Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे तासाभरात रक्त उकळलं माझं
बाकी कालचा तो राडा साफ कोण करतं? हे तोंडाचेपट्टे गँग तर नक्कीच करत नसेल. बाहेरुन नक्कीच लोक मागवत असतील साफ करायला. मग कसलं साफ सफाई टास्क?
आणि काल घरातली सगळीच्या सगळी अंडी, पिठं, शेविंग क्रिमं, आणि काय काय होत्या न्हवत्या त्या गोष्टी संपवल्या असल्या तर आजच्या टीमला राडा करायला बीबी स्पेशल सप्लाय देत असणार ना?
बाकी कोणे संडासातून पाणी वगैरे पण आणलं नाही ना? तळ नसलेल्या बादली सारख्या लेव्हललाच जायचं ठरवा आणि करा.
पण हो, अपूर्वा तोंडपट्टा चालवणार आणि तेजू ऐकुन घेणार आणि नियमात नाही करुन आपल्याच पायावर हातोडा मारणार. हेच नक्की होणार आहे.
काल ती न खेळणारी टीम वर कशाला बसलेली? खाली येऊन कोंबडी पळाली तंगडी धरुन लंगडी करत नाच करायचा. कडकनाथ म्हटलं ... की कसला कडकनाथ! चव नाही काही! बळी द्यायची कोंबडी झालं... अशा काड्या टाकत बसायचं. पूल मध्ये पोहायचं आणि पाणी घ्यायला आले की बादल्या खेचून मध्यावर जाऊन बसायचं. आणि त्या बादल्यांनी कॅच कॅच खेळायचं. आपल्या बादल्या आणून त्यात जरा गरम पाणी भरुन माने-विकासला स्वच्छ करायचं. नुसतं वरुन बघत कसले बसलेले? वर्बल फाईट्स करायच्या अक्षय अपूर्वाशी. माने बिचारे एकटे बाप बाप करत बसलेले. आणखी त्या अक्षयला भडकवायचं ना. की तो फिजिकल झाला असता. मग घालवता आला असता.
बाकीव्च्यांनी वर जायचे हे
बाकीव्च्यांनी वर जायचे हे रुल मधे आही बहुतेक. हल्ली सगळ्या टास्क मधे तसे असते.
मला तर मान्यांची आपल्यावर टाकलेला कचरा उलटून अटेकिंग टीम च्या अंगावर फेकण्याची स्ट्रॅटेजी पण आवडली. हे लोक तेव्हाही लगेच तुम्ही नाही करू शकत म्हणत ओरडत होते.
त्रिशूल तर जवळून नेम धरून नाकात पावडर स्प्रे करत होता. वर अपूर्वा म्हणे तोंड इकडे करायचं आणि हात खाली!! डीफेन्ड करायला परवानगी नाही हे कसे असेल रुल मधे?! काहीही.
अपूर्वा बसणारच नाही चेअरवर
अपूर्वा बसणारच नाही चेअरवर कदाचित, नुसती आरडाओरडा करायला थांबेल संचालक असल्यामुळे !
माने खरच भारी , थुंकत सुद्धा होते
अक्षयला अँगर इश्युज आहेत, काढा सतत त्याचा बाप, बह्साड्या आवाजात, ‘कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्शावाला वाट याची बघतोय रिक्षावाला ‘, झालच तर रिक्षावाला जोक मारा त्याच्यापुढे.
>>माझ्या अंदाजाने अक्षय,
>>माझ्या अंदाजाने अक्षय, अपुर्वा, रोहित, रुचिरा टफ देतील..... अमृता देशमुख आजच इतक्या नाजूकपणे खेळत होती की उद्या तिला मी त्या सी-सॉ वर इमॅजिनच करत नाही..... Its not her cup of tea Happy
अमृता आणि स्नेहलताला शेवटी पाठवा (गरज लागलीच तर)
माझे शब्द मागे घेतो..... दोघीही अपेक्षेपेक्षा चांगल्याच खेळल्या,,,,, स्नेहलता तर जबरदस्तच!! अजुन जरा बाजुचे लोक टिकले असते तर तिने मानेंवरचा लाईमलाईट काढूनच घेतला होता.
रुचिरा फारच फुसकी निघाली.
ज्या लोकांकडून अपेक्षा नव्हत्या तेच लोक हे टास्क भारी खेळले
अपुर्बाला कुणी कितीही नावे ठेवू दे पण ती पाणी मारणाऱ्यांना वेगवेगळे आक्षेप घेउन मस्त डिस्ट्रॅक्ट करत होती आणि आपल्या टीमला ब्रिदींग स्पेस देत होती
तेजस्विनी आवडते त्यामुळे तिची टीम जिंकल्याचा आनंद झाला पण आता किरण आणि विकास कॅप्टन्सीसाठी भांडून उमेदवारी घेणार आणि मग बाकीच्यांना बहुतेक त्या दोघातल्या कुणालातरी सपोर्ट करावा लागणार
प्रसादचा अगदीच तोल सुटत होता आज!!
मी रोहितला टॉर्चर करत होते
त्या सगळ्या सो कॉल्ड यूट्यूबर्स पेक्षा नक्कीच चांगले लिहतात लोक इथे Happy
सुमार दर्जा, चुकीचे मराठी, तपशिलातल्या चुका आणि बायस्ड टिपण्या बघण्यापेक्षा इथल्या दोन चार ओळींच्या पोस्टसुद्धा जास्त दर्जेदार असतात >>> खरोखर.
मी रोहितला टॉर्चर करत होते तेव्हापासून बघितलं.
अक्षयने अगदीच लवकर गिव अप केलं.
बी टीम जिंकली, अभिनंदन.
तेजस्विनी आवडते त्यामुळे तिची टीम जिंकल्याचा आनंद झाला >>> अगदी अगदी.
माने आणि विकासने खेळ इतक्या उंचीवर नेऊन ठेवला होता ना, की ते जिंकावे असं वाटत होतं.
अक्षयला अँगर इश्युज आहेत, >>> खरं आहे.
माझ्यामते कोणी कोणाचेही बाप काढण्यापेक्षा त्या लोकांना बोलायला हवं डायरेक्ट. समहाऊ आई बाबांवर कोणी जाऊ नये असं मला पहिल्या सीझनपासून वाटतं.
सही. तेजू वॉज राईट. त्या
सही. तेजू वॉज राईट. त्या बावळ्या धोंडगे आणि यशश्रीला पहिले पाठवलं असतं मोराल डाऊन झाल्याने माने आणि विकास इतके खेळले नसते कदाचित.
माने आणि विकासने खेळ इतक्या
माने आणि विकासने खेळ इतक्या उंचीवर नेऊन ठेवला होता ना, की ते जिंकावे असं वाटत होतं.>> खासकरून मानेंनी केलेलं इन्स्टिगेशन, आणि विकासने दिलेली टफ फाईट!
शेवंता आवडली होती, पण अपूर्व नेमळेकर बकवास आहे.. इतके दिवस टॉम जेरी वगैरे सो. मि. वर केलेली फालतुगिरी कुठे आणि आज त्या बिचार्या विकासला रडवणे कुठे.. अगदीच असह्य डोक्यात जातेय.
ता. क. मी फक्त हा एक एपी पहिला, आणि आजचा जो उद्या येईल ऊत वर तो बघेन..
तेजस्विनी जिंकली तर आवडेल,
तेजस्विनी जिंकली तर आवडेल, कमाल डोकं चालते, वरुन कचाकचा भांडत नाही, positive वाटते.
रच्याकने, उत्कर्ष शिंदे,
रच्याकने, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, जय दुधाने यांना मांजरेकरने वेडात मराठे वीर दौडले सात मध्ये घेतले आहे. पोस्टर वर जय दुधाने फारसा पटलेला नाही.
विराट मडके चा अभिनय केसरी चित्रपटात आवडला होता, तो देखील आहे. याशिवाय, प्रवीण तरडे, सत्य मांजरेकर, हार्दिक जोशी राणादा आहेत प्रमुख भूमिकेत, आणि शिवाजी महाराज म्हणून अक्षय कुमार
शिवाजी महाराज म्हणून अक्षय
शिवाजी महाराज म्हणून अक्षय कुमार >>> त्या तरडे ऐवजी मीच आरा रा रा रा केले आत्त्ताच लोकसत्तामधला फोटो पाहून
ममां नी काय म्हणून त्या अक्षयकुमार ला घेतले असेल?! मराठी अॅक्टर्स कोणीच नाही का मिळाले. बाकीची कास्ट (एक जय सोडून- तो फार मॉडर्न दिसतो) सगळे छान दिसतील. विशाल दिसण्यात शिवाजी महाराज म्हणून चालला असता लुक्स मधे पण अॅक्टिंग ची बोंब असणार आहे.
थोडक्यात काय तर मानेंचं ‘रोल
थोडक्यात काय तर मानेंचं ‘रोल फेकतो‘ स्टेट्स्मेन्ट इज ट्रु
हाहाहा.
हाहाहा.
बाय द वे पण म मां शिवला घेऊन पण सिनेमा काढणार होते ना, त्याचं पुढे काय झालं.
पाहिला आजचा एपिसोड्,बी टिमने
पाहिला आजचा एपिसोड्,बी टिमने पण फेकाफेकी केली, अंडी नेम धरून मारली आणि प्रसाद टॉवेल फेकून मारत होता
धोंगडे आणि यशश्री आज चांगल्या खेळल्या.
विकासनेही अप्पूर्वावर आवाज चढवलं.
पण अॅग्रेशन्मधे ए इतकी व्हर्बल नव्हती बी टिम, मानेंना कंट्रोल मधे ठेवलं त्यांनी आज , अॅज एक्स्पेक्टेड अपूर्वाची हिंमत नव्हती टॉर्चर घ्यायची, नुसती रडारड !
त्या स्नेहलताचं का कौतुक होतय ?
टॉर्चर सहन केलं तिनी पण टोटल टाइम बघितलात, तर माने-विकासच्या आसपासही नव्हतं, अर्धा तास सुद्धा नाही.
रुचिरा सुद्धा उगीच रडारड करत होती !
स्नेहलताचे कोण कौतुक करतंय
स्नेहलताचे कोण कौतुक करतंय?सोमि वर मोस्टली आवडालेली नाहीये कुणालाच.
प्रत्येक वेळा "आम्ही हे वापरले नव्हते" असे काय अर्ग्युमेन्ट वापरत होती, त्याने काय फरक पडणार ? 
मी मुद्दाम टाइम पाहिला, मो़जून अर्ध्या तासात उठली ती. उगीच हातवारे नाच जास्त. बी टीम चांगली खेळली आज पण फार काही इनोवेटिव आयडीया नव्हत्या. अपूर्वा ला आज बर्याच गोष्टी योग्य नसल्याचा साक्षात्कार होत होता
बाय द वे पण म मां शिवला घेऊन
बाय द वे पण म मां शिवला घेऊन पण सिनेमा काढणार होते ना, त्याचं पुढे काय झालं. >>
अंजू परवा शिव टीनाला सांगत होता की हिंदीत यायचा त्याचा उद्देश फेम मिळावी हा तर आहेच पण एखादी डेली सिरीयल मिळावी आणि काहीतरी काम मिळावे हा आहे. याचा अर्थ त्याला मराठी ट्रॉफी नंतर काहीच काम मिळाले नाही. ऍक्टिंग, आवाज, डायलॉग डिलिव्हरी वीक म्हणून कोणी घेतले नसेल त्याला.
शिवला घरात कोणी वीणाबद्दलच्या
शिवला घरात कोणी वीणाबद्दलच्या रिलेशनशिपबद्दल विचिललेल दिसत नाही.कारण आता त्यांच ब्रेकअप झाल आहे,
त्यामुळे बिचुकले आणि शिवानी सतत शोसाठी आहे, अस म्हणायचे,ते खरही असेल.त्यावरून शिवला कोणी बोललेल दिसत नाही.
बाकी,काल टीम बी जिंकल्यावर ए टीमचा बहुतेक विश्वासच बसत नसावा,की आपण हरलो.
टीम बी ने सुध्दा काही कसर ठेवली नाही.पण त्यांना मात्र सिंपथीच मिळत आहे.
असो,टीम बी जिंकली,हे महत्वाच.पण आता कँप्टनशीपची सूत्र टीम ए च्या हातात देईल बिबॉस.
कारण सिंपथी मिळवणारी टीमच जिंकल्यामुळे अपेक्षित असा राडा बिबॉसच्या द्रुष्टीने तसा कमीच झाला.
म्हणजे परत माने ,अपूर्वा मध्ये भांडण लावून द्यायला बर.
टीम बी जिंकली शेवटी. जोरात
टीम बी जिंकली शेवटी. जोरात पाणी फेकुन मारायच्या युक्तीचा त्यांना फायदा झाला.
स्नेहलता, देशमुख, रोहित चांगले टिकले. रुचिरा ने लगेच रडारड करत गिव्ह अप केले.
स्नेहलता आणि देशमुख कडुन अपेक्षा नव्हती टीकायची. अपुर्वा ने टॉर्चर घेतले नाही पण अपोझिट टीम ला चांगलेच अडवले.
अखंड बडबड आणि आरडाओरडा चालु होता आणि स्वतः च्या टीम ला चांगले चीअर पण करत होती.
टीम बी ने उकळते तेल, हेअर रीमुव्हिंग क्रीम वगैरे वापरले त्यामुळे बहुतेक ओरडा खातील थोडाफार.
प्रसाद बेक्कार ओरडा खाणारे. कात्री ने टॉवेल फाडणे, टॉवेल ने मारणे , अंडी फेकुन मारणे अशा मुर्ख गोष्टी करत होता. तो ओला टॉवेल खुप जोरात लागु शकतो. कात्री ने टॉवेल कापताना चुकुन स्नेहलता चा टी-शर्ट फाटला असता तर प्रसाद ला तेव्हाच बाहेर काढलं असतं.
धोंगडे पण भयंकर अग्रेसिव्ह वाटली काल मला.
माने एकदम शांत आज. दिसलेच नाहीत. विकास आणि अपुर्वा चं वाजलं.
आता माने आणि विकास कॅप्टनसी चे दावेदार झाले तर विकास ला छानपैकी गुंडाळुन माने कॅप्टन बनु शकतात.
टीम बी ला काल २-३ वेळा तरी बिबॉ ने वॉर्निंग दिली. त्यावरुन पण ममां बोलतील. यावेळी बहुतेक ममां चे पण कोणी फेवरेट बनत नाहियेत त्यामुळे वीकेंड चा वार फुसका होतो आहे
टीम ए कोण आणि टीम बी कोण?
टीम ए कोण आणि टीम बी कोण?
टीम ए-अपूर्वा, अक्षय,रुचिरा,
टीम ए-अपूर्वा, अक्षय,रुचिरा, रोहित, स्नेहलता,देशमुख, त्रिशुल
टीम-बी.राहिलेले सगळे.
तेजु आणि अपूर्वा संचालक
ओके. धन्यवाद
ओके. धन्यवाद
ओके. धन्यवाद
ओके. धन्यवाद
तेजस्वीनी आणि अपुर्वा संचालक
तेजस्वीनी आणि अपुर्वा संचालक होत्या.
तेजुच्या काही मुव्हज सक्सेसफुल झाल्या त्यामुळे तेजुचं कौतुक जास्त व्हायला पाहीजे, प्रसादचं जास्त होतंय. त्याची टीम जिंकली, जिंकली म्हणतायेत. मेघा धाडेने माने आणि विकासचे कौतुक केल्यावर, खाली एकदोन जणांनी प्रसादचे कौतुक का नाही केलं लिहिलं.
तेजुने आता जरा गेम जास्त दाखवायला हवा, ती जिंकू शकते. मला आवडेल जिंकली तर.
जय दुधाणेने पण सांगितल आहे की
जय दुधाणेने पण सांगितल आहे की तेजू जिंकू शकते.त्या धोंगडेपासून दूर राहायला पाहिजे.
पण काल ती आणि प्रसाद ओटीटी होते,चावडीवर मार खाणार.
रुचिराला पाहिल्यावर मला सिझन 1मधल्या जुई गडकरीची आठवण येते.जाम रडी होती आणि ममां दर चावडीवर तिच्यावर तडकायचे,काही आठवड्यांनी तिनेच सांगितल की मी या घरात अनफिट आहे,आणि मग नॉमिनेशन मध्ये आल्यावर बाहेरच गेली,तसच ही रडी रुचिरा पण या शोसाठी अनफिट आहे.
खरतर या टास्कमध्ये दोन्ही टीम्सकडून नियमांच उल्लंघन झाल ,त्यामुळे ममांनी दोघांना फैलावर घ्यायला हव.
फक्त माझ्यामते मेघासारख गेम ऑब्झर्वर कोणी नाही. ती अपूर्वा बेंबीच्या देठापासून बिबॉस बिबॉस ओरडत होती,त्या बिबॉसने भावच दिला नाही,त्याला वाटल तेव्हाच वॉर्निंग दिली, यावरुन कळायला हव होत की आपल्या कांगाव्याने आपण आणखी निगेटिव्ह दिसू.
मेघाला लगेच कळायच म्हणून पुष्की,आस्ताद,रेशम जाम जळायचे.
इथे तस कोणी दिसत नाही,त्यातल्या त्यात तेजूच दिसते.पण तिनेही टास्क खेळायला हवा होता.
अपूर्वा का नाही खेळली?
किरण माने हुशार आहेत..... काल
किरण माने हुशार आहेत..... काल अगदीच हातचे राखुन खेळले की बाहेर वाईट दिसणार नाहीत!!
आता टीम बी मधले कोण चांगले खेळले हे जर टीम ए ला ठरवायला लावले तर त्यांनी सरळ माने आणि विकासची नावे घ्यावीत कॅप्टन्सीच्या दावेदारीसाठी आणि ब्राउनी पॉईंटस् कमवावेत; ते दोघे सोडून इतर कुणाचेही नाव घेतले तरी मग चावडीवर चांगलेच ऐकून घ्यायला लागेल
मी फक्त हाच धागा बघतो
मी फक्त हाच धागा बघतो त्यामुळे परसादचं कौतुक कोण आणि का करतंय कल्पना नाही. तो अजिबात आवडत नाही, अपूर्वा परवडली.
अन्नाची नासाडी वि. पाणी, डिटर्जंट, शांपू, मेकप या सगळ्याची नासाडी यात मला तरी शून्य फरक दिसतो.
माने, विकास आणि तेजू हेच स्टार होते काल. धोंगडे पण चांगली खेळत होती. धोंगडे इरिटेटिंग आहे पण तिने पर्सिंटंट त्रास दिला. रोहित आणि रुचिरा मात्र दोघे क्रायबेबी आहेत.
अपूर्वा चांगला आरडाओरडा करत होती आणि टीमला चांगला सपोर्ट करत होती. गव्हाचं पीठ वापरलं तर काय इतका आरडाओरडा. वर म्हणते आम्ही अंडी वापरली.
अॅक्टर आहे आणि चेहरा खराब होईल तर उठा म्हणावं. हु केअर्स त्यांचा चेहरा खराब होतोय का काय! हंगर गेम्स मध्ये फक्त विकृत मनोरंजन महत्त्वाचं! यात तरी वे आऊट पण आहे की. बाहेर पडा जमत नसेल तर. तुम्हाला ह्युमिलिएट करुन प्रेक्षक मनोरंजन करत आहेत हे लक्षात असू द्या. विविध गुण दर्शनाने कुणाला मजा येत नाही. विकृती दाखवा विकृती! हे कितीही विचित्र वाटलं वाचायला तरी हेच सत्य आहे या अशा शोज चं.
अमित
अमित
पण खरंच आहे, नाही सहन होत तर उठा! इतके सोपे आहे.
आज काहीतरी फुग्यांचे टास्क आहे कॅप्टनशिप साठी. इन्डिविजुअल टास्क दिसतो आहे. म्हणजे बेसिकली सगळ्या दावेदारांनी एकमेकाला आउट करायचे. आता इतके करून ( बी टीम कडून खेळल्यामुळे) समृद्धी जिंकली तर ए टीमच सेलेब्रेट करेल पुन्हा.
अमित
अपूर्वा संचालक पुन्हा. अमृता धोंगडे ला यशश्री ने आउट केले.
दरवेळी अपूर्वा बरी संचालक
दरवेळी अपूर्वा बरी संचालक बनते. काल ६ प्लेअर आउट झाल्यावर मला वाटलं अपूर्वा बसेल. तर परत अदेलाच बसवलं. अपूर्वा बसली असती तर मानेंनी पार खुन्नसच काढली असती!
तेजु खरंच धोंगडेमुळे मागे
तेजु खरंच धोंगडेमुळे मागे पडणार. धोंगडे चांगली खेळली काल पण ती ही आरडाओरडा क्वीन आहे त्या अपूर्वासारखी. तो योगेश बाहेर गेला ते मला जरा तेजूसाठी बरं वाटलं. धोंगडे पासूनही लांब राहावे. ती लगेच तेजुवर आरोप करते जिंकत नाहीत तेव्हा.
धोंगडे आरडाओरडा करणार कॅप्टनशिप फुगा यश आणि अपूर्वा फोडणार म्हणून, हिनेही अपूर्वाला नॉमीनेट केलेलं की तेव्हाही अपूर्वाने खिलाडूवृत्ती नाही दाखवली, आता ही नाही दाखवणार.
माझा तरी सध्या सपोर्ट फक्त तेजूला bb ट्रॉफीसाठी. कॅप्टन म्हणून या वीकमध्ये माने आणि विकासला.
रोहित काल चांगला खेळत होता आणि अक्षयमुळे तो आऊट झाला हे अक्षयने कबूल केलं voot extra मध्ये.
>>मी फक्त हाच धागा बघतो
>>मी फक्त हाच धागा बघतो त्यामुळे परसादचं कौतुक कोण आणि का करतंय कल्पना नाही.
अरे बिगबॉसचा कुठलाही रॅंडम व्हिडिओ उघडला यूट्यूबवरचा तरी त्या खाली नुसते प्रसादच्या नावाचे बदामच बदाम असतात (भले त्या व्हिडीओत प्रसाद नसेना का) म्हणूनच परवा म्हंटलेले की प्रसादची पीआर एजन्सी जोरात आहे!!
वानगीदाखल हा व्हिडीओ बघ:
https://youtu.be/sbSowNXsBWo
Pages