Submitted by अni on 6 September, 2022 - 01:54
दरवेळी माझ्यासोबतच सर्व सण साजरे व्हायचे. आज तर विशेष महत्व म्हणून पुरणाचा बेत असायचा. फुलांच्या माळा आणि मस्त झूल सुद्धा. आनंदाने माझ्या अंगावर रोमांच उठायचे आणि त्याचबरोबर घुंगराची लयबद्ध किणकिण... त्या आवाजासरशी प्रत्येकवेळी माझ्याकडे कौतुकाने पाहिलेली ती प्रेमळ नजर...डौलदार वशिंडावर मारलेली मायेची थाप... आज सर्व सर्व काही तिव्रतेने आठवतंय. धनी अचानक गेल्यावर कर्जफेडीसाठी उरलेली पूंजी म्हणजे मीच होतो फक्त ! त्यानेही भागले नाही म्हणून घरावर जप्ती झाली.. आणि माझी बैठक सावकाराच्या घरी !!
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि ..... मागल्या दुष्काळात धनी ज्या चिंचेच्या झाडाला लटकताना दिसले त्याच्यासमोरच बसकण मारुन शेवटचा श्वास सोडला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी जमली आहे!
भारी जमली आहे!
वाक्य मध्ये घ्यायचे कल्पना
वाक्य मध्ये घ्यायचे कल्पना आवडली. कथा उत्तम!
वाक्य मध्ये घ्यायचे कल्पना
वाक्य मध्ये घ्यायचे कल्पना आवडली. कथा उत्तम!
वाक्य मध्ये घ्यायचे कल्पना
वाक्य मध्ये घ्यायचे कल्पना आवडली. कथा उत्तम!++१११११
कथा उत्तम!
कथा उत्तम!
भारी जमलीय !
भारी जमलीय !
वाक्य मध्ये घ्यायची कल्पना +७८६
मस्त रे अज्ञानी!!
मस्त रे अज्ञानी!!
वाक्य मध्ये घालायची कल्पना तर भारीच पण रघूला टिपीकल माणूस न बनवता बैल वगैरे बनवायची आयडियाही चांगली जमलीय!
धन्यवाद स्वरूप, ऋन्मेऽऽष,
धन्यवाद स्वरूप, ऋन्मेऽऽष, SharmilaR, धनुडी, नानबा, हरचंद पालव आणि वावे
वाक्य मध्ये घ्यायचे कल्पना
वाक्य मध्ये घ्यायचे कल्पना आवडली. कथा उत्तम!>>+१
ओह...
ओह...
वाक्य मध्ये घ्यायचे कल्पना आवडली. कथा उत्तम!>>+१
नावीन्यपूर्ण कल्पना खूपच
नावीन्यपूर्ण कल्पना खूपच आवडली! कथा आवडली असे कसे म्हणु
छान
छान
वाक्य मध्ये घालायची कल्पना तर
वाक्य मध्ये घालायची कल्पना तर भारीच पण रघूला टिपीकल माणूस न बनवता बैल वगैरे बनवायची आयडियाही चांगली जमलीय! >>> +१२३