भडक बटबटीत दाक्षिणात्य सिनेमे आणि बॉयकॉट बॉलीवूड !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 October, 2022 - 13:28

आर आर आर चित्रपट त्यावरची चर्चा ऐकून पाहिला. अपेक्षा बाहुबलीच्या होत्या. पण बघितल्यावर आरारारा का बघितला असे झाले.

केजीएफबाबत सावध भुमिका घेतली आणि थोडक्यातच तो चित्रपट काय कॅटेगरीचा आहे हे ओळखत वेळ आणि मनस्ताप दोन्ही वाचवले.

पुष्पा मात्र पुर्ण बघितला. अल्लू अर्जुन नाव ऐकून होतो. त्याचा स्वॅग आवडला. पुर्ण चित्रपटाचा डोलारा त्यावरच होता. बाकी चित्रपट म्हणून कलाकृती सामान्य वाटली.

आता कांतारा आलाय. काही लोकं याची तुलना तुंबाडशी करायचा चावटपणा करत आहेत. तुंबाड क्लासिक होता. हा ट्रेलरवरून काहीतरी भडक भयानक प्रकार दिसतोय. याचे कौतुक करणारे तेच लोकं आहेत ज्यांना वर उल्लेख केलेले तीन चित्रपट आवडलेले आहेत. त्यामुळे मी माझ्यापुरते तरी याच्या नादाला न लागायचे ठरवले आहे.

असो,
ईथे हे चित्रपट आवडणार्‍यांच्या अभिरुचीला बिलकुल नावे ठेवायची नाहीयेत.

पण हे चित्रपट ज्या कॅटेगरीचे आहेत त्या चित्रपटांना आपल्याकडची पब्लिक कधी डोक्यावर उचलून घ्यायची नाही.

हल्ली आपण शाहरूखच्या रोमांटीक चित्रपटांना, चोप्रा जोहर यांच्या पंजाबी चित्रपटांना, बॉलीवूडच्या नेपोटीजमला नावे ठेवू लागलो होतो. बॉयकॉट बॉलीवूड म्हणून ट्रेंडही सुरू झालाय. बरेच चित्रपटांना याचा फटकाही बसलाय.

हरकत नाही !

पण पर्याय म्हणून आपण काय उभे करत आहोत? तर हे भडक बटबटीत सो कॉल्लड लार्जर दॅन सुपरमॅन साऊथ ईंडियन सिनेमे डोक्यावर घेत आहोत?

त्यामुळे यांना टक्कर द्यायला बॉलीवूडही आता काय करतेय, तर ब्रह्मास्त्र मैदानात उतरवतेय..
काहीतरी चुकतेय...

आपल्या येत्या पिढीतील प्रेक्षकवर्ग प्रामुख्याने याच चित्रपटांवर पोसला जाणार आहे जो ट्रेंड बॉक्स ऑफिसवर आज आपण सेट करत आहोत.
कितीही नावे ठेवली तरी यापेक्षा ते शाहरूखचे रोमांटीक चित्रपट कैक पटीने सरस होते ज्यांना बघत आमची नव्वदीची पिढी लहानाची मोठी झाली.

आज चांगले आशयघन चित्रपट आले तरी ते ओटीटीपुरतेच मर्यादीत राहणार आहेत. आणि थिएटरला पब्लिक खेचायला असेच स्पेशल ईफेक्टचा मारा असलेले भडक बटबटीत चित्रपट बनवले जाणार आहेत. आणि ते चालणार सुद्धा आहेत. त्यांचीच जनमाणसात हवा होणार आहे.

हा जो नवा ट्रेंड सेट होतोय तो एक प्रेक्षक म्हणून आपल्याला आणि भारतीय चित्रपटसृष्टीला कुठे घेऊन जाणार आहे यावर चर्चा करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुंबाडचा ट्रेलर सुद्धा भडकच आहे. इतकेच काय खुद्द तुंबाड सिनेमा भडकच आहे>>>+१११
तोच मराठी तुंबाड ना. एकदम भिकार.

पण ऋ जी,
कांतारा न बघताच
>>>
याचे उत्तर आधीच्या पोस्टमध्ये दिलेय. कांताराला लक्ष्य नाही केलेय, तर या लाटेवर भाष्य केलेय. या लाटेतील प्रत्येक चित्रपट त्यासाठी पुर्ण बघणे गरजेचा नसावा. कांतारा अपवाद असू शकतो. त्याने काही मुद्दा बदलत नाही.

तुंबाडचा ट्रेलर सुद्धा भडकच आहे. इतकेच काय खुद्द तुंबाड सिनेमा भडकच आहे
>>>>

तुंबाड आणि कांतारा दोन्ही चित्रपट पाहिलेल्यांनी भडकपणाच्या स्केलवर वर दोघांना रेटींग द्यावे असे मी आवाहन करतो.

दाक्षिणात्य सिनेमात बेस भडकपणा मुळात जास्त असतो अशी सूट न दिल्यास भडकपणात कांताराला १० टक्के जास्त गुण देईन.

स्वदेश फ्लॉप हे चित्रपट सृष्टीचेच अपयश म्हणावे लागेल...
>>>>
ती वरची फ्लॉप चित्रपटांची लिस्ट पाहून हेच म्हणायला आलेलो.
बाकी रमड यांनी अजून त्या लिस्टीतली नावे कमी केली आहेतच.

पण स्वदेस सारखा चित्रपट तेव्हाही अपेक्षित कमाई करू शकत नसेल तर येणार्‍या काळात फार वाईट स्थिती असेल. कदाचित असे चित्रपटच बनणे बंद होतील. बनले तरी गर्दीत हरवून जातील. स्वदेस निदान शाहरूखच्या नावामुळे लोकांनी छोट्या पडद्यावर तरी पाहिला आणि मग आवडून पुन्हा पुन्हा पाहिला. पण येत्या काळात लोकप्रिय कलाकार अश्या चित्रपटात कामही करायला टाळतील.

कांतारात शेवटी जणु युद्धच सुरू होते आणि त्यात साहेब रंगमंचासमोर बसल्याप्रमाणे आरामात खुर्ची मांडून बंदूकीने याला टिप त्याला टिप करत बसतात. त्यांना टिपावं हे कॅमेरामन शिवाय कोणाच्याही डोक्यात येत नाही.

सरांनी मोजून दोन सिनेमे पाहिलेत लाटेमधले आणि एक ट्रेलर
त्यावरून त्यांनी बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमे यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांच्या लाडक्याची लालेलाल केली आहे, याला म्हणायचा व्यासंग Happy

पुन्हा एकदा आपल्या हुकमी सापळ्यात सगळ्याना अडकवू शकतो हे सरांनी सिद्ध केलं आहे Happy

याबाबत खरेच त्यांचे कौतुक

माझ्या धाग्यांना नावे ठेवणारे माझे किती टक्के धागे वाचतात .. चला कबूल करा पटापट प्रामाणिकपणे Happy

असो, तर माझ्यावर चर्चा टाळा. ईथला विषय माझ्यापेक्षा महत्वाचा आहे.

तर आपण विषयावर बोलूया _/\_

सर मी वाचतो, तुम्ही अतोनात फालतू लिहीत असला तरी मी तुमचे धागे वाचतो Happy

असो, तर माझ्यावर चर्चा टाळा. ईथला विषय माझ्यापेक्षा महत्वाचा आहे.>>>
इथलाच काय तर ढब्बू मिरची चे सारण बिघडले तर हा धागा ही तुमच्यापेक्षा महत्वाचा आहे
मुळात तुमच्यावर बोललं म्हणजे तुम्ही महत्वाचे आहात हा भ्रम आणि त्याचा भोपळा कधीतरी एकदा डॉकटर जाऊन फोडून घ्या
नंतर त्रास होईल त्याचा
दिवाळीत काही नवीन घेण्यापेक्षा यावर खर्च करा
खरेच भले होईल तुमचं

मला तर सिनेमा पेक्षा टीव्ही shows बघायला आवडतात.
विविध विषयावर असतात.
काही तरी कथा असते.
हर्षद मेहता वरची web series, आणि बिहार मधील राजकारण वर आधारित महाराणी ही वेब सिरीज खरेच मला आवडली
सेक्शुअल containt असणाऱ्या सिरियल ह्या दर्जा हिन असतात.
पण त्या च विषयात व्यवस्थित मांडणी केलेल्या सिरियल नितांत सुंदर असतात.
सिनेमा आता चांगला निर्माण होत नाही.
उत्तम दर्जा चे लेखक आता नाहीत किंवा असतील तर त्यांना संधी मिळत नाही.
उत्तम दर्जा चे संगीतकार,गीतकार आता नाहीत किंवा असतील तर त्यांना संधी मिळत नाही.
कामाविषयी निष्ठा असणारे,कलाकृती निर्माण करणे हेच ध्येय असणारी.

वेडी लोक आता नाहीत.
फक्त आर्थिक गणित च डोक्यात असतात.
त्या मुळे दर्जेदार चित्रपट आता निर्माण होत नाहीत.
छायाचित्रण पण गुणवत्ता धारक लोक नसल्या मुळे बकवास असते.
सर्व तंत्र सुविधा असून.
जुनी गाणी,त्यांचे बोल,संगीत ,छाया चित्रण किती उच्च दर्जा होते हे कोणी पण मान्य करेल.
कारण लोक वेडी होती कलेची.
काहीच तंत्र,सुविधा नसताना उत्तम कलाकृती त्या मुळे निर्माण झाल्या.
पिंजरा मधील एका एका गाण्यासाठी महिना महिना गेला आहे

असे वाचले आहे.

शाहरुख ,चे सिनेमे अमिताभ चे सिनेमे नसतात.
ते एक ॲक्टर आहेत
निर्माते किंवा लेखक,नाहीत.
उत्तम कथा,उत्तम चित्रीकरण,उत्तम संगीत,उत्तम निर्देशक सिनेमा खरे निर्माण करतात
सिनेमाच्या यशात त्यांचा मोठा वाटा असतो
Actor .म्हणजे सर्व काही नसतो
Submitted by Hemant 33 on 21 October, 2022 - 02:45

>>>>>>>

सर्वच चित्रपट दिग्दर्शकाचे नसतात, काही चित्रपट एखाद्या कलाकारासाठी खास तसे लिहिले बनवले जातात. पटकथा लिहितानाच त्या कलाकाराला डोळ्यासमोर ठेऊन लिहिली जाते.
अमिताभ, शाहरूख अशी उदाहरणे घेतली आणि यांचे अनुक्रमे अ‍ॅक्शन आणि रोमांटीक सिनेमे पाहिले तर हे सहज लक्षात येईल.

सध्याचे चित्रपट थिएटरात भव्य दिव्य बघायला काय वाटेल हे डोळ्यासमोर ठेऊन बनवले जात आहेत. बाकी गोष्टी दुय्यम झाल्या आहेत. मोठ्या पडद्यावर बघायला मजा येईल असे काही बनवले तरच पब्लिक थिएटरात येणार नाहीतर ओटीटीवर बघणार असे गणित झालेय. हळूहळू सगळ्यांचेच धंद्याचे गणित हे होणार आहे.

राजू श्रीवास्तव.
टीव्ही शो मधील त्यांच्या विनोदाच्या दर्जा .
आणि त्यांच्या स्वतःच्या खासगी कार्यक्रमात सादर केलेली कला.
फरक लगेच जाणवेल.
Chyd मधील bhavu कदम किंवा बाकी कलाकार च त्या शो मधील परफॉर्म आणि त्यांच्या स्वतःच्या स्टेज वरील परफॉर्म लगेच फरक जाणवेल.
निर्देशक हा खूप महत्वाचा घटक आहे .

फक्त त्याचे नाव कधी पुढे येत नाही.

दिग्दर्शकापेक्षाही मोठा असतो निर्माता, जो पैसा लावत असतो आणि त्याला पैसा कमवायचा असतो.
कमर्शिअल चित्रपटांबाबत धंद्याचे गणित ठरवते की तो चित्रपट कसा बनणार.
जो पैसा आधी तगड्या स्टारकास्टार खर्च केला जायचा तो आता स्पेशल ईफेक्ट तंत्रज्ञानावर केला जातोय असे वाटतेय.
कालच्या तारखेला एखादा सल्लूभाईसारखा लोकप्रिय कलाकार आपल्या नावावर पब्लिक थिएटरला खेचेल आणि पिक्चर बंडल आहे हे लोकांना कळेपर्यंत दोनेक आठवड्यात करोडो सुटलेले असतील असे गणित होते.
आता तेच विज्युअल ट्रीट दिली जातेय लोकांना, ट्रेलर बघूनच लोकं प्रभावित होतील आणि हा पिक्चर थिएटरातच बघायला मजा म्हणत जमतील असे गणित आहे.

उत्तम कलाकृती निर्माण करणे ह्याचे वेड जे पहिल्या लोकात होते ते आता नाही.
पैसे कमावणे हेच ध्येय आहे...
विनाकारण शरीर प्रदर्शन हे त्याचे फळ आहे.
ब्लू फिल्म कमी बजेट च्य असतात पण व्यवसाय करतात.. ...

त्या मुळेच उत्तम कलाकृती आता निर्माण होत नाहीत...दक्षिण भारतीय चितपट पण तसेच असतात
फक्त काही तरी कथा असते..
भारतीय रीती रीवाज हे बरोबर आहेत हे दाखवतात.
हिंदी चित्रपट मध्ये दर्जेदार कथा नसते.
असेल तर त्याची मांडणी योग्य नसते..
मध्येच विनाकारण अंग प्रदर्शन किंवा .
Atom song असतात..
त्यांना पण दर्जा नसतो
चित्रपट खेळवून ठेवत नाही

सरांनी मोजून दोन सिनेमे पाहिलेत लाटेमधले आणि एक ट्रेलर
त्यावरून त्यांनी बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमे यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांच्या लाडक्याची लालेलाल केली आहे, याला म्हणायचा व्यासंग Happy

पुन्हा एकदा आपल्या हुकमी सापळ्यात सगळ्याना अडकवू शकतो हे सरांनी सिद्ध केलं आहे Happy

याबाबत खरेच त्यांचे कौतुक
>>>>>>>>>>>
दिवाळी च्या पहिल्याच दिवशी फटाक्यांची आतिषबाजी पाहायला भेटली Lol
तुमची आणि ऋन्मेश ची जुगलबंदी म्हणजे फुल्ल एन्टरटेन्मेंट !

सरांनी मोजून दोन सिनेमे पाहिलेत लाटेमधले आणि एक ट्रेलर
त्यावरून त्यांनी बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमे यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांच्या लाडक्याची लालेलाल केली आहे, याला म्हणायचा व्यासंग Happy

पुन्हा एकदा आपल्या हुकमी सापळ्यात सगळ्याना अडकवू शकतो हे सरांनी सिद्ध केलं आहे Happy

याबाबत खरेच त्यांचे कौतुक
>>>>>>>>>>>
दिवाळी च्या पहिल्याच दिवशी फटाक्यांची आतिषबाजी पाहायला भेटली Lol
तुमची आणि ऋन्मेश ची जुगलबंदी म्हणजे फुल्ल एन्टरटेन्मेंट !

तुमची आणि ऋन्मेश ची जुगलबंदी म्हणजे फुल्ल एन्टरटेन्मेंट !
>>>>>>>
जुगलबंदी बिलकुल नसते. वन साईड मॅच असते.
ते माझ्यावर टिका करत राहतात. मी झेलत राहतो.
त्यांना टिका करायला मजा येते. मला टिकेने फरक पडत नाही.
आणि जर तुमच्यासारख्या बघ्यांनाही मजा येत असेल तर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी नाही तर वर्षाच्या ३६५ दिवस हे चालणार वर्षानुवर्षे चालू राहणार Happy

असो, विषयावर बोलूया आता ..

उत्तम कलाकृती निर्माण करणे ह्याचे वेड जे पहिल्या लोकात होते ते आता नाही.
पैसे कमावणे हेच ध्येय आहे...
>>>>>>>

प्रोब्लेम हाच तर आहे. उत्तम कलाकृतींना लोकांनी थिएटरात जाऊन पाहिले आणि त्यांना पैसा कमावून दिला तर साहजिकच त्या बनायचे प्रमाण वाढतील.
जसे माझे वर्षाचे बजेट थिएटरात दहा पिक्चर बघायचे असेल तर मी त्यात चांगल्या मराठी चित्रपटांना प्राधान्य देतो. आणि आवर्जून त्यावर परीक्षण लिहितो.
मराठी चित्रपट थिएटरात पाहिले तर पैसा येणार, पैसा आला तर ते निर्माण करताना लावणार, आणि तांत्रिकदृष्ट्या आणखी सरस बनणार, जेणेकरून थिएटरात बघायला आणखी मजा येईल. जसे की झिम्मा थिएटरात बघायला मजाच आली होती. त्यासाठी अचाट आणि अतर्क्य स्पेशल ईफेक्टच हवेत असे गरजेचे नाही.

बॉलीवुड चे सिनेमे चालत नाही म्हणून रूनमेश साऊथ च्या इंडस्ट्री वर राग काढतोय की काय अशी दाट शंका मला यायला लागली आहे .
साऊथ च्या तुलनेत बॉलीवुड कंटेंट द्यायला कमी पडतंय हे तरी मान्य आहे की नाही ?
आर आर आर जर लो क्वालिटी वाटा असेल तर संपूर्ण देशात त्याने गल्ला का जमवला असेल ?
लोकांना काय आवडते ते न दाखवल्या मुळेच बॉलीवूड ची वाट लागली आहे , बॉयकॉट बॉलीवुड ही नंतर ची गोष्ट !
शाहरुख ने हात पसरवून
आणि आमिर ने डोळे वटारून डायलॉग बोलणे आणि तेच तेच पाहणे पब्लिक का बोअर झालंय .

जस्ट इमॅजिन पुष्पा ,आर आर आर , केजीएफ आणि बाहुबली हे सिनेमे बॉलीवुड चे पण साऊथच्याच बटबटीत दर्जाचे असते फक्त कलाकार सगळे बॉलीवुड चे असते तर सिनेमे हिट झालेच असते ना ?
कारण सध्या लोकांना तेच हवंय !
मग आपोआप बॉयकॉट बॉलीवुड ट्रेण्ड बाजूला पडला असता .
हॉलिवुड मधील सिनेमे बटबटीत नसतात का ?
सध्या तरी बॉलीवुड आणि साऊथ इंडस्ट्री दोघेही एकाच दर्जाचे सिनेमे बनवतात असे दिसतंय .
मर्व्हाल कंपनी मला वाटतंय गेली पंधरा वीस वर्ष तरी काल्पनिक कथावर आणि फक्त स्पेशल इफेक्ट वर आधारित सिनेमे बनवत आहे तरी जगभर तुफान चालले , बिलियन डॉलर्स चा बिझिनेस केला असेल .
त्याच पठडीत आर आर आर , बाहुबली बसतात , फक्त थोडासा देसी टच ......
पुष्पा आणि के जी एफ मात्र गुन्हेगार चे उद्दतिकरण मध्ये मोडतात ......

बॉलीवुड चे सिनेमे चालत नाही म्हणून रूनमेश साऊथ च्या इंडस्ट्री वर राग काढतोय की काय अशी दाट शंका मला यायला लागली आहे .
>>>>

फुरोगामी आपली पोस्ट आता वाचली. मी बॉलीवूडचा लाडका नाहीये. कोणाचा राग नाहीये. कोणाचा लोभ नाहीये.

पुष्पा आणि के जी एफ मात्र गुन्हेगार चे उद्दतिकरण मध्ये मोडतात ......
>>>
+७८६
आणि या लाटेत ते ही चालेतय
ही चिंतेची बाब आहे..

आता कांतारा आलाय. काही लोकं याची तुलना तुंबाडशी करायचा चावटपणा करत आहेत. तुंबाड क्लासिक होता. हा ट्रेलरवरून काहीतरी भडक भयानक प्रकार दिसतोय. याचे कौतुक करणारे तेच लोकं आहेत ज्यांना वर उल्लेख केलेले तीन चित्रपट आवडलेले आहेत. त्यामुळे मी माझ्यापुरते तरी याच्या नादाला न लागायचे ठरवले आहे. >>>>>>>>> कांतारा अजिबात भडक किंवा बटबटीत नाही। बाहुबली आणि पुष्पा एकदम झकास। RRR अगदीच बकवास.

मला आर आर आर बोरिन्ग वाटला..
लोक धाउन येतिल माझ्यावर पण पुष्पा पण फार फार पकाउ वाटला.
अल्लु अर्जुन म्हणुन किन्वा काय रश्मिका म्हणुन .. बघणार किती .. आत्याचार वाटला
मला वाटतय हिन्दि कन्टेन्ट चांगल, पण विज्युअल ट्रिट नसेल तर ओटिटि वर येत आहे , बड्या बड्या आक्टर्सच पण .. जसं आलिया: डर्लिन्ग्स
आणि पब्लिक खेचणे थिएटर पर्यन्त साध्या आशयघन मुव्हीज मधे जमत नाहिये त्यामुळे थिएटर साठी तामझाम असलेले मुव्हिज जात आहेत..
आणि मोस्टली दक्शिणात्य मुव्हीज मधे ताम्झाम असतोच...
तसही चन्गले कन्टेन्ट असलेले मुव्हीज मस्त घरी बसुन बघायची सवय पण लागलिये सगल्यान्ना .. करोना मधे वेब सिरिज ई. ची सोय झाल्याने

आनंदी +७८६
सध्या विज्युअल ट्रीट आहे की नाही यावर थिएटरला जायचे की नाही हे ठरत आहेत. त्यासोबत चांगले कंटेंट असेलही किंवा नसेलही.

मला आर आर आर बोरिन्ग वाटला..
लोक धाउन येतिल माझ्यावर पण पुष्पा पण फार फार पकाउ वाटला. >>> आहेच तो तसा Happy बहुधा चित्रपटांच्या मुख्य धाग्यांवर झाली होती चर्चा. मीही हेच लिहीले होते.

आर आर आर, पुष्पा, केजीएफ हे या चढत्या क्रमाने पकाऊ आहेत.

Pages