चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आणि तेव्हापासून
हॉगवर्ट्स मे रहने वाले ब्रह्मास्त्रपे टिका नही किया करते
ही म्हण पडली.>>>
वैसे भी हम लोक कोई भी टीका लगाते नही, टिकालाल! हमने तो ना माताजी का टीका लगाया ना कोविडका!

टीका पुराण सुरू आहे तर हे एक आठवले.
मनोगत मध्ये एक गूढ शब्दकोडे आले होतो.
हा एखाद्या गोष्टीचे चांगले वाईट विश्लेषण करतो तर कारटी का बिथरतात? (४)

इथे बिथरणे ऍनाग्राम इंडिकेटर आहे. "कारटी का" चा ऍनाग्राम "टीकाकार" हे कोड्यात उत्तर. पण कोड्याचा शब्दशः अर्थ घेतला तर टीका केल्यास चार टाळकी बिथरतात हे सुद्धा खरेच की. Wink

हॅॅरी पॉटर चा पण खूप इतिहास आहे.
हे पुस्तक बारा प्रकाशकाकडून नकार घंटा घेऊन ब्लूमबर्ग कडे आले. ब्लूमबर्गचा मालकही ते रिजेक्ट करणार होता. पण त्याच्या लहान मुलीने हट्ट केला म्हणून त्याने प्रकाशित केल. उसकी तो जिन्दगी बन गयी.
रौलिंग बाईंनी इकडून तिकडून बरेच कन्सेप्ट उधार घेतले आहेत. इवा इबोटसन (नाम तो सुनाही होगा. नसेल तर कुठूून तरी मिळावा पुस्तके आणि वाचा) हिने "प्लॅॅ्टफॉर्म नंबर १३" नावाचे पुस्तक लिहिले आहे. रौलिंग बाईंनी तोच कन्सेप्ट "Platform 9 3/4" करून वापरला.
अजूनही बरच लिहिण्यासारखे आहे.

१०० फूट जर्नी म्हणजे तो "ऑम्लेटमध्ये हळदीची चिमुट" वाला सिनेमा का? असेल तर मस्तच आहे तो.

इथे बिथरणे ऍनाग्राम इंडिकेटर आहे >> हे कळले नाही. मला फक्त 'चार टाळकी बिथरतात' एव्ढाच अर्थ वाटला होता. टीकाकार आणि कारटी का - ह्यातली गंमतही तुम्ही सांगितल्यावर कळली. पण बिथरतातचा दुसरा (तुमच्या लिखाणात पहिला) अर्थ काय आहे? कृपया उलगडून सांगता का?

आपला,
हॅरचंद पॉलव (सौजन्यः अमित)

हॅरी पॉटरची पुस्तके मराठीत अनुवादीत आहेत का?
आधीच मला वाचनाचा आळस. त्यात ईंग्लिश त्रास घेऊन वाचणे तर अशक्यच.
मी पिक्चरच पाहिलेय. दोन भाग पुर्ण. आणि बाकीचे अर्धेमुर्धे नाईलाजाने.
त्यामुळे मी त्या पिक्चरनाच बंडल बोलत आहे. पुस्तके चांगली असतील तर कल्पना नाही. त्यांची चर्चा ईथे अवांतर होईल. कारण धागा चित्रपटाचा आहे ना Happy
तरी हॅरी पॉटरचे चित्रपटाचे सारे भाग लहानपणीच आले असते तर गोष्ट वेगळी. तेव्हा माझी आवड वेगळी होती. आवडलेही असते.

हॅरी पॉटरची पुस्तके मराठीत अनुवादीत आहेत का?>> Rofl अर्रे जरा त्रास घेऊन तू स्वतः शोध ना तुला वाचायची असतील तर.. सर्वच काय ईथे विचारायचं?

हॅॅरी पॉटर चा पण खूप इतिहास आहे.>>> ईथे हॅपो चा धागा आहे. त्यात लिहिता येईल. रोउलिंग बाईंनी पुस्तकं कॅफे वगैरेत बसून लिहिलीत आजू बाजू चं चित्रण करत करत असे ऐकिवात आहे.

आशू,
गूगलवर एखादी गोष्ट स्वतः शोधणे आणि ईथे एखाद्याला विचारणे, लोकांनी सांगणे यात फरक असतो.
गूगलवर शोधताना ह्युमन टच मिसिंग असतो.
आधीच आपण तंत्रज्ञानाने वेढलो आहोत. त्या नादात माणूस माणसापासून दुरावतोय.
असो, हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे Happy

च्रप्स ओके धन्यवाद
पुस्तके वाचणारही नाही जर ईंग्लिश असतील तर.. आपल्या भाषेत असेल तरच मला वाचायला, बघायला मजा येते. तरच ते माझ्या थेट भिडते.

सरफरोश येऊन जमाना झाला आहे. पण आमीरच्या चांगल्या पिक्चर्सपैकी तो खूप वरचा आहे. यातली सगळी पात्रं खरी खुरी वाटतात. जरा नासीरसाहेबच जादा झाले आहेत. ते कान कापणे वगैरे. पण त्यांची व्यक्तिरेखा पण ग्रे शेड मधे आहे. दुसरे म्हणजे पोलीस तपासात खबरी नेटवर्क दाखवलंय. त्या आधी नुसत्या बिडी वरून पोलीस अधिकारी अचूक गुन्हेगार दाखवत असत. क्राईम पेट्रोल ने असल्या डिटेक्टिव्ह सिरीजची दुकानं बंद केली त्याच्या किती तरी आधी खबरी नेटवर्कचं क्रेडिट दिल गेलंय. सुरूवातीच्या नक्षली हल्यानंतर पण माग काढणे हे खूप छान आलेले आहे. मसाला आहे. पण साफ दुर्लक्ष करण्यासारखा आहे. अशा सिनेमांचा एक वेगळाच जॉनर आहे. रिअ‍ॅलिस्टीक + बॉलीवूडी रोमान्स, गाणी इ. या पिक्चरचा वेगळा धागा असता तर छान झालं असतं. यात आमीर आणि सोनालीची जोडी कमालीची सुंदर दिसलीय. मुकेश ऋषी* हा पोलीस म्हणून आमीर पेक्षा उजवा वाटलाय तरी नायकाच्या हिरोपणाला बाधा येत नाही. या अशा गोष्टी लक्षात राहिल्यात.
* ज्या ज्या सिनेमात साईड हिरो आमीर पेक्षा ताकदवान , नायकाला वाचवणारा दाखवलाय त्यात आमीर जास्त आवडलाय. उदा. कयामत से कयामत तक राज झुत्शी, जो जिता मधे त्याचा मोठा भाऊ.

Harry Potter books - yessss...
Movies - NO! They can't reach what i have imagined while reading Happy

Harry Potter books - yessss...
Movies - NO! They can't reach what i have imagined while reading Happy > +१०००००००

Harry Potter books - yessss...
Movies - NO! They can't reach what i have imagined while reading>>>
+100000
पुस्तकांच्या 10 टक्के सुद्धा भाग सिनेमात नाहीये
तरीही मला सिनेमे बघायला जाम आवडतात
स्पेशली प्रिझनर ऑफ अझकबन
त्यातला टाईम ट्रॅव्हल वाला पार्ट जो काही घेतलाय त्याला तोड नाही

मगल्स नी हॅपो ला शिव्या घातल्यावर धावून आलेल्या सगळ्या विझर्ड्सना धन्यवाद Happy

हॅपोला शिव्या कोणी नाही घालत हो
जस्ट नॉट माय टाईप..
लोकांना ईथे आपल्याला जे आवडते ते दुसर्‍या कोणाला आवडत नाही हे पचवणे फार जड जाते आणि ९० टक्के राडे त्यातूनच होतात..
हुमायुन नेचर आहे हे..
मलाही कोणी शाहरूख आवडत नाही म्हटले की डोक्याला शॉट लागतो तसेच Happy
फक्त ज्याच्या त्याच्या मताचा आदर करावा..
हॅरी पॉटर पुस्तके भारी आहेत आणि पिक्चर त्यामानाने बंडल हे मत बहुतेकांचे आहे हे ही नसे थोडके Happy

सरफरोश +७८६
गुलामसुद्धा तितकाच आवडतो
दोघांचा आपापसात काही संबंध नाही. कदाचित एकाच काळातील असावे म्हणून सहज आठवला.

त्यामानाने>>>>
हा शब्द ट्रिपल बोल्ड करून वाचा सर

आजवर कुठलाच सिनेमा ज्या पुस्तकावर आधारित आहे त्याला न्याय देऊ शकला नाहीये

ना लॉर्ड ऑफ द रिंग्ज ना गेम ऑफ थ्रोन्स ना हंगर गेम्स ना मेझ रनर
ना ज्यूरसिक पार्क ना गॉन विथ द विंड ना गन्स ऑफ नेव्हरोन

त्यामुळे सोयीचे तेवढेच घेऊन टेऱ्या बडवू नका

हॅपो चा एकूणएक सिनेमा वर्षानुवर्षे खुळ्यागत हसत, दुसऱ्यांचे कॉपी मारत आणि विनाकारण हात वर करत फॅन्स जमा करणाऱ्या सुमार नटांच्या तुलनेत कैक पटीने सरस आहे

मी सांगतो, सिडनी शेल्डनच्या if tomorrow comes पुस्तकापेक्षा रामूचा एक हसीना थी चित्रपट जास्त भारी आहे.

लॉर्ड ऑफ द रिंगस् चित्रपटात टॉम बोंबाडील हे पुस्तकातलं ५० एक पानं खाणारे अतिशय कंटाळवाणं पात्र पूर्णपणे गाळलं याचं मला अतीव समाधान आहे.

लॉर्ड ऑफ द रिंगस् चित्रपटात टॉम बोंबाडील हे पुस्तकातलं ५० एक पानं खाणारे अतिशय कंटाळवाणं पात्र पूर्णपणे गाळलं>>> अस कस
तोच वाचवतो ना मेरी आणि पोपीन्स ना जंगलात

अर्थात तेवढाच पार्ट घेतला असता तर चालला असतंच ना

पुस्तकात शॉर्टकट टू मश्रुम हा अक्खा chapter आहे
सिनेमात मोजून 3 सेकंदात उरकलाय

ब्रह्मास्त्र इथे इंग्रजीत होता... भयंकर त्रास झाला पाहून... कान से खून निकलना बाकी था.. सतत who are you.. what are you.. अर्रारा... डायलॉग भिकार आहेत ऐकलं होतं.. पण भाषांतर पण दुसरीच्या मुलांच्या level cha ahe..
हॅरी पॉटर पाचव्या पर्यंत चांगले वाटले.. पण फार डार्क होत जातात , त्या नंतरचे.. इतक्या अंधारात कुठं बघायचं तेही कळत नाही.. सो पास नंतरच्या पार्टस ना.. पुस्तकावर समाधान..

आजवर कुठलाच सिनेमा ज्या पुस्तकावर आधारित आहे त्याला न्याय देऊ शकला नाहीये
ना लॉर्ड ऑफ द रिंग्ज ना गेम ऑफ थ्रोन्स ना हंगर गेम्स ना मेझ रनर
ना ज्यूरसिक पार्क ना गॉन विथ द विंड ना गन्स ऑफ नेव्हरोन
>>>>>>>>

ईंग्लिश बनत नसतील.
मराठीत दुनियादारी आहे एक जबरदस्त ब्लॉकबस्टर !
अजूनही असतील, मी पुस्तके वाचत नसल्याने मला कल्पना नाही. पण सरसकटीकरण काय करता की पुस्तकच भारी पिक्चर बंडल वगैरे..
हॅरी पॉटर पिक्चर कोणाला वाटत असतील बंडल तर स्विकारा त्यांची मते.

..

हॅपो चा एकूणएक सिनेमा वर्षानुवर्षे खुळ्यागत हसत, दुसऱ्यांचे कॉपी मारत आणि विनाकारण हात वर करत फॅन्स जमा करणाऱ्या सुमार नटांच्या तुलनेत कैक पटीने सरस आहे
>>>>>

शाहरूखचा काहीही संबंध नसताना उल्लेख केला यातच त्याचे यश Happy

इतक्या अंधारात कुठं बघायचं तेही कळत नाही..
>>>>>

अगदी अगदी
म्हणजे आमच्याकडे लागलेले असतात अद्येमध्ये. जेव्हा नजर जाते तेव्हा सारी अंधारलेली स्क्रीन. जरा बघूया पाच मिनिटे अशी उत्सुकताही त्यामुळे तयार होत नाही.

मराठीत दुनियादारी आहे एक जबरदस्त ब्लॉकबस्टर !
अजूनही असतील, मी पुस्तके वाचत नसल्याने मला कल्पना नाही.>>>
पुस्तक वाचत नाही तरी किती बोलता सर
दुनियादारी वाचलं असतं ते सिनेमा किती हिडीस आहे हे कळलं असत
कॉलेजच्या मुलांच्या भावविश्वात डोकावणारी ही कादंबरी
आणि तुमच्या त्या सो कोल्ड ब्लॉकबस्टर मध्ये कोण तर ज्यांची मुलं कॉलेजमध्ये जायची वेळ आली असे थोराड निबर अंकुश जाधव, सई आणि कॉलेज युवकाची भूमिका करतानाही ढेरपोट कमी करण्याची जराही तसदी न घेणारा झबा
याचे कौतुक करत असाल तर बरोब्बर आहे तुमचं
हॅरी पॉटर तुमच्या आवाक्यात नाहीच येणार

शाहरूखचा काहीही संबंध नसताना उल्लेख केला यातच त्याचे यश>>>>
मी खुळ्यागत हसणारा नट म्हणलं होतं
तो शरूखच आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद
तो कॉपी करतो हेही मान्य केलंत हेच यश

आता परत एक पो टाकाल की कॉपी करतो पण करिष्मा आहे
एकंदरीत असले पो टाकण्यातच धन्यता माना सर तुम्ही

इतका लाळघोटेपणा बरानव्हे

मुळात दुनियादारी पुस्तकही फार ग्रेट नाही पण सिनेमा थर्ड क्लास आहे.
हॅपॉ पुस्तकात नर्मविनोद आहे तो सिनेमात फारसा येत नाही अर्थात मी फक्त दोनच भाग पाहिले आहेत. पुस्तके मात्र सगळी वाचलीयेत.

Pages