चिकन सुहाना

Submitted by अवल on 13 May, 2012 - 02:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

चिकन 1/2 किलो
बटर 1 चमचा
तेल 1 चमचा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
आलं 1/2 इंच
लसूण 10-12 पाकळ्या
बडिशेप 1 चमचा
धणे 1 चमचा
खसखस 1 चमचा
कोथिंबीर 1/2 वाटी
काजू 10
पांढरे व्हिनिगर 2 चमचे

क्रमवार पाककृती: 

चिकन स्वच्छ धुऊन , हळद, तिखट, मीठ, व्हिनिगर लावुन ठेवावे.
कांदे जाडसार चिरावेत.
चिरलेल्या कांद्यातला १/३ कांदा, लसूण, अालं, बडिशेप, खसखस, कोथिंबीर, धणे, काजू सर्व वाटावे. हे वाटण चिकनला लावावे. किमान १/२ तास चिकन मॅरिनेट करावे.
पसरट भांड्यात ( लगडी किंवा फ्राय पॅन ) बटर आणि तेल तापत ठेवावे. त्यात चिरलेला कांदा टाकावा. कांद्याचा रंग बदलु लागला की त्यात चिकन टाकावे. चांगले परतावे. चिकनचा रंग बदलु लागला की २ वाट्या पाणी घालावे. उकळी आली की झाकण ठेऊन चिकन शिजू द्यावे. साधारण २५ मिनिटांनी तयार होईल चिकन सुहाना !

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरावे
अधिक टिपा: 

जितके जासत मॅरिनेट कराल (१/२ तास ते ४ तास) तेव्हढे लवकर शिजेल, अन चवही छान लागेल.

माहितीचा स्रोत: 
माझेच प्रयोग. हे चिकन परतत असताना खुप छान वास येत होता, म्हणून त्याचे नाव ठेवले 'चिकन सुहाना' :-)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दहा वर्ष होत आली की या रेसिपीला
>>> ओह.. मग उगाच आज बनवला... Happy दहा वर्ष आधीच बनवायला पाहिजे होता.. सुहाना...

उद्या घरी get together आहे. चिकन करी बनवायची आहे. काल रात्री झोपेत चिकन सुहाना आठवलं.,सकाळी रेसिपी शोधू असा विचार करतं झोपले. सकाळी पाहिलं तर सुहाना , पहिल्या पाचात. Happy

उद्या करायचा विचार आहे. खसखस ( आणि काजू सुद्धा) मिक्सर मध्ये नीट वाटली जाण्यासाठी काही स्पेशल टीप आहे का?
मी २-३ वेळा खसखस वाटायचा प्रयत्न केला होता पूर्वी. छान गंधासारखी वाटली गेली नाही माझ्याकडून. मग मी खसखस वापरणे बंद केलं.

असं कुणी कुणी अधे मधे प्रतिसाद दिले की असे निसटलेले धागे वाचता येतात. हे भारी वाटतंय, पनीर घालून करुन बघेन.

नावच ठेवायचं होतं तर चिकन 'अवली'या पण चाललं असतं. Happy

छान आहे रेसीपी.
पण घरी चिकन बनवण्याचा अजिबातच अनुभव नाही. (त्यामुळे दुकानातून चिकन कसे आणावे याचाही नाही.)
माधव म्हणतात तसे आधी पनीर सुहाना करून बघेन.

माधव Lol
बादवे पनीर सुहाना करताना मसाला नुसता परता. पनीर शेवटच्या उकळीत घाला. नाही तर चिवट होईल.
अल्पना, खसखस आधी थोडी रगड्यात/ खलामधे रगडून/ खलून घे. मग वाटणात टाक.

चिकनला व्हेज ऑप्शन पनीर ऐवजी फ्लॉवर बटाटा करून बघा.

आणि वर कोणी तरी म्हटलय तसं, दिसताना फार उत्तम दिसत नाही पण चव फार मस्त येते.

अल्पना, खसखस आधी थोडी रगड्यात/ खलामधे रगडून/ खलून घे. मग वाटणात टाक.>> पुढच्या वेळी करेन. काल बनवून झाले. मी आधी कोरडे पदार्थ मिक्सर मध्ये फिरवले आणि मग त्यात कोथिंबीर, आले, लसूण, कांदा घालून परत वाटले. अगदी गंधासारखे वाटण नव्हते झाले.
पण चिकन मस्त झाले होते. माझ्या लेकाला खूप आवडले.

छान पाकृ.
परंतु शीर्षक वाचल्यावर "सुहाना मसाला" वापरून केलेली पाकृ असे वाटले.

आज बनवलं
मस्त मस्त झालं
धन्यवाद अवल
IMG_20221103_194606_2.JPG

वा माधव.
बाय द वे माझ्या इतर रेसिपीज पण बऱ्या आहेत हो Biggrin

Pages