नमस्कार माबोकर्स,
'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात…
आम्ही एक नवीन मराठी बाल साहित्याला वाहिलेले यूट्यूब चॅनेल सुरु करतो आहोत. आपण बाल गोष्टी / साहित्य लिहीत असाल......वयोगट ४ ते १०....तर आपण आपले स्वलिखित साहित्य' आम्हांला देऊ शकता.
निवड झालेल्या गोष्टींचे अॅनिमेटेड स्टोरी बुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळणार नाही. पण चॅनेलवर लेखक म्हणून तुम्हांला क्रेडीट दिले जाईल. )
अट एकच....साहित्य पेपरबुक / मासिकात/ ब्लॉगवर प्रकाशित असले तरी चालेल, पण कुठल्या ही प्रकारे व्हिडीओ / ऑडिओ स्वरुपात प्रकाशित झालेले नको.
कथेसाठी काही सूचना - कथा छोट्या असाव्यात. भाषा लहान मुलांना समजेल व आवडेल अशी असावी. वयोगट ४ ते १०..... प्राणी, पक्षी असलेल्या कथा जास्त आवडतील. इसापनिती, पंचतत्र अशा प्रकारे गोष्टी लिहीणारे हवेत.
काही सूचना - गोष्टी छोट्या छोट्या हव्यात. साधारण ३ ते ४ मिनिटाचा व्हिडिओ बनेल इतका मजकूर असावा. रंजकता असावी. आपले साहित्य मला मेल करु शकता. साहित्यावर आपले नाव, पत्ता, फोन नंबर असावा. साहित्य वर्ड फाईलमधेच असावे.
मेल आयडी - Suchetasindia.arts@gmail.com
विनिता -7709073008
मागे मी इथेच एक बालकथा लिहिली
मागे मी इथेच एक बालकथा लिहिली होती. तिला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. ती चालेल काय? चालतं असल्यास word format madhe आहे माझ्याजवळ ते पाठवते.
मनिम्याऊ, कथा मेल करा. छान
मनिम्याऊ, कथा मेल करा. छान आहे
पाठवली आहे. धन्यवाद
पाठवली आहे. धन्यवाद
हा उपक्रम अजून सुरू आहे का?
हा उपक्रम अजून सुरू आहे का? मी बाल साहित्य पाठवू शकते का?