तमिळनाडूचा इतिहास भाग- ६

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 6 September, 2022 - 15:11

एका रम्य सकाळी शहरातील पाॅश एरीया मयलापूरात चहा पिनारे काही अभिजन तरूण ऊत्साहात दिसत होते. ते सामान्य तरूण नव्हतेच. एक कचेरीत प्रतिष्ठीत वकील होता, एक “द हिंदू”तील प्रथम स्तंभलेखकात होता, एक सिवील सर्वंट होता, एक रिअल ईस्टेट मालक, एक प्रोफेसर. हा ईंग्रजींच्या तालमीत तयार झालेल्या काही ब्राम्हण तरूणांचा घोळका होता जे समजायचे की ह्या देशाच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. तसंच जसं पुणे-मुंबई आणी कलकत्त्यातील ऊच्चभ्रू सवर्णांना वाटायचं. हा भारताचा ताजा एलीट क्लब होता, जो मॅकालेवादी ईंग्रजी शिक्षणाच्या पायावर ऊभा होता. रक्ताने भारतीय विचारांनी ईंग्रज.

“कालची काॅन्फरंस चांगली होती. तू नाही आलास?”

“मी एका खटल्याची याचीका बनवन्यात गुंतलो होतो, काय आहे ही थियोसाॅफीकल सोसायटी? ऐकलंय की अडयारात मोठी जमीन मिळालीय त्यांना.”

“आजकाल तर एकेश्वरवाद, एक सार्वभौमीक धर्म, ब्रम्ह समाज, आर्य समाज, प्रत्येकजागी हेच बोलणं चाललंय, ह्यांचंपण असंच काहीतरी आहे.”

“हो? मी तर ऐकलं मॅडम ब्लाताव्सकी काहीतरी वू-डू करताना पकडली गेली”

“हा हा!आॅकल्ट म्हणतात त्याला, काहीतरी बौध्द तंत्र मंत्र आहेत.”

“ख्रिस्ती मिशनरी नक्कीच नाराज होतील ह्यांच्यावर.”

“नाराज तर झालेत, आज संध्याकाळी चल, काहीतरी सिक्रेट मीटींग होनार आहे दिवान साहेबांच्या घरात.”

“दिवान रघुनाथ राव?”

“हो! आपली महाजन सभा नी त्यांच्या सोसायटीतील काही लोक भेटनार आहेत.”

“काय अजेंडा आहे?”

“मला माहीत नाही, पण काहीतरी मोठी योजनाय”

त्या संध्याकाळी काही लोक मद्रासस्थित दीवान रघुनाथराव ह्यांच्याघरी एकत्र आले. ह्या मीटींगचे अध्यक्षपद एक सेवानिवृत्त ईंग्रज आॅफीसर करत होते.”

ते बोलले, “ मी आपल्या सर्व गुणवंत आणी प्रतिभासंपन्न व्यक्तिंचे स्वागत करतो. आपण सगळे ह्या देशातील निवडलेले लोक आहात. आपणा सर्वांवर महत्वाच्या जबाबदार्या आहेत, समाजाला ऊत्तरदायी आहात. आपल्यातील अनेकांनी १८५७ नाही पाहीलं. मी ह्या देशातील गरीब लोकांवरील तो अन्याय माझ्या डोळ्यांनी पाहीलाय. पण खंत अशी आहे की त्यावेळी माझे हात बांधलेले होते. मी वाटत असूनही काही करू शकलो नाही. मी ईंग्रजांचा एक नोकर होतो.

पण, तुम्ही भारतीय आहात. आपणा सर्वांना ह्या निरंकूश सत्तेपासून मुक्ती हवीय. लोकशाहीची स्थापना करायचीय. एका अश्या राज्याची मागणी करायचीय ज्यात प्रशासन आपल्या हातात असेल.

मला माहीत पडलंय की तुम्ही लोकांनी एक मद्रास महाजन सभा बनवलीय. एक “द हिंदू” वर्तमानपत्र छापनं सुरू झालंय. मुंबई-पुण्यातही बैठकी बसल्या आहेत. कलकत्त्यात मी काही प्रेसिडेंसी काॅलेजच्या तरूणांशी बोललो. त्यांनीही एक क्लब बनवलाय.

आम्हास ह्या सगळ्यांना एकत्र आणून एक राजकीय ताकद ऊभी करायचीय, जी ब्रिटीश राज्यासमोर जनतेचं प्रतिनिधत्न करेल. जी आपल्या मागण्या मांडेल.

आमची थियेसाॅफिकल सोसायटी ह्या कार्याला शक्यतीतकं सहाय्य करेल.”

एका तरूणाने विचारले “सर! त्या शक्तिचे नाव काय असेल?”

“अजून विचार केलं नाहीये. आता आपण सगळ्यांनी दर वर्षी भेटणं सुरू करावं”

“इंडियन नॅशनल यूनियन?”

“चांगली सूचना. मी वाईसराॅय ला चिठ्ठी लिहीन कि आमच्या ह्या यूनियन ला दर वर्षी एक काॅंग्रेस (संमेलन) ची परवानगी दिली जावी जिथे आम्ही देशभरातील मूद्द्यांवर चर्चा करू.”

ती व्यक्ती होती एओ ह्यूम, आणी ते सतरा व्यक्ति (Mylapore १७) रचत होते पाया “इंडियन नॅशनल काॅंग्रेस चा.”
…….

काहीतरी रहस्यमय घडत होतं.
थियोसाॅफीकल सोसायटी च्या चर्चेवीना द्रविड आंदोलनाबद्दल बोलणं कठीण आहे. ही रंगमंचं सजायच्या आधीच्या नाट्याची सुरूवात आहे. मद्रासात होनार्या ह्या घडामोडींनीच भारताचं भविष्य ठरनार होतं.

१८७५ साली न्यूयोर्क शहरात काही विचीत्र प्रकारचे लोक भेटले. ज्यांनी एक समुह बनवला. त्याचं चिन्ह असं होतं ज्यात स्वस्तिक, ओम, डेविड चा तारा , ईजिप्त-ग्रीक चा तो साप जो आपली शेपटी आपल्या तोंडात धरून होता. ते एका अश्या धर्माबद्दल बोलत होते ज्याचा कुठलाही धर्म नसेल. हे थोडे सुफी पंथींयांसारखे होतो जे तंत्र मंत्र आणी ज्यूंसारखे विधी करायचे.

कश्मीरचे महाराज रणबीरसिंग पण अश्याच स्वभावाचे व्यक्ति होते. त्यांनी ह्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी मद्रासचे तीस वर्षीय वकील तरूण सुब्बाराव तत्वज्ञानी म्हणून नावाजले होते. त्यांनी महाराजांच्या मदतीने त्यांना बोलावले आणी मद्रासच्या हिरव्यागार शांत भागात म्हणजे अडयार मध्ये जमीन मिळवून दिली. तिथे त्या सोसायटीचे मुख्यालय तयार झाले. ह्यांची प्रमूख होती एक रहस्यमयी ईंग्रज महिला मैडम ब्लाताव्सकी आणी एक अमेरीकन बौध्द मिस्टर आॅकाॅल्ट.
ह्या सोसायटीच्या कार्यालयातील काहीतरी विचीत्र संक्रमणामूळे सुब्बाराव अल्पायुषी वारले.

ह्या सोसायटीकडे मद्रासातील अभिजन तमिळ ब्राम्हण आकर्षित होत होते. शेवटी ईंग्रजीत धर्मावर चर्चा होत होती. युरोपीय नी अमेरीकन लोकांसोबत बसून चर्चा करण्याचा आनंदं मिळायचा. दयानंद सरस्वतींचा आर्य समाजसुध्दा काही काळासाठी ह्यांच्याकडे आकर्षीत झाला होता.

पण ह्यांची इच्छा काय होती? कोण होते हे लोक? ही गोष्ट ब्रिटीशही जाणून घेऊ ईच्छित होते की हे फिरंगी शेवटी भारतात ख्रिश्चन धर्म न आणता काय आणू इच्छितात? ते त्या काळातील हिप्पी प्रकारचे लोक होते का? जे हिंदू नी बौध्द ग्रंथात निर्वाण शोधत होते?

थियोसाॅफीकल सोसायटीचा मूलमंत्र होता ‘सत्यम नास्ति परो धर्मः’ (नास्ति सत्यात् परो धर्मः वर आधारित). अशी नोंद आहे की हा मंत्र मॅडम ब्लातावस्की ना काशीच्या महाराजांनी सांगीतला होता. ह्यामंत्राचा त्यांनी अर्थ काढला, सत्याहून मोठा कुठलाच धर्म नाही. अर्थ तर ठिक होता पण ह्यात “कुठलाच धर्म नाही” ह्यावर जोर होता. न हिंदू, न मुसलमान, न ख्रिश्चन, न बौध्द, न ज्यू. (ऊलटपक्षी एक साधारण समज असलेल्या भारतीयाला सुध्दा ह्या
श्लोकाचा अर्थ समजतो. ईथे धर्माचा अर्थ कर्तव्याशी आहे, आताच्या जगातील सर्व धर्मांशी नाही.)

असो, ह्या सोसायटीच्या लोकांनी भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसचा पाया रचला. हा काही सामान्य गोष्ट नव्हती ही गोष्ट आता आपण जाणतोच. स्वातंत्र्या आधीचे शंभर वर्ष नी स्वातंत्र्यानंतरचे चार पाच दशकं ह्याच संघटनेने किंवा ह्यांच्या शाखेने भारताचे नेतृत्व केले. स्वतः गांधी जेव्हा कायद्याच्या शिक्षणासाठी गेले होते तेव्हा मॅडम ब्लाताव्सकींना भेटले आणी त्यांनी गांधींना भगवद्गिता वाचण्याचा सल्ला दिला. गांधींच्या विचारात सत्याचा आग्रह आणी आपल्या धर्माच्या व्याख्येत थियोसाॅफिकल सोसायटीचे योगदान आहे. गांधींनी सांगीतलंय की ते मॅडम ब्लाताव्सकींनी प्रभावीत झाले होते, पण त्यांच्या रहस्यमयी विधींवर त्यांना शंका होती.

नंतर ह्या सोसायटीची जबाबदारी एनी बेसेंट यांनी सांभाळली. आणी त्या काॅंग्रेसच्या पहिल्या महीला अध्यक्ष सुध्दा झाल्या. नंतर त्यांनी टिळकांसोबत मिळून स्वराज्या(होमरूल)चं आंदोलन ऊभारलं नी मदन मोहन मालवीय ह्यांच्यासोबत बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली.

तमिळनाडूत एनी बेसेंट नी ह्या सोसायटीचं असणं एक योगायोग होता. पण काॅंग्रेसच्या माध्यमातून तमिळ ब्राम्हणांचं राजकीय प्रभूत्व वाढणं हा काही योगायोग नव्हता. (गांधी येण्याआधी)
काॅंग्रेस बंगाली, मराठी आणी तमिळ ब्राम्हणांचा, पारश्यांचा आणी काही युरोपीयन आणी काही अन्य ऊच्चभ्रू सवर्णांचा घोळकाच होता. तमीळनाडूत ही गोष्ट लोकांना बोचत होती, कारण तिथे ब्राम्हण अति अल्पसंख्यांक होते. पण, ब्राम्हणांविरूध्द कोण बोललं असतं? धर्माची नी प्रशासनाची सत्ता दोन्हीही त्यांच्या जवळ होत्या.

एक धनाढ्य व्यवसायी दांपत्य वर्षानूवर्षे मूलासाठी नवस करत मंदिरात चकरा मारत होते. शेवटी तिरूपती दर्शनानंतर त्यांना दोन मूलं झाले, ज्यांची नावे त्यांनी विष्णु अवतारांवर ठेवली.- कृष्णास्वामी आणी रामास्वामी.

त्यांना माहीत नव्हतं कि हा रामास्वामीच राम-कथा आणी संपुर्ण ब्राम्हण समाजाचा सर्वात भीषण टीकाकारातील एक बनेल आणी म्हणवला जाईल “पेरियार.”
(क्रमशः)

मूळ लेखक- प्रविण झा.

Group content visibility: 
Use group defaults

हा भाग मला रोचक आणि उत्कंठावर्धक वाटला.
ह्या सर्व भागांना ' तामीळनाडू च्या आधुनिक इतिहासाची पार्श्वभूमी ' असे म्हणता येईल

एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नाही.
तुम्ही भाषांतर स्वतः करा आणि ते मराठी मध्ये लिहा.
Google भाषांतर करू नका.
काही म्हणजे काहीच कळत नाही लेखात नक्की काय सांगायचे आहे ते

एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नाही.
तुम्ही भाषांतर स्वतः करा आणि ते मराठी मध्ये लिहा.
Google भाषांतर करू नका.
काही म्हणजे काहीच कळत नाही लेखात नक्की काय सांगायचे आहे ते >>>>
भाषांतर मी स्वतःच करतोय. गूगल वगैरे काहाही न वापरता. कसला अर्थ लागत नाहीये?? जरा विस्कटून सांगा. सरळसोट तर आहे सगळ.

भाषांतर करायची परवानगी घेतली आहे का लेखकाकडून?>>>> तुम्ही आंबे खा फक्तं. इतर चौकशांसाठी मायबोली प्रशासन आहे. Happy

नवीन माहिती मिळतेय हे नक्की, पण प्रतिसाद देणाऱ्यांना उद्धट वाटतील अशी उत्तरे देऊ नका प्लीज. >>>>
नक्कीच. सूचनेचे स्वागत आहे. पण लेखकाची परवानगी घेतलीय का वगैरे आपल्या अखत्यारीत नसनारे प्रश्न कुणी विचारू नये. त्या साठी माबो प्रशासन आहे, हे पहाण्याचं कार्य त्यांचं आहे. बिनपगारी फूलअधीकारीपणा कुणी का करावा?? तरी कुणाला वाईट वाटलं असल्यास मी माफी मागतो.