"हस्तकला उपक्रम - १ :* विषय : पेन्सिल शार्पनर कचऱ्यापासून कलाकृती ." - रेहान (मायबोली आयडी - mrunali.samad)

Submitted by mrunali.samad on 10 September, 2022 - 10:08

रेहानने थोडे गुगल थोडे स्वतःहून फायनली बनवले निसर्ग द्रुश्य आणि माहिराने त्या दोन मुलींना नावं पण दिली आहेत एक माहिरा आणि तीची स्कूल फ्रेंड मिकारिका .

IMG_20220910_193340.JPG

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्त!!! शाब्बास रेहान Happy माहिरा आणि मिकारिका गोडच आहेत. पण ती फुलं, झाड सुर्य पण खुप क्युट दिसतोय

Are छानच!
माहिरा आणि मिकारिका(निहारिका तर नव्हे?) मस्तच फ्रॉक धरून आहेत.

थँक्यु.
मला पण ते निहारिका वाटतंय पण ती शाळेतल्या मुलांची जी नावं सांगते .. बॉईज- कारमुगीलन, तन्वा, समन्यु
गर्ल्स- द्दुत्ती, मिकारिका
यांची खरी नावं काय असतील मला अजून कळली नाहीऐत. Lol

छानच केलंय! रेहानला शाबासकी! फ्रॉक्स मस्तच.
माझ्या मुलाच्या अपर केजीच्या शिक्षिकेचं नाव अपर्णा होतं, पण त्याच्या वर्गातल्या मुलीने स्वतःच्या आईला सांगताना 'अपोलो' सांगितलेलं Rofl विश्वास न बसल्यामुळे तिने (आईने) मला विचारलं तेव्हा तिला उलगडा झाला.

माहिरा आणि मिकारिका गोडच आहेत. पण ती फुलं, झाड सुर्य पण खुप क्युट दिसतोय+१
छानच रेहान! Happy

यांची खरी नावं काय असतील मला अजून कळली नाहीऐत>>  Lol

फ्रॉक आणि फक्त फुलंच असलेली झाडं मस्त. चेहर्‍यावर कॉन्सन्ट्रेशन लिहिलंय. फोटो न सांगता घेतला की पोझ द्यायची सवय आहे?
मुलं एकमेकांना इतकी कठीण नावं ठेवतात ? मज्जाय !

माझ्या मुलाच्या अपर केजीच्या शिक्षिकेचं नाव अपर्णा होतं, पण त्याच्या वर्गातल्या मुलीने स्वतःच्या आईला सांगताना 'अपोलो' सांगितलेलं Rofl विश्वास न बसल्यामुळे तिने (आईने) मला विचारलं तेव्हा तिला उलगडा झाला... Lol

माझ्या मुलीच्या HM शिखा मॅडम.. पहिल्या interview नंतर घरी आल्यावर मला विचारते की त्यांच्या आई बाबांनी असं का नाव ठेवलंय.. शी.. खा Sad

वावे Lol
मनिम्याऊ, अरे देवा Lol

आधी फोटो काढतेय म्हटल्यावर वेडेवाकडे चेहरे करत होता गमतीत, राहू दे म्हटलं.तुझी एन्ट्री च नाही टाकणार माबोवर मग हे सीरियस चेहरा करून बसला Lol

सगळ्यांना थँक्यु!!

मस्त ....
कलात्मकतेने बनवलंय रेहानने चित्र..

रेहान.gif

पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला खालील विशेष पुरस्कार देण्यात येत आहे.

हस्तकला उपक्रम - १   - रेहान.jpg