Submitted by WHITEHAT on 2 September, 2022 - 22:58
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय..
कठड्याकडे निघालेल्या नातवाचा हात कावेरीने पकडला आणि पुन्हा हिच्याकडे वळली.
"दोन वर्ष करोनामुळे गौरीगणपती नाही केले. यावर्षी मुलासुनेला म्हटलं गुरुजींना विचारून कायमस्वरूपीच पूर्णविराम देऊ. सूनबाई म्हणाली- गौरीगणपतीचे पाच दिवस घरात उत्सवी, उत्साही, मंगलमय वातावरण असतं. आप्तस्नेह्यांनी घर भरतं. तो पॉझिटिव्हीटी रिचार्ज वर्षभर पुरतो. सून-मुलगा दोघांनी मिळूनच केलं सगळं. चुकलंमाकलं माफ कर आई, तुझी कृपा आमच्यावर असू देत." कावेरीने भरल्या डोळ्यांनी हात जोडले. गणेशाचा हात धरलेल्या पार्वतीने हसून 'तथास्तु' म्हटल्याचा भास तिला झाला.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान!
छान!
आवडली.
आवडली.
आवडली
आवडली
छान आहे.
छान आहे.
छान आहे.
छान आहे.
छान आहे!
छान आहे!
छान आहे!
छान आहे!