कथाशंभरी १.५ - अंतिम सत्य - अस्मिता.

Submitted by अस्मिता. on 8 September, 2022 - 10:21

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. उरलेल्या पाण्यासोबत रघू वहात येत होता.
................

कॅरी: समद्या माबोकरांनं याला रोज सकाळी शेजारच्या घराकडं बगाया सांगितलंय, कवाकवा तर हातचं टमरल पडायची येळ येती, धोतर सुटल्यागत व्हतं, बायेरबाधा झाल्यागत- यकटक बगंत 'नजर लागी राजा तोरे बंगलेपर' पुटपुटत ऱ्हातं.

समँथा: बंगला म्हनं, घराची सुदिक खिंडारं पडल्यात..
कॅरी: आजही खुळ्यागत तितंच बघत होतं, तवा मोटा लोंडा आलानं काय..

समँथा: (रघूकडे बघून आरडत) गुडघाभर पाण्यात हैसरे यड्या, उभार नीट..
कॅरी: आता गावंभर 'सिंदबाद' व्हवून हिंडंल, हेच्या गोष्टी अयकनं कै कमी टेंसनय का. 

समँथा: ए बंग की, हातात टमरंल घेऊन चाललंय वाट काडत...
कॅरी: पाच वर्सागोदर ग्रामपंचायतीच्या मिटिंगमदी त्येला सरपंचानी वायदा केलता, 'तुह्या शेजारचं घर पाडू, नं तितं 'सुलब शौचाले' बांदू, कसचं काय नं कसचं काय. त्येत धोत्रात पाय अडकून डोस्क्यावर पडलंय. गावातल्या हर घरानी संडास बांदलं पर काय बी जालं तरी सवताच्या घरात संडास बांधनार नाय म्हनं, मगं रोज सकाळी टमरंल घेऊन....

समँथा: ('शिल्पासा फिगर बेबो सी अदा' गुणगुणत) गेलं त्ये यंडं, पुडचा पत्ता टाक की आता कॅरे.....

--------------
संदर्भ:
कॅरी आणि समँथा : सेक्स अँड द सिटी
रघू : माबो गणेशोत्सवातील 'हरफन मौला'
मीम: imageflip generator
शब्दसंख्या जास्त झालीये तर 'दीडशक किंवा द्विशशक' समजा व सांभाळून घ्या Wink !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

{{उरलेल्या पाण्यासोबत रघू वहात येत होता.
कॅरी: समद्या माबोकरांनं याला रोज सकाळी शेजारच्या घराकडं बगाया सांगितलंय, }}

You made my day today!!
हसून हसून संपायला झालं!!!

कहर Lol

Lol

थँक्स सर्वांना. Happy
रघूला तर पार आडवा केला की>>> Proud
You made my day today !>>> Happy