Submitted by मॅगी on 7 September, 2022 - 09:16
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि त्याने आ वासला! पडवीतल्या झोपाळ्यावर विनूकाका पेपर वाचत होते. बाहेर उन्हात मेंदीच्या हिरव्यागार कुंपणावरून त्यांच्याकडे आलेल्या छोट्या पाहुणीने तिच्याच वयाच्या रघूकडे लक्ष जाताच "अव्वा!" म्हणून तोंडावर हात घेतला. तिचे घारे डोळे चमकले आणि अपऱ्या नाकावरचा तीळ उठून दिसला. ती पटकन वळून मागे घरात पळाली. त्याने चमकून स्वतःच्या उघड्या शरीराकडे पाहिले आणि आपल्या घरात पळाला.
काही वेळानंतर सहा फुटाचा तरणाबांड होऊन तो बेडरूममध्ये उभा होता. "कुठवर स्वारी?" बायकोने आत येऊन हसत तिळासकट नाक उडवले. "आठव्या वर्षात! आपण एकमेकांना पहिल्यांदा पाहिलं!" तो हसत तिच्या हातातले कपडे घेत म्हणाला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मस्त
The Time Traveler's Wife.
पडवीतल्या झोपाळ्यावर विनूकाका
पडवीतल्या झोपाळ्यावर विनूकाका पेपर वाचत होते. >> ह्याचे प्रयोजन कळले नाही. बाकी प्रयोग आवडला.
छान कल्पना
छान कल्पना
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
मस्त.
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(चेकॉव्हचे विनूकाका नाहीत वाटतं ते)
झकास!
झकास!
पडवीतल्या झोपाळ्यावर अजुनही विनूकाका पेपर वाचत होते.>> असं काही कालदर्शक केलं तर चेकॉव्ह होईल का खुष?
धन्यवाद! हाहा मामी, तेच
धन्यवाद! हाहा मामी, तेच शीर्षक देता देता थांबले.
असामी, प्रयोजन काळ दर्शवण्याचे आहे. तेच स्वातीने लिहीलेय तसे.
अमित, 'अजूनही' शब्द नकोय कारण रघूसाठी प्रत्येक वेळ ताजी कोरी असते.
मस्तय ही. आवडेश
मस्तय ही. आवडेश
छान.
छान.
मस्त
मस्त