खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

गरिबांचे कॅव्हिआर>>>> Proud

Mrunali, बंडू मस्त ताट

सुरेख रंग, म्हळसा...
अगदीच उचलावासा वाटतोय >>> +१

आजचा नाश्ता
>>>
आठवड्याभराने हाच फोटो टाकून रोजचा नाश्ता लिहायची वेळ येते Proud

थँक्यु भरत, अमुपरी, मृ, देवकी. मानव. Happy

@मानव, त्या मठीया आहेत. गुजराथी पदार्थ.

@अमुपरी - चुरमा लाडू, बेसन लाडू, साखरेचे शंपा, गुळाचे शंपा, खारे शंपा, करंजी, चकल्या (मी केलेल्या व साबांनी केलेल्या), तिखट शेव, साधी शेव, मसाला हरभरा दाळ, मठीया, पातळ पोह्यांचा चिवडा, भाजक्या पोह्यांचा चिवडा, गुळाच्या पुर्‍या.

मोजून दमलो...
आणि ते ही दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सारे तयार...

@अमुपरी - चुरमा लाडू, बेसन लाडू, साखरेचे शंपा, गुळाचे शंपा, खारे शंपा, करंजी, चकल्या (मी केलेल्या व साबांनी केलेल्या), तिखट शेव, साधी शेव, मसाला हरभरा दाळ, मठीया, पातळ पोह्यांचा चिवडा, भाजक्या पोह्यांचा चिवडा, गुळाच्या पुर्‍या.

>>>>> ते दोन चकलींच्या पुढे अनारसे आहे काय ? ते राहील यादीत Happy

@ऋन्मेऽऽष - Happy हो सगळा फराळ तयार असतो आदल्या दिवशी. फक्त काजुकतली लक्ष्मीपुजनाच्या दिवशी बनवते.
@आबा - हो. Happy खरंच. अनारसं लिहायचं राहिलं. थँक्यु.
@मानव - येस. काईंड आॉफ पापडच.
Screenshot_20221025-172851.jpg

मस्त.
आधी भाज्या दाखवल्या नसत्या तर कळलेही नसते फायनल प्रीडक्टमध्ये ईतक्या भाज्यांचा राडा आहे.. छान झणझणीत मसालेदार रंग आलाय

भारीच!

अनिंद्य , जबरीच Happy !
नेहमीच्या मिश्र भाज्यांची करतो त्याच पद्धतीने केली का ?

Pages