Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो तसंच असेल आणि अक्षय
हो तसंच असेल आणि अक्षय अपूर्वाने मदत करावी त्याला.
सगळ्या वादात रोहित रुचिरा जाम गरीब वाटले आज.
जर काल रुचिराला नॉमीनेट केलं तर आज अपूर्वाने तिने मदत करावी ही अपेक्षा कशी करते.
आज मला बी टीमच्या स्किलचे स्नेहलता आणि अक्षयने कौतुक केलेलं बघून बरं वाटलं. एपिसोड गाजवणारी लोकं म्हणजे माने आणि प्रसाद.
हल्ली पुंबा अजिबात दिसत नाहीत.
सुजाही दिसत नाही यंदा.
प्रसाद ला सायकॉलॉगिकल
प्रसाद ला सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम किंवा मेमरी लॉस चा प्रॉब्लेम आहे बहुतेक.
जो तो रणनीती रणनीती करत होता.
काल जेव्हा स्नेहा, अ दे आणि किरण राहिले होते तेव्हा प्रसाद म्हणाला की मला स्नेहा ला इन करायचं आहे. त्यावर तेजा म्हणाली की पण स्नेहा ला बाहेर काढण्यासाठी एकमत झालंय. तेव्हा असा काही रुल नाही म्हणुन भांडला. मग समॄद्धी ने मधे विचारलं की " तुला स्नेहा ला इन करयचय तर मग तु या फेरीला नाही जाणार का ? " तर नाही म्हणाला. मग विकास सोबत रोहित जाइल का अशी पण चर्चा झाली तेव्हा गप्प बसला. मग परत म्हणाला की मी आणि विकास जात आहे तर कोणाला अडवायचं ? टीम बी ची दया च आली मला एकदम. अशा माणसासोबत कसं डील करायचं जो कुठल्याच वाक्यावर ठाम नाही. धोंगडे भडकली तेव्हा भांडण सुरु केलं. विकास ला तर फारच हाडतुड करत होता. आणि मग शेवटी तेजा ला म्हणाला की माझी नावं पहिल्यापासुन स्नेहा आणी किरण च होती. अरे ? काय हे... किती क्षणाक्षणाला बदलतो हा. .. अशा माणसाला लोक कसं काय सपोर्ट करु शकतात. भिंतीजवळ तिकिटं ठेवली ती मी एकट्याने नाहीत तर सगळ्यांनी हे सगळ्यांनी कबुल करावं म्हणून काय लहान मुलासारखा हट्ट करत होता. सगळ्यांनी म्हणुन सुद्धा परत परत तोच मुद्दा.
आयत्या वेळी अ दे चं तिकिट हलवलं. पण त्यामुळे टीम ए का खुष झाली ते कळलंच नाही. स्नेहा गेलीच शेवटी बाहेर.
तेजा बिचारी किती धडपड करते प्लॅन करण्यासाठी. प्रसाद चा येडपट्पणा, धोंगडे चा चिडकेपणा सगळं सांभाळुन घेते. तिची आणि समृद्धी ची दया आली काल.
आणी काल अचानक रणनीती शब्दाला काय महत्व आलं होतं
रोहित रुचिता काही कामाचे नाहित. टास्क वगैरे तर जाउदेत च पण कपल म्हणुन घेतलंय तर जरा रोमान्स पण करुन दाखवत नाहीत
यापेक्षा रेशम-राजेश किंवा शिव-वीणा बरे. खोटे कपल असुन सुद्धा रोमँटीक अँगल दाखवायचे. हे दोघं खरे कपल आहेत असे एका अंशानेही वाटत नाही मला त्यांच्या बॉडी लँग्वेज वरुन. यावेळी रुचिरा ला काढा यार. ती यश पण परवडली.
मला अमृता धोंगडेचं बोलणं
मला अमृता धोंगडेचं बोलणं ,कोल्हापूरी ठसका फार आवडतो..काल प्रसादाला तुझा एकट्याचा ग्रुप आहे हे म्हणताना तिने जे हातवारे आणि हावभाव केले ते पाहून खूप हसलो आम्ही...आणि तेच भांडण चालू असताना अपूर्वाला मस्त म्हणाली ,"जा बाई त्याला (प्रसादला) तुमच्याकडेच घेऊन जा आणि तिकडेच ठेवा..."
प्रसाद खरोखर अशक्य आहे...तेजस्विनीच्या पेशन्सची खरंच कमाल आहे...सध्यातरी तीच deserving winner वाटतेय...
कम्प्लीट सायको आहे प्रसाद.
कम्प्लीट सायको आहे प्रसाद. काल तर पार कामातून गेलेला वाटला. बोलणे, थॉट्स काही कोहेरंट नाही दिसत त्याचे . असे वाटते की त्याला काही तरी कौन्सिलिंग/ हेल्प ची गरज आहे. काढा याला लवकर.
राहून राहून गेल्या वर्षीचा हाच टास्क किती नाट्यमय झाला होता हे आठवत होते काल. विशाल ने जेल तोडून विकास ला बाहेर काढले होते आणि प्रॉपर्टी चे नुकसान होऊन सुद्धा तोच हिरो ठरला होता.
हे इथेच लिहितो. गेल्या सी
हे इथेच लिहितो. गेल्या सी झनमधले विकास पाटील आणि गायत्री दातार स्टार मराठीच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आलेत.
हे असेच होते..... बाकीच्यांना
हे असेच होते..... बाकीच्यांना ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे कामे मिळतात पण विनर लोक फारसे कुठे झळकताना दिसत नाहीत!!
विशाल निकम, जय दुधाणे आणि
विशाल निकम, जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे मांजरेकरांच्या वेडात मराठे सात... या चित्रपटात आहेत.
हे इथेच लिहितो. गेल्या सी
हे इथेच लिहितो. गेल्या सी झनमधले विकास पाटील आणि गायत्री दातार स्टार मराठीच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आलेत. >>> विकास दोन महीन्यांपुर्वीच दिसलेला त्यात, गणपतीत. गा दा हल्ली आली असेल. पकवतात खूप, काहीही चालू असतं म्हणून बघत नाही.
सुरुवातीला प्रसादला अपुर्वा कशावरुन सॉरी म्हणत होती, त्यामुळे त्याने ए ला मदत करायची ठरवलं का, किंवा नंतर आज त्याला ते मदत करतील म्हणून. तो सायको आहे की इंडीविज्युअल गेम खेळतोय काही कळत नाहीये.
बिबॉस टास्क देतोच कशाला,कारण
बिबॉस टास्क देतोच कशाला,कारण टास्क कुठलाही असो आणि ग्रुप कोणताही असो,हे लोक फेअर खेळतच नाहीत ,कोणीच नाही आणि अक्षरश: त्या टास्कचा कचरा करतात.
कशाला ठरवता,अडवा ना सगळ्यांची तिकीटे, मग बघू कोण डोक लावून कस निसटत,त्यात गंमत आहे ना.
येऊ देत की कुठल्याही टीमचे दोन उमेदवार कँटन्सीसाठी,मग बघू समर्थक कसे होतात.त्यात शोची मजा आहे.
इथे काय सगळच ठरलेल,कंटाळा येतो.
बिबॉसला हे लोकांना दाखवण्यात काय मजा येते तेच कळत नाही.
ठरवलेला सामना बघण्यात मजा आहे की अटीतटीचा बघण्यात.पण बिबॉसला टास्क खेळवायचाच नसतो,फक्त आरडाओरडा आणग भांडण हवी असतात..
कालच्या एपिसोडबद्दल कोणीच
कालच्या एपिसोडबद्दल कोणीच लिहिलं नाही, काल नेमका मला बघता आला नाही.
फार बोर खेळतात टास्क्स हे लोक
फार बोर खेळतात टास्क्स हे लोक. अगदी बेसिक. त्यात अपूर्वा -अक्षय, तेजू आणि अमृता, विकास - माने हे सोडले तर बाकी कुणी कुणाशी धड लॉयल नाहीत. कुणाकडे काही नाविन्यपूर्ण स्ट्रॅटेजी नाहीत. अक्षय बाथरूम मधे रोहित ला म्हणत होता की तू ग्रुप चे का ऐकलेस आणि मला का म्हणून आउट केलेस? मी असतो तर माझ्या मनाचेच केले असते. आणी लगेच पुढच्या २ मिनिटात मानेंशी भांडला, म्हणे तुम्ही तेजस्विनी ला तिची पाटी का दाखवलीत म्हणून, तुम्ही असं ग्रुप विरुद्ध करू शकत नाही म्हणे! त्यांचे त्यांना कळत नसेल का यात काही विसंगत आहे हे !! प्रसाद तर जाम डोक्यात गेला आहे. सर्वात निगेटिव आणि सर्वात सटकू. हाकला त्याला.
>>पुढच्या २ मिनिटात मानेंशी
>>पुढच्या २ मिनिटात मानेंशी भांडला, म्हणे तुम्ही तेजस्विनी ला तिची पाटी का दाखवलीत म्हणून, तुम्ही असं ग्रुप विरुद्ध करू शकत नाही म्हणे!
सही पकडे हो!!
करेक्ट
मी धावत धावत फक्त कोण आऊट ते
मी voot वर धावत धावत फक्त कोण आऊट ते बघत होते. विकास सरेंडर झाला बहुतेक दादासाठी. अर्थात ए टीम आधीचा बदला घेणार होतीच.
तेजु मूर्ख आहे, धोंगडे साठी स्वत: मागे रहात होती, धोंगडे मात्र मला जायचं जायचं करत होती. तेजु मैत्री निभावते जास्त. दोघींची जोडी छान पूरक आहे एकमेकींना पण तेजुला जास्त बोलू देत नाही ती, स्वतः च बोलते.
बाकी फाफटपसारा बघितला नाही.
समृद्धी चपळाईत सर्वांना पुरून उरते.
रुचिरा किती त्रासदायक आवाजात
रुचिरा किती त्रासदायक आवाजात बोलते!
शिवानी सुर्वे पण आली वेडात
शिवानी सुर्वे पण आली वेडात मराठे मध्ये
हाहाहा.
हाहाहा.
अक्षय सर्व मुलींशी फ्लर्ट
अक्षय सर्व मुलींशी फ्लर्ट करतो आणि मुलीही जणू फिदा होतात त्याच्यावर. एक डान्स बघितला त्याचा आणि धोंगडेचा.
हा सिझज खरच फ्लॉप आहे, फक्तं
हा सिझज खरच फ्लॉप आहे, फक्तं २ दिवस खुर्ची सम्राटचे चांगले होते !
कालचा टास्क बघून विशालचे जेल फोड आठवलं नाही असं कोणी बिबॉ फॅन नसेल
खरच.कालचा टास्क म्हणजे
खरच.कालचा टास्क म्हणजे बिबीकॉलेजची पिकनिकच होती.
काल ते सगळे जण ती खोकडी त्या
काल ते सगळे जण ती खोकडी त्या झाडांत का लपवत होते? काही नियम होता का अक्कलेचं दिवाळं?
अक्षय एकुणच फार बालिश आहे. रुचिरा-रोहित वर कोणी म्हटलंय तसं प्रेम करताना ही दिसत नाहीत. माने सोडले तर सगळे बबल मध्ये रहाणारे आणि डोक्याचा स्क्रू ढिला कॅटेगरी आहे. मानेंना जिकवा आणि बंद करा हे.
कसले काय काही नियम नव्हता पण
कसले काय काही नियम नव्हता पण सगळे डोके न लावता मेंढरासारखे खेळत होते. तसेच खेळत आलेत लोक या सीझन ला. त्यामुळे त्या मेंढरात अपूर्वा, अक्षय ही लंगडी वासरं जिंकतात
यशश्री तर नं १ बालिश अॅक्टिंग वगैरे करण्यात. जेन्युइअन रहावं ना जसे असाल तसे.
सर्व छान खेळीमेळीत गप्पा
सर्व छान खेळीमेळीत गप्पा मारतात मात्र इथे बरेचदा. बाकी आनंदी आनंद, trp आला खाली.
समुला रडायला खूप येतं, तिला अपूर्वाची गरज वाटते, इमोशनल असते तेव्हा आणि नाही आली तर रडते.
ती रुचिरा कसली कणाहीन आहे....
ती रुचिरा कसली कणाहीन आहे..... इतक्यांदा झिडकारले त्या रोहितने तरी रडते रडते आणि परत लाडात येते...... तिने इतके सुनावले म्हणून रोहितला ते उगा बळजबरी बदामाचा फुगा बिगा द्यायला लागला..... काही केमिस्ट्रीच नाही दिसत त्यांच्यात!!
अमृता देशमुखला आज कुणीच खेळायला घेतले नाही..... अक्षय म्हणाला ते बरोबर होते..... दोन्हीकडे जात राहिले की कुणीच प्रेफरन्स देत नाही!!
अक्षय चांगला खेळला आज पण फारच अंगचटीला जातो तो पोरींच्या (किंवा पोरीपण त्याच्या)..... आज त्याने हात काय दिला हातात धोंगडे पार विरघळली होती.... कठिण आहे!!
अपुर्वाने मानेंना पार उलटेपालटे केले आज!!
जरा एक दोन टास्क काय खेळले माने तर लगेच विकासला म्हणायला लागले की मी बघ कसा तुला पुढे घेऊन जातो...... फिस्स्कन हसायलाच आले मला
अपुर्वाचा गेम भारी आहे.... सगळ्यांना स्वताभोवती फिरवत ठेवते ती पण मीपणा आणि फटकळ बोलण्याने निगेटिव्ह दिसते!!
तेजस्विनी हीच काय ती जरा बरी वाटतेय..... तिला जरा बरी कंपनी पाठवा घरात
प्रसादच्या quality check ला शेवटी बिगबॉस पण कंटाळले आणि सगळ्यांना एका रेषेत उभे रहायला सांगितले
आज टास्कमधे कोणीही कोणाबरोबर
आज टास्कमधे कोणीही कोणाबरोबर खेळू शकत होतं का.
अक्षय एकदा इथून, एकदा तिथून खेळला पण फेअर खेळला, चांगला खेळला. तेजुने पण कौतुक केलं. त्याला नडतात छान तेजु आणि धोंगडे, नंतर त्याने कुठे लागलं असेल तर माफी मागितली ते आवडलं.
रोहितच्या टीम मधून अक्षय अडवायला आला तेव्हा माने का सामोरे गेले नाहीत, मुली जातात आणि तिकडे टेडीही बरोबर भरत नव्हते.
अपूर्वाने मानेना चांगलं पकडले, विकास असता तर चाललं नसतं तिचं काही.
ह्या लोकांच्यातले शत्रुत्व वगैरे संपले का, एरवी छान गप्पा मारतात एकमेकांशी. रोहित कॅप्टन झाला. माने यांनी रोहितचे कौतुक केलं.
देशमुखला खेळायला मिळालं नाही म्हणून ती रडत होती.
बाकी मस्त सगळ्यांची पिकनिक सुरू आहे.
रुचिरा कणाहीन वाटते ह्याला
रुचिरा कणाहीन वाटते ह्याला अनुमोदन स्वरूप. काही फार खेळतही नाही, छाप अजिबात पडत नाही. तोंड मात्र फार चालवते, फक्त आवाज लहान असल्याने अपूर्वा आणि धोंगडे पेक्षा कानाला कमी त्रास होतो पण किरकिरी वाटते.
तो रोहित असं विचित्र मराठी
तो रोहित असं विचित्र मराठी काय बोलतो? सॅम फ्लुएंट नसली तरी नीट बोलते. रोहितचं काय वेगळंच वाटतं.
यांना १ तास ही पळवत पळवत बघु शकतो. तिकडे २४ तास कसे रहातात हे लोक? एकातासाच्या एक्सर्प्ट मध्येच इतके बोर करतात, २४ तास दुसरं काय करतात?
पर्सनली मला वाटतं अक्षय
पर्सनली मला वाटतं अक्षय मुलींशी ज्या प्रकारे वागतोय, त्याबद्दल म मां बोलणार, बोलायला हवं. मुलीही फार फ्री वागतात त्याच्याबरोबर, विशेषत: दोन्ही अमृता, तेही चूक वाटतं मला. ग्रेसफुल वाटत नाहीये. नो डाऊट तो खेळला छान आणि त्याला माने दुसऱ्या फेरीत जिंकले नाही याचं वाईटही वाटलं.
त्याने खेळावर लक्ष केंद्रित करावं ह्या गोष्टी करण्यापेक्षा आणि माने का नाही पुढे गेले त्याला अडवायला पहिल्या राऊंडला हे ही डोक्यातून जात नाहीये.
आज टास्कमधे अक्षय चे कौतुक
आज टास्कमधे अक्षय चे कौतुक करावे लागेल. तो दोन्ही जणांकडून एकेकदा खेळला. बाकी समृद्धीला कसले सांत्वन हवे होते अपूर्वाकडून . उगीच आपले अटेन्शन सीकिंग. रुचिराचे पण तेच. बी टीम हरली अॅज युज्वल. जमत नाहीत त्यांना टास्क्स. किती मेंगळटासारखे भरत होते टेडीमधे कापूस.
मानेंनी स्पोर्टिंगली घेतले पण.
कालचा पण भाग तसा बोअरच होता.
कालचा पण भाग तसा बोअरच होता.
किती नीरस टास्क खेळतात हे.
नशीब,प्रसाद संचालक असल्याने काल एकंदरीतच त्याचा आवाज नव्हता,रिलिफ.
मला वाटल की अक्षय उगाचच दाखववून कौतुकासाठी फेअर खेळण्याचा आव आणत होता.काही फेअर वाटल नाही.पहिल्या राऊंडला बझर व्हायचवया आधीच अँटँक करायला आला आणि दुसर्यावेळी अगदी मानेंकडून खेळून 'मी अँटँक करत नाही, तुम्ही करू नका' अशा मोडमध्ये होता.समोर रोहित होता म्हणून असेल किंवा रोहितला सहज जिंकू द्यायच असेल.हेच जर प्रसाद असता तर तुटून पडला असता.मला तर ते ममांकडून कौतुक करून घेण्यासाठी आणि प्रेक्षकांसमोर चांगली इमेज उभी करण्यासाठी केलेल नाटक वाटल.
अपूर्वा एक दोन आठवडे छान एंटटेनर वाटली पण आता तिचाही कंटाळा येतो.
मानेंना जर कँप्टन होण्यात रस नव्हता ,कारण कालच्या टास्कमध्या त्यांच्या देहबोलीतून जाणवत तरी नव्हत ,मग कशाला एवढा बाऊ केला प्रसादवरून.
सम्रुध्दी ला मध्येच काय होत कळत नाही.स्नेहलता ने ही तशी निराशाच केली.
शमा,हीना,आदिश,आरोह यांनी वाईल्ड कार्ड म्हणून काय धमाल उडवली होती.
यश तर जाईलच बहुतेक.रुचिराही पिरपिरी आहे.
इतके दिवस ती देशमुख रडत नव्हती ती ही आज गळा काढणार आहे.
टीआरपी परत खाली यायला लागला आहे.
एकंधरीत आता सहा आठवडे झाले तरी शो रंगत नाही.
मला अक्षय चांगला खेळला असंच
मला अक्षय चांगला खेळला असंच वाटतं, फेअर वाटलं मला. फक्त तो अति फिजिकल होतो याला माझा विरोध आहे पण त्या मुलींचा विरोध नसेल तर आपण काय करणार. एकही मुलगी म्हणाली नाही की माने तुम्ही अक्षयशी पंगा घ्यायला जा, इथे आम्ही टेडी भरतो, त्यात तेजा तरी विरोध करत होती. धोंगडे जणू प्रेमात त्याच्या, त्यामुळे आधी अपूर्वा चिडवत होती कालच्या टास्कवरुन ते योग्य होतं.
अक्षयचे डोकं टास्कमध्ये चालते, त्याची स्ट्रॅटेजी चांगली असते असं योगेशही म्हणत होता. त्यामुळे त्याने तिथे लक्ष द्यावं आणि हे मुलींच्या पाठीमागे जाणं सोडावं. पाचात काय तीनात जाण्यासाठी याचा उपयोग होईल. नाहीतर अँगर आणि असं फिजिकल होणं त्याला बाहेर नेऊ शकतात.
Pages