लहान मुलांना फटके मारावेत का?
गेले चार वर्षे या प्रश्नाचे उत्तर शोधतोय.
मी स्वत: एकेकाळी लहान मुलांना मारू नये या मताचा होतो. सोशल साईटवरील चर्चात मी या माझ्या मताला बरेचदा डिफेंडही केले. एकेकाळी जैसे बोलावे तैसे वागावे म्हणत कधी मुलांवर हात उचलला नव्हता. पण पुढे जाणवले हे काम करत नाहीये. त्यामुळे सध्या आमच्या घरात गरजेनुसार मुलांना मारणे अलाऊड केले आहे.
मुलांना धाक राहावा असे मारणे मला जमत नाही. म्हणून आम्ही मध्यंतरी बाथरूममध्ये बंद करणे हा प्रकार सुरू केलेला. पण नंतर तो चुकीचा वाटला. मुलांच्या मनात त्याने भिती राहतेय असे वाटले. म्हणून ते बंद केले. सध्या तशीच गरज पडलीच तर मारायचे काम त्यांची आई करते. मुलांवर कोणाच्या तरी माराचा (वा कुठल्याही प्रकारचा) धाक असावा असे वाटते.
शेवटी एक पालक म्हणून आपण काय बघतो, तर मुलांना योग्य वळण लागावे, त्यांची मानसिक जडणघडण योग्य व्हावी, चांगले शिस्त आणि संस्कार त्यांच्या अंगी बाणवावेत. विचार नेहमी त्यांच्या हिताचाच असतो. फक्त प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. जे प्रत्येक मुलानुसार बदलू शकतात. तरी आपण जे करतो ते योग्य वा अयोग्य हे कुठेतरी पडताळून घेणे गरजेचे आहे.
लहान मुलांचे मानसशास्त्र हा फार गहन विषय आहे. पण तरीही तो आपल्या सर्वांना माहीत असणे, याबद्दल जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. यावर विविध दृष्टीकोनातून आणि आपापल्या अनुभवांतून चर्चा झालेली आवडेल.
हा धागा वाचून त्या कल्चरल शॉक
हा धागा वाचून त्या कल्चरल शॉक धाग्याची आठवण झाली.
शेवटी एकाचं कल्चर तो दुसऱ्याचा शॉक.
मायबोलीवर कल्चरल बदलाचे वारे वहात आहेत. या रेटने बायकोला फटके मारण्याबद्दलही धागा निघू शकेल.
बायकोला फटके मारण्याबद्दलही
बायकोला फटके मारण्याबद्दलही धागा निघू शकेल.>>किंवा नवर्याला
आम्ही मध्यंतरी बाथरूममध्ये
आम्ही मध्यंतरी बाथरूममध्ये बंद करणे हा प्रकार सुरू केलेला. पण नंतर तो चुकीचा वाटला.>> हे इंडियन स्टाईल टाईम आऊट आहे
>>>>>>
एक्झॅक्टली म्हाळसा. ती चूक रिअलाईज झाली. ते सुद्धा कुठले एक्स्पर्ट ओपोनिअनची गरज न घेता स्वत:लाच जाणवले की यात काहीतरी चुकतेय. पोराला धपाटा किती जोरात मारायचा हे आपल्या कंट्रोलमध्ये असते. त्यानंतर आपण त्याला जवळ घेऊन पाठ चोळली तर लगेच हिशोब संपतो. पण मुलाला वेगळे तोडल्यावर त्याच्या मनात काय चालते यावर आपला बिलकुल कंट्रोल नसतो. फक्त त्यानंतर मुले ऐकतात हेच आपले ध्येय असावे का? जी मुले खरेच टाईम आऊटला घाबरतात त्यांच्या मनावर हे परीणाम करत असणार त्याशिवाय हे होते का?
आम्ही मध्यंतरी बाथरूममध्ये
आम्ही मध्यंतरी बाथरूममध्ये बंद करणे हा प्रकार सुरू केलेला. पण नंतर तो चुकीचा वाटला.>> हे इंडियन स्टाईल टाईम आऊट आहे
>>>>>>
एक्झॅक्टली म्हाळसा. ती चूक रिअलाईज झाली. ते सुद्धा कुठले एक्स्पर्ट ओपोनिअनची गरज न घेता स्वत:लाच जाणवले की यात काहीतरी चुकतेय. पोराला धपाटा किती जोरात मारायचा हे आपल्या कंट्रोलमध्ये असते. त्यानंतर आपण त्याला जवळ घेऊन पाठ चोळली तर लगेच हिशोब संपतो. पण मुलाला वेगळे तोडल्यावर त्याच्या मनात काय चालते यावर आपला बिलकुल कंट्रोल नसतो. फक्त त्यानंतर मुले ऐकतात हेच आपले ध्येय असावे का? जी मुले खरेच टाईम आऊटला घाबरतात त्यांच्या मनावर हे परीणाम करत असणार त्याशिवाय हे होते का?
च्रप्स,
च्रप्स,
मेधावि यांच्या पोस्टमध्ये आवरा असे काही नाही.
मुले अटेंशन सीकर असतात. त्यांना त्यासाठी ओरडा वा मार खायचीही तयारी असते. पण त्यांना घरच्यांचे स्पेशली आईवडिलांचे अटेंशन हवेच असते. आणि हा त्यांचा दोष नसून ती त्यांची मानसिक गरज असते. आणि हो यावर ऊपाय म्हणून मुलांना वेळ द्या म्हटले तरी कितीही वेळ दिला तरी मुलांना तो कमीच असतो.
जेवढे टाईम आऊटबद्दल वर समजले त्यात मुलांच्या या मानसिक गरजेवरच फटका मारून त्यांना वठणीवर आणले जाते. आता काय योग्य आणि काय अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवावे.
अमेरीकेत हे होत असेल तर तिथल्या मुलांनीही हे स्विकारले असेल. त्यामुळे नो कम्प्लेंटस, नो कॉमेंटस.
पण भारतात राहणाऱ्या पालकांनी मात्र हा प्रयोग आपल्या मुलांवर करू नये असे वाटते.
लहान मुलांना फटके मारावेत का?
लहान मुलांना फटके मारावेत का? >> इथे 'कोणाच्या मुलांना' असा प्रश्न उपस्थित केल्यास ह्या उद्बोधक चर्चेला आणखीन एक नवीन मिती प्राप्त होईल.
time-outs increase emotional
time-outs increase emotional dysregulation, fail to teach children distress tolerance skills, isolate them when they need support, and may re-traumatize children who have experienced abuse.
---
यात जरा जरी तथ्य असेल तर प्लीज थांबवा हा प्रकार.. निदान याचे समर्थन तरी बिलकुल करू नका _/\_>>> मस्त गेम खेळले सर इथे! शेमिंग चे हत्यार त्यांच्यावरच परत उलटवले.
ऋन्मेष त्या संपूर्ण पोस्ट
ऋन्मेष त्या संपूर्ण पोस्ट बद्धल आवरा नाही लिहिलेय.. त्या पर्टिक्युलर वाक्याबद्धल म्हणालोय जे कोट केले आहे...
च्रप्स ओके
च्रप्स ओके
पण त्या वाक्याला सुटे न करता एकूणच पोस्टचा जो अर्थ मला लागला तो मी लिहिलाय. त्याला माझेही अनुमोदन आहे ईतकेच.
म्हणजे ऋन्मेष तुम्ही या लॉजिक
म्हणजे ऋन्मेष तुम्ही या लॉजिक ला अनुमोदन देताय-
फटक्याच्या निमित्तानं का होईना, त्यांना आईचा स्पर्श, हवा असतो, तिच्या जवळ जायचं असतं.
फटक्याच्या निमित्तानं का
फटक्याच्या निमित्तानं का होईना, त्यांना आईचा स्पर्श, हवा असतो, तिच्या जवळ जायचं असतं.
>>>>
जरा वाक्य रचना बदलतो च्रप्स,
त्यांना अटेंशन हवे असते. मग त्यासाठी ते फटके पडतील अशी मस्ती करायलाही तयार असतात. ती किंमत मोजायला तयार असतात.
पण याचाच दुसरा अर्थ असाही लक्षात येतो की ते फटके ईतके जोराचे नसतात की ते त्यांना लागावेत.
मोरोबा, शेमिंगचे हत्यार
मोरोबा, शेमिंगचे हत्यार प्रत्युत्तर म्हणून असे वापरले नाहीये. तर तो मुद्दा खरेच विचारात घेण्याजोगा आहे.
माराबाबत त्याचे अमुकतमुक दुष्परीणाम एखाद्याला सांगितले तर ते पटकन पटतीलही. कारण मारासोबत शारीरीक पीडा येते जी सामान्य लोकांनाही रिलेट करता येते. त्यामुळे मारणे हा ऊपाय अवलंबताना जोरात मारू नये वा मारल्यावर मुलाला लगेच भावनिक आधारही द्यावा हे करून आपण काळजी घेऊ शकतो.
पण टाईम आऊट सारख्या उपायांनी जे भावनिक डॅमेज होऊ शकते, जे त्याचे साईड ईफेक्ट वा जे दुष्परीणाम होऊ शकतात ते हा ऊपाय अवलंबणारे चटकन ओळखू शकत नाही, किंबहुना ते चटकन मान्य होणारे नाहीत. आणि हे जास्त धोकादायक आहे.
फटक्याच्या निमित्तानं का
फटक्याच्या निमित्तानं का होईना, त्यांना आईचा स्पर्श, हवा असतो, तिच्या जवळ जायचं असतं.>> हे अगदी खरंय. न बोलणे ही पनिशमेंट मारा पेक्षा जिवघेणी असते. कुठल्याही वयाचं मुल हे डिझर्व करत नाही. ह्यात आवरण्यासारख काहिही नाहिये. हा अनुभव मी घेतलाय.
मुलांना मारतो म्हणजे अमानुष "च" आहोत हा असा जो निष्कर्श ईथे निघतोय ते वाचून हसू आलेय. तलवार परजूनच उभे आहोत मुलांच्या पुढ्यात असं डोळ्यांपुढे आलं.
जो तो आपापल्या परी ने एक सुजाण व्यक्ती घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अॅज अ मदर, मला कोणा परक्या/की कडून शिकायची गरज नाही की मी योग्य करतेय किंवा कसं. त्यासाठी नवरा, आई, बहिणी, भाऊ ,जवळच्या मैत्रिणी आहेत.
मी चिन्मयी +१
फारच फालतू प्रतिसाद येताहेत
फारच फालतू प्रतिसाद येताहेत माराचं समर्थन करणारे...
https://m.facebook.com/humansofbombay/posts/1571520383056933
https://www.quora.com/How-do-Indian-adults-feel-about-parents-occasional...
https://aisiakshare.com/node/27
https://aisiakshare.com/node/4182
अॅमी तुमच्या दुसर्या
अॅमी तुमच्या दुसर्या लिंकवरील ही पहिलीच पोस्ट वाचली.
मला नाही वाटत ईथे कोणी असल्या माराचे समर्थन करत आहे.
I've suffered a lot as well, the trauma still keeps me awake at night sometimes. A few instances as follows:
I was 6 or 7, I don't remember what I did, but I was hung upside down from the fan (from one leg) and beaten (aka. movie style)
Then again around the same age, I said that I won't have dinner. My dad was pressing clothes at that time, so he pressed the hot iron on me.
During one visit to my village, my neck was tied to the khoonta (where cows are tied) and beaten with a stick in front of people. I don't remember what I did, but it was certainly not something that deserved this.
Most of the time I was beaten with freshly cut branches until it broke (of course apart from the scale, skipping rope and chappal).
When I was 16, I went with my guy friends after tution and when I was returning I found my dad standing furiously in the middle of the market, I saw him and panicked but I had no where to run. So got a slap in between the market (and it was so damn hard that my eye twitched for straight 2 days).
मुलांना मारणे चांगले की वाईट
मुलांना मारणे चांगले की वाईट हे मारण्याच्या प्रकार वर आहे.
मांजर आपल्या पिल्लांना तोंडात घेवून दुसऱ्या स्थळी halvate.पिल्लाला दात नक्कीच जाणवतात आई चे पण टोचत नाहीत.जखम करत नाहीत.
मुलांना मारणे तसेच असावे .अगदी प्रतीकात्मक .त्याला त्रास होणार नाही असे .पण आवेश आणि कृती बघून त्याच्या मनावर परिणाम व्हावा.
म्हणजे पालकांनी का मारले त्याची जाणीव व्हावी परत ती चूक करू नये.
पण अमानुष मारण्याचे कोणीच समर्थन करणार नाही.
पण अमानुष पने मारणारी लोक विकृत मानसिकतेची असतात.
समाजासाठी पण धोकादायक त्यांच्या साठी तुरुंग हीच योग्य जागा आहे
आपल्या डोळ्या समोर आपली मुल
आपल्या डोळ्या समोर आपली मुल चुकीच्या मार्गाने जात असतील.त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने जे अयोग्य ठरू शकत असे वर्तन असेल तर पालक मुलांना त्या पासून प्रवृत्त नक्कीच करणार.
बोलून ऐकत असेल तर मारणार नाही.
पण बोलून ऐकत नसेल तर मारणार च.
पण अमानुष नाही फक्त आम्हाला तुझे हे वागणे बिलकुल पटत नाही ह्याची जाणीव होईल इतके च अगदी सौम्य
काही घरात मुलांना,स्त्रियांना
काही घरात मुलांना,स्त्रियांना अगदी अमानुष मारहाण होते हे खरे आहे.
पण अशी कुटुंब minority मध्ये आहेत .
अशी मारहाण करणारे मानसिक रोगी असतात.किंवा व्यसनी असतात.
पण असे पण नाही की व्यसन असणारे सर्व पुरुष घरात अशी मारहाण करतात..
मानसिक आजारी,व्यसनी लोकांचा न्याय सामान्य पालकांना लावता येणार नाही.
तारतम्य पाळावेच लागेल.
समाज नी active असणे गरजेचे आहे.
असा कोणी मानसिक विकृत व्यक्ती पुरुष असेल तर पुरुषांनी आणि स्त्री असेल तर स्त्रियां नी चोपून काढला पाहिजे.
सरासरी काढली तर बहुसंख्य घरात
सरासरी काढली तर बहुसंख्य घरात बापा पेक्षा आई च मुलांना जास्त मारत असते.
आणि कठोर शब्द पण तीच वापरत असते.
https://www.tiktok.com/t
https://www.tiktok.com/t/ZTRmXuE9c/
माफक प्रमाणात मुलांना प्रसंगी
माफक प्रमाणात मुलांना प्रसंगी मार ही द्यावा मी ही ह्या मताचा आहे.फार सुरक्षित वातावरणात वाढलेली मुले जेव्हा बाह्यजगात येतात तेव्हा अशा प्रसंगात कावरीबावरी होतात हे अनुभवले आहे. घरीच तसा प्रकार जर थोड्या फार मात्रेत केला तर त्यांचे अश्या प्रसंगात कसे वागावे ह्याचे आपोआप ट्रेनिंग होते.नात्यातला एका लहान मुलीचे आईवडील उच्चप्दस्थ आहेत आणि मुलीशी बोलणे ही अगदी अदबीने वगैरे असायचे. काही दिवस कौतुक झाले पण नंतर आईला कळले कि परिवार संमेलनात काही कारणाने त्या मुलीवर कुणी थोडेफार जरी आवाज चढवुन बोलले तर ती कावरीबावरी व्हायची. अर्थात कुणी ठरवुन तो प्रकार केला नाही पण बाकीच्या मुलांना दटावताना हीला ही दटावले गेले तर तिचा आत्मविश्वास ढासळायचा.
मिशीवाले, लमा वाटते
मिशीवाले, मला वाटते ह्या प्रसंगात लहानग्यांना दटावणार्या मोठ्यांना आपले बिहेविअर तपासून बघण्याची गरज आहे त्या लहानग्या मुलीला नाही. ती जशी आहे तशी पर्फेक्ट आहे. लहान मुले म्हणजे आपल्याला अभिप्रेत असलेली मानसिकता (टफ.सेन्सिटिव, अल्लड/मॅच्युअर, शांत/धडपडी) घडवण्यासाठीचे ट्रेनी नाहीत ना.
ते ह्या अॅट्रिब्युट्सचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर घेऊनच जन्माला येतात ... पालकांना ते अॅट्रिब्युट्स ओळखून त्याला योग्य संगोपनातून जोपासण्याचे महत्वाचे काम करायचे आहे. सेन्सिटिव मुलांना रफट्फ बनवण्याचा अट्टहास करू नये.
आमचा मुलगा म्हणजे फुल गुंडा
आमचा मुलगा म्हणजे फुल गुंडा आहे.. असला दम देतो बाकीच्या पोरांना.. असे कौतुकाने सांगणारे पालक पाहिले आहेत...
दंगल मधील आमीर खान आठवला
दंगल मधील आमीर खान आठवला
खरे तर मारामारी न करता
खरे तर मारामारी न करता खेळणारी मुले विरळच. त्यामुळे आपली पोरं मारामारी करत असोत वा नसोत ईतर मारामारी करणाऱ्या पोरांशी डिल करता यायला हवे.
ज्या सोसायटीमध्ये मुले खूप असतात. रोजचा खेळ दंगा चालू असतो. तिथे रोजच्या छोट्यामोठ्या मारामारीही चालतातच. मग काही मुले घरी तक्रार घेऊन येतात. यात बरेच पालक आपल्या मुलांना सांगतात, समोरच्याने एक मारले तर आपणही दोन मारून यावे. ऐकून घेऊ नये कोणाचे...
मलाही हे कधीच पटत नाही.
म्हणजे पालकांचा हेतू असतो की आपल्या मुलाला टफ बनवावे. त्याला कोणाची मुजोरी सहन न करण्याचे संस्कार द्यावेत. पण या पलटून मारण्यात समोरच्यानेही आणखी मारण्याचा धोका असतो. तसेही आपल्या मुलाने समोरच्याला चार फटके मारले तरी त्याचे काही बक्षीस मिळणार नसते. पण समोरचाही आपल्या पोराला दोन मारेल त्यात त्याला लागणार असते. मारामारीच्या शेवटी दोघांनाही कमी जास्त लागणारच. जिंकत यात कोणीच नाही. कोणी कमी हरते, तर कोणी जास्त हरते. पण उगाच त्या नादात काही कमी जास्त झाले तर कोण जबाबदार.
त्यामुळे आम्ही मुलीला नेहमी सांगतो की बाकी कितीही खेळा, भांडा, रुसवे फुगवे चालू द्या.. पण मारामारी करायची नाही. कोणी मारलेच आपल्याला तर घरी येऊन नाव सांग. आपण त्यांच्या घरी तकार करायला जाऊ.
पण अर्थात एक वय झाले की मुलेही घरी रडत न येता त्यांचे मॅटर बाहेरच्या बाहेर सॉल्व्ह करणे प्रीफर करतात. अश्यावेळी त्यांच्यावर त्यांच्याही नकळत नजर ठेवणे ऊत्तम..
>>कोणी मारलेच आपल्याला तर घरी
>>कोणी मारलेच आपल्याला तर घरी येऊन नाव सांग. आपण त्यांच्या घरी तकार करायला जाऊ.<<
ऋन्म्या, दुसरा गाल पुढे करावा हे लिहायचं विसरलास काय? अनायासे आज गांधी जयंती सुद्धा आहे...
चालू द्या...
राजभाई आपण गांधीजींईतके महान
राजभाई आपण गांधीजींईतके महान नाही आहोत.
आपल्याला त्यांची तत्वे पुर्णपणे अंगीकारणे अशक्य.
पण माराचा बदला मार हे सोल्युशन नाही.
आंख के बदले आंख. पुरी दुनिया अंधी हो जायेगी.
कोणी मारलेच आपल्याला तर घरी
कोणी मारलेच आपल्याला तर घरी येऊन नाव सांग. आपण त्यांच्या घरी तकार करायला जाऊ >> माझ्या लहानपणी माझे आई वडील मला असेच सांगायचे पण होते काय की समोरच्या बाजूची मुले आणी पर्यायाने त्यांचे आईवडील आपली चूक कधीच कबूल करायचे नाहीत. मग मला वाटायचे मी फक्त मार खायचा आणी परत मारायचे नाही हा माझ्यावर अन्याय आहे. त्यामुळे मी थोडी मोठी झाल्यावर कोणी एक दिली तर चार द्यायला शिकले. आणी घरी काहीच सांगायचे नाही.
ssj कर्रेक्ट आहे तुमचेही
ssj कर्रेक्ट आहे तुमचेही
मुले मोठी झाली की आपल्या हिशोबानेच बाहेरच स्कोअर सेटल करायला शिकतात.
पण तरी आपण घरून त्यांना चुकीचा सल्ला देऊ नये असे वाटते.
एखादी चुकीची गोष्ट ते करत असतील तर ती निदान चुकीची आहे याची तरी त्यांना जाणीव हवी.
माझाच एक धागा होता, लहान मुलांसमोर घरी दारू पिऊ नये. पुढे जाऊन मुले दारू पिऊ लागतील ते लागतील. पण निदान दारू एक वाईट व्यसन असते याची तरी जाणीव त्यांना हवी. आपणच लहानपणी त्यांच्यासमोर दारू पिऊ लागलो तर त्यांना दारू पिणे हे नॉर्मलच वाटणार. उलट कोणी दारू वाईट आहे असे सांगायला आले तरी त्याला उलटे उडवून लावतील ते. पुढे मुले मोठी झाल्यावर आपल्या मनाने हवी तशी वागणारच आहेत म्हणून आपण आपली संस्कार लावायची जबाबदारी झटकून टाकू शकत नाही ना.
फक्त एक करावे, आपली मुले जेव्हा एखाद्याने आपल्याला मारले म्हणून तक्रार घेऊन येतील तेव्हा त्यांच्यासोबत त्या मुलाच्या घरी जाऊन त्याला दम देऊन यावा.
आज हा व्हिडिओ बघून हा धागा
आज हा व्हिडिओ बघून हा धागा आठवला
इथे ही insta लिंक दिसते की नाही कल्पना नाही.
https://www.instagram.com/reel/DAGUsr5IBoL/?igsh=ZmhrOHp1cDIyZ2tm
Pages