चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

थोराड निबर अंकुश जाधव, सई आणि कॉलेज युवकाची भूमिका करतानाही ढेरपोट कमी करण्याची जराही तसदी न घेणारा झबा
>>>
हे सारे मराठीतले दिग्गज कलावंत आहेत.
पण आपल्याकडे हॉलीवूड ते ग्रेट आणि मराठी ते डाऊनमार्केट असा एक सूर आढळतो त्यामुळे या टिकेचे आश्चर्य नाही वाटले.
असो, कॉलेजच्या मुलांचे पोट नसते का? आमच्या ग्रूपमध्ये कित्येक मुलांची पोटं बीअर पिऊन फुगली होती. (बीअर हे कारण ते स्वतःच द्यायचे, मला कल्पना नाही खरेच असे होते का?)

सिनेमा किती हिडीस आहे हे कळलं असत
>>>>
काय हिडीस होते दुनियादारी सिनेमात?

मी खुळ्यागत हसणारा नट म्हणलं होतं
तो शरूखच आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद
>>>>
टिपिकल आर्ग्युमेंट.
तुम्ही एकंदरीतच शाहरूखचे जे वर्णन केले म्हणजे हात वर करणे वगैरे जी त्याचीच सिग्नेचर स्टेप आहे हे लहान मुलगाही सांगू शकतो.
त्याऊपर जी टिका तुम्ही केली ते तुमचे वैयक्तिक मत आहे. त्यावरून मी तो शाहरूखच होता हे ओळखणे याचा अर्थ शाहरूख तसाच आहे हे मी मान्य करणे वा तेच फॅक्ट आहे असा अर्थ होत नाही.

मला दुनियादारी आवडला नव्हता.मूळ पुस्तकातले जे अतिशय भिडणारे मुद्दे आहेत ते सगळेच बदलले होते.शिरीन ला साईनाथ ची होणारी बायको करणे हा अक्षम्य अपराध आहे.
पण ज्यांनी पुस्तक वाचलं नाही त्यांना सिनेमा आवडला.

त्यावरून मी तो शाहरूखच होता हे ओळखणे याचा अर्थ शाहरूख तसाच आहे हे मी मान्य करणे वा तेच फॅक्ट आहे असा अर्थ होत नाही.>>>
जाहीरपणे नका करू पण खुळ्यागत हसणारा नट म्हणताच तुम्ही शरूख म्हणालात
त्यावरून तुम्हाला हे मान्यच आहे की तो खुळ्यागत हसतो, लोकांची कॉपी करतो
आता त्याची इतकी लाल केल्यामुळे तुम्हाला ते मान्य करणेही अवघडच पण तुम्ही मनातून मान्य केलंत हेच यश Happy

आता दुनियादारी
एकवेळ ते तिघे मान्य करतील की या रोलसाठी आम्ही मिसफीत होतो पण तुम्ही नई करणार
उलट त्यांनाच पटवून द्याल नई हे असेच ढेरपोट असलेली व्यक्ती हवी होती श्रेयस म्हणून
कारण वाचनाशी तुमचा काही संबंध कधी आलाच नाहीये
त्यामुळे तुम्ही अगदी अधिकारवाणीने त्यावर बोलू शकता
Happy

हॅरी पॉटर वरच लहानाचे मोठे झालो. सिनेमा आला की फर्स्ट डे बघायला आईबाबा घेऊन जायचे, त्यांना पण आवडायचा. बहीण मोठी होती तिने पुस्तकं इंग्रजीतून वाचलेली. मराठी अनुवाद खूप हळू येत असल्याने मी मागे पडलेलो. शेवटी अगदी न रहावल्याने हिंदीतून ४,५ पार्ट घेतले. पुढे ६,७ सुद्धा हिंदीतूनच वाचले. त्यामुळे ६,७ पुस्तकं आधी वाचली आणि सिनेमे नंतर पहिले. सर्व पुस्तकांची अक्षरश: पारायणे केली.

मला वाटतं की सिनेमे खूप छान बनवलेत. पुस्तकांची जादू स्क्रीनवर उतरवण्यात यशस्वी झालेत.

नार्नियाचा पहिला सिनेमा हा आजवरचा "पुस्त टू सिनेमा" मधला एक नंबर सिनेमा आहे. अगदी बालिश पुस्तकातून सुरेख सिनेमा तयार झालाय. पुस्तक अति म्हणजे अति लहान मुलांसाठी आहे.

आणि नार्नियाचे सातवे पुस्तक वाचून सी एस ल्युईस ह्या लेखकाबद्दल अनादर वाटू लागला.

नार्निया म्हणजे तो सिंहाचाच ना .. त्याचे अजून भाग असल्यास कल्पना नाही. त्याचेही पुस्तक होते हे माहीत नाही.
पण तो मस्त पिक्चर आहे. मला फार आवडतो. तो लागला की मी बघत बसतो.
तो पिक्चर मला आवडला म्हणजे बालकथा वा जादू फॅन्टसी या प्रकाराशी माझे काही वावडे नाहीये हे नक्की Happy

पाकिस्तानात जाऊन काय करता?
तिथंही पॉटरहेड्स आहेत

https://tribune.com.pk/story/2331583/pakistani-potterheads-transform-uni...

तुम्ही आता थेट अझकबानला जा
तिथल्या डीमेन्टरसना सांगून ठेवतो की या दोघांना एकदम कडेची कोठडी द्या म्हणून Happy

टॉम bombadil baddal सहमत, हपा!
मला gollum che parts वाचायला ही बोर झालेले नंतर नंतर Happy

हॅरी पॉटर वाचले नसेल तर वाच re Runmesh. लेकीला घेऊन वाच. आता मला लेकी बरोबर वाचून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. शिवाय त्यांच्याबरोबर कनेक्ट ही होता येते, एकमेकांना कोडी घालणे, छोटे छोटे डिटेल्स एकमेकांबरोबर शेअर करणे हे sagle आता आमच्याकडे होत असते.

आता मी ती LOTR कधी वाचतेय याची वाट baghtey. Happy

हॅरी पॉटर वाचले नसेल तर वाच re Runmesh. लेकीला घेऊन वाच.
>>>>>>

ओके, ठरलं तर मग... तिथे तू बोललीस आणि ईथे मी लागलीच ऑर्डर केली...
आता ईंग्लिश रीडींग मोड ऑन !
सोबत एक डिक्शनरी सुद्धा ऑर्डर केलीय.. ती आली की लगेच सुरू होतो Happy

IMG_20221109_022921.jpg

अरे एवढ्या lलवकर पुस्तके आली पण! Accio Harry Potter books असे म्हणुन summon केलीस की काय Lol आता हा जोक कळायला पुस्तके नक्की वाच Happy I'm happy

आणि डिक्शनरी वगैरे काही लागणार नाही तुला. उगीच आपलं काहीतरी म्हणतोयस. अशी काही मेजर भाषा नाहिये त्यात.

क्विझ घेण्यात येईल. त्याचे पासिंग ८०%. पास झाल्यावरच हकालपट्टी वटहुकूम रद्द करण्यात येईल.

अरे अरे त्याला प्रेशर कुकर मध्ये ठेऊ नका :D, analit की पुस्तके.
Runmesh, एक एक पुस्तक वाचून धागा काढ (म्हणजे बरोबर वाचेल Happy हलके घे re)

अग्ग ए काय हलके घे.. एक पुस्तक एक धागा.. हेच मोटीवेशन राहणार
आणि डिक्शनरी कॅन्सल केली. कॉन्वेंटमध्ये शाळा शिकलेली बायको केलीय त्याचा काही तरी फायदा झाला पाहिजे ना Wink
नाहीतर मायबोली आहेच. एकेका शब्दाचे अर्थ भावार्थ गूढार्थ विचारायला. त्याचा मी एक वेगळा धागा घेईन Happy

बाकी माझी विमानाची तिकीट कॅन्सल करू नका. आता पुस्तक घेतलेय. अजून वाचायचेय. त्याहून महत्वाचे आवडायचे आहे..
पण तसेही मी विमानाने जात नाही कुठे.. विसरलात.. माझी एंट्री एक्झिट हेलिकॉप्टरनेच असते.. आता त्याचाही फोटो टाकायला लाऊ नका Proud

केकू - तिकडे जायच्या विमानात बिसिनेस क्लास असतो का?>>>>

नोप… असला भेदभाव तिकडे करत नाहीत. सर्वांनी फ्लोअरवर बसुन आपापले डबे, आणले असतील तर, खायचे. आणले नसतील तर बघा कोणी शेजारी दया करतो का ते. डबे न धुता बॅगेत परत टाकायचे. उगीच दोन घोट पाण्यात डबे विसळुन पाणी हळुच खिडकीबाहेर टाकण्यासाठी खिडकी उघडायचा
प्रयत्न करायचा नाही. ऐर्होस्टेस खालाजान येऊन कानाखाली मारेल.

असतोना! बिसिनेस मेन कसे कुठलाही रिपोर्ट स्वतः वाचत नाहीत. त्यांच्या हाताखालचे लोक रिपोर्ट वाचून बॉसला ब्रीफ करतात. असे माझ्या सारखे बिझी लोक पुस्तक वाचत नाहीत वा सिनेमा बघत नाहीत. आम्ही इतरांचे प्रतिसाद वाचतो. तेव्हडे पुरेसे होते. मग आपला एक ठोकून देतो झाल.
असे लोक साध्या सुध्या कॅॅटल क्लास मॅंगो लोकांबरोबर कसे बसतील?
म्हणून त्यांच्या साठी खास. दीवाणे खास!

Pages