Submitted by अनन्त्_यात्री on 8 November, 2022 - 10:15
"वाचूनही कविता नच कळली
असे न माझे व्हावे
कोश कोणते यास्तव घरी मी
आणुनी ठेवावे?"
विचारले ऐसे मी कविला -
हसुनी खिन्न तो वदला,
"कविता माझी आजवरी का
कळली कोणाला?"
"शब्दांची आतशबाजी अन्
मोडजोड मी करितो -
जरा रेटुनी अर्थ त्यातूनी
शोधावा तो मिळतो.
जे जे अमूर्त, जटिल, अकल्पित
ते ते मजला गमते
दुर्बोधाच्या गर्द सावलीत
कविता माझी रमते.
शब्द बुडबुडे केवळ असती
अर्थही अवघा भास
सत्य रोकडे ऐस जाणुनी
शिणवू नको मेंदूस.
अर्थ जसा गवसेल तसा तो
ठोकुनी दे ना तूही
शक्य तिथे मम श्रेष्ठत्वाची
फिरवशील ना द्वाही?"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडली.
सहीच
मस्त आहे कविता.!!
मस्त आहे कविता.!!
आवडली.
आवडली.
द्वाही की ग्वाही
द्वाही की ग्वाही
मोल्सवर्थ
ग्वाही = ग्वाही gvāhī f ( P) Evidence, testimony, deposition of a witness.
द्वाही= द्वाही dvāhī f ( H) An exclamation or expression used in prohibiting in the name of the Rájá or other high authority; implying an
दुहाई आणि गवाही , सोप्या
दुहाई आणि गवाही , सोप्या/हिंदी भाषेत.
द्वाही- दुहाई म्हणजे 'दुहाई हो महाराज/मायबाप' अशी थोरांना केलेली आर्जवं .
ग्वाही- गवाही म्हणजे साक्षं !
इथे 'द्वाही' खोडकरपणे चपखलरित्या बसतेयं. 'दवंडी' या अर्थाने पण जुळतेयंस वाटलं. बाकी यावर अंतिम 'ग्वाही' कवी महाशयांनी देणं योग्यं आहे. हे माझं 'अर्थ जसा गवसेल तसा तो ठोकुनी दे' व्हर्जन, चूभुदेघे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोही
दोही
स्त्री. १ द्वाही; दवंडी; जाहीर घोषणा
दाते शब्दकोश
>>>दोही
>>>दोही
स्त्री. १ द्वाही; दवंडी; जाहीर घोषणा>>>>
कविता आवडली....
अनन्तजी धन्यवाद
प्रतिसाद देणार्या सर्व
प्रतिसाद देणार्या सर्व कवितारसिकांना धन्यवाद
वा, आवडली
वा, आवडली