Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिव आणि स्टॅन आवडतायेत
शिव आणि स्टॅन आवडतायेत पब्लिकला, स्टॅनला सपोर्टही खूप आणि टपोरी लँग्वेजमुळे ट्रोलिंगही खूप !.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला आवडते त्याचा लहेजा ऐकायला
बरं झालं ती मान्या गेली...
बरं झालं ती मान्या गेली... नुसती जळूबाई होती
कालचा एपिसोड मस्त झाला! गौतम
कालचा एपिसोड मस्त झाला! गौतम - सौंदर्याचा पंचनामा . एकेक सॉलिड खुलासे, आरोप, प्रत्यारोप.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केजो चा हा फोर्टेच असल्यामुळे नो वंडर ही डिड अ ग्रेट जॉब !!इसे कहते है बिग बॉस
केजोने खरच सलमान पेक्षा बेटर
केजोने खरच सलमान पेक्षा बेटर होस्टिंग केलं, पब्लिक उगीच शिव्या घालतय त्याला, सलमान नाही तर बिग बॉस नाही वगैरे मिथ आहे !
आरती| तुम्हाला पुढच्या दिवशी
आरती| तुम्हाला पुढच्या दिवशी काय होणार ते कसे कळत होते.. लिंक सेंड करता का...
लोकप्रियतेत यावेळी प्रियंका
लोकप्रियतेत यावेळी प्रियंका एक नंबर, शिव दोन, स्टॅन तीनवर आहे.
प्रियांका कुठल्या सिरीयलमधे होती, कलर्सच्या का, तसं असेल आणि ती खेळत छान असेल तर तिचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. वोटींगमधे कदाचित ती शिव, स्टॅनपेक्षा मागे असेल.
अर्चनाने काल छान समजूत काढली
अर्चनाने काल छान समजूत काढली गौतम आणि सौंदर्याची. निम्रत ला पण चांगलं समजाऊन सांगितलं.
मला तर वाटले की ती दोघांनाही
मला तर वाटले की ती दोघांनाही एकमेकाविरुद्ध उचकवयाचा प्रयत्न करते आहे. तिला आवडते भांडणाची गंमत बघायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एग्झॅक्टली, समजूत कसली,
एग्झॅक्टली, समजूत कसली, पेटवायचा प्रयत्नं करतेय अर्चना, तिला काय करायचय समजूत काढून![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मान्या ऐवजी सुम्बुल जायला हवी होती, मान्या-सौंदर्या अग्ली खुन्नस आत्ता कुठे सुरु झाली होती !
बिबॉ आणि केजो बाकी लब्बाड आहेत, शालिन टिना सुम्बुल प्रकरण ऑर्गॅनिक वाटते त्यांना आणि दुसरे फेक
केजोने तर एन्ड पण सांगितलाय कि सेकंड हाफमधे टिना जाणार , राहुल आणि अन्जली एकत्रं येणार !
सुम्बल ला फॅन फॉलोविंग खूप
सुम्बल ला फॅन फॉलोविंग खूप आहे.. निम्रत पेक्षा जास्त...
वोटिंग ट्रेंड-
1.प्रियांका
2.शिव
3.अंकित
4.स्टॅन
5.सुम्बल
आरती| तुम्हाला पुढच्या दिवशी
आरती| तुम्हाला पुढच्या दिवशी काय होणार ते कसे कळत होते.. लिंक सेंड करता का...>>>
च्रप्स...मी ट्विटरवरच बिगबॉसचा हॅशटॅग फॉलो करते. त्यात काही काही 'खबरी' हॅन्डल असतात. ज्यांच्या बीबीच्या क्रूमध्ये ओळखी असतात म्हणे. ते टाकतात अशा बातम्या तेव्हा कळते. किंवा कदाचित बीबी स्वतःही leak करत असतील कोण जाणे. पण बातम्या खऱ्या निघतात.
ह्या आठवड्याचा कॅप्टन कोण झाला हेही कळलं आहे मला. एलिमिनेशन, काही मेजर न्यूज असेल तर कळते. बाकी जे युटूबवर असतात ते बरेचसे कोणा न कोणाचे पी आर असतात. त्यामुळे त्यांचे विडिओ मला बायस वाटतात. ते मी शक्यतो बघतच नाही.
शिवला स्क्रीन स्पेस कमी मिळत
शिवला स्क्रीन स्पेस कमी मिळत असला तरी फॅन फॉलॉइंग, रिस्पेक्ट खूप जबरदस्तं मिळतोय ऑल ओव्हर सोशल मिडिया !![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मेघाने हिन्दीत येऊन मराठी बिबॉची इमेज खराब केली होती, शिवमुळे आता ती सुधारली आहे.
‘इज शी अ विनर?‘ ते ‘नाउ वि नो व्हाय हि इज अ विनरब!‘ जर्नी फॉर मराठी बिगबॉस , थॅ,क्स टु शिव !
btw एका ट्विटर हॅन्डलने शिव निम्रित जोडी लाऊन टाकली आहे, #शिम्रित केलय
जबरदस्तीने त्यांचे एकत्रं शॉट्स कलेक्ट करून रोमँटिक व्हिडिओ बनवते .. आय होप असे काही होऊ नये प्लिज
घरातील सर्वात डोकेबाज माणूस,
घरातील सर्वात डोकेबाज माणूस, अगदी सब का बाप म्हणजे साजिद खान. मनात आणले तर सहज ट्रॉफी जिंकेल. पण कोटीत पैसे मिळवणारा तो, त्याला या ६० लाखाच्या ट्रॉफीत काहीच इन्टरेस्ट नाही. तो फक्त स्वतःची इमेज सुधारायला आला आहे.
साजिद कुठल्या भान्डणात पडत नाही.पण सगळ्यांना व्यवस्थित सल्ले देतो. जेवायला मिळते ते मुकाट्याने खातो.सर्व परिस्थितीचे व तिथल्या मेम्बर्सचे अचूक निरीक्षण करतो. बीबीने एखादा टास्क दिला तर तो व्यवस्थित करतो. संतुलित बोलतो. विनोदी बोलून मनोरंजनही करतो. (त्यात कधी पीजे पण असतात). पण स्वतःला व्यवस्थित कंट्रोल करत आहे. शिवला जरी तो आपल्या टीममध्ये आहे असे वाटत असले तरी गरज भासल्यास साजिद त्यातून अंग काढून घेईल. आज तो अब्दुला ही समजावत होता की हा गेम आहे.
बीबीने कॆजो कडून त्याला हिंट ही पाठवली की साऊंड सिस्टिमवगैरेवर सिरीयस चर्चा करू नकोस. इंटरटेन कर. लगेच त्याला कळलेही.
एके काली साजिदचा टीव्हीवर शो येत असे. नाव आठवत नाही पण त्यावेळी मला तो खूप आवडायचा. त्याच्याकडे छान विनोदबुद्धी आहे व witty आहे, चांगला होस्ट आहे. आताही तो शोमध्ये चांगलाच आहे पण तरीही मला त्या ९ स्त्रियांनी केलेले आरोप विसरता येत नाही. नुकतेच मी ते सर्व परत एकदा वाचले आणि वाटले हा माणूस इतका खाली का गेला असेल ? पॉवरची नशा हे त्यानेच कबूल केलंय म्हणा
यस्स आरती, ‘कहनेमे क्या हर्ज
यस्स आरती, ‘कहनेमे क्या हर्ज है‘ , मला पण फार आवडायचा तो शो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बॉलिवुड हॅम सीन्स सेगमेन्ट सर्वात विनोदी असायचा
निम्रत इतकी चिडूबाई आहे....
निम्रत इतकी चिडूबाई आहे.... तिला उगाच चढवला आहे बेस्ट कॅप्टन वगैरे... शिव बेटर होता आणि अर्चू पण छान करतेय...
गौतम टोटल गंडलाय एम सी पी
गौतम टोटल गंडलाय
एम सी पी
काल शेवटची पाच मिनीटे पाहिला.
काल शेवटची पाच मिनीटे पाहिला. तो अब्दू का एव्हढा चिडला होता आणि शिव कशाला रडत होता.
नॉमिनेट काय झाला , अब्दुची
नॉमिनेट काय झाला , अब्दुची लग्गेच सटकली, रिअॅलिटी चेक !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्याला नॉमिनेट केलं गेलं एलिमिनेशन साठी इतकी छोटी गोष्ट नाही अॅक्सेप्ट करता आली , आता समजेल बिगबॉस काय आहे, क्युटनेस-कॉमेडी इ. किती दिवस चालवणार अजुन ?
काल शिवने स्टॅनला वाचवलं म्हणून कांगावा करणार्या प्रियंकाची बिबॉने मस्तं जिरवली कन्फेशन रुम मधे बोलवून
प्रियंकाला समजून चुकलय कि ती वर्सेस शिव अशीच खरी फाइट असणार हे, त्यामुळे एकच टार्गेट आहे तिचे, शिव !
शिव डुइंग ग्रेट अॅज ऑल्वेज !
आता दोन तीन दिवस बिग बॉस
आता दोन तीन दिवस बिग बॉस पाहणार नाही. डिटॉक्स मोड ऑन.![happy.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u77401/happy.jpeg)
त्याला नॉमिनेट केलं गेलं
त्याला नॉमिनेट केलं गेलं एलिमिनेशन साठी इतकी छोटी गोष्ट नाही अॅक्सेप्ट करता आली , आता समजेल बिगबॉस काय आहे, क्युटनेस-कॉमेडी इ. किती दिवस चालवणार अजुन ? >>>> शेवटी तो पण माणूसच आहे ना... बाकीचे मुखवटा धारण करून काही फरक पडला नाही असं दाखवतात. अब्दुला बिचाऱ्याला राग लपवायला नाही जमलं...
मला शिव मराठी बिग बॉस मध्ये
मला शिव मराठी बिग बॉस मध्ये पण कधी आवडला नाही आणि आता हिंदी मध्ये पण आवडत नाहीय. प्रियांका आवडते आणि तीच जिंकावी असे वाटते.
प्रियांकाच जिंकेल!!!! शिव टॉप
प्रियांकाच जिंकेल!!!! शिव टॉप टू मध्ये जाईल मात्र....
प्रियन्का खुप इरिटेटिन्ग आहे
प्रियन्का खुप इरिटेटिन्ग आहे पण
जस बिग बॉस ने तिला आणि शिवला कन्फेशन रुम मधे बोलवुन जाणिव करुन दिलि की तु तुझ्या मित्रान्ना वाचवल तर ते बरोबर पण तेच शिवने केल तर चुक.. असच ति बर्यचदा वागते की मीच बरोबर बाकी लोक विरुद्ध असतिल की चुकच
आवाज पण इरिटेटिन्ग ...
शिव बर्याचदा डोक लावुन पन बोलतो.. ही मोस्टली खुन्नस धरुन आणि मीच बरोबर हे सान्गत राहते
निम्रत आणि अंकित मध्ये अंकित
निम्रत आणि अंकित मध्ये अंकित बेटर आहेच ना...
निम्रत काय विचार करते आणि काय करते तिलाही कळत नाही...
मेरे लिये कॅप्टन्सी जरुरी है म्हणत होती.. अरे तुला कॅप्टन्सी हवी आहे तर तू शिव ला कॅप्टन्सी च्या दावेदारी मधून बाहेर काढायला हवे.. म्हणजे तुला संधी मिळेल...
प्रियन्का खुप इरिटेटिन्ग आहे
प्रियन्का खुप इरिटेटिन्ग आहे पण
जस बिग बॉस ने तिला आणि शिवला कन्फेशन रुम मधे बोलवुन जाणिव करुन दिलि की तु तुझ्या मित्रान्ना वाचवल तर ते बरोबर पण तेच शिवने केल तर चुक.. असच ति बर्यचदा वागते की मीच बरोबर बाकी लोक विरुद्ध असतिल की चुकच
आवाज पण इरिटेटिन्ग ... >>> +१११
मला प्रियांका आणि इतर लो
मला प्रियांका आणि इतर लो आयक्यु टि.व्ही बहुए अज्जिबात आवडत नाहीत, डोकं मिनिमल आणि ड्रामा मॅक्स..
कलर्स रेप्युटेशन पहाता प्रियंका-निम्रित असणारच टॉप३ मधे, शिव असायलाच हवा पण कलर्स काय करेल सांगता येत नाही , मागच्या वर्षी उमर रियाझला काढलं डोइजड झाला तेंव्हा!
टिव्ही बहू आणि बेटे दोन्ही
टिव्ही बहू आणि बेटे दोन्ही फार बोअर करतात. फेक बॉंडिंग, फेक लव स्टोरीज. नॉन टिव्हि पब्लिकच जास्त एन्टर्टेन करताहेत. पण शिव ला ओवरपावर होऊ देणार नाहीत ते लोक . म्हणूनच जास्त फिजिकल टास्क्स ठेवतच नाहीत. नाहीतर शिव सहजच जिंकेल.
मला शिव मराठी बिग बॉस मध्ये
मला शिव मराठी बिग बॉस मध्ये पण कधी आवडला नाही आणि आता हिंदी मध्ये पण आवडत नाहीय. >>> +११११
मला तो खूप cunning वाटतो. अजिबात genuinely nice नाहीये. पण तो हुशार आहे हे मान्य करते. काय करून सतत चर्चेत राहायचे हे त्याला चांगले माहित आहे. इथे तो कपल्सना नावे ठेवतोय. पण मराठीत त्याने तेच केले. इथेही कुठल्या मुलीने भाव दिला तर तो परत प्रेमप्रकरण करेल.
प्रियांकाचे विरोधी त्याच्या बाजूने आहेत.
जस बिग बॉस ने तिला आणि शिवला कन्फेशन रुम मधे बोलवुन जाणिव करुन दिलि की तु तुझ्या मित्रान्ना वाचवल तर ते बरोबर पण तेच शिवने केल तर चुक.>>> शिव त्याच्या नॉमिनेशनच्या वेळी सौन्दर्याला म्हणाला कि पर्सनल जाऊ नका. मग पर्सनल मैत्री म्हणून स्टॅन ला का वाचवले? फेअर राहायचे अस म्हणत पर्सनल गेला तो. मग दुसऱ्यांकडून कशी अपेक्षा ठेवतो?
मला आतापर्यंत आवडला तो अंकितच.(आणि अर्थातच अर्चना) पण तो राहणार नाही हे माहित आहे.प्रियांका वि शिव फिनाले होईल.
स्टॅन महा बोर आहे. तो या अब्दू काय बोलतात ते नीट ऐकूच येत नाही.
निम्रत ला पब्लिक सपोर्ट नाहीय
निम्रत ला पब्लिक सपोर्ट नाहीय... टॉप 3 नसेल...
कितीतरी वर्षांनी काल सलमान
कितीतरी वर्षांनी काल सलमान खानने मस्तं केला विकेन्डचा वार, (मायनस अब्दुची ओव्हर स्तुति).
इतका अपमान होऊन सुम्बुलच्या डोक्यात कणभरही फरक पडलेला नाहीये, एन्डला पुन्हा शालीनला मिठ्या!
अंकितच्या महामन्दपणातही काही फरक पडेल असे वाटत नाही,कशाला येतात असे लोक बिबॉ मधे ?
शिवला कमी स्क्रीन टाइम मिळाला असला तरी शालीनची गजब बेइज्जती केली त्यानी जेंव्हा संधी मिळाली , एकेक शब्दं वार केल्या सारखा.. टु द पॉइंट.. गुड गोइंग शिव, हे रुप मराठीत नव्हतं दिसलं, बहुदा २ वर्ष आत्मपरीक्षण केलं किंवा मराठी पेक्षा हिन्दी बोलताना जास्त कम्फर्टेबल असेल !
Pages