Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान परिचय Srd. रियासतकार
छान परिचय Srd. रियासतकार सरदेसाईंचा उल्लेख वाचलाय खूप वेळा, पण त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती.
जनाचे अनुभव पुसता - मिलिंद
जनाचे अनुभव पुसता - मिलिंद बोकील .२००२ मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक. मिलिंद बोकिलांच्या सामाजिक विषयांवरील लेखनातलं नेमकं मर्म सांगणारी स.ह. देशपांडेंची १८ पानांची दीर्घ प्रस्तावना. विकास , पर्यावरण यांवर विचार मांडताना काही ठिकाणी त्यांनी बोकीलांच्या विचारांना छेद दिला आहे. आताची लोकसंख्या आणि पुढच्या पिढ्या यांना आवश्यक तेव ढा पर्यावरणाचा अंश शिल्लक राहिला पाहिजे, हे वाक्य वाचून थबकलो. लेख लिहि ण्यामागची आपली भूमिका बोकिलांनी सांगितली आहे. इंजिनीयरिंगचं शिक्षण घेऊन त्याच क्षे त्रात नोकरी करत असताना आणीबाणीच्या काळात ते सामाजिक कार्यात ओढले गेले. ते करताना त्याचं शास्त्रीय ज्ञान असायला हवं म्हणून मुंबई विद्यापीठातून बी ए , एम ए आणि पी एच डी केली. यात अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, विकासाचं समाजशास्त्र यांचा अभ्यास झाला. पी एच डी साठी सामूहिक उपसा जलसिंचन योजनांचा अभ्यास केला. पहिला लेख त्यावरच आहे. त्यावर एक चित्रपट होऊ शकेल. धरण आणि अभयारण्यामुळे विस्थापित झालेले लोक , दलितांनी गावांतील सामायिक जमिनींवर केलेले अ तिक्रमण आणि सरकारने ते नियमित करणे- त्याला मराठवाडा डॉ आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतराची जोड ; डहाणू भागात चिकूमुळे आणि तिथल्या सामाजिक संस्थांमुळे झालेले क्रांतिकारक बदल, किल्लारी भूकंपानंतर जमिनीची माल की मिळालेल्या विधवा आणि शेवटीयर रायगड तालुक्यात औद्योगिकीकरणामुळे झालेली खाडीतील मासेमारीची हानी आणि लोकांनी दिलेला लढा असे वेग वेगळे विषय हाताळले आहेत. हे सगळे लेख ललित भाषेत लिहिलेले शोधनिबंध म्हणता येतील. त्यांची पहिली ओळख ललित लेखक ही आहे. त्यामुळे मानवी, सामाजिक अंगांबद्दल त्यांनी लिहावं याचंहे नवल नव्हतंच. अर्थात सामाजिक प्रश्नाचा असा सहृदय अभ्यास हीही त्यांनीच घालून दिलेली वाट. पण विषया संबंधी अगदी बारीक बारीक तपशीलही त्यांनी नोंदवलेत. धरणग्रस्त धनगर लोकांची आधीची जीवनशैली, त्यांचा आहार, त्यातून मिळणारं पोषण, चिकूच्या लागवडीचा इतिहास, खाडीतल्या मासेमारीसाठी वापरल्या जाणार्या होड्या आणि साधनांचे तपशील हेही तितकेच रोचक आहेत.
मिलिंद बोकील यांचं 'शाळा'
मिलिंद बोकील यांचं 'शाळा' गाजलंय म्हणतात. वाचनालयातच चांळलं पण आता शाळा विषय नको वाटतो. लंपनचंही ( प्र.ना.संत यांनी निर्माण केलेलं पात्र) आयुष्य शाळेभोवतीच फिरतं. त्यातून बाहेर येतंच नाही.
जनाचे अनुभव पुसता बघू.
ती पुस्तकं त्या वयाविषयीच
ती पुस्तकं त्या वयाविषयीच आहेत.
बोकिलांच्या क्षितिजापारच्या संस्कृती या पुस्तकाविषयी मी मागे लिहिलंय. त्यांचंच समुद्रापारचे समाज हे आणखी एक पुस्तक आहे . इथे नाहीए. तुम्हांला मिळालं तर बघाल का?
अवांतर - माझ्या एका भाच्याने आय आय टी मुंबई इथून इंजिनीयरिंग पूर्ण केलं आणि आता TISS गौहाटीला समाजशास्त्र शिकतोय.
जनांचे अनुभव विकत घेऊन त्याला भेट द्यायचा विचार आहे.
जनांचे अनुभवमध्ये दारिद्र्य हा शब्द दरिर्द्र्य असा छापलेला दिसला. शुद्धलेखनाच्या आणखी दोन चुका होत्या. आता विसरलो.
मध्ये डॉ बाळ फोंडकेंचं सुगरणीचं विज्ञान हे पुस्तक वाचलं. गप्पांच्या रूपात सगळं लिहिलं आहे. आकाशवाणीवर पुन्हा प्रपंच असायचं त्याची आठवण व्हावी. काही मुद्द्यांची उजळणीही केली आहे. शाळेत शिकलेल्या काही गोष्टी आठवल्या. द्रव तापवला की जास्त घन पदार्थ विर घळतो हे सांगताना त्यांना साखरेच्या पाकांचे प्रकार आठवले नाहीत!
पुस्तक तपासून घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या विहिणीची मदत घेतली. पुस्तकातल्या विज्ञान समजवणार्या बाईंना त्यांचंच नावही दिलं आहे. या विहीणबाई म्हणजे ओगलेआजींच्या कन्या.
यात अगोड साठी निगोड हा शब्द वापरलाय. कट्टी बट्टी ऐवजी गट्टीबट्टी की असंच काहीतरी. वाचून बरेच दिवस झाले.
डॉ. वर्षा जोशींचं
डॉ. वर्षा जोशींचं 'स्वयंपाकघरातील विज्ञान' हे पुस्तक छान आहे.
(याला फॅन फिक्शन असं म्हणतात). मिलिंद बोकिलांची परवानगी घेतली होती अर्थात आधी.
मिलिंद बोकिलांच्या 'शाळा' पुस्तकातल्या शिरोडकर या व्यक्तिरेखेला घेऊन मी 'शिरोडकरची शाळा' नावाचा ललित लेख इथल्या महाराष्ट्र मंडळाच्या अंकात लिहिला होता.
सुगरणीचं विज्ञानही छान आहे.
सुगरणीचं विज्ञानही छान आहे. स्वयंपाकघरातील विज्ञान आहे माझ्याकडे. सलग वाचलं नाहीए
"शाळा" पुस्तक जेथे संपते ते
"शाळा" पुस्तक जेथे संपते ते वाक्य माझ्या दृष्टीने Most hilarious sad end आहे. आणखी स्पॉइलर देत नाही पण आता हे पुस्तक येउन बरीच वर्षे झाली. त्यावर पिक्चरही आला. ज्यांनी पुस्तक वाचले आहे त्यांना लक्षात येईल बहुधा
माझ्या एका भाच्याने आय आय टी
माझ्या एका भाच्याने आय आय टी मुंबई इथून इंजिनीयरिंग पूर्ण केलं आणि आता TISS गौहाटीला समाजशास्त्र शिकतोय. >>>> इंटरेस्टींग.
गो. स. सरदेसाई यांनी दीर्घ
गो. स. सरदेसाई यांनी दीर्घ आत्मचरित्र लिहिलं आहे. चरित्र लिहिण्यासाठी मेहनत लागू नये.
समुद्रापारचे समाज - भरत,
समुद्रापारचे समाज - भरत,
बघतो.
गो. स. सरदेसाई यांनी दीर्घ आत्मचरित्र लिहिलं आहे. - चिनुक्स,
बघतो. सरदेसाईंबद्दल आता उत्सुकता वाढली आहे.
अशी पुस्तके विकत घेऊन आपल्या छोट्या घरातील कपाटात साठवणे व्यवहार्य राहिलेले नाही. शिवाय मराठीतून न शिकणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आवड नसणार.
स्थानिक नगरपालिकेच्या वाचनालयांनाच अशी पुस्तके आणणे, ठेवणे आणि कमी शुल्कात वाचायला देणे परवडते. फक्त वाचकांनी मागे लागून ती यादी मंडळाकडे दिली पाहिजे.
बाकी पुणे मुंबई इत्यादी मोठ्या शहरांचा परिसर पसरत चालला आहे आणि दोन एक किमी चालतं जाऊनही पुस्तकं बदलणे शक्य आहे. वाहन वर्दळ वाढल्याने पाच किमी जाणेही दिव्यच होते. त्यामुळे एका टोकाच्या वाचनालयाचा संपर्क दुसऱ्या टोकाच्या वाचकांना घेणे अवघड जाते.
माझ्या वाचनालयाला
माझ्या वाचनालयाला समुद्रापारचे समाज घ्यायला सुचवलं, तर अशा लेखनाला वाचक कमी असतात, असं सागून नकार मिळाला.
इतर काही पुस्तकांच्या एकापेक्षा जास्त प्रती पाहिल्या आहेत.
मीच ते पुस्तक विकत घेऊन वाचून मग वाटलं तर त्यांना देणगी म्हणून देईन.
मी सभासदत्व घेतलं तेव्हा पुस्तकांची सूची असलेल्या फाइली शोधून त्यातली हवी ती पुस्तकं मागत असे. अनेक जुने कवितासंग्रह वाचले. घेतलेल्या नव्या पुस्तकांची यादी सूचना फलकावर लावतात. त्यात कवितासंग्रह कधीच नसतात. कोणी वाचून परत केलेलेही दिसत नाहीत.
आधी ठरवून पुस्तके नावे शोधून किंवा लक्षात ठेवून मागत असे आणि मिळत. श्याम मनोहरांचं सगळं लेखन असंच वाचलं. आता कर्मचार्यांची संख्या निम्मी झाली आहे. मी किंवा आणखी कोणी एखादं पुस्तक शोधून मागितलं आणि ते मिळालं असं होताना दिसत नाही. शोधत नाहीत असं नाही. पण नाही मिळत. अगदी मी आधी कधी इथूनच वाचलेलं पुस्तकही. त्यातल्या त्यात सतीश तांबेंची पुस्तकं मिळाली. पण ती आताचीच आहेत आणि फिरत असतात.
वाचनायलायची जागा बदलल्याने सदस्यसंख्या खूप कमी झाली आहे. त्यामुळे कर्मचारीही निम्मे झाले. आधी स्टेशनच्या जवळ होतं. आता दीड बसस्टॉप लांब आलं. माझ्या जवळ आल्याने मला बरंच झालं. पण ऑफि सात जाता येता पुस्तक बदल णार्यांची गैरसोय झाली. लॉकडाउनमध्ये वृद्ध लोकांची घराबाहेर पडायची सवय सुटली.
असो, खूपच अवांतर झालं.
आधी ठरवून पुस्तके नावे शोधून
आधी ठरवून पुस्तके नावे शोधून किंवा लक्षात ठेवून मागत असे आणि मिळत........अगदी अगदी!
फार पूर्वी घराच्या अगदी शेजारच्या गल्लीत असणारी मुं.म.सं., जराशी लांब गेली,तर खूप लांब गेल्यासारखी वाटल्यामुळे,जवळची एक library join केली.त्या लायब्ररीच्या मालकाने खूप सुंदर पुस्तके अशीच तोंडी सांगून दिली होती.त्यांचे आडनाव मुसळे होते.तेही बरीच पुस्तके सुचवित असत.
इथेही तीच तऱ्हा होती.लायब्ररीयन मस्त होत्या.
भरपूर पुस्तके वाचली गेली.b.mc ward मधील ऐसपैस जागेतून लहान जागेत लायब्ररी हलली आणि नंतर नवा स्टाफ आला.एकूणच आता आनंद आहे.माझीही वाचायची क्षमता कमी झाली.
वाचनालयात पुस्तके येतात अशी?
वाचनालयात पुस्तके येतात अशी?
वाचकांनी आणि साहेब लोकांनी सुचवलेल्या पुस्तकांची यादी घेऊन दुकानाकडे जात नाहीत. एक बजेट असते. एक पुस्तके आणून देणारा एजंट असतो. त्याला दोन सूचना असतात १)२५% कमी छापील किंमतीने आणि २) साहेबांनी सुचविलेली प्राधान्य. मग गळती सुरू.
खास चांगली पुस्तके १०%सुटीने मिळतात. ती येत नाहीत.
सगळीच पुस्तकं अशी नसावीत
सगळीच पुस्तकं अशी नसावीत बहुतेक गाजलेली, नावाजलेली पुस्तकं आहेत इथे.
लोक देणगी ही देतात.
दिवाळी अंकासाठी आमच्या गावातूनच प्रकाशित होणारा अंक कमी सवलत देतो म्हणत होते. कधीच घेतला नाही त्यांनी. आणि तो दर्जेदार म्हणवला जातो.
ग्रंथालय समितीसाठी निवडणूक असते. पण त्यांना पुस्तक निवडीचे अधिकार नाहीत. ते स्थानिक कर्मचारीच ठरवत असावेत.
सावित्री- पु. शि. रेगे
सावित्री- पु. शि. रेगे
पत्रांमधून साकार झालेली ही एक छोटी कादंबरी.
सावित्री ही तिरुपेट (कूर्ग)ची एक तरुण, बुद्धिमान, स्वतंत्र विचारांची, सुस्वभावी, मनमोकळी मुलगी. तिच्या वडिलांच्या शब्दात, ती ’आनंदभाविनी’ आहे. बुद्धिमान, व्यासंगी, तत्त्वज्ञानी वडिलांकडे ती वाढली आहे. तिची आई बहुधा तिच्या आठवणीच्या आधीच गेली आहे. तिने तिच्या एका ’मित्राला’ तीन वेगवेगळ्या कालखंडांमध्ये लिहिलेली ही पत्रं. १९३९ ते १९४६ असा साधारण एकूण काळ. कूर्गलाच राहणारे एक विद्वान ब्रिटिश गृहस्थ ’एजवर्थ’ हेही या कथेत एक महत्त्वाचं पात्र आहे.
ती बंगळूरला कॉलेजात शिकणारी. पत्रांच्या पहिल्या कालखंडात सुट्टीसाठी कूर्गला परत आली आहे. त्याच प्रवासात हा मित्र तिला भेटलाय. तोही तिच्यासारखाच बुद्धिमान, व्यासंगी. त्या एका भेटीतच कदाचित ते दोघे एकमेकांकडे ओढले गेले आहेत. पण ही ओढ, हा काही या पत्रांचा मुख्य विषय अजिबातच नव्हे. पत्रांमध्ये काही लहानपणचं, काही आजूबाजूचं, काही वडील लिहीत असलेल्या पुस्तकाबद्दलचं, काही मनातलं असं बरंच काही आहे. एक भेट आणि ही पत्रांची देवघेव, यातून हे नातं निर्माण होत जातं. एकदा तो तिच्या घरी येऊन काही दिवस राहूनही जातो. नंतर तो ऑक्सफर्डला जातो आणि सावित्री आणि तिचे वडील जपानला, वडिलांच्या व्याख्यानांच्या निमित्ताने.
दुसरं महायुद्ध ही घटना जगभरातल्या माणसांवर विविध प्रकारे परिणाम करून गेली. थेट किंवा अप्रत्यक्षपणे. सावित्रीच्या पत्रांचा दुसरा कालखंड हा ऐन युद्धाच्या काळातला आहे. जपानला तोपर्यंत युद्धाची झळ लागलेली नाही, पण तिला इंग्लंडला असलेल्या ’त्याची’ सतत लागून राहिलेली काळजी पत्रांमधून कधीतरी डोकावते. अधलीमधली पत्रं गहाळही होतात. एक अनिश्चितता सगळीकडे भरून राहते. पण सावित्री काळजीने, दु:खाने कुढत बसणार्यांपैकी अजिबात नाही. ती निष्क्रियपणे बसणारीही नाही. जपानमध्ये ती एक लहानसं, पण फार खोल अर्थाचं नाटक बसवते. त्याची सविस्तर कथा आपल्याला पत्रातून वाचायला मिळते. ल्योरे नावाची एक युरोपियन मैत्रीणही तिला तिथे मिळते. अगदी जिवाभावाची.
पत्रांच्या दुसर्या आणि तिसर्या संचांमध्ये पडलेला मोठा खंड अर्थपूर्ण आहे. मधल्या काळात जपान युद्धात भरडून निघाला. सावित्रीच्या आयुष्यातही बरंच काही घडून जातं. वडिलांना दगदग सहन होत नाही आणि त्यांचा मृत्यू होतो. सावित्री काही काळानंतर लष्करी इस्पितळात नर्स म्हणून काम करायला लागते. तिथे तिची ज्यांच्याशी ओळख होते, ते भारतीय डॉक्टर आणि त्यांची जपानी पत्नी नवजात मुलीला मागे सोडून मरण पावतात आणि युद्ध संपल्यावर त्या मुलीला-बीनाला घेऊन सावित्री भारतात परत येते. कूर्गला येऊन परत सगळं स्थिरस्थावर होतं, ’तो’ही परत भारतात, कूर्गला येणार असतो या वळणावर कादंबरी संपते.
खरं सांगायचं तर मला ही कादंबरी आधी माहितीच नव्हती. पु. शि. रेग्यांची ’रेणू’ स्टोरीटेलवर आधी ऐकली होती आणि ती आवडली होती म्हणून ’सावित्री’ ऐकायला घेतली. प्रिया जामकर यांचं अभिवाचन आहे. रवींद्र लाखे यांचाही आवाज आहे. अभिवाचन सुंदरच झालेलं आहे. नंतर शोधल्यावर दिसलं की प्रिया जामकर यांनी ’सावित्री’चा रवींद्र लाखे दिग्दर्शित एकपात्री नाट्यप्रयोग केला आहे.
मी ही कादंबरी दोनदा ऐकली. तरीही अजून मला ती पूर्णपणे कळली आहे असं म्हणता येणार नाही. आवडली, हे नक्की. केवळ पत्रांमधून (तीही एकतर्फी) एवढी सखोल, सशक्त व्यक्तिरेखा आणि कथावस्तू उभी करण्याच्या लेखकाच्या सामर्थ्याने मी थक्क झाले.
सत्यवान-सावित्रीच्या कथेतली सावित्री ही स्वतंत्र बाण्याची, जे हवं ते मिळवणारी. ही सावित्रीसुद्धा तशीच. ’मोर हवा, तर आपणच मोर व्हायचं. जे जे हवं, ते ते आपणच व्हायचं’ हे तिचं सूत्र. जयवंत दळवींच्या ’अधांतरी’ची नायिकाही सावित्रीच. पण ती आयुष्यभर कितीही स्वतंत्रपणे वागली, तरी अखेरीस परतंत्र होते. पु. शि. रेग्यांची सावित्री मात्र स्वतंत्रच आहे. ती कूर्गला परत आल्यावर जो नाट्यप्रयोग बसवत आहे, त्या प्रयोगाची तारीख आहे १५ ऑगस्ट १९४७.
वावे,किती सुरेख परिचय करून
वावे,किती सुरेख परिचय करून दिला आहेस!
वा, वावे काय.लिहिलस. मलाही
वा, वावे काय.लिहिलस. मलाही फार आवडलेली सावित्री. अन तू म्हणतेस तसचं झालेलं. काही कळली, खूपशी उरली. पुन्हा वाचायला हवी.... धन्यवाद ग.
"दुर्गा भागवत - व्यक्ती, विचार आणि कार्य "वाचायला घेतलय. झालं वाचून की लिहेनच पण आधीच प्रस्तावनेत, संपादक अरुणा ढेरेंनी दुर्गाबाईंचं केलेलं चपखल वर्णन इथे लिहिल्याशिवाय रहावेना.
अरुणा ढेरे लिहितात, " आरोग्यासाठी नानाप्रकारचे व्यायाम करणाऱ्या, शिकवणाऱ्या दुर्गाबाई; सहलीला जाताना सहजपणे हाफपँट आणि टीशर्ट घालून येणाऱ्या दुर्गाबाई; नऊवारी साडी नेसून पंचतारांकित हॉटेलमधे सहज वावरणाऱ्या दुर्गाबाई; वाईनची चव चाखून बघणाऱ्या आणि त्या चवीला निरभ्र दाद देणाऱ्या दुर्गाबाई; चोली के पीछे क्या है या लोकप्रिय गाण्याच्या निमित्ताने लोकपरंपरेतील अश्लिलतेचा मागोवा घेणाऱ्या दुर्गाबाई; न पटणाऱ्या गोष्टींवर सडेतोड टीका करणाऱ्या दुर्गाबाई- दुर्गाबाईंच्या निर्भयतेची कितीतरी दर्शनं त्यांच्या आठवणींमधून विखुरलेली आहेत."
दुर्गाबाईंच्या जन्मशताब्दी निमित्त एक चर्चासत्र आयोजित केले गेले होते; साहित्य अकादमी, मुंबई आणि भारती विद्यापीठा द्वारे. त्यातील निबंध तसेच इतर काही लेख यांचे हे संपादित पुस्तक.
पुस्तकात रा. ग. जाधव, द. दि. पुंडे, प्रतिभा रानडे, मीना वैशंपायन, मंगला आठलेकर, तारा भवाळकर, सरोजा भाटे, लीला अर्जुनवाडकर, अरुण खोरे, शोभा नाईक अशी दिग्गजांनी दुर्गाबाईंवर लिहिलेले लेख आहेत.
मीना वैशंपायन यांनी परिशिष्टात दुर्गाबाईंची साहित्यसूची दिली आहे. या परिशिष्टावर नुसती नजर फिरवली तरी दुर्गाबाईं हे काय अद्भूत रसायन होतं हे कळतं. खरोखर ज्ञानावर नितांत श्रद्धा असलेली अन त्यासाठी आयुष्य वाहून घेतलेली अशी व्यक्ती विरळाच! नतमस्तकच या विदुषी समोर ___/\___
वावे,किती सुरेख परिचय करून
वावे,किती सुरेख परिचय करून दिला आहेस! >>> खरंच
वावे, एवढ्या थोडक्यात
वावे, एवढ्या थोडक्यात सावित्री उभी केलीत.
कॅमेरा आणि लेखणी दोन्ही चांगली फिरवता.
अवल, दुर्गाबाईंचा परिचय वाचायला उत्सुकता निर्माण करत आहे.
धन्यवाद अवलताई, देवकीताई,
धन्यवाद अवलताई, देवकीताई, नताशा. Srd
धन्यवाद!
वावे, 'सावित्री'चा परिचय
वावे, 'सावित्री'चा परिचय आवडला.
वावे - परिचय आवडला!
वावे - परिचय आवडला!
यु हॅव्ह द राईट टु रिमेन
यु हॅव्ह द राईट टु रिमेन सायलंट' वाचले. पुस्तकाचा गोषवारा - पोलिसांनी अमेरिकेत काहीही कारणाने पकडले तर फक्त २ प्रश्नांची उत्तरे द्या - तुमचे नाव काय आणि तुम्ही आत्ता या क्षणी, इथे या ठिकाणी काय करत आहात. तेही वर्तमान काळात उत्तर द्या. पिरिअड!!! अन्य कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायचे नाही - तुम्ही अर्ध्या तासापूर्वी कुठे , काय करत होता - काही काही नाही.
सरळ ६ वी अमेन्डमेन्ट एक्सरसाइस करायची. सांगायचे आय हॅव्ह राईट टु रिमेन सायलेन्ट. मला वकील द्या.
अनेक निरपराधी माणसांनी तुरुंग भरलेले आहेत. इतके नियम आहेत ना की तुम्ही कोणत्याही हगल्या पादल्या कारणाकरता तुरुंगात विनाकारण सडू शकता. उदा. - तुम्ही पोलिसाला काही माहीती नकळत दिली (इनोसंटली) आणि ती चूकीची निघाली तर ...... फेडरल गव्हर्नमेन्टच्या अधिकार्यास जाणून बुजून चूकीची माहीती दिली या आरोपाखाली, ५ वर्षे तुरुंगवास होउ शकतो. हे झाले फेडरल गवर्न्मेन्टचे नियम. स्टेट गव्हर्न्मेन्ट चे अजुन वरती अगणीत नियम आहेत.
यु हॅव्ह द राईट टु रिमेन सायलेन्ट!!
इस्केप टू नोव्हेर - अमर भूषण
इस्केप टू नोव्हेर - अमर भूषण
स्पाय पुस्तके आवडत असल्याने हे पुस्तक वाचले. कॅटेगरी म्हणायची झाली तर पुस्तकाचे वर्णन ट्रू फिक्शन असे करू शकतो.
आधीच RAW च्या कारभारा बद्दल फारशी काही माहिती पब्लिक डोमेन मध्ये नसते त्यामुळे एका इन्सायडर कडून तिथल्या बाबू गिरी बद्दल आखोदेखा हाल बघायला मिळतो.
जेव्हा RAW मधला एका मोठ्या पोस्ट वरचा एजन्ट गद्दार आहे अशी बातमी इंटर्नल अफेअर्स ला मिळते तेव्हा काय तपास केला जातो, आपले लोक त्याला पकडू शकतात का ह्या तपासा वर आधारित पुस्तक आहे.
जॅक रायन किंवा जेसन बॉर्न ची अपेक्षा धरून गेलात तर पुस्तक अजिबात आवडणार नाही.
पुस्तक मधून मधून रेंगाळते पण एकूण आवडले.
तळटीप 1 - पुस्तक सत्यघटनेवर आधारित आहे. साल 2000 च्या आसपास RAW मध्ये रवींद्र सिंग नावाचा एक जॉईंट सेक्रेटरी लेवल चा एजन्ट होता जो CIA च्या खिशात होता. अर्थात सिंग हा काही CIA/बाहेरच्या देशांनी फोडलेला पहिला RAW एजन्ट नाही, ती एक 1960 च्या पासूनची मोठी लिस्ट आहे.
तळटीप 2 - विशाल भारद्वाज चा येणारा सिनेमा, खुफिया, हा या पुस्तकाचे रूपांतरण आहे. बघूया तो कितपत सफल होतो.
<< सरळ ६ वी अमेन्डमेन्ट
<< सरळ ६ वी अमेन्डमेन्ट एक्सरसाइस करायची. सांगायचे आय हॅव्ह राईट टु रिमेन सायलेन्ट. मला वकील द्या. >>
राईट टु रिमेन सायलेन्ट हा ६ व्या अमेन्डमेन्टनुसार नसतो ओ, मिरांडा वॉर्निंगनुसार असतो. मुळात पोलिसांशी न बोलण्याचा खरा उद्देश ५ वी amendment invoke करणे, हा आहे.
अधिक माहितीसाठी, आवड असेल तर लेखकाचा हा व्हिडिओ बघावा.
उबो पहाते.
उबो पहाते.
वावे, छान परिचय सावित्रीचा.
वावे, छान परिचय सावित्रीचा.
धन्यवाद अस्मिता, फारएण्ड,
धन्यवाद अस्मिता, फारएण्ड, वर्णिता.
'You have the right to remain silent. Anything you say can and will be used against you in the court of law' हे सिनेमात किंवा क्राईम सीरियल्समधे ऐकायला भारी वाटतं
विशेषतः ते एकीकडे गुन्हेगाराला बेड्या घालताना ऐटीत म्हणतात त्यामुळे!
पोलीसांना काय सांगितले,कबुली
पोलीसांना काय सांगितले,कबुली दिली हा भारतात पुरावा नसतो. तरीही बेदम चोपतांना दाखवतात. मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही साथीदार पकडायचे असतात ना.
<< पोलीसांना काय सांगितले
<< पोलीसांना काय सांगितले,कबुली दिली हा भारतात पुरावा नसतो. तरीही बेदम चोपतांना दाखवतात. >>
जमलं तर हे बघा. ही पण एक शक्यता आहे.
Pages