Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बार्सिलोनाच्या प्रतिसादातील
बार्सिलोनाच्या प्रतिसादातील पार्ट-२ मला समजला नाही. स्त्री/ पुरुष तुलना कशावरुन केलेली आहे? काही डोळ्यासमोर उदाहरण असेल तर मला समजलं नाही. इथे स्त्री म्हणून अॅनॅलिसीस/ जजमेंट कुठे आणि कसं झालंय?
काय ते कोडे विरहित स्वच्छ लिही.
याचं उत्तर द्यायला मात्र फिफ्थ ... आपलं, पार्ट-१ मधलं कारण वापरू नको.
अस्मिता, पण मीही त्याच
अस्मिता, पण मीही त्याच पुस्तकावरून लिहिलंय की.
समाजकार्याचा उल्लेख मी नाही केलेला. (वर srd यांनी बहुतेक आयुकाचा उल्लेख केला आहे. मी नाही.) तू जे लिहिलं होतंस (कामं, नाती उंचीवर न जाता अर्धवट सोडण्याबद्दल) त्यावरून मी मालेगावचं लिहिलंय. ते 'आहे मनोहर तरी' मध्येच आहे.
मी अकरावी-बारावीत असताना हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं होतं आणि मला ते खूप आवडलं होतं. नंतर मी ते कित्येक वेळा वाचलं. प्रत्येक वेळी संपूर्ण वाचलं असं नाही, कधीकधी मधलाच एखादा भाग काढून वाचला.
त्यांचं 'मनातलं अवकाश' हे अजून एक पुस्तक मी वाचलंय. पण ते मला खूप नाही आवडलं.
अस्मिता, धाग्यावरचा पहिला
अस्मिता, धाग्यावरचा पहिला प्रतिसाद असल्याने काय फरक पडतो? तू या आधी विनोदिनी इ लिहीलेले आहेस. त्यामुळे पहिला प्रतिसाद इ ने नक्की काय म्हणायचे होते ते कळाले नाही. वुमन कार्ड "सिलेक्टीव्हली" खेळण्याचा प्रश्न कसा? स्त्रियांसाठी वेगळी मानके वापरली जातात ती कुणी मुद्दाम करते असे नाही तर वर्षानुवर्षाचे कंडिशनिंग असते. एकदा दहा वर्षापूर्वी फूटपट्टी जाळली नि सॉर्टेडनेस आला असेल तर छानच आहे. ठीक आहे, शे पो म्हणालीस तर हा प्रतिसाद सोडून दे. उचकवण्यासाठी लिहीलेला नाही
अमितव, अस्मिताने त्यांचे झोकून देणे विनाअट नव्हते, एकांगी समर्पण इ लिहीले आहे त्यावरून लिहीले होते. अशा अपेक्षा पुरूषांकडून होतात का? जर एखाद्या लेखकाला नातेवाईक सोडून रानावनात जावे वाटले (उदा: मारूती चितमपल्ली) तर आपण अपेक्षा ही करत नाही की त्यांची नाती कशी होती इ इ. त्यांचे चॉईसेस मान्य होतात. (चितमपल्ली यांची नाती सशक्तच होती. पण आपण विचारही करत नाही एवढाच मुद्दा.) तिचा प्रतिसाद त्या परिच्छेदामुळे पुस्तकापुरता लागू वाटला नाही. हा मा बु दो. माझा प्रतिसाद लागू नसेल, पटला नसेल तर द्या सोडून.
वावे , तेवढी गडबड झाली बघं.
वावे , तेवढी गडबड झाली बघं.
बदल केला.
सी, तरीही मी लूज एन्ड्स सोडत नाही (विनोदिनी न वाचलेल्यांसाठी व्हॅलिडिटी समज) .
पहिला प्र ओघाने/ सहजच लिहिले आहे.
हे पहिल्या परिच्छेदासाठी आहे. काय बाई, कोर्टात बोलल्यासारखं लिहावं लागतंय.
आहे मनोहर तरी मधले काही भाग
आहे मनोहर तरी मधले काही भाग म टा मधे प्रसिद्ध झाले होते - पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व प्रसिद्धीचा भाग असावा. ते वाचून पुस्तकाची पहिली आवृत्ती खरेदी केली होती. माहेरी अजूनही असेल ती कॉपी. तेंव्हापासून अनेक वेळा ते पुस्तक वाचले. त्याची परिक्षणे/ त्यावरची चर्चा देखील वाचली होती.
इथे आल्यावर इथे संग्रही असावे म्हणून परत एक प्रत घेतली. ती पण अनेकदा वाचली.
२००० साली मौज प्रकाशनाने आहे मनोहर तरी वाचन आणि विवेचन असे पुस्तक प्रसिद्ध केले ( संपादन विजया राजाध्यक्ष आणि श्री पु भागवत ) . आहे मनोहर तरी वाचून लोकांनी सुनीताबाईंना लिहिलेल्या काही पत्रांचे संकलन - प्रसिद्ध लेखक, ( शिरवाडकर, मेश्राम ) विद्यार्थिनी ( माझी मैत्रीण स्वागता आळतेकर ) , सर्व सामान्य वाचक अशा सर्वांनी लिहिलेली पत्रे आहेत. अनेक लेखक समीक्षकांनी लिहिलेले परिक्षण / विवेचन आहे .
ज्यांना ज्यांना आहे मनोहर तरी पुस्तक आवडले / नाही आवडले याची कारण मीमांसा छळते त्या सगळ्यांसाठी वाचन आणि विवेचन नक्की वाचा असे सुचवेन.
( स्वगत - वाचन आणि विवेचन माझ्याकडे पहिली आवृत्ती आहे . वाचायची असेल तर दोन चार दिवस मुक्कामाला या )
स्वगत कंटिन्यू: ओव्हरडोस
स्वगत कंटिन्यू: ओव्हरडोस झालाय आता. त्यात आता समिक्षकांनी लिहिलेलं परत वाचा म्हणत्येस? इतकं मैलाचा दगड टाईप पुस्तक आहे का हे की पुस्तकावर विवेचन करायला रिकर्सिव्हली आणखी एक पुस्तक काढावं? वीस वर्षांनी आज परत तू चाळ आणि वाचुन तुला काय वाटतं ते तूच लिही बरं!

आता तू लिहिल्यावर असं वाटतंय की मी हे संकलन पुस्तक ही वाचलेलं आहे. बरोबर आठवत असेल तर सुनिताबाईंचं पहिलं पुस्तक इ. भारावलेली पत्र बरीच आहेत का? हे भारावलेपण, प्रसिद्ध लेखकाच्या प्रसिद्धीवर पोळी भाजणे इ. इ. सोडून फक्त पुस्तकावर काय अभिप्राय आहेत ते आठवत नाही पण वाचायला आवडेल. हॉलिडेजची तिकिटं काढू का?
वाचन आणि विवेचन हे पुस्तक
वाचन आणि विवेचन हे पुस्तक माहिती नव्हतं.
शांता शेळकेंचं 'धूळपाटी'
शांता शेळकेंचं 'धूळपाटी' (१९९६)हे आत्मकथन आणलं आहे. त्यात सुरुवातीला मनोगत मध्ये म्हणतात -
आत्मचरित्रात आपले खासगी जीवनातले प्रसंग सांगून वाचकांची जिज्ञासा चालवणे मला पसंत नाही. त्यामुळे धूळपाटी आत्मचरीत्र नाही.
पुढे वाचून बघतो काय आहे.
(म्हणजे यात ह्युमन टच गाळला आहे. जन्मगाव,शिक्षण,लेखन यावर लिहिले असावे.)
चांगली चर्चा. आवडली.
चांगली चर्चा. आवडली.
आहे मनोहर तरी वाचन आणि विवेचन
>>> या पुस्तकात मी सुनीताबाईंना लिहिलेले पत्र प्रसिद्ध झालेले आहे.
आता दुर्गाबाईंविषयी चर्चा
आता दुर्गाबाईंविषयी चर्चा चालली होती तेव्हा या पुस्तकाची आठवण झाली.
मी ११+ वर्षांपूर्वी लिहिलेलं
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी : प्रतिभा रानडे' वाचले.
दुर्गाबाईंचे स्पष्ट आणि स्वच्छ विचार वाचून क्वचित हेवा वाटला. कधी एकांगीही वाटले. सगळ्यांनाच स्वतःला आलेल्या अनुभवांवरून आणि आपल्याला पटलेल्या तत्त्वज्ञानावर कसे काय जोखता येइल?
प्रतिभाताईंनी अशा वेळी दुसरी बाजू चर्चेत आणायचा चांगला प्रयत्न केला आहे.
'धूळपाटी' त शांताबाईंनी आपलं
'धूळपाटी' त शांताबाईंनी आपलं लहानपण,शिक्षण ,वाचन आणि समाजाची ओळख कशी झाली ते दिलंय पुर्वार्धात. हे सर्व एका लेखकाला, कवयित्रीला,गीतकाराला कसं पुढे उपयोगी पडलं ते कळलं. परंतू सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जे त्यांना माहीतच नव्हतं ते कसं साध्य केलं. समुद्र, कोळी लोक यांचं जीवनच माहीत नसताना पुस्तकं वाचून लिहिलेली कोळी गीत. कॉलेज जीवनापासूनच लेख,कविता लिहू लागल्या होत्या आणि मराठी साहित्यातील नावाजलेल्या लोकांनी दिलेले सल्ले कसे कामाला आले ते मांडलंय. मुंबईत चाळीस वर्षं काढली आणि मुंबईने काय दिलं हे प्रकरण आहे. मराठी सिनेमासाठी अगणित गाणी दिली तीसुद्धा फक्त चालीवर ती शब्द रचून लिहिली. अनेक लोकप्रिय झाली आणि आनंदाचे वाहते ओहोळच आहेत.
श्रेय दिलेल्यांची एक मोठी यादीच होईल पण सर्वात अधिक श्री.म.माटे आणि ह्रदयनाथ मंगेशकरांना.
वाचनीय पुस्तक.
पण . . वाचनालयाचे पुस्तक घेतल्याचे शिक्के पाहिल्यावर वाईट वाटलं. २०११,२०१३ आणि आता २०२२. तीन जणांनी वाचलं अकरा वर्षांत.
भरत, यस. फार मस्त आहे ते
भरत, यस. फार मस्त आहे ते पुस्तक. पुन्हा वाचायला हवं.
गाव
गाव
रिक्टर कॉनरड या लेखकाचे मूळ पुस्तक 'द टाऊन' याचा मराठी अनुवाद (१९६०)- जी.ए.कुलकर्णी. नवीन आवृत्ती २००८.
पाने ३५०
अमेरिकेतल्या एका गावातील एका मोठ्या कुटुंबाची कहाणी. पण १९६० मध्ये त्याचा अनुवाद मराठी वाचकांच्या माथी का मारलाय ते कळलं नाही. लेखक जी.ए.कुलकर्णी असले तरीसुद्धा पटत नाही. कथेत विशेष काही नाही.
वाचनालये आणि अनेक वाचक
वाचनालये आणि अनेक वाचक शिरवळकर, ज्योत्स्ना देवधर, योगिनी जोगळेकर, इत्यादिक आणि इंग्रजी कादंबऱ्यांचे अनुवाद यांतच अडकलेले दिसतात.
इतर पुस्तकेही असतात, पण मागायला लागतात.
होय. पण आता शिरवळकर,
होय. पण आता शिरवळकर, ज्योत्स्ना देवधर, योगिनी जोगळेकर, इत्यादिक वाचायला मागणारी पिढी तसेच वीस ते पस्तीस वयोगटातील वाचकही दिसत नाहीत.
ललित'ने एके काळी { जयवंत दळवी लिखित} खुमासदार 'ठणठणपाळ' सदर चालवले होते.
अंजली कीर्तने हिने कॉलेजात असतानाचे श्री.पु् भागवत सरांचे आलेले अनुभव दिले आहेत. त्यांना बहुतेक अंजलीचे लेखन,कविता, साहित्य आवडत नव्हते. "बरंय, पण सत्यकथेत देण्याएवढे चांगले नाही " म्हणत. शिवाय भागवत सर असे का वागले यांचे चार पाच किस्से आहेत. पण हा लेख फारच जुना आहे. घटना सत्तरच्या काळातील असतील.
मागच्या आठवड्यात मायबोलीवरच्या जुन्या कथा एक एक प्रतिसाद दिल्याने अचानक वरती आल्या आणि "मायबोली नासण्या अगोदरचे लेखन" म्हटले आहे. पण आता आम्हीच साठीच्या पुढे गेलो, डिजिटल माध्यम व्यक्त होण्याचा काळ लोटल्यावर हातात सोयीचे आणि परवडणारे झाले तर नवीन लेखनास जुळवून घ्यायला हवे असं मला वाटतं.
रावपर्व - प्रशांत दिक्षित
रावपर्व - प्रशांत दिक्षित यांनी लिहीलेल pv नरसिंह राव यांचे चरित्र. राव काय परिस्थिती मध्ये पंतप्रधान झाले याच सविस्तर वर्णन केलय. त्या वेळेस काँग्रेस पक्षाची स्थिती आतले राजकारण.. कुरघोड्या.. यांचा चांगला वेध घेतलाय.
पुस्तक वाचल्यावर रावांविषयी अधिक वाचन करावेसे वाटले म्हणून विनय सितापती यांनी लिहीलेले पुस्तक पण आणले. अजून वाचते आहे.
नरसिंह राव जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा मी शाळेत होते. त्यांनी जी आर्थिक सुधारणांची पायाभरणी केली.. जे दूरगामी निर्णय घेतले ते समजण्याची कुवत तेव्हा नव्हती. आता जेव्हा वाचल तेव्हा मला फार आदर वाटला.
डिजिटल माध्यम व्यक्त होण्याचा
डिजिटल माध्यम व्यक्त होण्याचा काळ लोटल्यावर हातात सोयीचे आणि परवडणारे झाले तर नवीन लेखनास जुळवून घ्यायला हवे असं मला वाटतं.>>
प्लिज अस अगतिक झाल्यासारखे नका नका लिहू. "मायबोली नासल्या नंतर" लिहिणारे कुणाच्या दारात येऊन जोगवा मागत नाहीयेत. जुळवून घ्यायची सक्ती नाहीये.
प्रथम "मायबोली नासण्या अगोदरचे लेखन" ह्या वाक्यावरच माझा आक्षेप आहे. साहित्य हे वाहत्या नदी प्रमाणे गतिमान असायला पाहिजे. "माहीमची खाडी " "वासू नाका" किंवा "पिपांत मेले ओल्या उंदिर" हे जेव्हा लिहिले गेले तेव्हा, माझी खात्री आहे, कुणीतरी अशीच आरोळी मारली असणार.किंवा
"किसन देवा आम्हाला पण एक चान्स द्याना " ह्याला पण अश्लील मार्तंड कृष्णराव मराठे सारख्यांनी शाउट आउट केले केले होतेच कि. आता सिनेमात बिकिनी पहनके येतात. आणि आपण मिटक्या मारत बघतो.
"मायबोली नासण्या अगोदरचे लेखन" वगैरे म्हणजे तारक मेहतावाले भिड्यांची आठवण येते.
"हमारे जमानेमे"
" मायबोली नासली" अस जर कुणाला वाटत असेल तर गुड ... त्याचा अर्थ आहे मायबोली जिवंत आहे,
वाहती आहे. स्टॅॅग्नंंट नाहीये.
धुळपाटी नोटेड. धन्यवाद srd.
धुळपाटी नोटेड. धन्यवाद srd.
असं 10 वर्षात 2,3 शिक्के 'पैस' या पुस्तकाबाबत झालेलं बघितलं. छोटंसं च आहे पुस्तक. 'ऋतुचक्र' एवढंच.
नुकतीच एक फॉरवरडेड पोस्ट वाचली होती की उमा गोखले जेव्हा भटकंती ला बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या पर्स मध्ये 'ऋतुचक्र' आणि 'पैस' ही दोन पुस्तकं हमखास असतात. पोस्ट कायप्पा वर आली होती. खरी- खोटी माहिती नाही.
साद घालतो कालाहरी
साद घालतो कालाहारी
मार्क ,डेलिया ओवेन्स
अनुवाद - मंदार गोडबोले
डेलिया आणि मार्क ओवेन्स. प्राणीशास्त्राचा अभ्यास करणारे दोन अमेरिकन. पी एच डी साठी कोणता विषय घ्यावा याचा विचार करताना ठरवतात -- आफ्रिकेतील नाहीशा होणाऱ्या मार्गावरील वन्यजीव हा विषय अभ्यासावा. जिथे मानवी हस्तक्षेप झालेला नाही . वातावरणच असं की मनुष्य राहायला तयार होणार नाही असं कालाहारी वाळवंट त्यांना साद घालते.
तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि काही दिवस तग धरण्यासाठीची रक्कम हे जोडपं अगदी जरुरीच्या वस्तू सोडून घरातल्या सगळ्या वस्तू, भांडीकुंडी विकून उभी करतं. एक दुर्बीण, दोन कपडे जोड आणि जंगलात राहण्यासाठी/ अभ्यासासाठी फिरण्यासाठी एक लँड रोव्हर गाडी विकत घेऊन सुरू होतो कालाहारीतला प्रवास. कधी धो धो वादळी पाऊस तर कधी हाडं गोठवणारी थंडी तर कधी भाजून काढणारं ऊन अशा परिस्थितीत वन्यजीव कसे राहतात, प्रजनन करतात, संगोपन करतात, स्थलांतर करतात, त्यांचे एकमेकांशी सोशल संबंध कसे असतात, संवाद कसा साधला जातो हे सगळं या पुस्तकात आहे.
तिथल्या सात वर्षांच्या वास्तव्यात दोघांनी अनुभव लिहिलेल्या डायऱ्या पुस्तक रूपाने वाचकांसमोर येतात. महिनोन्महिने पाण्याचं दुर्भिक्ष असताना केवळ वन्य जीवांच्या अभ्यासासाठी त्या वाळवंटात एकाकी राहताना माणसांचे सुखद दुखद अनुभवही येतात . फक्त दहा लिटर पाणी आणि काही डिझेल शिल्लक आहे. शेकडो किमीचा प्रवास केल्याशिवाय या दोन्ही गोष्टी मिळणार नाहीत इतक्यात एक हौशी वन अधिकारी तिथे भटकायला म्हणून येतो आणि त्याच्याकडच्या वस्तू यांना देऊन टाकतो. याउलट खाणं पिणं, मौजमजा करत शिकारीचा आनंद लुटायचा म्हणून राखीव वनक्षेत्राच्या बाहेर तंबू उभारायचा आणि पाण्याच्या शोधात या राखीव वनक्षेत्रातून बाहेर पडलेला प्राणी टिपायचा असेही अनुभव आहेत.
सिंह , ब्राऊन हायना आणि हरणे यांच्या विषयी बरीच इंटरेस्टिंग माहिती आहे. सिंहिणीनी केलेल्या शिकारीवर आयतोबे सिंह कसे ताव मारतात, दुष्काळी परिस्थितीत पिल्लं जगावीत म्हणून ब्राऊन हायना कशी वसाहत करून राहतात . अगदी आपल्या पाळणाघरांसारखं . सगळ्यांची पिल्लं एकत्र ठेवतात. लक्ष ठेवायला एक दोघं. बाकी सगळे पोटापाण्यासाठी बाहेर पडणार.
नैसर्गिक आपत्तीचाही हे जोडपं निकरांनं सामना करतं. लांब पेटलेला वणवा अगदी तंबूच्या दारात येतो तेव्हा प्रचंड धावपळ करून तो वणवा पुढे सरकवला जातो तो प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो . पावसाळी वादळात तंबूची, अन्नधान्याची झालेली वाताहात. अभ्यास वाढतो तसं त्यांना अनुदान मिळतं. मग मदतीला जवळच्या गावातला एक मुलगा घेऊन येतात. तो मध्येच पळून जातो. अनुदान टिकवण्यासाठी धडपड करतात. लँड रोवरने प्राण्यांचा पाठलाग करताना अडचणी येतात म्हणून नंतर नंतर स्वतः हेलिकॉप्टर उडवायला शिकून मार्क ते विकत घेऊन जंगलात स्वतः हेलिपॅड तयार करतो. जे प्राणी , पक्षी आपण वाचत असतो त्यांचे लेखकांबरोबरचे कृष्णधवल फोटो ही पुस्तकात मध्ये मध्ये आहेत. ज्यांना जंगल आवडतं . जंगली प्राणी आवडतात . त्यांनी हे पुस्तक वाचण्यासारखे आहे.
छान परिचय वर्णिता..
छान परिचय वर्णिता..
कालाहारी बघतो.
कालाहारी बघतो. परिचय आवडला.
या अगोदर बाफू(ट) बीगल मालिका वाचली आहे. यावर सिनेमेही आले म्हणतात. पण ते कुठे मिळणार? अमेरिकेतल्या झू'साठी आफ्रिकेतून प्राणी गोळा करण्याच्या मोहिमा. यास नंतर खूप विरोध झाला - असे तिकडचे प्राणी पकडून इकडे आणू नका. पण ते तिकडे तरी कुठे सुरक्षित राहिलेत/राहणार असा विरोधी प्रचार झाला आणि तो खरा ठरला. आता ते आफ्रिकेत नामशेष झाले तरी झू'मध्ये काही पिढ्या वाढत आहेत.
मस्त परिचय वर्णिता.
मस्त परिचय वर्णिता.
व्यंकटेश माडगूळकरांचं 'अशी माणसे, अशी साहसे' हे पुस्तकही मस्त आहे. त्याची आठवण झाली.
वर्णिता मस्त परिचय, परीक्षण
वर्णिता मस्त परिचय, परीक्षण
वर्णिता मस्त परिचय, परीक्षण..
वर्णिता मस्त परिचय, परीक्षण.....+1.
Srd, हे माहीत नव्हतं की
Srd, हे माहीत नव्हतं की जंगलात नामशेष होऊन झू मध्ये पिढ्या जिवन्त आहेत.
धन्यवाद धनवंती, वावे, अवल, देवकी.
जनरली आतापर्यंत वाचलंय त्यात माणूस सोडल्यास इतर सर्व species मध्ये मादी प्रमुख असते. नराची निवड करायचा तिला अधिकार असतो असं वाचलंय पण यात ट्रँगल आहे सिंहिणीचा, तिला अ आवडत असतो पण अ आणि ब दोघे घट्ट मित्र असतात आणि ब जरा अग्रेसिव्ह असतो , शेवटी तिला ब च भाग पाडतो आपल्याबरोबतर यायला, ती आशेने अ कडे बघत असते पण अ लक्ष नाही असं दाखवतो, अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पिल्लांची काळजी अजिबात फारसे नर घेत नाहीत. उलट दीडशहाणे मुद्दाम पिल्लांपाशी येऊन बसतात जेणेकरून सिंहिण उठून शिकार करायला निघाली की मागोमाग जायला. मला तर दया आली , पिल्लं सांभाळा, त्याना खायला आणा, वर नवऱ्यासाठी शिकार करा, त्यातून उरली तर खा नाहीतर परत भुकेल्या पोटी जाऊन शिकार शोधा, मग करून खा. अशा बऱ्याच मजेशीर गोष्टी आहेत.
अशी माणसे, अशी साहसे अजून वाचलं नाही. आवडेल वाचायला. मिळातय का बघते.
वर्णिता मस्त परिचय, परीक्षण >
वर्णिता मस्त परिचय, परीक्षण >>> +१
जंगलात नामशेष म्हणजे तिकडे
जंगलात नामशेष म्हणजे तिकडे होणाऱ्या शिकारी. लोकसंख्या वाढतेच आहे,रानं कापून शेती वाढते आहे. काय होणार? पंडासारखं होणार. अगदी थोडे नरमादी उरले की आंतरविवाह आणि दुबळी प्रजा आणि प्राणी नष्ट. झू'मध्येही हाच प्रश्न आहे.
रियासतकार
रियासतकार
(सरदेसाई यांचे चरित्र)
श.श्री.पुराणिक.
चंद्रकला प्रकाशन, प्रथमावृत्ती २००२
पाने ३९०.
हे वाचायला घेतलं आहे. आपण इतिहास सहसा वाचत नाही पण या विषयावर राजवाडे,खरे,जोगळेकर आणि सरदेसाई यांची नावे ऐकतो. राजवाड्याचे चरित्र फार पूर्वी वाचले आहे.(ओस्मानाबाद ओपन युनिव्हर्सिटी लाइब्ररीतून पुस्तक डाउनलोड केले होते. पण ही साईट oudl dot orgदोन वर्षे झाली उघडता आलेली नाही. ) तर हे पुस्तक वाचेन.
मध्यंतरी खूप बिझी होते तर सवड
मध्यंतरी खूप बिझी होते तर सवड मिळाल्यावर, एखादे हलके-फुलके फिक्शन वाचावेसे वाटत होते. अश्विन सांघींच्या 'मॅजिशिअन्स ऑफ माझ्दा' चा रिव्यू बरा वाटला म्हणून मागवले. पारशी पार्श्वभूमीवरचे थ्रिलर म्हणता येईल. मुंबईच्या विकासाला पारसी जमातीचा मोठा हातभार लागला असला तरी त्यांना एकेकाळच्या इराणमधून स्थलांतर करावे लागले यापलिकडे फार इतिहास माहिती नव्हता. चिरपरिचित पारसी नावांमागे किती मोठा इतिहास आहे हे जाणवले. फिक्शन असले तरी लेखकाने बराच अभ्यास केला आहे. फिक्शन आवडत असेल तर वाचू शकता.
रियासतकार (गो. स. सरदेसाई
रियासतकार (गो. स. सरदेसाई चरित्र ) वाचले.
श.श्री. पुराणिक
चंद्रकला प्रकाशन , २००२
पाने३८६
१) लहानपण गरीबीची
२)शिक्षण पुणे, मुंबई.
३)नोकरी बडोद्याला सयाजीरावांकडे ३५वर्षे,स्वीय सहायक. पण शेवटी वाकडेपणा आला. सयाजीरावांबरोबर भारत,युरोप,जग भरपूर फिरायला मिळाले. परदेशी आणि इथल्या मोठ्या लोकांशी भेटी झाल्या. निवृत्तीनंतर इतिहास लेखन सुरू करून एक हजार वर्षांचा इतिहास लिहिला पण त्यावर समकालीन इतिहासकारांनी आणि भा.इ.सं.मंडळाकडून सडकून टीका झाली. "हा इतिहास नव्हे, गोष्टींची पुस्तकं.".
सरदेसाई म्हणाले इतिहास लिहिणे हे बडोद्याच्या राजपुत्र कॉलेजात राजपुत्रांना शिकवण्यासाठी लेखन केले होते. तेच पुढे चालू केले कामशेतला घर बांधून राहिले तेव्हा. सयाजीराजांचा सरदेसायांच्या निवृत्तीला विरोध होता. "तुम्ही इथेच बडोद्यात घर बांधून राहा आणि माझ्या नातवंडांना शिकवत राहा. तुमचं मोठं आयुष्य इथेच गेलंय ना." (( सयाजिराजांचे चारही मुलगे मोठे होऊन लवकर गेल्याने सदैव दु:खात असत. निद्रानाश. मग रात्री अपरात्री सरदेसायांना उठवत गप्पा मारायला. रात्री दोन ते साडेचार ही ठरलेली वेळ." सरदेसायांना या नोकरीचा खरंच कंटाळा आला होता. चार पाच वेळा निवृत्ती अर्ज नाकारल्यानंतर शेवटी नोकरी सोडलीच. सयाजिरावांनी मनात अढी ठेवलीच. दोनशे सत्तर रु नि.वेतंन सुरू झाले पण काहीतरी मागची कारणं काढून वेतन कापून नव्वद केले.
एकूण साठ वर्षांत पन्नास हजार नोंदी/कागद वाचून मुसलमानी,मराठा,ब्रिटिश अंमलांच्या इतिहासाचे विपूल लेखन केले.
सयाजिराजांप्रमाणेच त्यांना पुत्रशोक झाला. दोन्ही मुलगे पंचविशीच्या आत गेले. बायको गंगुमाईने सत्तर वयापर्यंत सर्वकाळ साथ दिली.
त्यांच्या लेखनाबद्दलचं इतिहासकारांचं विरोधी मत नंतर बदललं. जदुनाथ सरकार मात्र कायमच त्यांच्या पाठीशी राहिले.
असा इतिहासकार पुन्हा होणे नाही.
सरदेसाई ९४ वर्षे जगले आणि मृत्युनंतर चाळीस वर्षांनंतरही त्यांचे चरित्र लिहिले गेले नव्हते. पुराणिक यांनी ते मोठ्या कष्टाने माहिती गोळा करून लिहिले.
Pages