Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुरुवात मीच करते.
सुरुवात पण करते.
आजचे डिनर- चेट्टीनाडचिकन आणि डोसा
जबर दिसतंय !!व्हेज किंवा पनीर
जबर दिसतंय !!व्हेज किंवा पनीर चेट्टीनाड करावे वाटतेय , कृती सांग जरा !
सोप्पंय.दोन स्टेप्स मधे फक्त.
सोप्पंय.दोन स्टेप्स मधे फक्त.
पहिली स्टेप: गरम तेलात दालचीनी जरा, लवंगा दोनतीन, शैलोट्स अर्धा किलो (सोलायचा फार वैताग येतो पण चव भारी लागते म्हणून तेवढा त्रास सोसावा लागतो ), सुके खोबरे छोटंसं, छोटा टोमॅटो चांगलं परतून घेऊन,गार करून, ग्राईंड करून बाजूला ठेवणे.
दुसरी स्टेप: पुन्हा थोड्या गरम तेलात आलं लसूण पेस्ट टाकून स्वच्छ धुवून ठेवलेले चिकन (थोडे मैरिनेटेड असेल तरी ओके नसेल तरी ओके) टाकून अजिबात पाणी न टाकता अंगच्या पाण्यातच शिजवून ड्राय होऊ द्या. (अर्धा तास लागतो याला जवळजवळ) मग धने पावडर, मिरची पावडर, हळद टाकून परतून, मघाशी नाही का ती पेस्ट बनवली ती पण टाकून दोन चमचे गरम/चिकन मसाला टाकून परतून हवे तितके पाणी टाकून मस्त उकळू द्या..रस्सा जास्त असला कि डोसा कसा मस्त बुडवून खाता येतो.
पर्फेक्ट, थँक्स
पर्फेक्ट, थँक्स
मस्त फोटू, मृणाली! थँक्स
मस्त फोटू, मृणाली! थँक्स रेस्पिसाठी.
मस्त फोटू, मृणाली! थँक्स
मस्त फोटू, मृणाली! थँक्स रेस्पिसाठी.
आजचा मेन्यू : पापलेट फ्राय ,
आजचा मेन्यू : पापलेट फ्राय , बोंबील रस्सा.
वा, जबरदस्त दिसतंय
वा, जबरदस्त दिसतंय
तळून रेडी असलेल्या पापलेटा चा
तळून रेडी असलेल्या पापलेटा चा पण फोटू हवा होता :लाळगाळू बाहुली:
बोंबील तुम रख लो
बोंबील तुम रख लो
पापलेट हमे दे दो
(No subject)
तूप, गुळ आणि चपातीचा लाडू
तूप, गुळ आणि चपातीचा लाडू
हे घ्या अर्धा झब्बू- तूप गुळ
हे घ्या अर्धा झब्बू- तूप गुळ तीळ शेंगदाणे लाडू
वाह वाह काय व्हरायटी आहे.
वाह वाह काय व्हरायटी आहे. चेट्टीनाड चिकन डोसा विथ रेस्पि, पापलेट फ्राय बोंबिल रस्सा, बिर्याणी, पोळीचा लाडू, गुळ तीळ शेंगदाणे लाडू अबब.मसत आहे सगळं
अरे जमाना हूई गवा चपातीचा
अरे जमाना हूई गवा चपातीचा लाडू खैके.
विसरूनच गेलो होतो हा पदार्थ जणु.
आता चपात्या केल्या की जास्तीच्या करायला लावून दुसऱ्या दिवशी सकाळी करून खाणार.
आमच्याकडे हिट आयटम आहे हा ..
आमच्याकडे हिट आयटम आहे हा .. आज डब्यात पण हेच दिलंय
नाइ नाच.
नाइ नाच.
म्हणजे नाचणीची इडली आणि नारळाची चटणी.
मस्त दिसतेय नाई नाच
मस्त दिसतेय नाई नाच
भारी दिसती आहे इडली..मानव....
भारी दिसती आहे इडली..मानव.....रेसिपी द्या की..आंबवून केली की इनो घालून..
केया, बेकिंग सोडा घालून केली.
केया, बेकिंग सोडा घालून केली.
उडीद डाळ 1/3 कप किमान ८ तास भिजत घालावी.
याचे पीठ मग एक कप च्या आसपास होते.
सकाळी पाऊण कप इडली रवा भिजत घालायचा, किमान अर्धा तास (याचा भिजून एक कप होईल.)
उडदाची डाळ थोडे पाणी घालून मिक्सर मध्ये पिठा सारखी वाटून घ्यावी (भरडसर नव्हे).
१ कप नाचणीचे पीठ घ्यायचे.
वाटलेली उडदाची डाळ, इडली रवा आणि नाचणी पीठ एकत्र करायचे. त्यात हिरवी मिरची बारीक चिरून, कोथिंबीर आणि मेथी/पालक बारीक चिरून घालायचे (ऐच्छिक). चमचाभर तेलात मोहरी हिंग आणि कढी पत्त्याची फोडणी करून त्यात घालायची आणि पाणी आणि मीठ घालून इडली बॅटर सारखे कालवून घ्यायचे. दहा मिनिट मुरू देऊन त्यात इनो पावडर / अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून अजून दहा मिनिट मुरू द्यायचे आणि इडली पात्रात घालायचे. मोठ्या आचेवर पंधरा ते वीस मिनिट लागतात. फोटोत दाखवलेल्या ८ सेंमी आकाराच्या १२ इडल्या होतात. नेहमीच्या इडली पेक्षा या कमी लागतात खायला. १२ इडल्या चौघा वयस्कांना पुरतील पोटभरीचे होऊन.
इडल्या भारीच दिसताएत.. तुम्ही
इडल्या भारीच दिसताएत.. तुम्ही पण स्पर्धेत भाग घ्यायला हवा होता.
आज आमच्याकडे नाश्त्याला चहा
आज आमच्याकडे नाश्त्याला चहा ढोसा. आय मीन चहा बरोबर डोसा.
मानव, वेगळा धागा काढून ही
मानव, वेगळा धागा काढून ही इडलीची कृती लिहा.
नंतर शोधणे सोपे जाईल.
छान आहे कृती. करून बघेन.
ओके, काढतो नवीन धागा.
ओके, काढतो नवीन धागा.
सगळेच पदार्थ एकसेएक!
सगळेच पदार्थ एकसेएक!
मी पण नाचणीचे पीठ बनवले की इडली डोसे उत्तपे, आप्पे करते इनो, सोडा न घालता.
मागच्या वर्षी बाजरीची इडली केली होता माबो गणेशोत्सवाच्या स्पर्धेसाठी ... जिंकले पण होते
मला गुळपोळीचे लाडु कसे करायचे
मला गुळपोळीचे लाडु कसे करायचे सांगा ना आवडतील मला
चपातीचे बारीक तुकडे करून
चपातीचे बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवायचे, मग त्यात गूळ आणि तूप घालून एकजीव करून लाडू वळायचे. लाडू नाही वळले तरी चालतं.. मुलांना चमच्याने खायलाही आवडतं
थँक्यु!
थँक्यु!
वडा पाव
वडा पाव
बव कातिल आहेत. पुन्हा भूक
बव कातिल आहेत. पुन्हा भूक लागली
Pages