Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओड्याला फटाक्यांचा त्रास होईल
ओड्याला फटाक्यांचा त्रास होईल अशी भीती होती पण तसं काही झालं नाही
एकतर सुदैवानं तुरळक फटाके वाजत आहेत
आणि लांब वर आहेत, घराच्या जवळपास फारसे नाहीत
त्यामुले तो निवांत वातावरण एन्जॉय करत फिरतोय
एखादाच atam बॉम्ब फुटला तर दचकतोय पण घाबरून घरात नई बसलेला
आई गं हार्ट ब्रोकन भाव आहेत
>>>>>>नेलं नाही म्हणून ऊदास बसला होता
आई गं हार्ट ब्रोकन भाव आहेत डोळ्यात अगदी. अगदी विश्वासघात झाल्याचे दु:ख दिसते आहे डोळ्यात.
आई गं हार्ट ब्रोकन भाव आहेत
आई गं हार्ट ब्रोकन भाव आहेत डोळ्यात अगदी>>>
आमच्याकडे हे दृश्य अगदी कॉमन
म्हणजे गाडी काढली आणि त्याला नेलं नाही की झालं
इतके करुण भाव की कोणत्याही क्षणी घळाघळा रडेल असं
चल म्हणलं की क्षणात मूड चेंज
फार हँडसम आहे सिंबा
फार हँडसम आहे सिंबा
फुंतरु साहेब कसे आहेत आता?सुधारणा आहे का?
>>>>>इतके करुण भाव की
>>>>>इतके करुण भाव की कोणत्याही क्षणी घळाघळा रडेल असं
चल म्हणलं की क्षणात मूड चेंज Happy
कालचा जोक.
कालचा जोक.
बाहेरून काही सामान, ग्रोसरी आणली की आधी सगळ्या पिशव्या आम्ही एका टेबलवर ठेवतो. मंकीची (आमचा बोका) सवय आहे त्यात घुसुन काय काय आहे वास घेत राहतो. काल त्याला म्हटलं क्युरियस जॉर्ज आहेस अगदी तर मुलगी म्हटली आणि तो मंकी आहे
परवा मी थोडावेळ सॅमीला बाहेर सोडलं. नंतर दार लावून घेतलं आणि या मॅडम बाहेर असल्याचं मी साफ विसरले. अर्धा एक तास झाला असेल. किचनच्या दाराशी आल्यावर दिसलं तिथल्या काचेला सॅमी अगदी नाक लावून बसली होती. सॉरी सॉरी म्हणत आत घेतलं तेव्हा कधीही म्यांव न करणारीने चक्क २-३ वेळा बारीक आवाज काढले. बहुतेक निषेध करत असावी माझा अशी कशी विसरलीस. बरं मुलगी नव्हती नाहीतर माझं काही खरं नव्हतं
मंकीची (आमचा बोका) सवय आहे
मंकीची (आमचा बोका) सवय आहे त्यात घुसुन काय काय आहे वास घेत राहतो. <<<>>>>> अगदी सेम. आमच्या थिओला ( बोका ) मेथी आणि कांद्याच्या पातीचा वास अतीशय आवडतो. मेथी निवडतांना मेथीतच बसायच्या प्रयत्नात असायचा. आता एखादी काडी दिली की चघळत बसतो. कांद्याच्या पातीचंही तसच.
आता दुसरी सवय लागलीये फिरायला जायची. आम्ही त्याला जिन्यात फिरायला नेतो. पहिला मजला ते चौथा, पाचवा मजल्यांवर तो पॅसेज, फायर एक्झिटचा जिना, दुसरा जिना असा फिरत असतो. आधी फक्त रात्रीची सवय होती, आता सकाळीही ६ वाजता दारात तालात ओरडत बसतो. शेवटी व्यायाम वगैरे बाजूला ठेऊन न्यायला लागतं.
अगदी खोडकर बाळ आहे आणि सिंबा
अगदी खोडकर बाळ आहे आणि सिंबा एक्दम राजघराण्यातला!
फुंतरू कसा आहे आता ?
बिचारी सॅमी लक्षात आले म्हणून बर झाले.
ओड्या नेहमीप्रमाणेच मस्त! ओड्या आणि माऊईचे किस्से वाचले की ही माणसे चुकुन कुत्र्यांच्या वंशाला गेली असावीत असेच वाटते.
आम्ही त्याला जिन्यात फिरायला
आम्ही त्याला जिन्यात फिरायला नेतो.>>> कसं नेता? लिश लावून?
मस्त एक एक किस्से, फोटोज...
मस्त एक एक किस्से, फोटोज...
फुंतरू कसा आहे आता ??
ओड्या डोळ्यासमोरच आलं सगळं.
ओड्या डोळ्यासमोरच आलं सगळं.
सिंबा एकदम क्यूट!
मंकी , सॅमी आणि थिओचे किस्से भारीच.
हा धागा स्ट्रेसबस्टर आहे
फुंतरू कसा आहे आता?
कसं नेता? लिश लावून? <<<>>>>
कसं नेता? लिश लावून? <<<>>>>>> नाही. नुसतच. पहील्या लिशची दोरी त्यानी चाऊन चाऊन तुकडे केली. दुसरी आणलीये पण ती घातली की लोळून लोळून काढून टाकतो. म्हणून नुसतच नेतो.
ग्राऊंड फ्लोअर पर्यंत जाऊ देत नाही.
येस फुंतरू इज बॅक....
येस फुंतरू इज बॅक....
आता बरीच सुधारणा आहे .... जास्तच टग्या झाला आहे... बापरे एवढी धावाधावी करतो आहे कि मी काल त्याला म्हणाली कि तुझ्या अंगात काय आत्मा वगैरे आलाय का कोणाचा ? म्हणजे माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर..... ओम फॅट स्वाहा .... डॉक्टरसुद्धा म्हणाले कि काय खाऊ घालताय याला ? अफू वगैरे दिली का ?काल कोणाचे लक्ष नाही बघून महाराज ओट्यावर पाय ठेऊन तिथुन चकली खाऊन मोकळे, हे कमी वाटते नं वाटते तोच पलंगावर चढून तिथून स्टडी टेबल वरचे श्रीखंड मस्त चाटून पुसून स्वच्छ करून वाटी चमकवून दिली...आता लक्ष फराळाच्या प्लेट वर आहे.....तुम्हि उठलात की गायब झालेच म्हणून समजा .............
अरे हो रिपोर्ट आले नाही अजून पण बघू काय ते....
येस फुंतरू इज बॅक. >> वाचून
येस फुंतरू इज बॅक. >> वाचून छान वाटले..
येय! मस्त वाटले फुंतरूचा
येय! मस्त वाटले फुंतरूचा अपडेट वाचून!! करू देत मस्ती आता जरा
अरे वाह मस्त वाटलं हे वाचून
अरे वाह मस्त वाटलं हे वाचून
दृष्ट् काढा पोराची
खूप छान वाटले फुंतरूछा अपडेट
खूप छान वाटले फुंतरूचा अपडेट वाचून.
येय! मस्त वाटले फुंतरूचा
येय! मस्त वाटले फुंतरूचा अपडेट वाचून!! करू देत मस्ती आता जरा
>>>>> +१
फुंतरु बरा होतोय वाचून छान
फुंतरु बरा होतोय वाचून छान वाटलं.
म्हणून नुसतच नेतो.
ग्राऊंड फ्लोअर पर्यंत जाऊ देत नाही.>>>> ओह फारच आज्ञाधारक दिसतोय गुड
काल लेकाने सॅमीचा पोट्रेट मोड मधे फोटो काढला
ओड्याचा डांबिसपणाचा किस्सा
ओड्याचा डांबिसपणाचा किस्सा राहीला सांगायाचा
तर मध्ये जेव्हा धुंवाधार पाऊस पडत होता तेव्हा संध्याकाळी उशीरा आम्ही गेलो ट्रॅकवर, अर्थातच सुनसान होता. थोडं पुढे गेल्यावर तिथं एक शेड आहे, त्याखाली भटकी भूभू पावसापासून वाचायला झोपली होती. ओड्या येताच जोरदार भुंकाभुंक झाली, एक जण त्याच्या अंगावर चालत आलं, पण ओड्याला माहीती होतं की हे तात्पुरते आहे त्यामुळे त्याने मस्तपैकी त्याला झुकांडी देत अर्धगोलाकार अंतरात पळून पुन्हा जागी आणलं. तोवर मी शेडमध्ये पोचलो होतो.
मग त्या भटक्या भूभूंना चांगलंच सुनावलं, म्हणलं का रे भुंकता त्याच्यावर???
काय त्रास देतो का तो तुम्हाला, त्याच्या वाटेने चाललेला असतो ना, मग??? आणि आम्ही किती वेळा येतो इथे, अजूनही मैत्री नाही का करता येत? असं नाही करायचं. सगळे जणांनी नीट रहा, कशाला भुंकायचं उगाच....???
असं बरंच काही, आणि सगळेजण कान पाडून ऐकत बसलेले, शेवटी आपण काही केलं नाही तर हा माणूस असाच इथं बोलत उभा राहील या भीतीने एकाने पुढाकार घेतला. त्याने मग मांडवली केली, तोंडाचा, शेपटाचा वास घेऊन आता नो राडा वगैरे ठरवलं. मग अजून दोघांनी. बाकीच्यांनी उठायची तसदी घेतली नाही पण बहुदा लीडर लोकांनी ठरवलं त्याला अनुमोदन दिलं असावं....
मला समाधान वाटतंय ना वाटतं तोच ओड्याने मोक्याचा फायदा उठवला. मी आहे सोबत आणि आता नो मारामारी अशी नुकतीच डील झाल्याने त्याने अक्षरश उद्दामपणे त्या भूभूंच्या डोळ्याला डोळा देत तिथ शेडच्या खांबावर धार मारली. बरं इतक्याने थांबला नाही तर चार कोपऱ्यात चार वेळा शू करून आता हा माझा एरीया झाल्याचे शिक्कामोर्तब केले.
म्हणलं किती रे ओड्या तू बेक्कार आहेस, चल आता इथून त्यांचा पेशन्स संपायच्या आत
हा हा ओड्या डांबीस आहे अगदी.
हा हा ओड्या डांबीस आहे अगदी.
हे हे त्याला पी मेल म्हणायचे.
हे हे त्याला पी मेल म्हणायचे. ओडी इज द दादा बॉस
आम्ही वॉक्स ला जातो तिथे मागे एका कोपर्यात एक दोन हाडाडलेली मांजरे परवा भेटली त्यांना हातात होती म्हणून पेडिग्रीच चारली. व फोटो ट्विटर वर टाकले. पंधरा लाइक्स आले व एक रीट्विट. आता पाउस संपल्याने तिथे पाणी व पेडिग्री ठेवत जाइन. माउ एकदम टायगर सारखे दिसते. व आमच्या म्हातारीला आजिबात भीत नाही.
माउ एकदम टायगर सारखे दिसते. व
माउ एकदम टायगर सारखे दिसते. व आमच्या म्हातारीला आजिबात भीत नाही.>>>
हाहाहा सही
आमच्याकडंही जाम धुमाकूळ सुरू असतो
समोरच्या बंगल्यात मांजरीने पिल्ले दिली आणि आता त्यांचे झाडावर चढण्याचे ट्रेनिंग सुरू आहे
पिल्लं थोडी वरती गेली की घाबरून मिओवं मिओवं करायला लागतात, मग त्यांच्या आईसाहेब त्यांना दम देतात
आणि या सगळ्या गदारोळात ओड्या नाचून नाचून भुंकत असतो
मध्ये फेंसिंग असल्याने मांजरे निवांत असतात आणि पलीकडून टुकुटुकू बघत राहतात
आणि ओड्या प्रचंड फ्रस्ट्रेट होतो
ओड्या टोमॅनजेरी मधला स्पाइक
ओड्या टोमॅनजेरी मधला स्पाइक आहे असा डोळ्यासमोर उभं राहिलं
काउबॉय माउई तर्फे सगळ्या
काउबॉय माउई तर्फे सगळ्या दोस्तांना हॅपी हॅलोविन!!
मस्त फोटो! किती गोडुला दिसतोय
मस्त फोटो! किती गोडुला दिसतोय माऊली.
स्वीट!
स्वीट!
मस्तच हॅट पण ती मेक्सिकन आहे
मस्तच हॅट पण ती मेक्सिकन आहे ना. क्युट बेबी.
हाहाहा भारी दिसतोय माव्या
हाहाहा भारी दिसतोय माव्या
घेतो का पण हे सगळं घालून का जबरदस्तीने पोझ द्यायला लावलीय
भाव पण तसेच आहेत चेहऱ्यावर
आशूचँप माव्याला शर्ट
आशूचँप माव्याला शर्ट घातलेला चालतो पण टोपी ताबडतोब चावायला हवी होती फोटो पुरते तरी ठेवायला लावली कशीतरी.
काल आमच्या नेबरहुड मधे पेट्स ची हॅलोविन परेड ऑर्गनाइज केली होती. सगळे डॉग्ज एक से एक क्यूट दिसत होते ! पण अर्थात इतके सगळे जमल्यावर मग नेहमीचीच मजा मस्ती सुरु होती. माव्याच्यापण "स्कर्ट घातलेल्या सुंदरींकडून" पाप्या घेऊन झाल्या
Pages