इडली साठी:
- नाचणीचे पीठ – १ कप
- उडदाची डाळ – १/३ कप
- इडली रवा – ३/४ कप
- तेल – १ tsp
- मोहरी – १ tsp
- जीरा – १ tsp
- हिंग – १/४ tsp
- बेकींग सोडा – १/२ tsp
- कढी पत्ता – ५-६ पाने
- दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरुन किंवा अधिक टिप १ पहा.
- कोथींबीर बारीक चिरुन – ओंजळ भर
- मेथी / पालक बारीक चिरून – दोन ओंजळी किंवा आवडी नुसार कमी/ अधिक. (ऐच्छिक)
- मीठ
- पाणी - लागेल तसे.
चटणी साठी:
- अर्धा ओला नारळ तुकडे करुन / खवून / किसून
- ओंजळभर कोथींबीर
- १ – २ हिरव्या मिरच्या तुकडे करुन
- चमचा भर लसणाची चटणी किंवा दोन लसुण पाकळ्या
- १ लिंबु
- थोडे काळे / थोडे पांढरे मीठ
- पाव – अर्धा चमचा मीर पूड.
उडदाची डाळ किमान आठ तास भिजत घाला. फ़ुगुन ती साधारण कपभर होते.
इडली रवा दोन तास भिजत घातल्यास उत्तम पण वेळे नुसार किमान अर्धा तास तरी भिजु द्यावा, फुगुन तो साधरण कपभर होतो.
सर्व तयारी झाली की उडदाची भिजलेली डाळ मिक्सर मध्ये थोडे पाणी घालुन पिठा सारखी वाटुन एका भांड्यात काढुन घ्या. त्यात भिजवलेला इडली रवा आणि नाचणीचे पीठ, कोथींबीर, पालेभाजी आणि मीठ घालुन थोडे थोडे पाणी घालत इडली बॅटरच्या कन्सीस्टन्सी इतपत नीट कालवून घ्या आणि किमान दहा मिनिटे मुरु द्या.
तोवर चटणीचे सर्व साहित्य मिक्सर मध्ये घेउन पाणी घालुन चटणी सारखे वाटुन घ्या आणि त्यात लिंबु पिळुन घ्या.
मग हिंग, मोहरी, जिरे, कढी पत्त्याची फोडणी करुन ती इडली मिश्रणात घाला आणि कालवून घ्या.
हवे असल्यास चटणीतही फोडणी घालु शकता.
इडल्या करण्याच्या १० मिनीट आधी त्यात बेकिंग सोडा घालुन नीट कालवून घ्या.
इडली पात्रातील साच्यांना ब्रशने तेल लावुन घ्या (किंवा अधिक टिप २ पहा.) आणि इडली मिश्रण घाला.
मोठ्या आचेवर १५ ते २० मिनिट वाफवून घ्या.
झाकण उघडून बोटाने दाबुन पाहिल्यास अंदाज येतो. इथे एवढे लक्षात ठेवा की या नेहमीच्या इडली पेक्षा कमी सॉफ़्ट होतात, तशात या न आंबवता करत आहोत.
गॅस बंद करुन इड्ल्या काढण्या इतपत तपमान कमी झाले की इडल्या काढुन चटणी सोबत सर्व्ह करा.
या इडल्या नेहमी्च्या इड्ल्यांपेक्षा कमी लागतात खायला. दिलेल्या प्रमाणात चौघा वयस्कांना पोटभरीची न्याहारी होते.
१. मिरची बारीक चिरण्या ऐवजी डाळीसोबत वाटुन घेउ शकता.
२. इडली पात्रातुन इडली अलगद बाहेर काढण्यासाठी १२ x १२ सेंमी आकाराचे (किंवा इडली पात्रातील इडली साच्याच्या व्यासापेक्षा ४ सेंमी अधीक आकाराचे) पांढऱ्या उपरणाचे तुकडे करुन घ्यावेत. पहिल्यांदा वापरण्या पूर्वी उपरणे धुवून एकदा पाण्यात १० मिनिटे उकळुन घ्यावे. इडली साच्यात आधी ही फडकी घालुन त्यात बॅटर घालावे. मग इडल्या झाल्या की फडक्या सकट इडली काढुन उलटे करुन टिचक्या मारुन इडली काढता येते. अशी फडकी वापरल्यास इडली साच्यात तेल लावण्याची गरज नाही.
३. ही पाकृ नाचणीच्या पीठा ऐवजी नाचणीचे अख्खे दाणे आणि इडली रव्या ऐवजी तांदुळ वापरुन – आंबवून - साग्रसंगीत केल्यास अजुन छान लागते. त्याची पाकृ त्या केल्या की फोटो काढुन झाल्यावर लिहेन.
छान पाकृ. आंबवुन करुन बघेन.
छान पाकृ. आंबवुन करुन बघेन.
टिप २ बद्दल धन्यवाद. तेल जरासेच लावले की इडली चिकटते आणि आकार बिघडतो.
छाने रेसिपी!
छाने रेसिपी!
टीप २ ही हैद्राबादी स्पेशल!
छान लिहिली आहे रेसिपी.
छान लिहिली आहे रेसिपी.
टीप 2 तमिळनाडू स्पेशल पण आहे हो पण मी तेल लावून च करते आकार न बिघडता निघतात व्यवस्थित.. थोडी वाफ जाऊ द्यावी.. गरमागरम काढायला गेलो कि बिघडतात.
छान रेसिपी. माझ्याकडे
छान रेसिपी. माझ्याकडे नाचणीचा रवा आहे. तो वापरला आणी इडली रवा वापरला नाही तर चालेल का की इडल्या बरोबर होणार नाहीत ?
मी पण आंबवून च करेन..टीप 2
मी पण आंबवून च करेन..टीप 2 try करणार नक्कीच..
वा छान, दही घालून ट्राय करता
वा छान, दही घालून ट्राय करता येईल.
अरे वाह चॉकलेट ईडली दिसतेय
अरे वाह चॉकलेट ईडली दिसतेय
नक्की करून बघणार.
नक्की करून बघणार.
मस्त फोटो आणि सोपी कृती... पण
मस्त फोटो आणि सोपी कृती... पण या इडलीसाठी "वयस्क" होणे जमवावे लागणार? (मराठीत वयस्क बहुतेक वयस्कर अर्थाने वापरतात, हिंदीत बहुतेक प्रौढ अर्थाने येतो. चु भू द्या घ्या).
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय
((माझ्याकडे नाचणीचा रवा आहे.
((माझ्याकडे नाचणीचा रवा आहे. ))....@ssj
कसा दिसतो नाचणीचा रवा?
छानच दिसतेय इडली मानव.
छानच दिसतेय इडली मानव.
छान दिसतायत इडल्या!
छान दिसतायत इडल्या!
छान रेसीपी. मधुमेहींना योग्य
छान रेसीपी. मधुमेहींना योग्य ब्रेफा आहे.
सुपर्ब.
सुपर्ब.
मधुमेहींना नाचणी चालत नसते.
मधुमेहींना नाचणी चालत नसते. जीआय जास्त आहे असे डाॅ त्रिपाठी सांगतात.
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
लोना . पोस्ट करण्यापूर्वी वयस्क शब्द, शब्दकोशात बघितला होता आणि त्यात वयात आलेले आणि म्हातारपणा कडे झुकलेले असे दोन्ही अर्थ दिसले. मग ठोकून दिला.
फडकी वापरणे ही दाक्षिणात्य पद्धत आहे असे म्हणुन सगळ्या दक्षिण राज्यांना दाक्षिण्य दाखवावे असे मी सुचवतो.
ssj नाचणी सोबत एखादा binding agent असावा असे वाटते, बहुतेक होणार नाहीत नुसत्या नाचणीचे.
छान पाकृ
छान पाकृ
स्वान्तसुखाय
स्वान्तसुखाय
हा नाचणीचा रवा. मी ग्राहक पंचायत मधून घेतला होता. याचा उपमा छान होतो. फोटोत कलर वेगळा आलाय.
मानव , तुम्ही म्हणता ते पटले. तुमच्याच प्रमाणाने करून बघते इडल्या. धन्यवाद.
उडदाची डाळ, इडली रवा
उडदाची डाळ, इडली रवा भिजल्यावर फुगून किती होतो, हे बारीकसारीक डिटेल्स आवडले.
भलतीच हेल्थफुल केलीय इडली.
मी नेहमीसारखे डाळ तांदूळ भिजत घालून , वाटून, ते पीठ आंबवून ऐन वेळी नाचणीचे पीठ घालून इडल्या केल्या आहेत.
इथे आरती यांचे 'ई'डलीडोशांचे धागे आहेत. त्यातलं प्रमाण आणि सूचना पाळून लुसलुशीत, हलक्या इडल्या जमायला लागल्यावर पांढऱ्याशुभ्र इडल्याच आवडतात.
नाचणीचं पीठ वगैरे ढकलाढकली डोसे, आंबोळ्यांमध्ये.
मस्त रेसीपी
मस्त रेसीपी
नाचणी इडली नक्की बनवणार...
छान!
छान!
मी नाचणीचे अख्खे धान्य वापरून करायचे. निम्मे तांदूळ निम्मी नाचणी आणि त्याच्या एक चतुर्थांश उडीद डाळ. थोडे मेथीदाणे. मात्र नाचणी जरा जास्त वेळ भिजवावी लागते वाटण्यापूर्वी. हल्ली खूप दिवसांत केल्या नाहीत. करायला हव्यात. डोसेपण छान लागतात त्याच पिठाचे. डोसे जास्त छान लागतात.
नाचणीच्या रव्याचा फोटो;
नाचणीच्या रव्याचा फोटो; चंद्राची सॅटेलाईट इमेज म्हणूनही खपला असता...
छान रेसेपी! मी पण इडली che
छान रेसेपी! मी पण इडली che बरेच प्रकार केलेत. इथे मीपुणेकर आयडी च्या रेसीपी ne स्टील कट ओट्स इडली विशेष आवडली पण वर भरत यांनी म्हटल्याप्रमाणे पांढर्या लुसलुशीत इडली chi आठवण अगदीच यायला लागते. आणि पुढल्या आठवड्यात पारंपरिक पीठच भिजवले जाते!
ही वरील इडली थोडे पीठ बाजूला ठेवून ट्राय करेन
भारी दिसताहेत इडल्या!!
भारी दिसताहेत इडल्या!!
Scrumptious
Scrumptious
नाचणीच्या रव्याचा फोटो;
नाचणीच्या रव्याचा फोटो; चंद्राची सॅटेलाईट इमेज म्हणूनही खपला असता... Happy
Submitted by आंबट गोड on 18 September, 2022 - 22:33 >>>>>हा हा हा हा हा हा !!!!!