Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा
१
२
३
४
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मानेंबद्दलची वरची सगळी मत
मानेंबद्दलची वरची सगळी मत पटली.
ही चावडी मानेमय झाली खरतर यातच मानेंच घरातल योगदान दिसत.
बर,माने बिचुकल्यांसारखी वायफळ बडबड करत नाहीत,तर योग्य बोलतात,काही ठिकाणी ओटीटी होतात,पण बिबॉसच्या घरात तेवढ चालत.पण महत्वाच म्हणजे टास्क सुध्दा विनातक्रार करतात.मग तो शारीरिक असला तरीही.धुवून टाक कार्यामध्ये अक्षयने पकडून सुध्दा सुटण्यासाठी धडपडत होते,काल पण विषाच्या बाटल्या घेण्यात पुढे होते.
माईंड गेम तर खेळत आहेतच पण टास्कही खेळण्याचा प्रयन करतात,नॉमिनेशन स्वीकारतात,रडारडी करत नाहीत.
असा प्लेअर खरतर पुढे जायला हवा,वोटिंग मध्ये जर कमी पडत असतील तर शिवानी सुर्वे,अभिजित केळकर यांना जस बाहेर जाण्याच्या भीतीने बिबॉसने काही आठवडे नॉमिनेशन मध्ये येऊ दिल नव्हत तसच मानेंना पण येऊ देऊ नये.
स्नेहलताने जरी केळकरला जॉईन केल असल तरी काल अपूर्वावर टाकलेला वन लाईनर छान होता, "आज मी सेफ आहे म्हणून पण उद्या तुम्ही मलाही जज करणार आहात" अपूर्वा गप्पच बसली.
म्हणजे बाई अपूर्वाला गप्प करू शकतील.
अपूर्वाला नॉमिनेट करण्याची संधी असताना प्रसादने देशमुखला का नॉमिनेट केल कळत नाही,ती बाहेर जात नाही,हे अजूनपर्यंत कळल नाही का याला,मेघा धाडेला हे छान कळायच.
प्रसाद नक्की काय गेम खेळत आहे कळत नाही,पण सोमिवर देशमुखला नॉमिनेट केल म्हणून त्याला डोक्यावर घेतल आहे.
>>प्रसाद नक्की काय गेम खेळत
>>प्रसाद नक्की काय गेम खेळत आहे कळत नाही,पण सोमिवर देशमुखला नॉमिनेट केल म्हणून त्याला डोक्यावर घेतल आहे.
प्रसादची पीआर एजन्सी जोरात आहे..... काहीकाही युट्यूबर्सही त्यांनी खिशात घातल्यासारखे त्याचा प्रचार करतायत..... म्हणजे या शोमध्ये एव्हढे फॅनफॉलॉइंग उभे करण्यासारखे अजुनतरी इतके काही केलेले नाही प्रसादने

मज्जा म्हणजे सुरुवातीला प्रसादची वकिली करणाऱ्या अमृताचे भरभरुन कौतुक करणाऱ्या यूट्यूबर्सना आता तिचे तोंडदेखले कौतुक करताना बघायला मजा येतीय..... म्हणजे ते पण ती चांगली खेळतीय, मांजरेकरांनी पण स्मार्ट प्लेयर म्हंटले, प्रसादबरोबर पंगा घेऊनही ती व्होटींग ट्रेंड्समध्ये पहील्या एकदोन नंबरात असते त्यामुळे बिचाऱ्यांना चार कौतुकाचे शब्द काढायला लागतात
काल प्रसाद जे वागलाय त्याने सहानभूती अमृताकडेच जाणार आहे!
अपूर्वा आणि अमृता या मधून जर तो अपूर्वाला सेफ करत असेल तर असल्या बेभरवश्याच्या मित्राला अमृताने टांग दिली त्यात काही विशेष नाही.
म्हणजे किरण माने अमृताला दगड म्हंटल्यावर हा चिडतो; डिस्टर्ब होतो पण स्वता मात्र तिला नॉमीनेट करतो आणि याला जर कुणी प्रसादचा गेम म्हणत असेल तर धन्यवाद आहेत
आता आज खुर्चीसम्राट/ टॉर्चर
आता आज खुर्चीसम्राट/ टॉर्चर टास्क आहे असे दिसते
माने टॉर्चर खुर्चीवर बसलेले आणि कचरा, साबण टाकणार्यांवर ते उलटे फेकताना आणि शेरेबाजी करताना दिसले एका प्रोमोत. मजा येईल. असल्या टास्क मधे इमोशनल माणसाचे काम नाही. प्रसाद सारख्या अनस्टेबल माणसाचे तर नाहीच. त्याचा पराग होऊ शकतो. पण (ठरवले तर ) माने, विकास हे शाइन करू शकतात.
प्रसाद नव्हता का, मला तो का
'दिल्या घरी तू सुखी रहा' मध्ये प्रसाद नव्हताच. >>> प्रसाद नव्हता का, मला तो का आठवतोय. त्याच्या जवळपास दिसणारा कोणी होता का.
हो असे हे कन्यादान मधे प्रसाद होता हे लिहीणारही होते मी.
काल प्रसाद जे वागलाय त्याने सहानभूती अमृताकडेच जाणार आहे! >>> नाही, प्रसादने योग्य केलं म्हणतायेत लोकं. एकंदरीत युट्युबर्स बरेच जण विशेषतः अॅक्ट रायडर्स पुर्णपणे प्रसादच्या बाजुने आणि अपुर्वा फेक ठरवायच्या मागे दिसतात. प्रेक्षक पण बरेच जण प्रसादच्या बाजुने आहेत. मानेंच्याही विरोधात आहेत.
फक्त वोटींगच्या आधारावर ठरवलं तर प्रसाद जिंकू शकतो शेवटी.
मलव नाही वाटत त्या प्रसादचस
मला नाही वाटत त्या प्रसादचस काही विचार केलेला गेम आहे, अमृता गृप मधून फुटली म्हणून केलं तिला नॉमिनेट.
मला ती अमृता देशमुखही अजिबात आवडत नाही, इन जनरलच मुलांना खुष करून , फ्लर्ट करून शिडी बनवणार्या मुली डोक्यात जातात !
बाकी खुर्ची सम्राट म्हंटलं कि प्रत्येक सिझनचे आयकॉनिक एपिसोड्स आठवतात.. मेघा तिथेच हिरो ठरली, पराग तिथेच व्हिलन ठरला, विशाल निकम तिथेच विनर ठरला, त्याची आणि विकासची मैत्री तिथेच हिट गेली
अमृताचा एरवी कदाचित राग आला
अमृताचा एरवी कदाचित राग आला असता पण पहील्या दोन आठवड्यात प्रसादशी लॉयल राहून कायम प्रसाद हीच प्रायोरिटी ठेवल्यावरही प्रसाद तिला जी वागणूक देत होता ते बघून वाईट वाटले त्या मुलीबद्दल.... जेंव्हा लोकांनी त्यांच्याबद्द्ल बोलायला सुरुवात केली तेंव्हा ते प्रकरण त्याने ज्याप्रकारे झटकले तेंव्हा अमृता दुखावलेली नक्कीच दिसत होती..... प्रसादला ते अमृताला वेगळे घेऊन समजावता आले असते पण आक्ख्या ग्रूपसमोर त्याने तो विषय खुप कोरडेपणाने हाताळला.
तेंव्हा वाटलेले जी मुलगी दोन आठवडे फक्त प्रसादभोवती घुटमळत खेळली ती खचेल, अजुनच डाऊन होईल!!
But she surprised me..... एकदा तिला क्लॅरिटी मिळाल्यावर सरळ तिने ग्रूप बदलला..... अक्षयशी अगदीच हेल्दी फ्लर्टींग केले.... अजुन तरी कुठेही लाईन क्रॉस केलेली नाही!!
किंवा प्रसादलाही कुठेही वाकुल्या दाखवलेल्या नाहीयेत..... त्याच्याशीही ती चांगलेच बोलतेय.
पण आता प्रसादने नॉमीनेट केल्यावर ती कशी रिॲक्ट होतेय बघण्यात इंटरेस्ट आहे!!
आपल्याला तरी आवडली ती ग्रूप बदलल्यापासून आणि ज्याप्रकारे सांगून सवरुन ग्रूप बदलला ते जास्तच आवडले
खुर्ची सम्राट टास्क मध्ये
खुर्ची सम्राट टास्क मध्ये टीम्स.बदलून प्रत्येक सदस्याची गेमशी लॉयल्टी बघता आली असती,म्हणजे प्रसाद,अपूर्वा,माने एका बाजूला तर तेजू,केळकर विकास दुसर्या बाजूला,अगदी रोहित ,रुचिरा ही विरुद्ध टीममध्ये ठेवायला हवे होते,आणखी मजि आली असती,हे अगदीच आधीच्या सिझनसारख आता एकसुरी होत आहे,.
आता जो काही प्रोमो पाहिला,त्यातून माने,प्रसादची टीम हरली तरी आता हीरो तेच बनणार.
परत एकदा माने टास्क खेळतात,बिबॉस घेऊन जाईल यांना पुढे.
जोरदार पाणी मारल्यावर उठतायत
जोरदार पाणी मारल्यावर उठतायत हे अपुर्वा आणि अक्षयच्या टीमला जरा उशिराच कळले..... आधी उगीच कचरा आणि अंडी आणि पावडर वगैरे खेळत बसलेले!!
आता उद्या तेजस्विनी ची टीम जर शहाणी असेल तर तीच स्ट्रॅटेजी वापरतील!!
माझ्या अंदाजाने अक्षय, अपुर्वा, रोहित, रुचिरा टफ देतील..... अमृता देशमुख आजच इतक्या नाजूकपणे खेळत होती की उद्या तिला मी त्या सी-सॉ वर इमॅजिनच करत नाही..... Its not her cup of tea
अमृता आणि स्नेहलताला शेवटी पाठवा (गरज लागलीच तर)
माने आणि विकास बेस्ट खेळले,
माने आणि विकास बेस्ट खेळले, हॅट्स ऑफ. त्याखालोखाल प्रसाद खेळत होता. अक्षयने प्रसादचे कौतुक केलं पण माने विकास यांचे करताना दिसला नाही.
आधी मानेना टार्गेट खूप केलं, बेस्ट केलं त्यांनी. विकासने पण खूप सहन केलं. आजतरी माने नंबर वन.
बाकी फार लवकर गिव्ह अप करणारे ठरले. तेजु, समु किती वेळ होत्या ते समजलं नाही, नंतर पटापट दाखवलं.
समृद्धी हा टास्क कशी खेळते
समृद्धी हा टास्क कशी खेळते बघायला हवं, स्प्लिट्सविला मधे फिजिकल टास्क्स चांगले करायची!
यशमुळे प्रसादला आणि
यशमुळे प्रसादला आणि अम्रुतामुळे सम्रुध्दी ला उठाव लागल.
सिझन 2 पर्यंत एकच माणूस बसायचा,आता जोडीने बसवतात.
परागचा एवढा धसका घेतला आहे बिबॉसने
माने छाँ गये.
आजच्या भागातल वन लाईनर
" विक्या,कोंबडी पिसाळली."☺️
बाकी यशश्री,अम्रुता धोंगडे अगदीच सोसो निघाल्या.
अक्षयने प्रसादच कौतुक करण्याच कारण म्हणजे प्रसादला अस्थमा आहे वाटत,म्हणून केल असाव.
त्या रुचिरामध्ये मात्र काहीच दम नाही,काढा तिला.
या वेळी काही माने घराबाहेर जात नाहीत. माझ्यामते धोंगडे किंवा एअरटेल बॉय जातील.
बाकी यशश्री,अम्रुता धोंगडे
बाकी यशश्री,अम्रुता धोंगडे अगदीच सोसो निघाल्या. >>> अगदी अगदी.
अक्षयने प्रसादच कौतुक करण्याच कारण म्हणजे प्रसादला अस्थमा आहे वाटत,म्हणून केल असाव. >>> असं असेल तर योग्य केलं त्याने.
माने छाँ गये. >>> माने विकास दोघंही छा गये. माने एकदम नजर समोर ठेऊन होते हे कौतुकास्पद.
फायनली ग्रेट एपिसोड, माने
फायनली ग्रेट एपिसोड, माने रॉक्ड कोंबडी गँग शॉक्ड !

अपूर्वा अगदीच दातओठ खाऊन खुनशी चेहरे करत अंगावर धाऊन जात होती , अक्षय तर सायकोपंती करत होता , मानेच त्याला इन्स्टिगेट होते आणि तो चिडला कि हसत होते
विकासने गिव्हप करायला नको होते पण भारी खेळला !
प्रसाद काय मूर्ख माणुस आहे , उगीच समृद्धीशी भांडत होता , रडत काय होता , का सपोर्ट आहे या माणसाला ?
बघितला आत्त्ताच एपिसोड. बिबॉ
बघितला आत्त्ताच एपिसोड. बिबॉ चा ऑल टाइम फेवरेट गेम. मला वाटले होतेच , त्याप्रमाणे माने आणि विकास खरोखर कमाल खेळले!
इथेही बिबॉ च खेळतात कायम. त्यातला पॅटर्न म्हणजे त्यांना जी टीम पॉझिटिव दाखवायची असेल, (बहुधा जी वीक टीम असेल तीच निवडतात)त्यांना आधी टॉर्चर खुर्चीत बसाय्ला लावतात नेहमी. म्हणजे जास्त वेळ ते लोक सहन करण्याच्या भूमिकेत आणि दुसरी टीम दात ओठ खाऊन पाणी, कचरा वगैरे टाकताना अजून निगेटिव वाटेल. प्रेक्षकांना आपोआप त्या पहिल्या टीम बद्दल सहानुभूती वाटतेच. आणि बहुधा तो प्रेक्षकांचा सपोर्ट शेवटपर्यन्त टिकतो! असा माइंड गेम आहे हा
बी टीम फार मिळमिळीत, ताळमेळ नसलेली आहे. यशश्री, अमृता वगैरे सगळे फुसके बार. समृद्धी पण फ्लॉप. नुसते तोंडचे फटाके. पटापट उठून मोकळे. अक्षय, अपूर्वा आणि त्रिशूल ने बर्याचदा अॅग्रेशन ची लाइन क्रॉस केली. अक्षय उगीच प्रसाद ला तू सर्वात फार छान खेळलास वगैरे म्हणाला. माने आणि विकास त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगले खेळले होते की.
नविन आलेली कोण ती बाई अत्यन्त इरिटेटिंग वाटली, अटेन्शन साठी प्र्साद शी भांडणे, उगीच खोटे रडणे .
हो, टिम बी हरणारच आहे, माने
हो, टिम बी हरणारच आहे, माने-विकास सोडून सगळे फुसके !
मला माने आवडायला लागलेत आता, हुषार आहेत, फिजिकल टास्क्स सुद्धा खेळतात आणि खूप इमोशनल कंट्रोल्/पेशन्स आहे रिअॅक्ट करताना , शब्दसंचे वार्/बिचिंग करतात पण उगीच रडत बसत नाहीत !
किती पर्सनल बोलत होत्या त्यांना बायका.. तुझी इमेज बाहेर खराब, बिबीच्या घरातही खराब वगैरे.. अपूर्वा गेल्या ३ सिझनपेक्षा सर्वात मोठी व्हिलन बनली या टास्कमुळे!
मागच्या सिझनमधे जयचा राग यायचा पण एक प्लेअर म्हणून तो स्वतः टास्क्स उत्तम खेळायचा, अगदीच 24 X 7 निगेटिव नाही दिसायचा.
अपूर्वाची इमेज आता मात्रं कुठल्याच प्रकारे पॉझिटिव नाही राहिली !
नविन आलेली कोण ती बाई अत्यन्त
नविन आलेली कोण ती बाई अत्यन्त इरिटेटिंग वाटली >>> अगदी अगदी.
अपूर्वा टास्कमध्ये टोटल व्हिलन वाटली, किती तोंडाचा पट्टा सुरू. उद्या हिला बसवा पहिलं खुर्चीत.
यशश्री, धोंगडे आणि समृद्धी फक्त तोंड चालवण्यात पटाईत.
मानेना सर्वजण टार्गेट करतायेत, ते त्यांच्यासाठी चांगलंच आहे. त्यांना शेवटी पाचात हाच टास्क नेण्याची शक्यता आहे. रोहीत कमी बोलत होता पण त्याचा हात लागत होता सर्वाना.
माने विकास चं फुटेज सगळ्यात
माने विकास चं फुटेज सगळ्यात जास्त दाखवलं. त्यांना पुढे न्यायची इच्छा आहे बहुतेक बिबॉ ची.
विकास चांगला खेळेल हे माहित होतं पण माने इतका वेळ टिकतील असं वाटलं नव्हतं. चांगले खेळले दोघही.
विकास ला त्रास होतो आहे म्हणुन शेवटच्या क्षणी माने उठले असते तर अजुन हिरो झाले असते. तसही विकास आता जास्त वेळ टिकत नाही हे दिसत होतं
पण तरी माने मला अजुनही नाहीच आवडत आहेत. मेघा सई कशा पटकन आपल्याशा वाटल्या होत्या तसं माने विकास बद्दल काल नाही वाटलं.
विकास मधेच उठुन उभा राहिला होता तेव्हा खरतर त्याला आउट करायला हवं होतं. अपुर्वा बरोबर बोलत होती पण तेजु ने नाही ऐकलं.
अपुर्वाचा शेवटपर्यंत नॉनस्टॉप तोंडाचा पट्टा आणि हात चालु होते. तिचं पण मला खरतर कौतुक वाटलं. अक्षय, रोहित, त्रिशुल आलटुन पालटुन ब्रेक घेत होते. पण अपुर्वा न थांबता त्रास देत होती.
अपुर्वा पेक्षा स्नेहलता जास्त निगेटीव्ह वाटली काल.
बाकी प्रसाद, यश, सम्रुद्धी, अमृता धोंगडे कोणीच चमकले नाहीत. नुसता तोंडात दम. समृद्धी ला तेजु ने पहिल्यांदा न पाठवल्याने तिला तोटा झाला असणार आहे.
आज अपुर्वा, रोहीत, अक्षय टिकतील असे वाटतेय. त्रिशुल चं काही सांगु शकत नाही. स्नेहलता भांडुन पहिल्यांदा जायचा प्रयत्न करणार एवढं नक्की.
विकास ला त्रास झाला तर तो
विकास ला त्रास झाला तर तो उठला असता ना. त्याला त्रास होतोय उठा ही रुचिराची स्मार्ट युक्ती होती अॅक्चुअली. माने नाही उठले ते बरेच केले , पण किंचित चल बिचल झाली होती त्यांची तेव्हा. बाकी कशानेही त्यांना काहीही फरक पडला नाही.
आपल्याला टास्क चे सगळे नियम दाखवले नाहीत किंवा या लोकांनी नवीन नियम तरी काढले असावे - हात खाली, तोंड इकडे वगैरे असले नियम कधी ऐकले नव्हते! मागच्या वेळी गायत्री चक्क खाली वाकून झोपली होती.
माने म्हणत होतेना जीव गेला
माने म्हणत होतेना जीव गेला तरी उठणार नाही, त्यामुळे त्यांनी तसं केलं.
त्याला त्रास होतोय उठा ही रुचिराची स्मार्ट युक्ती होती अॅक्चुअली. >>> हो. ते थोडे इमोशनल झाले पण विकास उठतोय का बघत होते;
ए टीमने मानेना जास्त काहीच न करता विकासलाच आधीपासून जास्त टारगेट करायला हवं होतं, म मां म्हणाले होतेच ना त्याला स्पेशल समजु नका, स्ट्रॉंग आहे तो त्यामुळे ते काही बोलू शकले नसते आणि बोललेच तर त्यांना हे ऐकवा.
अपूर्वा टोटली वाईट वागली. स्नेहलता पण व्हिलन कॅटेगरीत गेली.
खरंतर टास्क संपल्यावर ए टीममधल्या सर्वांनीच माने आणि विकास यांचे जाऊन स्पेशली कौतुक करायला हवं होतं, ब्राऊनी पॉईंट्स मिळाले असते. म मां बोलणार यावर. अक्षयला पण सुनावतील.
दोन मिनिटांची रॅपिड फायर बघितली योगेशची. तो म्हणाला आमची टीम मन जिंकतेय. माने आणि अपूर्वासाठी बरंच निगेटिव्ह होतं, अपूर्वा अक्षय बद्दलही निगेटिव्ह बोलला. स्वत:ही तसा निगेटिव्ह झालेला खरंतर.
टास्क मध्ये स्ट्रॅटेजीज कोणाच्या छान असतात विचारल्यावर अक्षयचे नाव घेतलं, त्याचं डोकं चांगलं चालते म्हणे.
त्याचे पहिले तीन प्रसाद तेजा आणि धोंगडे.
काल धोंगडेने लगेच surrender केलं, तोंडाचा पट्टा मात्र सतत चालू असतो म्हणून आज मला अपूर्वाचा गेम बघायचा आहे, नुसती तोंड चालवते की खेळते खरंच.
अपूर्वा संचालक आहे,बहुतेक
अपूर्वा संचालक आहे,बहुतेक सगळ्यांत शेवटी बसेल.
बाय द वे त्या त्रिशूलने
बाय द वे त्या त्रिशूलने विकासला pan वगैरे मारलेले दाखवलं नाही. त्याला बाहेर काढा. किती दिवस ठेवणार एअरटेल वाले, दुसरं कोणी पाठवा एअरटेल तर्फे. ती समु गेम तरी खेळेल नीट तो गेला बाहेर तर.
माने आणि विकास फारच मस्त
माने आणि विकास फारच मस्त खेळले.
मै +१. इकडे बघा, तोंड कव्हर करू नका हे कसले माहित नसलेले नियम सांगत होते ते लोक?
रुचिरा फक्त डोक्याने खेळली. इमोशन्सना ती फक्त हात घालू शकत होती. बेंबीच्या देठापासून ओरडून इमोशनला हात घातलेला फेक वाटतो हे त्या सर्वांना सांगा. बाकी प्रसाद, यशश्री, सॅम, धोंगडे अगदी फुसके निघाले. चार पाण्याचे हबके पण सहन करू शकले नाही. माने आणि विकास चिवट आणि लेव्हल हेडेल! पाणी मारताना मुद्दाम त्या भांड्याच्या जवळ जाऊन इजा करुन त्याचं भांडवल करायला हवं होतं. तेजू सपोर्ट करत होती, पण रोहितचं हात लागला त्याचा बवाल करुन त्याच्यावर कारवाई, बोंबाबोंब, खेळ थांबवणे... किमान ब्राऊनी पॉईंटस तरी पदरात पाडायला हवे होते वाटलं. फिजिकल होतात वरुन मेधा कशी बोंब ठोकायची!
बाकी शर्ट वगैरे फाडले नाही का कोणी? त्यांच्या सामानाला हात लावून ते खराब करणे, त्यांच्या कुटुंबाचे वगैरे फोटो असतील ते फाडणे... असं काही डोकं न वापरता पाणी, साबण, शेविंग क्रीम आणि पावडर. आणि कचरा याच्या पुढे गाडी गेलीच नाही. इमोशनल function at() { [native code] }याचार सगळ्यात जास्त होतात तर त्यावर कोणी विचारच केला नाही.
अपूर्वा, अक्षय मात्र टोटल ह.ल.क.ट आहेत. आणि ती नवी आलेली पण. प्रिव्हलेज्ड हलकट. त्यांना जमिनीवर आणायला करा आज काही.
त्या नवीन बाईचा ‘विच फेस‘ आहे
त्या नवीन बाईचा ‘विच फेस‘ आहे , प्रोमो नुसार बहुदा त्या विचच्या अंगावर आज उकळतं तिखटाचं तेल सांडणार आहे
आजचा एपिसोड बघितल्यावर प्लीज
आजचा एपिसोड बघितल्यावर प्लीज कोणीतरी डिटेल्स लिहा. मला बघायला मिळणार नाहीये आणि voot वर लवकर पोस्ट करत नाहीत एपिसोड, त्यामुळे उद्या बघता येईल.
आमच्याकडे voot फ्री वाले आहे. त्यामुळे लवकर बघता येणार नाही.
अन्जू,डिटेल्स इथे मिळतीलच,पण
अन्जू,डिटेल्स इथे मिळतीलच,पण अगदी सेकंदाचा अपडेट हवा असेल तर तो अँक्ट राईडरवाला मंदार भाग संपल्यावर लाईव्ह असतो.अगदी प्रत्येकाच्या वाक्यावर बोलत असतो.कंटाळत कसा नाही,
कालचे प्रकार बघितल्यावर त्या
कालचे प्रकार बघितल्यावर त्या अपूर्वाचे अंगातला कपडा सोडून सगळेच्या सगळे कपडे फाडून टाकावे असं वाटलं. शी शुड बी पनिश्ड. तिच्या गादीला भोकं पाडायची. त्यात कचरा भरायचा. घाण टाकायची. तिचं पांघरुण टरकवायचं. पाण्याचा थेंब पण नाही उडवायचा तिच्या अंगावर. बुडा खाली आग लावलेली चालणार नाही असं नियमात नाही ना? मग पातेलं घेऊन नियमांचे कागद, कपडे जाळून ती राख तोंडावर टाकायची. यक्क!
किंवा सी सॉवर न बसलेल्या पण मित्र असलेल्या टीम मेटसचे मेकप कपडे नष्ट करायचे. उठ नाही तर एक गोष्ट गेली. उठ नाही तर दुसरी गेली. ब्रूटली करत रहायचं. माझ्यातला सैतान जागृत होतोय आता. बिगबॉस की जय. आलीज्वेल.
मला कंटाळा येतो यूट्यूबर्स ना
युपि मला कंटाळा येतो यूट्यूबर्स ना बघायला आणि ऐकायला इतका वेळ. मी त्यांचे दोन तीन मिनिटांचे असले तर बघते.
इथे तुम्ही सर्व लिहालच पण सांगितलं की अजून लिहाल, इथेच वाचायला आवडेल.
उठ नाही तर एक गोष्ट गेली. उठ
उठ नाही तर एक गोष्ट गेली. उठ नाही तर दुसरी गेली. >>
अमित.
बी टीम इतके डोके लावेल असे वाटत नाही. अपूर्वा बहुधा तिथे बसून जोरदार तोंड चालवेल आणि हे नाही चालणार ते नाही चालणार नियमात नाही असे आरडा ओरडा कररेल , बी टीम लगेच ते खरंच असे समजून बॅक ऑफ होईल असेच वाटते.
ज्जे बात अंजू!!
ज्जे बात अंजू!!

त्या सगळ्या सो कॉल्ड यूट्यूबर्स पेक्षा नक्कीच चांगले लिहतात लोक इथे
सुमार दर्जा, चुकीचे मराठी, तपशिलातल्या चुका आणि बायस्ड टिपण्या बघण्यापेक्षा इथल्या दोन चार ओळींच्या पोस्टसुद्धा जास्त दर्जेदार असतात
अमित, जातोस का वाईल्ड कार्ड
अमित, जातोस का वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून?
Pages