भडक बटबटीत दाक्षिणात्य सिनेमे आणि बॉयकॉट बॉलीवूड !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 October, 2022 - 13:28

आर आर आर चित्रपट त्यावरची चर्चा ऐकून पाहिला. अपेक्षा बाहुबलीच्या होत्या. पण बघितल्यावर आरारारा का बघितला असे झाले.

केजीएफबाबत सावध भुमिका घेतली आणि थोडक्यातच तो चित्रपट काय कॅटेगरीचा आहे हे ओळखत वेळ आणि मनस्ताप दोन्ही वाचवले.

पुष्पा मात्र पुर्ण बघितला. अल्लू अर्जुन नाव ऐकून होतो. त्याचा स्वॅग आवडला. पुर्ण चित्रपटाचा डोलारा त्यावरच होता. बाकी चित्रपट म्हणून कलाकृती सामान्य वाटली.

आता कांतारा आलाय. काही लोकं याची तुलना तुंबाडशी करायचा चावटपणा करत आहेत. तुंबाड क्लासिक होता. हा ट्रेलरवरून काहीतरी भडक भयानक प्रकार दिसतोय. याचे कौतुक करणारे तेच लोकं आहेत ज्यांना वर उल्लेख केलेले तीन चित्रपट आवडलेले आहेत. त्यामुळे मी माझ्यापुरते तरी याच्या नादाला न लागायचे ठरवले आहे.

असो,
ईथे हे चित्रपट आवडणार्‍यांच्या अभिरुचीला बिलकुल नावे ठेवायची नाहीयेत.

पण हे चित्रपट ज्या कॅटेगरीचे आहेत त्या चित्रपटांना आपल्याकडची पब्लिक कधी डोक्यावर उचलून घ्यायची नाही.

हल्ली आपण शाहरूखच्या रोमांटीक चित्रपटांना, चोप्रा जोहर यांच्या पंजाबी चित्रपटांना, बॉलीवूडच्या नेपोटीजमला नावे ठेवू लागलो होतो. बॉयकॉट बॉलीवूड म्हणून ट्रेंडही सुरू झालाय. बरेच चित्रपटांना याचा फटकाही बसलाय.

हरकत नाही !

पण पर्याय म्हणून आपण काय उभे करत आहोत? तर हे भडक बटबटीत सो कॉल्लड लार्जर दॅन सुपरमॅन साऊथ ईंडियन सिनेमे डोक्यावर घेत आहोत?

त्यामुळे यांना टक्कर द्यायला बॉलीवूडही आता काय करतेय, तर ब्रह्मास्त्र मैदानात उतरवतेय..
काहीतरी चुकतेय...

आपल्या येत्या पिढीतील प्रेक्षकवर्ग प्रामुख्याने याच चित्रपटांवर पोसला जाणार आहे जो ट्रेंड बॉक्स ऑफिसवर आज आपण सेट करत आहोत.
कितीही नावे ठेवली तरी यापेक्षा ते शाहरूखचे रोमांटीक चित्रपट कैक पटीने सरस होते ज्यांना बघत आमची नव्वदीची पिढी लहानाची मोठी झाली.

आज चांगले आशयघन चित्रपट आले तरी ते ओटीटीपुरतेच मर्यादीत राहणार आहेत. आणि थिएटरला पब्लिक खेचायला असेच स्पेशल ईफेक्टचा मारा असलेले भडक बटबटीत चित्रपट बनवले जाणार आहेत. आणि ते चालणार सुद्धा आहेत. त्यांचीच जनमाणसात हवा होणार आहे.

हा जो नवा ट्रेंड सेट होतोय तो एक प्रेक्षक म्हणून आपल्याला आणि भारतीय चित्रपटसृष्टीला कुठे घेऊन जाणार आहे यावर चर्चा करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख च लोल आहे....
हेच शारुख आला तेव्हा त्याच्याबद्दल बोललं गेलेलं जे आज या लेखात टॉलीवूड बद्दल लिहिलं आहे.... hahaha
आणि अभिरुची शब्द तर भयंकर च अवडण्यात आलेला आहे।

भडक बटबटीत दाक्षिणात्य सिनेमे मेनस्ट्रीममध्ये येणे काय किंवा सध्याचा ढासळलेला राजकारणाचा चिंताजनक स्तर काय किंवा तुमच्या फुटकळ धाग्यांचा मायबोलीवर रतीब काय ... 'काळ सोकावला आहे' हे त्यामागचे सत्य आहे ... आता मेलेल्या म्हातारीच्या नावाने गळेकाढू धागे पाडून शिमगा करण्यात काय हशील आहे सांगा बरं Happy

@ केशवकूल
आर आर आर ऑस्करला गेला आहे का?
गूगल केले तर कुठे हो तर कुठे नाही म्हणत आहेत.
खरे असेल तर भारताची लाज जाणार आहे..

हेच शारुख आला तेव्हा त्याच्याबद्दल बोललं गेलेलं जे आज या लेखात टॉलीवूड बद्दल लिहिलं आहे...
>>>

शक्य नाही.
शाहरूखचे सुरुवातीचे पिक्चर डर, बाजीगर, अंजाम, डीडीएलजे, चमत्कार, राजू बन गया जंटलमॅन, कभी हा कभी ना, येस बॉस.. वगैरे एक सो एक हटके होते. यात तो ओह डार्लिंग येह है ईंडिया सुद्धा घ्या..
ऐंशीच्या दशकात जी मरगळ आलेली हिंदी चित्रपटसृष्टीला ती त्याने घालवली.

शाहरुख ,चे सिनेमे अमिताभ चे सिनेमे नसतात.
ते एक ॲक्टर आहेत
निर्माते किंवा लेखक,नाहीत.

उत्तम कथा,उत्तम चित्रीकरण,उत्तम संगीत,उत्तम निर्देशक सिनेमा खरे निर्माण करतात
सिनेमाच्या यशात त्यांचा मोठा वाटा असतो
Actor .म्हणजे सर्व काही नसतो

पुष्पा मात्र पुर्ण बघितला. अल्लू अरविंद नाव ऐकून होतो. त्याचा स्वॅग आवडला. >> अल्लू अरविंद हा तेलुगू प्रोड्यूसर आहे लक्षात आले असते. पुश्पा मधे अल्लु अर्जुन होता. चुकीच्या माणसाचा स्वॅग आवडला.

आपल्या येत्या पिढीतील प्रेक्षकवर्ग प्रामुख्याने याच चित्रपटांवर पोसला जाणार आहे जो ट्रेंड बॉक्स ऑफिसवर आज आपण सेट करत आहोत. >> बरोबर!

भारतीय मनोरंजन क्षेत्रात विशेषतः चित्रपट व चॅनेलमधल्या मालिका या माध्यमात क्रियेटिव्ह लोकांची वानवा आहे. गल्लेभरू, निर्माते टुकार अभिनय, दुय्यम दर्जाचे लेखक यांमुळे क्रियेटिव्ह काही पाहिल्याचा आनंद भारतीय कलाकृती देऊ शकत नाहीत. जे काही थोडे क्रियेटिव्ह लेखक- दिग्दर्शक बरे काम करताहेत ते ओटीटीवरच(टिव्हीएफ वगैरे). तिथे देखिल आता पाश्चिमात्य कंटेंटच्या प्रभावामुळे टेम्प्लेट्स तयार झाली आहेत. नवे, चकित करणारे, संपूर्ण अनुभव देणारा कंटेंट भारतीय माध्यमांत मिळणे दुरापास्त आहे. इथल्या मातीतून निघालेले उत्तम सृजनात्मक काम होण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो त्याचा पूर्ण अभाव आहे भारतीय लोकांत. बाकी, दाक्षिणात्य चित्रपटातला थिल्लरपणा आपण भव्यता म्हणून वाखाणणार असू तर असोच. त्यातल्या त्यात मल्याळी चित्रपट बऱ्यापैकी कथा, लेखक वगैरेवर पैसे खर्च करायला इच्छूक असतात. बाकी सगळीकडे सुमारांची सद्दी.

Is RRR nominated for Oscars?

After being rejected as India's official entry for Oscar RR has launched a campaign to file nomination in 14 categories as part of their "For your consideration (FYC)" campaign. Team RRR's Oscar campaign was formally introduced last Friday with a massive screening at the Chinese Theatre in Los Angeles.06-Oct-2022
Is RRR an Oscar race?
SS Rajamouli's 'RRR' may not have been chosen as the Indian official entry at the Oscars 2023 but the makers on Wednesday announced that they would be joining the Oscar race separately. The film has been submitted for Oscars 2023 in 14 categories under 'For your consideration' campaign.07-Oct-2022

ऐंशीच्या दशकात जी मरगळ आलेली हिंदी चित्रपटसृष्टीला ती त्याने घालवली. >>>>>>>>>
मरगळ घालवली ?

शाहरुख चे हे सिनेमे मला जाम आवडले Happy

फॅन , झीरो , बिल्लू , पहिली , स्वदेश , जब हरी मेट सेजल , कोयला , असोका , वन टू का फोर ,किंग अंकल , माया मेमसाब , जमाना दिवाना , इंग्लिश बाबू देशी मेम , चाहत , शक्ती द पावर , आणि रावण !
तब्बल १६ फ्लॉप सिनेमे आहेत , फिल्म इंडस्ट्री किती वर्ष पाठीमागे गेली असेल ?

स्वदेश फ्लॉप हे चित्रपट सृष्टीचेच अपयश म्हणावे लागेल... इतका सशक्त मोहन भार्गव शाखा सोडून कोणीच करू शकला नसता ..

बिल्लूचा हिरो इरफान खान होता. किंग अंकलचा हिरो जॅकी होता. शक्ती हा करिष्माचा पिक्चर आहे. माया मेमसाब हा दिपा साहीचा पिक्चर आहे (शाहरूखचा या दोन्हीमधे extended cameo आहे असं म्हणता येईल) या चारही पिक्चर्स मधे जर शाहरूख खान लक्षात रहात असेल तर ते त्याचं यशच म्हणायला हवं.
कोयला(Budget est. ₹12 crore , Box office est. ₹28.05 crore), स्वदेस(Budget ₹25 crore , Box office est. ₹40 crore), चाहत(Budget ₹100.5 million , Box office ₹124.85 million), रावन (Budget ₹100–150 crore , Box office est. ₹207 crore) आकडेवारी पाहता नक्कीच फ्लॉप नाहीत.
राहिले ८ पिक्चर. त्याने फिल्म इंडस्ट्री इतकी पण पाठीमागे जाणार नाही, नाही का?

Crore मध्ये collection चे आकडे हे आर्थिक दृष्ट्या निर्माता फायद्यात आहे की तोट्यात हेच दर्शवतात.
तो चित्रपट चांगला होता हे दर्शवत नाहीत.
तिकीट दर बघता . भारतीय लोकसंख्येच खूप
कमी हिस्सा चित्रपट बघतात.

1 ते 2% लोक च चित्रपट बघतात.

केवळ हल्ली चांगले चित्रपट येण्याची संख्या फार कमी आहे म्हणून कोणी #बायकॉट-तमुक-फिल्म-इंडस्ट्री करत नाहीत.
लोक बघणार नाहीत चित्रपट एवढेच.
अन्यथा #बायकॉट-मराठी-फिल्म-इंडस्ट्री केव्हाच सुरू झाले असते.

बायकॉट बॉलिवूड एक पद्धतशीरपणे सुरू केलेला गेम आहे.
सुशांतसिंग राजपूत आत्महत्ये नंतर याची सुरवात झाली.
अख्खे बॉलीवूड गांजाडी आहे असा आपल्याला साक्षात्कार झाला. जमेल त्या कलाकारांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची त्यांनी एकदा कुणाला माल है क्या विचारले म्हणुन किंवा सरळ चक्क अर्धा तोळा गांजा सापडला अशा वावड्या उठल्याने मीडिया आणि सोशल मीडियावर छि थु सुरू झाली.
समाजाला लागलेली कीड साफ करण्यास हे सगळे सुरू आहे , असे म्हणुन या छि थुचे लोक कौतुक करू लागले. एकदा का बॉलिवूड ची ही कीड साफ केली की तिकडे किलो, टना मध्ये सापडत असलेला गांजा आपसूकच बंद होणार होता. त्यामुळे अमुक मंत्र्याच्या गाडीत एवढा गांजा सापडला अशा बातम्या आल्या तरी तिकडे लक्ष देण्याची काहीच गरज उरली नव्हती.

पण असे जंग जंग पछाडून हाती काही लागले नाही.
बॉलिवूडचे #नावडते कलाकार यात कुठे अडकले नाहीत त्यांचे चित्रपट येतच राहिले. केवळ स्पेसिफिक नटांना टारगेट करणे पुरेसे नव्हते कारण हे लोक आतून एकमेकांना सपोर्ट करत असावेत असा संशय बळावला होता. मग आपल्याला अनेक नवनवीन साक्षात्कार होऊ लागले.
बॉलिवूड ने नेहमी कपाळाला टिळा लावणारे व्हिलन दाखवले, नेहमीच फक्त आपल्याच संस्कृतीवर घाला घातला आहे, त्या पेक्षा दाक्षिणात्य चित्रपट बघा ते आपली संस्कृती जपतात व तिचा पुरस्कार करतात. आपण अशा या वाईट बॉलीवूडला बहिष्कृत करू या आणि आपल्या चांगल्या दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीला डोक्यावर घेऊ या असा ट्रेंड सुरू झाला.

आता बघत बसा बटबटीत चित्रपट.
आणि ऐकत बसा ऋन्मेष आणि च्रप्स कडुन शाहरुख खानचे बटबटीत कौतुक.

ओ अल्लू अरविंद हे पुष्पा ऐक्टर अल्लू अर्जुन चे वडिल आहेत..करेक्ट करता का जरा तिथे.

मानव>>>> सहमत.

आरारार, पुष्पा आणि केजीएफ आवडले नाहीत, खरंच बटबटीत आणि function at() { [native code] }अर्क्य आहेत. पण पोन्नियीन सेल्वन प्रचंड आवडला. function at() { [native code] }इशय सुंदर आहे तो. कांतारा बघायची पण इच्छा आहे. त्याचा ट्रेलर जरी भडक (रंगात) असला तरी तो पुष्पा-छाप भडक (विषयात) नाही वाटत. विषयाची हाताळणी कशी केली आहे ते बघितल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे सगळेच दाक्षिणात्य चित्रपट हे भडक असतात किंवा सगळेच बॉलिवुड टाकाऊ असतात - दोन्हीशी असहमत. कांताराबद्दल तर ट्रेलरवरून आरारार, पुष्पा आणि केजीएफ शी तुलना करावी असे अजिबात वाटले नाही. एक तर तमिळ, तेलगू आणि कन्नडा चित्रपटसृष्टीत वेगळेपण आहे. तेलगू चित्रपट जास्त भडक आणि स्त्रियांना ऑब्जेक्टिफाय करणारे वाटतात. तमिळ जास्त अतर्क्य (तो वरचा हाच शब्द होता पहिल्या वाक्यात, समजून घ्या), आणि कन्नडा हे जास्त मातीतले वाटतात. तरी केजीएफ कन्नड असूनही उगाच गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारा वाटला (तेलगू पुष्पासुद्धा). त्यामानाने कांतारा फारच वेगळा आहे. तो बघित्ल्याशिवाय मत बनवू नये, विशेषतः सर्वच स्तरांतून त्याचं कौतुक होत असताना निदान तो आधी बघून मगच टीका करावी. बॉलिवुडबाबतीतही तेच.

त्यामुळे सगळेच दाक्षिणात्य चित्रपट हे भडक असतात
>>>
असे बिलकुल नाही म्हणायचेय. पण जे चित्रपट ईथल्या बॉक्स ऑफिसवर धंदा करत आहेत ते तसेच येत आहेत ना.
जसे तुम्ही वर म्हटले की कन्नड हे जास्त मातीतले वाटतात. पण ईथे आपल्या डोक्यावर केजीएफ येऊन बसला ना. त्यांचे मातीतील चित्रपट त्यांच्या मातीतच राहिले. त्यामुळे ते या चर्चेतून बाद होतात. कारण मुळात या धाग्यावर तिथल्या चित्रपटांचे मूल्यमापन करायचेच नाहीये. तर आपली पब्लिक त्या फिल्म ईंडस्टीमधून वेचून वेचून काय डोक्यावर घेत आहेत तो ईथे मुद्दा आहे.

तो बघित्ल्याशिवाय मत बनवू नये >>> हे मत एका चित्रपटाविषयी नाही तर जी लाट आली आहे त्याबद्दल आहे. या लाटेत एखादा अपवाद निघालाच तरी तो वेचायला ते सारेच चित्रपट बघून मग प्रत्येकाबद्दल वेगळे मत बनवावे हे प्रॅक्टीकल नाही.

पण पोन्नियीन सेल्वन प्रचंड आवडला. >>> ह्ममम. कदाचित म्हणूनच तो हिंदी बॉक्स ऑफिसवर तितका नाही चालला. यातून मुद्दा आणखी स्पष्ट होतो.

However, the Tamil dubbed version of this film has found few takers. 'Ponniyin Selvan: I' Hindi has underperformed, earning just Rs 21.75 crore nett

बटबटीत धागे बऱ्याचदा जास्त लोकप्रिय होताना दिसतातच की.
असे धागे, त्यांची लोकप्रियता, आवडणाऱ्यांची अभिरुची, काढणाऱ्यांचा एकतर स्वतः बद्दल गोड गैरसमज किंवा "बिनदर्जेदार पण जे विकतं तेच पिकवतो" याची खरंतर स्वतःलाच असलेली वास्तवाची जाणीव, अस असूनही लोकप्रियता (Fan Following), वगैरे, वगैरे.. हे सर्व बटबटीत चित्रपटांच्या बाबतीत समांतर उदाहरणच की..

ऑस्कर ला तो गुजराती चित्रपट गेलाय ना... चेल्लो शो...>>>
ते केवळ गुजरात्यांना खुश करून मतंं उकळण्यासाठी.
>>>>>

ऐंशी आणि नव्वदीच्या आसपास बॉलीवूडमध्ये वाट लावायला अंडरवर्ल्ड घुसलेले. आता राजकारणी ते काम करतात. असो, हा आणखी एक वेगळाच आणि व्यापक विषय आहे. पण बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंड याचेच फळ आहे.

आरारार मनोरंजकच्या पुढे काहीही असे माझे मत आहे. डेफिनेटली न ऑस्कर मटेरियल. (अर्थात, ऑस्कर फक्त क्वालिटी सिनेमा मिळवतात असा काही दावा नाही.)

पण ऋ जी,
कांतारा न बघताच इतका का त्रागा का करताय ? किमान बघा तरी, मग बोला. मी सुद्धा नाही पाहिला पण बघेन.

तुंबाडचा ट्रेलर सुद्धा भडकच आहे. इतकेच काय खुद्द तुंबाड सिनेमा भडकच आहे (intense ?). तेव्हा, मुखपृष्ठावरून पुस्तकाचे अवलोकन करू नका.

Pages