पाककृती स्पर्धा-१ - तिरंगी पदार्थ - तिरंगी रवा टोस्ट - साक्षी

Submitted by साक्षी on 11 September, 2022 - 09:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कॉलेजमधे असताना बहुतेक टीव्हीवरच्या कुकिंग शो मधे झटपट पिझ्झा नावाने ही कृती बघितली होती. त्यात थोड्या सुधारणा करून प्रमाण वगैरे नक्की केले. ताकात भिजलेला रवा चीजच्या जवळची चव आणतो.

बारीक चिरलेले गाजर - ४ मोठे चमचे
बारीक चिरलेली ढब्बू मिरची - ४ मोठे चमचे
बारीक चिरलेलला कोबी - ४ मोठे चमचे
बारीक चिरलेलली हिरवी मिरची - १ किंवा तिखटाच्या आवडीनुसार
आंबट (नसेल तर गोड) ताक - अंदाजे १ वाटी
बारीक रवा - १ वाटी
ब्रेड स्लाइस - ५-६
बटर
चवीनुसार मीठ
saahitya.jpg

ऑप्शनल जिनसा
ओरिगानो, चिली फ्लेक्स, हर्ब्ज इत्यादि

क्रमवार पाककृती: 

१) रव्यात हिरवी मिरची, मीठ आणि रवा भिजेल इतकेच ताक घाला. भाज्यांचा ओलावा असतो त्यात रवा अजुन सैल पडतो त्यामुळे जरा घट्टच भिजवा.
२) ३-४ मिनिटांनी तीन निरनिराळ्या भांड्यांमधे हा भिजलेला रवा घ्या. आणि एकात गाजर, एकात ढ. मिरची, एकात कोबी असं एकत्र करून घ्या. चव बघून हवे असल्यास अजुन मीठ घाला.
(हे आजच्या दिवसापुरतं..इतर वेळी सगळ्या भाज्या आणि रवा एकत्र करून टाका. Happy )
३) ब्रेडच्या एका बाजुला हे मिश्रण आणि दुसर्‍या बाजुला बटर लावा.
(आजच्या साठी तीन रंगात लावा, इतर दिवशी कसंही थापलंत तरी चालेल )
हे आजचं
application1.jpg

हे नेहमीचं
application2.jpg

४) ५ मिनिटं मिश्रण मुरू द्या.
५) आता आधी मिश्रण लावलेली बाजु भाजून घ्या.

Toast1.jpg
६) आता बटर लावलेली बाजु भाजून घ्या.
७) ओरिगानो, चिली फ्लेक्स, हर्ब्ज यापैकी हवे ते, किंवा हे सगळे पेरा. काहीच पेरले नाही तरी चालेल.
८) हवा असेल तर सॉस नाहीतर असंच गरम सर्व्ह करा.

TirangiRavaToast.jpg

बाइट्स, फिंगर्स किंवा अजुन वेगवेगळ्या आकारात कापता येईल.
TirangiRavaToast1.jpg

वाढणी/प्रमाण: 
दोन जण
अधिक टिपा: 

१) अजुन लाड करायचेच असतील तर वरून किसलेले चीज पेरता येईल.

माहितीचा स्रोत: 
आठवत नाही बहुतेक टीव्ही
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users