
‘शाम सवेरा ‘ - पालक पनीरचे कोफ्ते असलेली हि एक नॅार्थ इंडियन स्टाईलची शाही डिश. तसं तर पालक न घालता नुसतेच पनीरचे कोफ्ते बनवून जास्तीचा त्रास टाळत नेहमीची कोफ्ता रेसिपी बनवता येते. पण जेव्हा फ्रिजमधे कॅास्टोतला ढिगभर पालक लोळत असतो तेव्हा तो शक्य तीथे घुसवायचा असतो, शास्त्र असतं ते.
तर आता जास्त पाल्हाळ न लावता स्पर्धेची मुदत संपत आली असल्या कारणाने थेट रेसिपीकडेच वळणार आहे. साहित्य आणि कृती तीन भागांत विभागून देत आहे म्हणजे रेसिपी समजायला आणि बनवायला सोप्पी जाईल.
रेसिपीचे तीन भाग-
1. कोफ्त्यांचं कव्हरींग
2. कोफ्त्यातलं स्टफिंग
3. ग्रेव्ही
1. कोफ्त्यांचं कव्हरींग -
साहित्य -
१ वाटी पालक प्यूरे
१/२ वाटी काजू पावडर
१/२ वाटी बेसण
१ चमचा काळं मिठ
१ चमचा जीरा पावडर
१ चमचा धणा पावडर
दोन चमचे तेल
कृती-
सर्वप्रथम गरम पाण्यात ३-४ मिनिटे उकळलेला पालक मिक्सरमधे वाटून घ्यावा. तेल गरम झालं की पालक प्यूरे ओतून त्यात जीरा पावडर, धणा पावडर आणि मीठ घालून दोन मिनिटं शिजवून घ्यावा. त्यानंतर घट्टपणा येण्यासाठी आधी काजूची पावडर आणि नंतर बेसण घालून एकजीव करून घ्यावं. घट्ट झालेलं मिश्रण एका प्लेटमधे घेत पूर्ण थंड होऊ द्यावं. ते थंड होईपर्यंत दुसरीकडे स्टफिंग बनवायला घ्यावं.
स्टफिंगचं साहित्य-
१ वाटी किसलेलं पनीर
१ चमचा वेलची पूड
१ चमचा आमचूर पावडर
१ चमचा काळं मिठ
१ चमचा जीरा पावडर
२ मोठे चमचे कॅार्न स्टार्च
कृती -
स्टफिंगच्या साहित्यात दिलेल्या गोष्टी एकत्र मिक्स करून त्याचे समान आकाराचे गोळे करून घ्यावे. साधारण १३ होतात. त्यानंतर थंड झालेलं पालकच्या मिश्रणाचेही समान भाग करून घ्यायचे. हातावर एक भाग घेत फोटोत दाखवल्याप्रमाणे तळहातावर थापत त्यात पनीरचा गोळा ठेवून बंद करावा. हे जरासं वेळखाऊ आहे.
त्यानंतर वाटीत थोडं कॅार्नस्टार्च घेत प्रत्येक गोळा त्यात घोळवून गरम तेलात खरपूस तळून घ्यायचा. एअरफ्रायरही वापरू शकता किंवा बेक करूनही चांगलेच लागतील. तयार झालेले कोफ्ते थंड होऊ द्यायचे.
ग्रेव्हीचं साहित्य -
१ कांदा
३ टोमॅटो
अर्धा इंच आलं
१,२ लसूण पाकळ्या
२ मोठे चमचे बटर
१/४ वाटी काजू
२ कश्मिरी मिरच्या
१ चमचा जीरा पावडर
१ चमचा गरम मसाला
दोन चमचे मध
चार चमचे क्रिम
मीठ
एका पातेल्यात बटर घेऊन त्यात ओबडधोबड चिरलेला कांदा, टोमॅटो,आलं लसूण, लाल मिरच्या, जीरे, काजू परतून घ्यावा. थोडंसं पाणी ओतून झाकण ठेऊन दहा मिनिटे मस्त शिजू द्यायचं आणि पूर्ण थंड करूनच मिक्सरला फिरवायचं. एका चाळणीच्या हे मिश्रण गाळून घ्यावं. आता पातेल्यात पुन्हा एकदा बटर टाकून त्यात गाळलेली प्यूरे ओतावी आणी जीरा पावडर, गरम मसाला, मीठ घालून दहा एक मिनिटं मंद आचेवर शिजवावं. शेवटी मध आणि क्रिम घालून पाच मिनीटं पुन्हा शिजवून त्यावर कसूरी मेथी घालावी.
आता एका पसरट भांड्यात ग्रेव्ही ओतायची. थंड झालेले कोफ्ते मधोमध कापायचे आणि ग्रेव्हीमधे टाकायचे. क्रिमप्रेमींनी हवं असेल तर पुन्हा एकदा चमचाभर क्रिम शिंपडावं.
अशा कोफ्त्याच्या ग्रेव्हीबरोबर लच्छा पराठा, नान किंवा कणकेचा खरपूस भाजलेला पराठा इज मस्ट. ते नसेल तर चपाती किंवा जीरा राईसबरोबरही हि ग्रेव्ही चांगली लागेल.
(खरं तर हे खाऊन घरचे सगळे वेडे होतील अशी कोफ्ता ग्रेव्ही बनवायची होती.. पण तसं काही झालं नाही..खाणारे सगळे नीट आहेत :))
मस्त!
मस्त!
काय सुंदर दिसतंय हे !
काय सुंदर दिसतंय हे !
हैला !! हे जबरदस्त आहे. मला
हैला !! हे जबरदस्त आहे. मला करायला आवडेल पण लागणार्या वेळाची नुसती कल्पना करूनच पोटात कोफ्ता (गोळ्यासारखाच मस्त गोल झालेला) येतोय
जाऊदे आपण म्हाळसा कडे जेवायलाच जावे त्यापेक्षा
अफलातून!
अफलातून!
खरं तर हे खाऊन घरचे सगळे वेडे होतील अशी कोफ्ता ग्रेव्ही बनवायची हो....,....खाताना ही पुढची बाब झाली.माझ्यासारखी करताना वेडी होईल म्हणून करणार नाही.
पण लागणार्या वेळाची नुसती
पण लागणार्या वेळाची नुसती कल्पना करूनच पोटात कोफ्ता (गोळ्यासारखाच मस्त गोल झालेला) येतोय >>> ह्या शाम सवेराने तर माझीच शाम-सवेरा एक केली आज
त्यामुळे पुन्हा बनवणे नाही आता.
माझ्यासारखी करताना वेडी होईल
माझ्यासारखी करताना वेडी होईल म्हणून करणार नाही>> मम
पण मस्तच दिसत आहे. म्हाळसाच करू जाणे शाम सवेरा एकाच वेळी एकाच ठिकाणी.
सुपीक कल्पना आहे. छान आहे.
सुपीक कल्पना आहे. छान आहे.
(स्वगतः पण आजकाल इतकी उस्तवार करायची इच्छा व आवडच राहिली नाही. बरं, करून करणार कोणासाठी? सगळ्यांचा हा डायटत, तो डायट)
नवनवीन पदार्थ बनवण्याची तुमची
नवनवीन पदार्थ बनवण्याची तुमची कला आणि मेहनत खूपच कौतुकास्पद..!!
लेकीचा शाळेचा डबा ही खूप छान असतो.
मेहनती रेसिपी.
मेहनती रेसिपी.
दिसतेय भारी एकदम.
जबरदस्त !!
जबरदस्त !!
दिसायलाही भारी आणि चवीलाही छान ..
आणि मायबोली गणेशोत्सव स्पर्धा म्हटली तर एफर्ट्स तर घ्यायलाच हवेत. बाकी फायनल प्रॉडक्टचा फोटो मस्त.. मुलांना फाईव्हस्टार डब्बे देणार्या सुपरमॉमकडून हे अपेक्षितही होतेच
दिसतयं तर भारी एकदम!
दिसतयं तर भारी एकदम!
कृती पण छान!!
मस्तच दिसतंय
मस्तच दिसतंय
मस्त दिसतेय डिश
मस्त दिसतेय डिश
मेहनती रेसिपी.
मेहनती रेसिपी.
दिसतेय भारी एकदम.
+1
आहाहा
आहाहा
तोपासू आहे एकदम.
मेहनत आहे जास्त.
सगळ्यात पहिल्यांदा रेस्टॉरंट मध्ये खाल्ली.होती.
इतकी छान बनवलेली शेफने. नंतर घरी एकदा try केलेली बायकोने , तीही छान झालेली. पण वेळखाऊ प्रकरण.
त्यामुळे परत घरी नाही. सरळ रेस्टॉरंट मध्ये ऑर्डर करणे बेस्ट असं आमचं।ठरलंय.
भारीच!
भारीच!
दिसतेय मस्त. चवही छानच असेल.
सांझ-सवेरा छान. प्लेटिंग झकास
सांझ-सवेरा छान. प्लेटिंग झकास. स्वच्छता आणि टापटिपीला एक अधिकचा मार्क
कोफ्ते नुसतेच खायला आवडतात, ग्रेवीहीन.
क्या बात है..भारीच आहे!
क्या बात है..भारीच आहे!
मेहनत आहे, पण मेहनतीचं फळ इतकं चांगलं असेल तर एखादवेळेस करून बघायला हरकत नाही असं वाटलं.
झकास!
झकास!
दिसतेय छान, चवीलाही छानच असेल
दिसतेय छान, चवीलाही छानच असेल.
पण असले कॉंप्लिकेटेड प्रकार करण्याचा उरक व उत्साह दोन्ही नाही.
त्यामुळे पास…
भन्नाट आहे ही रेसिपी. मेहनत
भन्नाट आहे ही रेसिपी. मेहनत खूप आहे मात्र, उत्साही आहेस म्हाळसा, तुझं कौतुक वाटतं.
जाऊदे आपण म्हाळसा कडे जेवायलाच जावे त्यापेक्षा >>> खरं आहे.
म्हाळसा डोंबिवलीत आलीस की सांग, येते खायला
.
ही ऑल टाइम विनर रेसीपी आहे.
ही ऑल टाइम विनर रेसीपी आहे. स्रोतः संजीव कपूर खाना खजाना. बॅक इन द एटीज.
मस्त!
मस्त!
एकदम देखणी दिसतेय रेसिपी.
एकदम देखणी दिसतेय रेसिपी. तिरंगी पदार्थ अशी थीम वाचली तेव्हा शाम सवेरा ची आठवण आली होती.
मी एकदा ही रेसिपी केली होती घरी. भरपुर वेळ लागतो. फोटो सापडला तर झब्बु देइन इथेच
तुमची भांडी खुप सुंदर आहेत. प्लेट फार आवडली.
मस्त दिसतंय.
मस्त दिसतंय.
मस्त दिसतेय डिश.. पालकाची चव
मस्त दिसतेय डिश.. पालकाची चव कशी लागेल कळत नाहीये पण !
मस्त दिसते आहे! उत्साह असेल
मस्त दिसते आहे! उत्साह असेल तेव्हा करू.
मस्त!
मस्त!
इतका खटाटोप माझ्याच्याने होईल असं वाटत नाही. त्यामुळे दुरून नमस्कार!
मस्तं दिसते आहे. इतकी किचकट
मस्तं दिसते आहे. इतकी किचकट रेसिपी केल्याबद्दल तुमचे विशेष कौतुक!
उत्तम पाकृ, नक्कीच करून खाणार
उत्तम पाकृ, नक्कीच करून खाणार
Pages