Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरं आहे स्वरूप, प्रसादचे
खरं आहे स्वरूप, प्रसादचे वारेमाप उगाच कौतुक होतंय. वोटिंगही होतंय त्याला.
बिग बॉसने दोऱ्या दुसऱ्या
बिग बॉसने दोऱ्या दुसऱ्या टीमच्या हातात न देता सर्वात जास्त वेळ टिकलेले सदस्य म्हणून डायरेक्ट माने आणि विकास यांना कॅप्टनपदाची उमेदवारी द्यायला हवी होती.
बिग बॉस हमेशा खेल जाते है. पण आजचा खेळ आवडला नाही, माने पहिले आऊट झाले.
धोंगडेला काढणार ते आवडलं मात्र मला, अपूर्वा खालोखाल किरकिर आणि कटकट करत असते. विकासबद्दल अपूर्वाला सिंपथी आहे हे दिसलं. यशश्रीला निर्णय बदलायला लावला तिने.
बिग बॉसने टीम बी ला जिंकून
बिग बॉसने टीम बी ला जिंकून हरवलं . ए टीममध्ये आधी असणारी यशश्री आणि ए टीम मध्ये आत्ताही मनाने असणारी समृद्धी या कॅप्टनपदाच्या उमेदवार झाल्या.
समृद्धी बाबत एक मानायला हवं, छान रनर आहे आणि एक फेरी फक्त यशश्री बझर राऊंड जिंकू शकली बाकी sam ने जिंकल्या, ह्यासाठी कौतुक तिचं.
विकासला खूप लागलंय, तो स्वत:चे मुद्दे सांगायला एकदाच उठला नंतर गेलाच नाही.
बिबॉस च ठरवतो सगळ.जरी प्रसाद
बिबॉस च ठरवतो सगळ.जरी प्रसाद,तेजूने बझर वाजवला कसता तरी त्याचीही सोय केली होती.एकमत नाही झाल तर बझर वाजवणाराच आऊट होणार होता.त्यामुळे प्रसाद,धोंगडे ,तेजछ जरी आले असते तरी ए टीमने एकमत होऊ दिल नसत.
प्रसाद आणि तेजा धोंगडे पेक्षा
प्रसाद आणि तेजा धोंगडे पेक्षा उजवे होते. धोंगडेने उठवले हे बरोबर पण बसण्यात टिकण्यात प्रसाद तिच्यापेक्षा भारी आणि तेजाची पहिली निवड भारी होती.
माझ्यामते बिग बॉस ने माने आणि विकासची उमेदवारी जाहीर करायला हवी होती, तिसरी तेजु चालली असती, तिची निवड योग्य या कारणासाठी. अर्थात टीम बी सिंपथी मिळवेल खूप पण यावेळी असं व्हायला नको होतं. त्यांच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशाचे कॅप्टनसी मध्ये रूपांतर व्हायला हवं होतं.
बाय द वे वेडात मराठे वीर दौडले सात मध्ये जय फार रुचला नाही, दिसतोय छान पण चांगला अभिनय करू शकेल असं वाटत नाही. विशालही खास वाटत नाहीये, राणादा आणि उत्कर्ष मात्र परफेक्ट वाटतायेत.
समृद्धी आणि यशश्री सगळ्यात
समृद्धी आणि यशश्री सगळ्यात बेकार होत्या तर त्यांना उमेदवार!!!? बाकी माने, विकास, तेजू अगदी धोंगडे सुद्धा चालली असती.
या वीकला त्रिशूलला हाकला.
काय माठपणा होता!! समृद्धी
काय माठपणा होता!! समृद्धी सोडून बाकी लोक चौकोनाच्या ४ बा़जुंवर उभे रहायच्या ऐवजी कोपर्यात / कोपर्याजवळ उभे राहिले होते !!अरे साधे भूमिती चे ज्ञान वापरावे ना, समृद्धी सर्वात जवळ होती बझर च्या! बाकीचे लांब
दे डीजर्व धिस 
समृद्धी हा टास्क खरोखर चांगली
समृद्धी हा टास्क खरोखर चांगली खेळली. बाकी धावण्यात माठ होते. कालच्या टास्कसाठी खरोखर कौतुक तिचं.
विकास, विकास ,आणि विकास.या
विकास, विकास ,आणि विकास.या मुलाला खरतर क्रिकेटमध्ये मँन ऑफ द म्च अँवॉर्ड असत तस स्पेशल अँवॉर्ड द्यायला हव.काय ती जिद्द.हँट्स ऑफ.
बाकी,टीम ए जिंकली.मस्त खेळले.
टीम बी ,खरतर टीम नाहीच आहे ती.
त्या प्रसाद आणि धोंगडेला बाहेर काढल पाहिजे.आज दोघ नुसती सिंपथी घेत होते.फार इरिटेट करत आहेत आता.
देशमुखबाई परतल्या तेजुच्या ग्रुपमध्ये.
टास्क सुरू होण्याच्या आधीच भांडण.वैताग आला आहे टीम बी चा.
फक्त एक पटल नाही.टीम बी साठी स्विमिंग पूलजवळची जागा आणि टीम एची दूर
पण हे सगळे पाण्यातच का त्या लगोरी टाकत होते.चार दिशांनाही फेकता आल असत.किंवा लगोरी पळवायची,स्वत:कडे घेऊन बसायच.
असो,सम्रुध्दी कँप्टन झाली.
उद्याची चावडी रंगणार बहुतेक.त्रिशुल आणि धोंगडे दोघांनाही काढा.
मी विकासबद्दलच लिहायला आले,
मी विकासबद्दलच लिहायला आले, हॅट्स ऑफ. पोऱ्याने गाजवला दिवस. अपूर्वाचा पचका केला. शेवटी इमोशनल झाला, त्याच्याबरोबर माझ्याही डोळ्यात पाणी आलं. जिंकलं मन पोराने.
समृद्धी टीम छान खेळली, पहिला टास्क स्थगित झाला नसता तर ती आधीच जिंकली असती.
अक्षय छान खेळला आज, त्यालाही श्रेय जातं जिंकण्याचे. रोहित, स्नेहलता ही चांगले खेळले.
धोंगडे टोटल रडी आहे, लागलं लागलं करत बसते. किरकिरी आणि रडी आहे जास्त.
बी टीमचे इगो इश्यूज खूप आहे आणि सारखे वाद घालतात. प्रसाद तर रडत असतो. तो खेळला छान पण दुसरे वरचढ झाले.
समृद्धीने शेवटी गोड खाण्यासाठी यशश्रीला निवडावे असं वाटत होतं, ते तिने केलं, दिल जीत लिया.
समृद्धी परत कॅप्टन झाली.
समृद्धी परत कॅप्टन झाली.
प्रसाद ची अलका कुबल झालीये. सारखं काय रडतो.
प्रसाद मुळे टीम बी चा खरंच तोटा होतोय. किती किरकिर रडारड भांडाभांडी करतो. लोक त्याच्या बाजूने बोलत आहेत ते पण त्याला कळत नाही. आज तेजू फ्रस्ट्रेट झालेली त्याला समजावून. त्याला ना धड मुद्देसुत बोलता येतं,ना खेळता येतं. कसा काय त्याला बाहेर पाठिंबा काय माहिती.
त्रिशूल छान खेळाला आज. विकास पण मस्त खेळतो. खूप ताकद आहे त्याच्यात.
धोंगडे ने स्नेहा चे केस भयंकर पद्धतीने ओढले पण तरी स्नेहा ने जास्त सीन केला नाही. अपूर्वा चे केस पण विकास ने ओढले म्हणे पण तिने पण ओरडा आरडा केलेला दिसला नाही. अपूर्वा आणि विकास एकमेकांशी छान समजून वागतात ते आवडलं मला.
सॅम ने यश ला स्वीटस देऊन दिल जीत लिया
स्मिता आपलं शेवटचे वाक्य एकाच
स्मिता आपलं शेवटचे वाक्य एकाच वेळी सेम पिंच, हाहाहा.
त्रिशूल छान खेळाला आज >>> हो त्याने प्रसादला चिडीला आणलं जाम.
प्रसाद काय रड्या आहे, मूर्ख
प्रसाद काय रड्या आहे, मूर्ख वाटतो टास्क मधे ,उगीच चिडचिड करतो, ज्यांना आवडतो त्यांना का आवडतो ?
माने- विकास रॉक्ड धिस विक , जिंकलेल्या टिम कडे /समृद्धीकडे लक्षही नाही गेलं !
समृद्धीने शेवटी बरोब्बर कुकी पॉइंट्स मिळवले !
अमृता देशमुख तेजूच्या टीमकडे
अमृता देशमुख तेजस्विनीच्या टीमकडे का परत आली म्हणे??


डायनिंग टेबलवर अपूर्वा ने एक टोमणा मारला की अक्षय तू दाणे टाकले की काही लोक येत असतील जवळ पण मी नाही येणार..... माझ्यासारखे इगोएस्टिक असतात काहीजण का असेच काहीतरी ती म्हणाली त्यानंतर अमृताचा उतरलेला चेहरा दिसत होता!! तो ट्रिगर पॉइंट असेल का? कालपण अपूर्वाने अमृताला तू पहिली खेळलीस तुला पिन मिळणार नाही का असे काहीतरी म्हणून गप्प केले होते.
She must have realised that she is not in a priority list of Apurva-Akshay team.
बाकी प्रसाद काल ज्या पध्दतीने वागत होता आणि यशश्री आणि धोंगडे जस्श्या भांडत होत्या ते बघता तेजस्विनीचे फार वाईट वाटले..... कमाल पेशन्स आहे तिच्याकडे आणि ॲक्सेप्टन्स पण आहे!! काल खेळली पण छान ..... She is winning hearts and sympthy
कालच्याही टास्कमध्ये लोक बिंडोकपणे खेळत होते..... शेवटच्या राउंडमध्ये नुसते टीम ए चे पाडून उपयोग नाही; आपले आधी जागेवर लागले पाहिजेत तर कुठेतरी पुढची फेरी होण्याचा स्कोप आहे हे न समजता लागले सगळे त्यांचे पाडायला!
सगळ्या गेममध्ये एकट्या विकासने ती चकती जेलमध्ये ढकलण्याचा किंवा सोफ्याखाली सरकवण्याचा प्रयत्न केला बाकी नुसते स्विमिंग पूल एके स्विमिंग पूल करत होते
विकास दोन्ही टास्कमध्ये छा गया!
मानेंनी "Give it back" फारच मनावर घेतलेय..... पण मजा येतीय त्यामुळे; मागून कुचकुचत राहण्यापेक्षा हे बरे
आपली एक छोटीशी कृती आपल्याला कशी हिरो बनवते हे सॅमने काल दाखवून दिले..... मला तिच्याकडून अनपेक्षित होते हे त्यामुळे जास्तच आवडले.!
एकूणात तेजस्विनीच्या ग्रूपला
एकूणात तेजस्विनीच्या ग्रूपला एका सेन्सिबल पुरुष सदस्याची गरज आहे जो उगाच कचकच न करता ताकदीचे टास्क जिंकायला त्यांच्या टीमला मदत करेल आणि टीमला बांधून ठेवायला मदत करेल किंवा at least moral support तरी देईल.
पण त्याला इतक्यात नाही आणणार.... अजुन तेजस्विनी आणि कोअर ग्रूपबद्दल पुरेशी सिंपथी गोळा झालेली नाहिये..... अजुन काही आठवडे अक्षय-अपुर्वा टीमचा माज आणि तेजस्विनी आणि टीमची बिचारी इमेज हेच चालू राहिल
तेजस्विनी ज्या प्रकारे खेळतेय ते बघता तिला चांगला चान्स आहे जिंकायला..... तेजस्विनी, अपुर्वा, अक्षय नक्की असतील पहील्या पाचात.... प्रसादची सपोर्ट आर्मी प्रसादलाही आणेल पहिल्या पाचात (आणि तो सपोर्ट बघता बिग बॉस पण प्रसादला आणतील पुढे मग भले त्याने गेममध्ये कितीही माती खाल्ली तरी)
आता पाचवा सदस्य कोण असेल ते खेळ पुढे कसा उलगडतो यावर अवलंबून असेल..... अर्थात मागचे पॅटर्न बघता हा अंदाज आहे!!
बाकी या शोमध्ये बिग बॉसच खेळत आणि खेळवत असतात मग ते टीम पाडणे असो; नॉमिनेशनमध्ये कुणाच्या दोऱ्या कुणाच्या हातात देणे असो किंवा टास्कमध्ये कुठल्या क्षणी बझर दाबायचा हे असो!!
पूर्णपणे स्क्रिप्टेड नसले तरी चॅनेल/प्रॉडक्शन हाउस बऱ्यापैकी मॅन्युपलेट करते हा शो
आता पाचवा सदस्य कोण असेल ते
आता पाचवा सदस्य कोण असेल ते खेळ पुढे कसा उलगडतो यावर अवलंबून असेल....>>>मला वाटतं समृद्धी राहील पहिल्या पाच मध्ये
मला प्रसादचा गेमच कळत नाही
मला प्रसादचा गेमच कळत नाही.काल त्याने जे काही केल ते नकळत किंवा अँगर इश्यूमुळे नसून मुद्दाम केल अस वाटल.
त्याला यशला कँप्टन होऊन द्यायचच नव्हत.
टॉयलेट एरियात त्याचा ग्रुप गेमप्लँन करत होता हे काय त्याला माहित नसेल का,पण मुद्दाम मध्ये इंटरप्ट केल.नंतर पहिली फेरी स्थगित केल्यावर मानेशी पुन्हा भांडला आणग सेकंड फेरीच्या आधी तर यशला येऊन सांगितल की मी आता तुमच्याबरोबर नाही.
एकतर हे मुद्दाम वाटत आणि जर नसेल तर याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम वाटतो,मग हा योगेशपेक्षा डेंजर ठरु शकतो,मग जसा परागला काढला तसा यालाही काढायलाच हव.
हो खरच प्रसादचं वागणं पाहुन
हो खरच प्रसादचं वागणं पाहुन त्याला खरच काहि सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत असं वाटतं.. अमृताशी बोलतानाहि तो कसं बोलतो.. शॉर्ट टेंपर तर आहेच बोलण्यात विसंगती पण खुप दिसते.
माने आणि विकास मला पुढे जायला
माने आणि विकास मला पुढे जायला हवेत! अनयुज्वल जोडी! जे प्रेडिक्टेबल नाहीत. लव अॅंगल नाही.
बाकीचे ठोकळेबाज पॅटर्न चे लोक नकोत. नाहीतर अमूक + तमूक केले की बिबॉ मधे पुढे जाता येते असा प्रेडिक्टेबल पॅटर्न बनेल. जसा आता हे बरेचसे लोक डोक्यात घेऊन आलेत आणि मेंढरासारखे खेळतात बिनडोक पणे. आणि जनता पण आधीच्या सीझन्स मधले पॉप्युलर लोक आताच्या कन्टेस्टन्ट्स मधे बघायचा प्रयत्न करते नेहमी, ही अमकी मेघासारखी वाटते तो तमका विशाल सारखा वाटतो असे. तसाच त्या प्रसाद ला सपोर्ट सुरु झाला कारण पहिल्या आठवड्यात त्याला एकटे पाडले, तो एकटा भांडला इ. अरे तो काही एक मुद्दा लावून धरत नव्हता तर तो मुळात इमोशनली अनस्टेबलच आहे. हे कळेपर्यन्त तो फालतूच टॉप ३ नाही तरी ७- ८ मधे जाईल ना.
तेजु जिंकायला हवी आणि विकास
तेजु जिंकायला हवी आणि विकास माने दोन तीन वर हवेत, सध्या एवढंच वाटतंय. विकासमध्येही जिंकण्याचे पोटेनशीयल आहे असं वाटायला लागलं, नेहेमी तो हीरो असतो, तो जिंकला तर इतिहास घडेल.
अपूर्वाला दोन वर न्यायला नको. ही तिघे पहिली असतील तर उरलेले दोन अपूर्वा आणि प्रसाद असतील. बाकी कोणी जाणार नाही पाचात.
लोकांना प्रसादमध्ये काय दिसतं काय माहिती. रडत तर असतो.
योगेश असताना तर टीम बी जिंकली असती पण योगेशमुळे तेजाचा गेम बिघडला असता, गेला ते बरं झालं.
मराठेला काढा आता, बास झालं.
तेजू,अक्षय,अपूर्वा, सम्रुध्दी
तेजू,अक्षय,अपूर्वा, सम्रुध्दी, प्रसाद आणि सहावी जागा विकास किंवा वाईल्ड कार्ड असू शकेल.क्रमवार कस असेल माहित नाही.पण अक्षय आणि तेजूमध्ये टफ फाईट होईल अस वाटत आहे.
मानेंना मध्येच कधीतरी काढतील,ते गेल्यावर विकासचा गेम कसा आहे ते कळेल,पूर्णपणे अपूर्वाच्या इन्फ्लूअन्समध्ये आला तर सीट जाईल.
मलाही अनयुज्वल लोक पुढे
मलाही अनयुज्वल लोक पुढे गेलेले आवडतील !
पब्लिक वोटिंग अगदी खरच फॉलो केलं तर देअर इज नि वे अपूर्वा -अक्षय टॉप ५ जाऊच दे टॉप १० मधेही जातील , पण घरात व्हिलन हवा म्हणून नॉमिनेशसन्स मधे न आणण्याचा प्रयत्नं नक्की होईल !
किरण , विकास मधे जे वेगळेपण आहे, त्यांची खेळण्याची जिद्द , मैत्री अपिलिंग आहे / ओरिजनल आहे आणि दे डोन्ट फॉलो एनी गृप, हे दोघे हवेतच टॉप ५ मधे , आय डोन्ट केअर अबाउट अदर्स .. इतर कोणीही काही वेगळं करून इंप्रेस केले नाहीये !
व्हिलन गृप्॑मधे अपूर्वाला काढलं तर समृद्धी मधे लिड घेण्याची कपॅसिटी आहे !
आजची चावडी बरीच आवडली.
आजची चावडी बरीच आवडली.
प्रसाद,धोंगडे, अपूर्वा, अक्षय, स्नेहलता यांना कितीही सुनावले तरी पालथ्या घड्यावर पाणी. मध्ये अपूर्वा बदलली असं वाटलं पण कसलं काय.
म मां ए वाले असंच करणार होते म्हणत होते पण एका शब्दाने असं म्हणाले नाहीत की यांच्या हातात सूत्र का दिली bb ने, त्याअर्थी bb नाच माने विकास पैकी कोणी कॅप्टन नको होतं ना.
अक्षय पहिल्या पाचात असू शकतो जर त्याने फिजिकली कोणाला हर्ट किंवा इतर काही कारणाने बाहेर पडला नाही तर, कारण तो कलर्सचा माणूस आहे, हिंदी सिरियलमध्ये लिड होता तो. नंतर बहुतेक दुसरा आला हीरो म्हणून. मी शेवटचा भाग बघितला. सिरियलचे नाव नीमा डेन्झोपा, कधी ऐकलं नव्हतं.
बाय द वे कोण एविक्ट झालं, एअरटेल नेटवर्क सुरु आहे की बंद पडलं घरातलं. यावेळी त्रिशुलला ठेवलं तर सटकणार माझी.
मराठे एविक्ट झाला अशा न्युज
मराठे एविक्ट झाला अशा न्युज आहेत, बरं झालं.
ते युट्युबर्स शॉकींग न्युज टायटल का देतायेत ह्याच्या एविक्शनला, तो राहीला असता तर शॉकींग न्युज असती, हाहाहा.
मला म मां नी अपुर्वा का नाही बसली सी सॉवर विचारलं ते बरं वाटलं .
मला अपुर्वा, अक्षय, स्नेहलता यांच्याबरोबर बी टीममधले प्रसाद आणि धोंगडेही व्हिलनच वाटतात.
ती देशमुख फक्त दोघांशीच बोलते का जास्त, ए त अक्षयबरोबर आणि बी त प्रसादबरोबर. इतर कोणी सदस्य नाहीत का घरात किंवा बिग बॉस तेवढंच फुटेज दाखवतात. तिला तळ्यात मळ्यात म्हणाले ते बरोबर होतं.
छान झाली ही पण चावडी, माने
छान झाली ही पण चावडी, माने -विकासचं कौतुक झालं, मच निडेड , मानेंना तर खूप गरज होती याची !
अपूर्वाला कितीही रिअॅलिटी चेक द्या , तिचा माज कमी होत नाही !
टिम बी च्या फ्लॉजना बरोबर हायलाइट करतात, प्रसादचाही कनफ्युज्ड अॅटिट्युड कमी होत नाही !
समृद्धीला हिन्ट देतायेत ममा, लिड घे म्हणून, तिने मनावर घेऊन अपूर्वाचा पत्ता कट करायला हवाय !
मला आज स्नेहलताची साडी नेकलेस आवडला, नाइस गेटप !
चांगली झाली चावडी......
चांगली झाली चावडी...... मुद्दे सगळे बरोबर होते!!

पण आतल्या लोकांना बोलू द्या..... तू टॅंजेंट बोलू नकोस; तू दे जस्टीफिकेशन पण मला पटणार नाही किंवा लगेच जस्टीफाय करायला हात वर करु नका सगळे असे बोलून नुसती धाडधाड फायरींग करण्यापेक्षा त्यांचे ऐकून घ्या आणि त्यांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात अडकवा ना!! They themsleves will realize their faults
एक किरण माने सोडले तर कुणीही आता इतक्या चावड्या होऊन मांजरेकरांच्या सांगण्यावरुन त्यांचा खेळ बदललेला नाही.... आणि माने तरी हे बेअरिंग किती दिवस सांभाळतायत कुणास ठाऊक!!
फार जास्त स्पून फिडींग होतय!!
हिंट्स देणे वेगळ आणि सगळ्याच्या सगळ्या बाहेरच्या जगातल्या कॉमेंटस आत आणून ओतणे वेगळे..... चुगली बूथ वगैरे आहे की त्यासाठी!! जरा आतल्यांची मजा घ्या, फिरकी घ्या!!
पण मांजरेकर या शोमध्ये पूर्ण involve दिसतात..... नुसत्या कुणीतरी काढलेल्या नोट्सवर अवलंबून न राहता ते पूर्ण एपिसोड परतपरत बघत असावेत हे ते एक होस्ट पेक्षा एका प्रेक्षकाच्या भुमिकेतुन ज्या पोटतिडकीने जे बोलतात त्यातून जाणवत राहते
>>पण मांजरेकर या शोमध्ये
>>पण मांजरेकर या शोमध्ये पूर्ण involve दिसतात<<
मला तर शंका वाटायला लागली आहे. त्या कॅप्टन्सीच्या उमेदवारीच्या टास्कमधे तुमचं एकमत झालं नाहि तर तुमचाच फुगा फुटु शकतो हा नियम त्यांना माहित नव्हता. यशश्रीने दाखवुन दिल्यावर सावरासावर करावी लागली. शिवाय त्या टास्कचे नियमंच असे बनवले होते कि टिम एच ठरवणार कोणाला पुढं जाउ द्यायचं ते. टिम बीचे स्पर्धक रिग्ड गेम खेळत होते. समृद्धी, यशश्री त्या नियमानुसारंच टिम ए च्या मतांनुरुप निर्णय फिरवत होत्या. आणि कांजरेकर ठणकाउन सांगत होते - होल्ड योर ग्राउंड. घंटा. एकिकडे तुम्हि सांगणार कॅप्टंसी महत्वाची आहे, स्पर्धेत दयामाया दाखवु नका, इंडिविज्युवल खेळा. तसे खेळले कि यांची बोंबाबोंब. साला डबलढोलकि...
दुसरीकडे - कधी सांगणार टिमशी बांधील रहा तर कधी सांगणार विरोधी टिमशी प्रामाणिक रहा - अरे मग जिंकणार कधी आणि कसं? नरो वा कुंजरोवा ऐकलंय का यापुर्वि. किंवा त्यांच्याच फिल्डमधलं जो जिता वोहि सिकंदर...
दोन्हि अमृता बाहेर जातील,
दोन्हि अमृता बाहेर जातील, जायला हव्यात. एक तर विध्वंसक वृत्तीची आहे; टोटल सायकोपॅथ. दुसरीचं नशीब जोरावर असल्याने अजुन टिकुन आहे. मांजरेकर तिचं का कौतुक करतात ते तिलाहि समजत नाहि. अगदि आश्चर्याचे भाव येतात तिच्या चेहेर्यावर - आय्ला खरंच मी असंं केलं?..
सोशल मिडियावर न्यूज होती
सोशल मिडियावर न्यूज होती आजच्या भागाच्या आधी की यशश्री आणि ममांच खूप वाजल आणि शेवटी चिडून तिला म्हणाले की बँग घे आणि निघून जा.पण आज तस काही दाखवल नाही.
जर खर असेल तर मात्र पुढच्या आठवड्यात जर यशश्री नॉमिनेशनमध्ये असेल तर नक्की बाहेर जाईल.
उद्याचा नॉमिनेशन टास्क बिबॉस बघू कसा डिझाईन करतात.
.
त्रिशुल गेला बाहेर, बरं झालं,
त्रिशुल गेला बाहेर, बरं झालं, स्वभावाने चांगला होता बहुतेक, सगळे रडत होते.
म मां ना यावेळी कोणी घाबरत नाही. अपुर्वा तर उलट बोलत असते, यशश्रीने तसंच केलं असेल किंवा जास्त असेल तर दाखवणार नाहीत. जे त्यांच्या हो ला हो करुन आम्ही पुढच्यावेळी नीट वागू म्हणतात ते खरंतर या कानाने ऐकतात आणि त्या कानाने सोडून देतात, फार काही सुधारणा करतात असं नाही .
गोदावरी चित्रपटाच्या प्रमोशनला जितेंद्र जोशी आलेला, मी जरा उशीराच बघायला घेतला एपिसोड. रविवारचा तसा बोअरच असतो.
Pages