हणजे प्रॉप्सचे पैसे तरी वाचतील
Pages