Submitted by अमितव on 5 September, 2022 - 09:46
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि क्षणभर थबकलाच. आज एकटा असतानाही तो ते घर 'बघू' शकत होता! इकडे बाबाबरोबर कितीतरी वेळा तो आलेला. फ्रेम केलेले असंख्य फोटो, लांबसडक जिने आणि एकाच फ्रेमवर घातलेली चादर! ती चादर घातल्याने त्या फोटोतल्या आज्जीला बाहेरचं जग खरंच दिसत नसेल? आणि बाजूच्या अंधार्या खोलीत काढलेला तो वंशवृक्ष. ते बाबाचं घर असुनही वंशवृक्षात बाबाचं नाव नाही हा पडलेला प्रश्न! शेजारी राहुनही ते अदृष्य घर फक्त बाबा असतानाच कसं दिसतं हे कोडं! बाबा गेल्यावर आता आईला आधार द्यायला हवा विचार करतोय तोवर आईची हाक ऐकू आली अल्बस-सेव्हरस! त्याच्या पाळण्यातल्या नावाने!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमितव
अमितव
थोडी थोडी समजली. पूर्ण समजली की पुन्हा लिहीन.
मीही गोंधळले आहे. घर
मीही गोंधळले आहे. घर वर्णनावरून सीरियसचं वाटतंय, पण अल्बस सेवरस हॅरीचा मुलगा ना?
सिरियस नंतर ते घर हॅरीचं झालं
सिरियस नंतर ते घर हॅरीचं झालं. तिकडे अल्बस-सेव्हरस बाबाबरोबर अनेकदा गेलेला आहे. आता ते बाजूच्या मगल घरात राहतात. पण Fidelius चार्म त्याला माहीत नसल्याने त्याला ते घर दिसत नाही. हॅरी नंतर आता वारश्यात ते त्याला मिळालं/ हॅरी ने निरोप घेण्यापूर्वी त्याला त्या घराची अचूक जागा सांगितली आणि आता ते घर त्याला दिसू लागलं. असं म्हणायचं होतं.
ok. समजली आणि आवडली.
ok. समजली आणि आवडली.
हॅरीला का मारलंत.. :टडोपा:
हॅरीला का मारलंत..??
ओह ओके.
ओह ओके.
(हॅरीला कशाला मारलं आणि उगाच! ‘द बॉय हू लिव्ड’ टर्न्ड ‘द मॅन हू डाइड’? )
हॅरी पॉटर मोड ऑन!!!
हॅरी पॉटर मोड ऑन!!!
Albus severus che नाव रघू कसे
Albus severus che नाव रघू कसे काय झाले! पार्वती पाटील च्या मुलीशी लग्न केले का
Albus severus che नाव रघू कसे
Albus severus che नाव रघू कसे काय झाले! >>> त्याला संयोजक जबबादार आहेत. तिथे त्या दोघी टाकले आहे, इथे रघु कश्याला हवे होते
कथा आवडली
छान आहे कल्पना.
छान आहे कल्पना.
प्रतिसाद हहपुवा आहेत.
>>> पार्वती पाटील च्या मुलीशी
>>> पार्वती पाटील च्या मुलीशी लग्न केले का
अल्बस-सेव्हरस आणि स्कॉर्पिअस
अल्बस-सेव्हरस आणि स्कॉर्पिअस लग्न झालेलं आवडेल मला. पण रोलिंगबाई लावायच्या नाहीत.
अगोदर गोंधळ झालेला..
अगोदर गोंधळ झालेला.. स्पष्टीकरणानंतर समजली कथा
एकदम भारी , आवडली!
एकदम भारी , आवडली!
(No subject)
प्रतिसाद वाचून समजली.
भारी जमली आहे एकदम
भारी जमली आहे एकदम
प्रतिसाद वाचून समजली..... +१.
प्रतिसाद वाचून समजली..... +१.
आजीच्या फ्रेमवर चादर... हा
अमित, आजीच्या फ्रेमवर चादर... हा संदर्भ लागला नाही.
Albus severus che नाव रघू कसे काय झाले! पार्वती पाटील च्या मुलीशी लग्न केले का <<<
सिरिअसच्या आईच्या फोटोवर मला
सिरिअसच्या आईच्या फोटोवर मला वाटतं ती किंचाळून ओरडू नये म्हणून सिरियस एकदा तो फोटो झाकतो असं वाचलेलं आठवतंय. ऑर्डर ऑफ फिनिक्स मध्येच असेल. अचुक प्रसंग आठवत नाही आत्ता, पण आहे कुठेतरी. सापडलं/ आठवलं तर लिहितो.
मला माझं नाव शांताराम पण
मला माझं नाव शांताराम पण प्रेमानं मला रखुमाई म्हणतात वाला जोक आठवला..
(No subject)
सिरिअसच्या आईच्या फोटोवर <<<
सिरिअसच्या आईच्या फोटोवर <<< आठवले.
आजी म्हटल्यावर मला लिली किंवा मॉली वाटले.