योग आणि तंत्र मार्गानुसार, प्रत्येक मनुष्याच्या मेरुदंडाच्या शेवटी, अचित, असीम शक्तीशाली, रहस्यमय शक्ती, सुप्तावस्थेमधे निद्रिस्त असते, जिला कुंडलिनी असे नाव आहे. तंत्रसाहित्यात कुल व अकुल हे शब्द शक्ती व शिव वाचक आहेत. कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती. ही शक्ती मेरुदंडातून वरवर चढत जाउन जेव्हा ७ चक्रांचे शुद्धीकरण करुन, सहस्रार चक्रात पोचते तेव्हा, शिव-शक्ती मीलन सोहळ्याचा अनुभव जीवास येतो. ज्ञानेश्वरीमधे चक्र शुद्धीकरणाच्या आणि कुंडलिनी जागृत होण्याच्या टप्प्यांचे अत्यंत रसाळ वर्णन येते. सुप्तावस्थेतिल कुंडलिनीचे वर्णन करताना, ज्ञानेश्वर म्हणतात -
नागाचें पिलें । कुंकुमें नाहलें ।वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी ।अधोमुख सर्पिणी ।निजैली असे ॥
तर ही कुंडलिनी कशी आहे? जणू कुंकवात न्हायलेले, नागाचे पिलू, औट म्हणजे साडेतीन वळणांचे, वेटोळे घालून निजलेले असते तशी, ही कुंडलिनी, निद्रिस्त आहे. सुप्तावस्थेतील कुंडलिनीचा वास कुठे आहे, तर मूलाधार चक्रात. मूलाधार चक्राचा रंग कोणता असतो तर लाल, कुंकवासारखा. योगमार्गानुसार, या मूलाधार चक्राची देवता आहे श्रीगणेश. अर्थात या चक्रावर अधिराज्य आहे गणपतीचे. जोपर्यंत गणपती प्रसन्न होत नाही तोपर्यंत ना कुंडलिनी जागृत होणार, ना शिव-शक्तीचे मीलन होणार. आता आठवा जगदंबेच्या म्हणजे पार्वतीच्या, विनंतीनुसार, गणपतीने दारावर दिलेला पहारा. साक्षात शंकरसुद्धा, गणपतीस ओलांडून जाउ शकले नाहीत. म्हणजे शिव-शक्तीचे मीलन हे गणेशाच्या रुकाराशिवाय होउच शकत नाही हा त्याचा मथितार्थ.
तर मंडळी अशा विघ्नहर्त्या गणेशाचे, बुद्धीच्या देवतेचे, आपल्या लाडक्या बाप्पाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करुया.
||गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||
ॐकार गणपती..
ॐकार गणपती..
|| अधिपती.. सुखपती.. छंदपती.. गंधपती..||
||गजवदना तु सुखकर्ता..
गजवदना तु दु:खहर्ता..||
सुरेख प्रस्तावना……
तुज सदभावें करितां नमन ।
तुज सदभावें करितां नमन । विघ्नचि होय निर्विघ्न ।
यापरी तुझी कृपा पूर्ण । चैतन्यघन गणराजा ॥
ॐ नमोजी आद्या |
ॐ नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||
देवा तूचि गणेशु | सकलमतिप्रकाशु |
म्हणे निवृत्तिदासु | अवधारिजो जी ||
अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल |
मकार महामंडल | मस्तकाकारे ||
हे तिन्ही एकवटले | तेथ शब्दब्रह्म कवळले |
ते मिया श्रीगुरुकृपा नमिले | आदिबीज ||
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वरवरद | सर्वजन्म मे वशमान्य नमः ||
धन्यवाद स्वाती. खूप दिवस आठवत होतो पण नीट आठवत नव्हते शब्द.
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगल मुर्ती मोरया
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| गणपती बाप्पा मोरया ||
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
मागणे ते देवा आता एकची आहे ।
मागणे ते देवा आता एकची आहे ।
तारूनीया सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।
काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी |
देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः ||
प्रणम्य शिरसा देवं,
प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् |
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयु:कामार्थसिद्धये ||
प्रथमं वक्रतुंण्डं च एकदंतं द्वितीयकम् |
तृतीयं कृष्णपिंङाक्षं गजवक्रं चतुर्थकम् ||
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च |
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ||
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् |
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ||
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठ्ठेनरः |
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर: प्रभु: ||
विद्यार्थी लभते व्द्यां धनार्थी लभते धनम् |
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ||
जपेद्गणपति स्तोत्रं षङभिर्मासै: फलं लभेत् |
संवत्सरेण सिद्धिं च नात्र संशयः ||
अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् |
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ||
|| इति श्री नारद पुराणे संकटनाशनं महागणपतिस्तोत्रं संपूर्णम् ||
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !
पायी हळूहळू चाला | मुखाने
पायी हळूहळू चाला | मुखाने गजानन बोला|
सर्व स्पर्धक आणि संयोजक,
सर्व स्पर्धक आणि संयोजक, मनापासून आभार. गणेशोस्तवाच्या निमित्ताने भरभरून वाचायला आणि खूप छान गोष्टी बघायला मिळाल्या. _/\_
शिवलीलामृताच्या १४ व्या
शिवलीलामृताच्या १४ व्या अध्यायातील हा गणपती-स्कंद यांच्या लुटुपुटीच्या भांडणाचा प्रसंग सापडला. विनोदी आहे.-
.
गणपती आणि कार्तिकस्वामी लहान होते. प्रत्येक आई आपल्या बालकास जसी खेळवते, लाड करते तशी पार्वती त्या दोघांना खेळवत होती. पहील्यांदा ती गणीशास स्तनपान करत असतेवेळी,बाल गणपती दूध ओढून पीत असताना आईच्या पाठीवरुन चाळा म्हणुन सोंड फिरवत होता. आणि कधी आपल्या सोंडेने आपला चिमुकला पाय धरुन तो असा खेळत खेळत दूध पीत असतेवेळी त्याने स्कंदास सहज पृच्छा केली - का रे भाऊ, जे ब्रह्मादिकांना अप्राप्य ते अमृततुल्य दूध तू का पीत नाहीस? कार्तिकस्वामी क्रोधिष्ट हे सर्वांना माहीतच असेल, तो रागाने गणपतीस म्हणाला - "जा रे मला नको तुझं उष्टं." आणि मग कार्तिक आईकडे तक्रार करत म्हणाला - "बघ ना गं आई हा लांबनाक्या मला त्याचे उष्टे दूध देऊ पहातो आहे. आता आई तू मला सांग याची सोंड ओढून याला जर का मी खाली पाडले तर यात माझी चूक ती काय? आई तू याला असा कसा गं लांबनाक्या बनवलास? तू तर सूर्य-चंद्र अन्य चराचर सुंदर निर्मिलेस मग हे रत्नच असे विनोदी कसे बनविलेस? एक तर नाक लांबच लांब त्यात एक दातच काय तोंडाच्या बाहेर आलेला. अशा वेड्याविद्र्या बाळाला कसा गं जन्म दिलास?" हे लहानग्याचे बोल ऐकून शंकर-पार्वती यांना हसूच आवरेना. मग स्कंद म्हणतो - आई आता पुरे झाले हां याचे लाड आता मला दूध पाज. यावर पार्वतीने गणेशाचे स्तनापान झाल्यानंतर लगोलग गणेशाला उतरविले. बाल-षण्मुखास मांडीवर घेतले व ती दूध पाजू लागली. एक मुख दूध पीऊ लागले परंतु अन्य पाच मुखांनी भोकाड पसरले. ठ्ठो!!! हे पाहून आता षडाननाचा मोठा भाऊ गणपती पोट धरधरुन हसू लागला व मग मगासच्या अपमानाचे उट्टे काढण्याची संधी न दवडता तो म्हणाला - आई एका मुखात एक स्तन दिलास , आता अन्य ५ मुखांत घालावयास ५ स्तन कोठून आणशील? व षडाननाची फजिती पाहून तो खो खो हसू लागला. आता या खेळात शंकरांनाही रस येऊ लागला होता. ते पार्वतीला मिष्किलपणे म्हणाले "गणेश काय म्हणतोय त्याला उत्तर दे ना, अशा (६ मस्तकांच्या) विचित्र मुलाला का जन्म दिलास? पार्वतीही काही कमी नव्हती तिने तत्काळ प्रत्युत्तर दिले "तुमची ५ तोंडे कमी होती घरात म्हणुन पूर्ण करण्यासाठी म्हणुन अजुन एक तोंड असलेला पुत्रास मी प्रसविले. झाले समाधान?" हे ऐकून शंकरांना अत्यंत संतोष झाला.अशा रीतीने गणेश आणि षडानन लुटुपुटुची भांडणे करत असत. पण दोघेही, मनात एकमेकांबद्दल अत्यंत प्रीती राखून होते. परंतु अतिशय व्रात्य अशा या २ बालकांमुळे आदिमायेच्या डोक्यास शांती अशी कशी ती नसेच. एकदा गणपती व षडानन दोघेही मारामारी करत असताना, रडत रडत आईकडे आले. पार्वती वक्रतुंडाला हृदयाशी धरुन, म्हणाली "का रे बाळा काय झालं तुला? कोणी काही बोललं का?" यावर वक्रतुंड बोलला "बघ ना गं आई, हा षडानन येऊन मुद्दाम माझा कान पकडून विचारतो का रे तुझा कान इतका लहान कसा ब्वॉ? यावर पार्वती मनात हसून पण वरवर लटक्या रागाने म्हणाली, "का रे अग्नीसंभूता (हे स्कंदाचेच नाव) अशी लागेल शी चेष्टा का करतोस गणेशाची?" यावरती स्कंद उलट गणपतीकडे बोट दाखवुन म्हणाला काय की "आई यानेच माझे १२ डोळे मोजायला सुरुवात केली. यानेच पहीली खोडी काढली." यावर हैमवती (पार्वती) आता एकदंताकडे वळून पृच्छा करती झाली, "का रे एकदंता, कुमाराचे डोळे का मोजत होतास? हे असं वागणं तुला तरी बरोबर वाटतय का? तूच आपल्या मनाला विचारुन सांग" यावर नागाननाने (गणपती) त्याच्यावरील अन्यायाचे सुरस वर्णन करण्यास सुरुवात केली "हा माझ्या सोंडेची लांबी किती वीत आहे ते चवंगे घालून, मोजत होता. हा माझ्यावर फार दादागिरी करतो. तू याला शिक्षा कर." यावर कार्तिकस्वामी म्हणाला "नाही गं आई सुरुवात लंबोदरानेच केली, माझे हात मोजू लागला." आता करिमुख (गणपती?)ची पाळी होती तो अंबेस म्हणाला "ऐक आई आता मी जे सांगेन ते ऐकून तू नक्की कुमारास शिक्षा करशील" आता नगात्मजा (पार्वती) व त्रिलोचन (शंकर) दक्ष होऊन गणपती काय बोलतो ते ऐकू लागले. इभमुख (गणपती?) म्हणे - "आई, हा मला म्हणाला की रे ढोल्या, तुझे पोट एवढे मोठ्ठे का कारण तू मोदक अति खातोस." मग मात्र मृडानीने दोघांना हृदयाशी धरीले व त्यांच्या त्यांच्या आवडीची वस्तू त्यांना देऊन त्यांची समजूत काढली.
परिसा गजास्यषडास्यांची कथा ॥ दोघेही धाकुटे असत ॥ जगदंबा खेळवी प्रीतीने ॥६॥ गजतुंडा ओसंगा घेऊन ॥ विश्वजननी देत स्तनपान ॥ शुंडादंडेकरून ॥ दुग्ध ओढीत गजास्य ॥७॥अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती ॥ शुंडा फिरवीत गणपती ॥
सोंडेत पाय साठवूनि षण्मुखाप्रती ॥ बोलतसे तेधवा ॥८॥ म्हणे हे घेई का अमृत ॥ ब्रह्मादिका जे अप्राप्त ॥ स्कंद बोले क्रोधयुक्त ॥ उच्छिष्ट तुझे न घे मी ॥९॥ षडानन म्हणे चराचरजननी ॥ लंबनासिक मजलागूनी ॥ उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी ॥ सांग मृडानी काही याते ॥१०॥शुंडेसी धरूनिया खाले ॥ पाडू काय ये वेळे ॥ माते याचे नासिक विशाळ आगळे ॥ का हो ऐसे केले तुवा ॥११॥इंद्र चंद्र मित्र निर्जर व मूर्ति प्रसवलीस मनोहर ॥ परी हा लंबनासिक कर्ण थोर ॥ दंत एक बाहेर दिसतसे ॥१२॥ऐसा का प्रसवलीस बाळ ॥ ऐकता हासे पयःफेनधवल ॥ धराधरेंद्रनंदिनी वेल्हाळ ॥ तिसीही हास्य नाटोपे ॥१३॥ स्कंद म्हणे जननी पाही ॥ यासी उतरी मज स्तनपान देई ॥ मग जगदंबेने लवलाही ॥ विघ्नेशा खाली बैसविले ॥१४॥ षण्मुख आडवा घेवोनी ॥ स्तन जी घाली त्याच्या वदनी ॥ पाचही मुखे आक्रंदोनी ॥ रडो लागली तेधवा ॥१५॥ ते देखोनि गणनाथ ॥ पोट धरोनि गदगदा हासत ॥ म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत ॥ हाक फोडीत आक्रोशे ॥१६॥
एक स्तन घातला याचे वदनी ॥ आणीक पाच आणसी कोठूनी ॥ ऐसे ऐकत पिनाकपाणी ॥ काय हासोनि बोलत ॥१७॥ काय म्हणतो गजवदन ॥ ऐसा का प्रसवलीस नंदन ॥ यावरी अपर्णा सुहास्यवदन ॥ प्रतिउत्तर देतसे ॥१८॥ म्हणे हा तुम्हांसारिखा झाला नंदन ॥ तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ॥ ऐकता हासला त्रिनयन ॥ पुत्र पाहोन सुखावे ॥१९॥ यावरी षण्मुख आणि गणपती ॥ लीलकौतुके दोघे क्रीडती ॥ विनोदे कलह करिती ॥ अंतरी प्रीती अखंड ॥२०॥ दोघेही रडता ऐकोनी ॥ धावोनी आली जगत्त्रयजननी ॥ वक्रतुंडासी ह्रदयी धरोनी ॥ म्हणे बाळका काय झाले ॥२१॥ तव तो म्हणे स्कंदे येवोन ॥ अंबे धरिले माझे कर्ण ॥ बोलिला एक कठीण वचन ॥ तुझे नयन सान का रे ॥२२॥ जगदंबा मग हासोन ॥ अग्निसंभूताप्रति बोले वचन ॥ गजवदनासी कठीण भाषण ॥ ऐसे कैसे बोललासी ॥२३॥ स्कंद म्हणे तर्जनी उचलोन ॥ येणे मोजिले माझे द्वादश नयन ॥ यावरी हैमवती हासोन ॥ एकदंताप्रति बोलत ॥२४॥म्हणे हे तुव अनुचित केले ॥ कुमाराचे नयन का मोजिले ॥ यावरी नागानन बोले ॥ ऐक माते अन्याय याचा ॥२५॥माझी शुंडा लंबायमान ॥ येणे मोजिली चवंगे घालून ॥ अन्याय हा थोर त्रिभुवनाहून ॥ करी ताडण अंबे यासी ॥२६॥ यावरी स्वामी कार्तिक बोलत ॥ अंबे येणे माझे मोजिले हस्त ॥ यावरी करिमुख बोलत ॥ मैनाकभगिनी ऐक पा ॥२७॥ याचा अन्याय एक सांगेन ॥ ऐकता तू यासी करिसील ताडण ॥ नगात्मजा आणि त्रिलोचन ॥ सावधान होऊन ऐकती ॥२८॥ इभमुख म्हणे भेडसावून ॥ मज बोलिला हा न साहवे वचन ॥ तुझे पोट का थोर पूर्ण ॥ मोदक बहू भक्षिले ॥२९॥ऐसे ऐकता मृडानी ॥ दोघांसी ह्रदयी धरी प्रीतीकरूनी ॥ दोघांसी प्रियवस्तु देऊनी ॥ समजाविले तेधवा ॥
@सामो,
@सामो,
सोंडेत
पायसाठवूनि षण्मुखाप्रती>>> पय>>>कधी आपल्या सोंडेने आपला चिमुकला पाय धरुन तो असा खेळत खेळत दूध पीत असतेवेळी >>>> आपला चिमुकला पाय
मला वाटतं बाळ पायाचा अंगठा
मला वाटतं बाळ पायाचा अंगठा वगैरे चोखते तसा काहीसा उल्लेख असावा.
त्या आधीच्या आणि पुढच्या
त्या आधीच्या आणि पुढच्या चरणांची दूध, अमृत हे शब्द आहेत. म्हणजे पय असायला हवं
नाही सामो. त्या ओवीत पय ऐवजी
नाही सामो. त्या ओवीत पय ऐवजी पाय लिहीलं गेल्यानं सगळी गंमत झालीय.
भरत +१
ओह असेलही. धन्यवाद.
ओह असेलही. धन्यवाद. दुरुस्त करते.
- अर्र संपादन करता येत नाही. टाइम आ ऊट
प्रत्येक वाक्यात वेगळे नाव
प्रत्येक वाक्यात वेगळे नाव नसले तर फाऊल धरतात का...
Pages