चिकन 1/2 किलो
बटर 1 चमचा
तेल 1 चमचा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
आलं 1/2 इंच
लसूण 10-12 पाकळ्या
बडिशेप 1 चमचा
धणे 1 चमचा
खसखस 1 चमचा
कोथिंबीर 1/2 वाटी
काजू 10
पांढरे व्हिनिगर 2 चमचे
चिकन स्वच्छ धुऊन , हळद, तिखट, मीठ, व्हिनिगर लावुन ठेवावे.
कांदे जाडसार चिरावेत.
चिरलेल्या कांद्यातला १/३ कांदा, लसूण, अालं, बडिशेप, खसखस, कोथिंबीर, धणे, काजू सर्व वाटावे. हे वाटण चिकनला लावावे. किमान १/२ तास चिकन मॅरिनेट करावे.
पसरट भांड्यात ( लगडी किंवा फ्राय पॅन ) बटर आणि तेल तापत ठेवावे. त्यात चिरलेला कांदा टाकावा. कांद्याचा रंग बदलु लागला की त्यात चिकन टाकावे. चांगले परतावे. चिकनचा रंग बदलु लागला की २ वाट्या पाणी घालावे. उकळी आली की झाकण ठेऊन चिकन शिजू द्यावे. साधारण २५ मिनिटांनी तयार होईल चिकन सुहाना !
जितके जासत मॅरिनेट कराल (१/२ तास ते ४ तास) तेव्हढे लवकर शिजेल, अन चवही छान लागेल.
अरे वा, बऱ्याच जणांनी केलंय
अरे वा, बऱ्याच जणांनी केलंय की हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थांकु थांकु सगळ्यांना
दहा वर्ष होत आली की या
दहा वर्ष होत आली की या रेसिपीला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे रेसिपी.. बनवणारे.
छान आहे रेसिपी.. बनवणारे.
दहा वर्ष होत आली की या
दहा वर्ष होत आली की या रेसिपीला
दहा वर्ष आधीच बनवायला पाहिजे होता.. सुहाना...
>>> ओह.. मग उगाच आज बनवला...
उद्या घरी get together आहे.
उद्या घरी get together आहे. चिकन करी बनवायची आहे. काल रात्री झोपेत चिकन सुहाना आठवलं.,सकाळी रेसिपी शोधू असा विचार करतं झोपले. सकाळी पाहिलं तर सुहाना , पहिल्या पाचात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वस्ति छान दिसतेय तू केलेली
उद्या करायचा विचार आहे. खसखस
उद्या करायचा विचार आहे. खसखस ( आणि काजू सुद्धा) मिक्सर मध्ये नीट वाटली जाण्यासाठी काही स्पेशल टीप आहे का?
मी २-३ वेळा खसखस वाटायचा प्रयत्न केला होता पूर्वी. छान गंधासारखी वाटली गेली नाही माझ्याकडून. मग मी खसखस वापरणे बंद केलं.
असं कुणी कुणी अधे मधे
असं कुणी कुणी अधे मधे प्रतिसाद दिले की असे निसटलेले धागे वाचता येतात. हे भारी वाटतंय, पनीर घालून करुन बघेन.
नावच ठेवायचं होतं तर चिकन 'अवली'या पण चाललं असतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे रेसीपी.
छान आहे रेसीपी.
पण घरी चिकन बनवण्याचा अजिबातच अनुभव नाही. (त्यामुळे दुकानातून चिकन कसे आणावे याचाही नाही.)
माधव म्हणतात तसे आधी पनीर सुहाना करून बघेन.
माधव
माधव![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बादवे पनीर सुहाना करताना मसाला नुसता परता. पनीर शेवटच्या उकळीत घाला. नाही तर चिवट होईल.
अल्पना, खसखस आधी थोडी रगड्यात/ खलामधे रगडून/ खलून घे. मग वाटणात टाक.
मानव लिशिअस मधून मागव चिकन,
मानव लिशिअस मधून मागव चिकन, बेस्ट एकदम
दही, टोमॅटो काहीच नाही
दही, टोमॅटो काहीच नाही टाकायचे?
व्हिनिगर आहे न, म्हणून नाही
व्हिनिगर आहे न, म्हणून नाही दही, टॉमेटो
चिकनला व्हेज ऑप्शन पनीर ऐवजी
चिकनला व्हेज ऑप्शन पनीर ऐवजी फ्लॉवर बटाटा करून बघा.
आणि वर कोणी तरी म्हटलय तसं, दिसताना फार उत्तम दिसत नाही पण चव फार मस्त येते.
अल्पना, खसखस आधी थोडी रगड्यात
अल्पना, खसखस आधी थोडी रगड्यात/ खलामधे रगडून/ खलून घे. मग वाटणात टाक.>> पुढच्या वेळी करेन. काल बनवून झाले. मी आधी कोरडे पदार्थ मिक्सर मध्ये फिरवले आणि मग त्यात कोथिंबीर, आले, लसूण, कांदा घालून परत वाटले. अगदी गंधासारखे वाटण नव्हते झाले.
पण चिकन मस्त झाले होते. माझ्या लेकाला खूप आवडले.
व्हिनेगर ऐवजी काय चालेल? कि
व्हिनेगर ऐवजी काय चालेल? कि मस्ट आहे?
वापरले नाही कधी व्हिनेगर.
लिंबू लाव. चालू शकेल.
लिंबू लाव. चालू शकेल.
छान पाकृ.
छान पाकृ.
परंतु शीर्षक वाचल्यावर "सुहाना मसाला" वापरून केलेली पाकृ असे वाटले.
मृणाली लिंबू चालेल ग.
मृणाली लिंबू चालेल ग.
ओके धन्यवाद अल्पना, अवल.
ओके धन्यवाद अल्पना, अवल.
आज बनवलं
आज बनवलं
![IMG_20221103_194606_2.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u70058/IMG_20221103_194606_2.JPG)
मस्त मस्त झालं
धन्यवाद अवल
अरे वा, मृणाली मस्त फोटो
अरे वा, मृणाली मस्त फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा बटाटा सुहाना. चव मस्त होती
हा बटाटा सुहाना. चव मस्त होती पण बटाटा हा योग्य पर्याय नाही वाटला. पुढच्या वेळेस पनीर घालून बघेन...
वा माधव.
वा माधव.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
बाय द वे माझ्या इतर रेसिपीज पण बऱ्या आहेत हो
Pages