चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बरं जाऊ द्या. चित्रपट कसा वाटला साठी नवीन धागा काढा. ज्यांना चित्रपट कसा वाटला वर लिहायचेय त्यांनी तिकडे जावा >>>
+१ इथेही हगून ठेवलंय त्या माणसाने.

कोणे एकेकाळी धाग्याशी संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल लिहिलं तर अ‍ॅडमिन, वेमा समज द्यायचे. आयडीही उडवायचे. आता दिवस असे आहेत की धाग्याशी संबंधित प्रतिसाद दिला तर आयडी उडायचा.
आणि हे जिथे चालू असतं तिथे फॅन क्लबातले लोक येत नाहीत, पण कोणी टोकलं की इथे पण तेच म्हणून गळा काढायला दत्त म्हणून हजर होतात. इतर वेळी बोटांना संधिवात होतो.

ओमकारा भारी आहे
पण आजवर मी दुर्दैवाने पुर्ण अ‍ॅट ए स्ट्रेच म्हणतात तसा पाहिला नाही.
बरी आठवण काढलीत, कधी सुचत नाही काय बघावे तेव्हा बघायच्या लिस्टीत टाकायला हवा.

Submitted by भरत. on 10 November, 2022 - 10:47 >> +१. ये है न्यू इंडीया.

बरी आठवण काढलीत, कधी सुचत नाही काय बघावे तेव्हा बघायच्या लिस्टीत टाकायला हवा. >>> अशी लिस्ट असेल तर स्क्रीनशॉट टाका. तीन वेळा जेवण, दोनदा उत्सर्जन यातून वेळ मिळताच इथेही नक्षीकाम करण्यातून अशी लिस्ट बनवायला वेळ मिळत असेल तर एखादा नोबेल पुरस्कार देऊनच टाकावा.

मानव, विशाल भारद्वाज हा शेक्सपियरप्रेमी आहे. त्याचे खालील चित्रपट आणि मूळ शेक्सपियरन क्लासिक अशी जोडी पहा. त्यांची नावंही पहा:

ओंकारा - ऑथेल्लो
मकबूल - मॅकबेथ
हैदर - हॅम्लेट

असेच गाजलेल्या संस्कृत नाटकांवर आधारित हिंदी/मराठी चित्रपट बघायला आवडतील (आदिपुरुष नको). मृच्छकटिकम् वर आधारित 'उत्सव' हा चित्रपट शशी कपूरने बनवून खूपच वर्षं लोटली.

इतर वेळी बोटांना संधिवात होतो.<≤<<<<भरत, तुमच्यासारख्कया सुज्ञाकडुन असं लिहिण्याची अपेक्षा नव्हती. असो.
आता परत कुणीतरी डुआय येऊन‌म लिहिल‌ की सस्मित वैनी कशा नेमक्या वेळी येतात Lol

भावना समजून घ्या.
मंडळी , अशा वेळी कोणाला हाक मारायची कळलं ना?

मकबूल काय जमलाय मुवि

आग के डर के लिये पानी का होना जरुरी है

कसला खतरनाक डायलॉग आहे हा

विशाल भारद्वाज ने शेक्सपिअर च्या नाटकांचे इतके सुंदर भरतीयकरण केलं आहे

त्याच्या एक शतांश पण सो कॉल्ड परफेक्शनिस्ट करू शकला नाही

तरही त्याच्या आरत्या ओवळल्या जातात

ओंकारा, युवा अलग च आहेत.. नॉस्टॅल्जिया..

सरफरोश पोस्ट ला+१

ॠ, एखाद्या विषयात गती नसेल (जसे पुस्तक बरे की चित्रपट), जर तू पुस्तकं वाचली नसशील तर ह्या वादात गुमान गप रहायचे. कशाला घाण करून डोक्यात जातोस? असेही डोळा लाल होतो ना तुझा? जरा कमी वावर इथे!

"युवा अलग च आहेत.. >>>
माझ्या मते तर हा एकमेव सिनेमा आहे ज्यात अभिषेक बच्चन हा अमिताभ बच्चनच्या सावलीतून बाहेर पडलाय. एरवी त्याच्या चेहर्‍यावर कायम "बाबांनी पाहिलं तर काय म्हणतील " असेच बावरलेले भाव दिसतात..
मणिरत्नमची जादू आहे हा सिनेमा..

हैदर मधे तब्बू शाहिद ची आई आहे ना?
>>> गूगल का वापरत नाही... ऋन्मेष पण असेच सिम्पल प्रश्न इथे विचारात असतो... मायबोली ला सर्च इंजिन समजायला लागले आहे पब्लिक....

असेच गाजलेल्या संस्कृत नाटकांवर आधारित हिंदी/मराठी चित्रपट बघायला आवडतील (आदिपुरुष नको). मृच्छकटिकम् वर आधारित 'उत्सव' हा चित्रपट शशी कपूरने बनवून खूपच वर्षं लोटली.>>> +११११

स्वप्नवासवदत्तावर बनवा. खरं तर खूप जबरी स्क्रिप्ट आहे. प्रेम, विरह, छल, कूटनीती, त्याग, ड्रामा, लढाई, मिलना- बिछडना, फुल्ल स्कोप आहे!
उदयन -शाहिद कपूर, वासवदत्ता - दीपिका, पद्मावती - आलिया यौगंधरायण - शरद केळकर अशी स्टार कास्टही आली लगेच डोक्यात Happy

ओंकारा - ऑथेल्लो
मकबूल - मॅकबेथ
हैदर - हॅम्लेट >>

आता किंग लियर कधी येणार?

कशाला घाण करून डोक्यात जातोस? असेही डोळा लाल होतो ना तुझा? जरा कमी वावर इथे!
Submitted by aashu29 on 10 November, 2022 - 02:43

>>> धमकीच म्हणजे डायरेक्त्त... पूर्वीची मायबोली आणि फ्रिडम ऑफ स्पीच राहिला नाही हेच खरे...

"युवा अलग च आहेत.. >>>
माझ्या मते तर हा एकमेव सिनेमा आहे ज्यात अभिषेक बच्चन हा अमिताभ बच्चनच्या सावलीतून बाहेर पडलाय
>>>
युवा मस्त आहे. ओंकारापण...
हैदरही अप्रतिम आहे. एकांगी नक्कीच आहे. तरीही जरूर बघा. मकबूल नाही पाहिला.

स्वप्नवासवदत्तावर बनवा. खरं तर खूप जबरी स्क्रिप्ट आहे. प्रेम, विरह, छल, कूटनीती, त्याग, ड्रामा, लढाई, मिलना- बिछडना, फुल्ल स्कोप आहे! >> +१
ह्यात स्वप्ने दृष्टा वासवदत्ता ऐवजी प्रॉडक्ट प्लेसमेंट म्हणून वासवदत्ता सिमेंट नको दाखवायला फक्त.

ओंकारा, युवा अलग च आहेत.. नॉस्टॅल्जिया.. >> युवा विशाल भारद्वाजचा कधी झाला ? मनिरत्नमचा आहे.

Pages