मुलांना गोष्ट सांगत झोपवून ती बाहेरच्या खोलीत आली. घड्याळात बघितलं तर साडेदहा वाजून गेलेले. नवऱ्याचं प्रोजेक्ट रिलीज आलेली त्यामुळे आजकाल त्याला यायला तर उशिरच होत होता. खिडकी बंद करायला म्हणून गेली तर क्षणभर तिथेच थबकली. खडकीतून छान शुभ्र चंद्र तिच्याकडे बघून जणू हसत होता. वाऱ्याच्या मंद झुळुकीन अंगालाच नाहीतर मनाला पण छान गारवा मिळाला, आणि कुंडीतल्या मोगऱ्यानेही स्वतः ची जाणीव करून दिली. शुभ्र शीतल चांदणं, हळुवार वाऱ्याची झुळूक आणि त्याबरोबर येणारा मोगऱ्याचा मंद सुवास ! हेच तर स्वर्गसुख नव्हे ! आणि तेही दुसऱ्या तिसऱ्या महागड्या रिसॉर्ट मध्ये नाही तर घरबसल्या, आपल्या स्वतःच्या इतक्या छोटयाश्या ब्लॉक मधे ?
इतक्या वर्षांत पहिल्यांदाच आपण हे अनुभवतोय! तीन वर्षांपूर्वी किती तरी घरं बघून झाल्यावर शेवटी मिळालं हे पूर्व-पश्चिमवाल घर. सगळे हिशेब ठिशेब जमवून, जमवलं कसं बस एकदाच! मग अजून थोडं कर्ज काढून ते सुंदर सजवलं. आता जाणवतंय इतक्या आटापिटा करून घेतलेल्या घरात गेल्या तीन वर्षात म्हणजे, १०९५ दिवसात, दहा मिनिटंही स्वस्थपणे घराचं घरपण अनुभवायला मिळू नयेत. आपण कुठल्या सुखाच्या मागे त्याला पकडायला पळतोय?
नवीन घर घेतल्याचा, ते सजवल्यावर झालेला आनंद हा खरंच आनंद होता कि अभिमान ? कि आम्ही पण करून दाखवलं असा किंचितसा अहंकार?
आणि तो आनंद खरा म्हणावा तर घर घेतल्यापासून आठवतात ते कर्जाचे हफ्ते , ऑफिसच्या कटकटी , मुलांची आजारपणं , वीकेंडची कामं आणि सगळं झेपेनास झालं कि होणारी पेल्यातली वादळं.
सुखं ,आनंद दोन प्रकारचे असतात का?
एक आनंद खूप मोठा, साजरा करावा असा, सगळ्यांना दिसतो असा , शेजाऱ्याने हेवा करावा असा ! चांगले मार्क मिळाले, लग्न केल, घर घेतलं , बढती मिळाली . मुलं झाली, झालच तर लाखांची लॉटरी लागली. पण मग ते काही रोज तर नाही मिळणार. म्हणजे लग्न केलं तरी एकदा, घर घेतलं (एकदा किंवा फारतर दोनदा). मुलं झाली (एकदा किंवा दोनदा ), नोकरी बदलली तरी काही वर्षांच्या अंतराने तेच झालं बढतीच ! बरं ह्या मोठया मोठया आनंदाबरोबर जबाबदाऱ्या आणि कटकटी हि वाढणाऱ्या असतात, मग त्यात आधी ज्याच्या मागे पळत इथवर येतो ते सुख पण लपून कुठेतरी हरवून जातं.
दुसरा आनंद सहजच मिळणारा अगदी आजच्यासारखा वाऱ्याच्या मंद झुळुकेबरोबर येणारा, पहिल्या पावसाच्या मृदगंधाने सुखावून टाकणारा, उमललेल्या कळीसारखा लाजरा बुजरा , दुडू दुडू धावणाऱ्या बाळासारखा खट्याळ, त्या बोबड्या बोलांनी कान सुखावणारा, सुग्रास जेवणाच्या सुवासावर येणारा , पाखरांच्या किलबिलाटाने जागवणारा, आई वडिलांच्या समाधानी चेहऱ्याने हास्य फुलवणारा, मित्रांच्या मैफिलीत वेळकाळाचं भान हरपवणारा, प्रियकराच्या आठवणीने धुंदावणारा, लताच्या सुरांनी न्हाऊन घालणारा, सूर्योदय-सूर्यास्त अनुभवताना शाश्वततेचे आश्वासन देणारा .... ! अरे हे तर किती प्रकारचे आनंद, ज्यांच्या मागे पळावही नाही लागत. अगदी क्षणाक्षणाला वेचता यावं इतकं भरभरून ठेवलेलं हे सुख. फक्त ह्यातली गोम अशी आहे कि ते आपल्याला जाता जाता वेचाव लागतं अगदी जाणीवपूर्वक. नाहीतर मोठ्या सुखाच्या मागे पळताना हे अनायासे असलेलं सुख दुर्लक्षित होऊन मागेच पडत आणि आपण आपले भरधाव गाडीतून पुढे मृगजळाच्या मागे!
लॅचच्या आवाजाने ती भानावर आली. "काय वेळ आहे हि घरी यायची ,आज अगदी कहर केलाय ह्याने, बारा वाजायला आले " हे वाक्य मनातच गिळून, कपाळावरची आठी घालवून, हलकीशी हसली, " अरे आज बघ काय छान चांदणं पडलंय, अगदी कोजागिरीचं जणू , मोगरा तर इतका सुरेख दरवळलाय. तू पट्कन फ्रेश होऊन ये, मी जेवण गरम करून आणते. " दबकत घरात शिरणाऱ्या नवऱ्याला म्हणत ती स्वयंपाक घराकडे वळली.
रात्री बाराला मिळणाऱ्या ह्या अनपेक्षित धक्क्याने तोही क्षणभर गडबडला, पण लगेच हलकिशी शीळ घालत , "सुखं म्हणजे नक्की काय असतं ... ?" गुणगुणत बाथरूमच्या दिशेने निघाला .
सुखं म्हणजे नक्की काय असतं ... ?
Submitted by छन्दिफन्दि on 25 August, 2022 - 02:12
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज मूड दिसतोय बाई साहेबांचा.
आज मूड दिसतोय बाई साहेबांचा. ......... जेवणानंतर वाफाळलेली कॉफी प्याय्चा हो.
छान लिहिलेय. रोजच्या रूटीन
छान लिहिलेय. रोजच्या रूटीन लाईफमध्येही छोटे छोटे बरेच आनंद असतात.... जे रोजच येतात.. आणि रोजच आनंद देऊन जातात.. लिस्ट काढली तर १५ गोष्टी तरी नक्की निघतील..
@अश्विनीमावशी : ) :).
@अश्विनीमावशी : ) :).
@ ऋन्मेऽऽष Thank you. खर आहे
आज मूड दिसतोय बाई साहेबांचा.
आज मूड दिसतोय बाई साहेबांचा.
>>>
छान लिहिले आहे... स्पेशली हे ---
आपण कुठल्या सुखाच्या मागे त्याला पकडायला पळतोय?
नवीन घर घेतल्याचा, ते सजवल्यावर झालेला आनंद हा खरंच आनंद होता कि अभिमान ? कि आम्ही पण करून दाखवलं असा किंचितसा अहंकार?
आणि तो आनंद खरा म्हणावा तर घर घेतल्यापासून आठवतात ते कर्जाचे हफ्ते , ऑफिसच्या कटकटी , मुलांची आजारपणं , वीकेंडची कामं आणि सगळं झेपेनास झालं कि होणारी पेल्यातली वादळं.
@च्र्प्स Thank you.
@च्र्प्स Thank you.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
आवडल.
आवडल.
@ववेवा, @परिस, Thank you
@ववेवा, @परिस, Thank you
मस्त लिहीलय.
मस्त लिहीलय.
@सामो thank you
@सामो thank you
लेक्चर द्यायचं म्हटलं तर
लेक्चर द्यायचं म्हटलं तर
" आनंद ही मनाची स्थिती असते. बाह्य गोष्टींवर आपला आनंद फारसा अवलंबून नसतो." वगैरे.
आनंदच म्हणून गेलाय नं '
आनंदच म्हणून गेलाय नं ' जिंदगी कैसी ये पहेली हाये , कभी तो हसाये कभी ये रूलाये'
लेख आवडला.
हीरा यांना जायफळ, ऑरगॅनिक
हीरा यांना जायफळ, ऑरगॅनिक चविष्ठ डाळ आणि गुळ घालून केलेले, वरून घरच्या साजूक तुपाची धार सोडलेले दोन मनातले मांडे.
तुपाची धार माझ्या मनात ग
दळदार चण्याची डाळ
सेंद्रिय भरीला गूळ
शिवाय जायफळ
ओतली तुपाची धार, साजूक कणीदार, बनविले मांडे
दोन मनातील मांडे
घ्या खाऊनिया झटपट, जोवरी हॉट, मनातल्या मनात
किती कौतुक करावे गडे
मनातले मांडे
बाई ग, बाई ग, बाई ग.
>>>>>>>हीरा यांना जायफळ,
>>>>>>>हीरा यांना जायफळ, ऑरगॅनिक चविष्ठ डाळ आणि गुळ घालून केलेले, वरून घरच्या साजूक तुपाची धार सोडलेले दोन मनातले मांडे.
इतकं मस्त सुचतं कसं बोलायला??
संयोजक, तुम्ही सुद्धा
संयोजक, तुम्ही सुद्धा
(No subject)
संयोजकांना डुआयडी वापरायचा
संयोजकांना डुआयडी वापरायचा अनुभव दिसत नाही वाटते. आयडी चेंज करायचे विसरले
(No subject)
वो कोई फटाफट रिप्लाय करने कि
वो कोई फटाफट रिप्लाय करने कि हालत मे हो तो आयडी चेंज का फॉर्म जरुरी है क्या
- मुन्ना मायबोलीकर
सक्सेस इज जर्नी नॉट
सक्सेस इज जर्नी नॉट डेस्टिनेशन.. मोअर अबाउट जर्नी.. ब्ला ब्ला ब्ला.
घर घेतलं सजवलं गुड जॉब! आता दुसर्या सुखाच्या/ ध्येयाच्या मागे लागा. घर घेतल्यावर काहीच वाटणार नाही, पण घर निवडताना केलेल्या तडजोडी, उडालेले गोंधळ, ते बांधताना मारलेल्या चकरा, डिझाईन सेंटरला मारलेल्या अगणित फेर्या, अपग्रेडस, हॅंडीपर्सन होऊन केलेले कामं हेच दीर्घकाळ स्मरणात रहातं/ चेरिश होतं. बसुन घेतलेला मोगर्याचा सुगंध, आर्मचेअर वर वाचलेलं पुस्तक, वाफाळती कॉफी ...! टोटली ओव्हररेटेड!
थोडक्यात मृगजळामागे धावण्यातच सगळी मजा आहे.
संयोजक
संयोजक
सगळेच
सगळेच
नवीन Submitted by हीरा on 29
नवीन Submitted by हीरा on 29 August, 2022 - 23:14
हाउ ब्रोमांटिक ते मांडे
हाउ ब्रोमांटिक ते मांडे प्रत्यक्षात पण चालतील.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
दळदार चण्याची डाळ
दळदार चण्याची डाळ
सेंद्रिय भरीला गूळ
शिवाय जायफळ>>
मांडे हा वेगळा विषय आहे, पण इथे उल्लेख आला म्हणून..
मांडे पुरणाचे असतात, हे मला आत्ता काही वर्षांपूर्वी कळलं. आमच्या घरी खूप पूर्वी मांडे बनायचे, ते फक्त घरी काढलेल्या गव्हाच्या रव्यापासून बनलेले असायचे. (शेवयांच्या पिठासारखं भिजवायचं). कागदा पेक्षाही पातळ असायचे. आणी खापरवरच भाजायचे. ते मांडे दुधात भिजवून खायचे.
ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती
ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती मुक्ताईने मांडे भाजले ना?
बसुन घेतलेला मोगर्याचा सुगंध
बसुन घेतलेला मोगर्याचा सुगंध, आर्मचेअर वर वाचलेलं पुस्तक, वाफाळती कॉफी ...! टोटली ओव्हररेटेड! Wink>>>+१
लग्न, घर, मुलं ही मोठी सूखे मिळाल्यावर छोटी-छोटी सूखे जास्त छान वाटतात.
लग्न सुख आहे
लग्न सुख आहे
Pages