प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ६ - भांडीकुंडी

Submitted by संयोजक on 26 August, 2022 - 22:43

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ६ - भांडीकुंडी

भांडीयेsss भांडीयेsss भांडी घ्या भांडी अशी आरोळी ठोकत एखादी बोहारीण आजही काही भागात फिरते. हरतऱ्हेची भांडी घरात असली तरी जुन्या कपड्याची गाठोडी तिच्यापुढे उलगडत घरची गृहिणी एक तरी कुंडा ,सट तिच्या बुट्टीतून उचलतेच. पूर्वी पानं, टोपली, दगडाचा खोलगट भाग अशा वस्तूंचा भांडी म्हणून वापर व्हायचा. आता मात्र भांड्यांची जंत्री काय सांगावी! गडू, किसणी, चाळणी, खवणी, रोवळी, बुधली, अडणी , तामली पासून काहील, काथवट, तसराळं, घमेलं, मुदाळं.... नुसतं देवघरात डोकावलं तरी तांब्या- पळी, तबक, करंडा, कोयरी, परडी... किती सांगू? कुठला समारंभ असला की अत्तरदाणी , गुलाबदाणी बाहेर काढली जातेच.
यातही पुन्हा लाकडी, मातीची, तांब्या- पितळेची, लोखंडी पासून कोरल, बीड, मेलामाईन, काच, सिरॅमिक अशी विविधता आहे.

या प्रकाश चित्रांच्या खेळातून अशाच विस्मृतीत गेलेल्या भांड्यांपासून आधुनिक भांड्यांची झलक बघूया.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आमचा तवा , माहित नाही कधी घेतलाय . घावन डोसे वगैरे फार सुंदर होतात. पीठ कसलंही आणि किती ही पातळ असलं तरी जाळी ही पडते . मी पोळ्या मात्र कधीही करत नाही ह्यावर.
वापरावा मात्र खूप संभाळून कारण खूपच जड असल्याने खाली पडला तर लादी किंवा फुटण्याची गॅरेंटी. पायावर पडला तर काय होईल विचार ही करवत नाही.
20220905_114726.jpg

मस्त फोटो आर्च आणि मी नताशा.

माझी रोज वापरातली पितळी चाळणी. पूर्वी गहू चाळायला वगैरे हीच वापरत होतो आता ते काही करावं लागतं नाही भाज्या फळं धुवायला वैगरे वापरात आहे.

20220905_172508.jpg

स्वरूप यांना (गड्डा) झब्बू :

3E4370C9-D12C-4F9F-93D0-82AACF5B86D3.jpeg

मला तो होडीच्या आकाराचा खल भारी आवडतो - आईकडे पूर्वी होता तसला. बराच काळ शोधत होते, पण हल्ली सगळीकडे हे गोल खलच दिसतात.
शेवटी एकदा चक्क वॉलमार्ट (फक्त वेबसाइट)वर मिळाला! Happy

WhatsApp Image 2022-09-05 at 2.20.24 PM.jpeg

अजुन एक झब्बू.. हा खलबत्ता इथेच एका दुकानात मिळाला. सगळ्या मैत्रिणीच्या आई/सासू लोकांना आवडलाय हा Happy

अरे व्वा!
मस्त व्हरायटी आहे की सगळ्यांकडे.... हा वरचा फोटो मी 'ढेपेवाड्यात' काढलाय

अनिंद्य, चालेल की! मस्त आहे सेट. Happy

ही परवा जवळच्या देशी दुकानात मातीची वॉटरबॉटल मिळाली - लहानपणी नव्या माठातलं लागायचं तसं कोऱ्या वासाचं थंड (गार नाही!) पाणी पिऊन जीव निवला!!

6AA0750D-E8F5-4ECA-A35F-C1564012A2AE.jpeg

स्वाती, तुझ्या मातीच्या वॉटरबॉटलला हा मातीच्या हंडीचा झब्बू :))
WhatsApp Image 2022-09-05 at 2.52.26 PM.jpeg

मागच्या भारतवारीत घेतली होती ही कढई. भाज्या मस्त होतात ह्यामध्ये.

अरे वा! मस्तच!
फोडणी वगैरे केलेली चालते का यात? आधी भिजवून घेतेस कढई?

मी हे भांडं आणि करवंटीची डाव केरळ ट्रीपमध्ये घेतलं होतं, पण दुकानदाराने त्यात द्रवपदार्थच शिजवा अशी सूचना केली होती. त्यामुळे वरून फोडणी देऊन डाळी किंवा पाणी उकळून त्यात तांदूळ वैरून भात अशाचसाठी वापरते.

27AEEDBF-CD3D-4FE4-8926-C25998A63807.jpeg

फोडणी वगैरे केलेली चालते का यात? आधी भिजवून घेता कढई?

>>> नविन होती तेंव्हा १-२ दा भिजवून घेतली पण आता डायरेक्ट फोडणी करते त्यात. गॅसवर ठेवल्यावर त्यात आधी तेल टाकून मगच गॅस पेटवायचा अस त्या दुकानदाराने सांगितलं ते फक्त पाळते.

आणि आहो-जाहो नको Happy

>>> ही भांडी तुम्ही आणली कशी भारतातून?
जीव मुठीत धरून! Proud

बबल रॅप आणि बऱ्याच जाडसर कपड्यांत चकडबंद गुंडाळून. पण धडपणे आलं हे तरीही नवलच! Happy

हल्ली इथल्या (न्यू जर्सीतल्या) देशी दुकानांत मिळतात बऱ्याच व्हरायटीज - तुम्ही कुठे राहाता तिथे चेक करा हा खटाटोप करण्याआधी. Happy

जीव मुठीत धरून! Proud >>>> exactly Biggrin
बबल रॅप आणि बऱ्याच जाडसर कपड्यांत चकडबंद गुंडाळून. पण धडपणे आलं हे तरीही नवलच! Happy >>> +१११ :))

ते भांडं आणि करवंटीची डाव किती क्युट आहे

मेलबर्नच्या नॅशनल गॅलरी ऑफ व्हिक्टोरियामध्ये एका प्रदर्शनात एक दालन एका भारतीय कलाकाराच्या नावाचं दिसलं. तिथे काय कलाकृती मांडली आहे हे बघायला कौतुकाने गेले तेव्हा हे दिसलं. फोटो २०१६चा आहे.

bhandi1.jpg

Pages