मायबोली गणेशोत्सव २०२२ - घोषणा

Submitted by संयोजक on 17 August, 2022 - 00:35

Mayboli Ganeshotsav with Logo-Final.jpgGhoshanapatra-2 with bold-V1.gif

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह ! मस्त. मंडळाला शुभेच्छा...!
गणपती बाप्पा मोरया.... !

-दिलीप बिरुटे

सगळ्या स्पर्धा व उपक्रमांचे 'लिंकादहन' या धाग्याच्या हेडरमधे करता येईल का? गणेशोत्सवाचा (२०२२) नवीन ग्रुप केला तरी आवडेल. शोधायला सोपे जाईल.
धन्यवाद संयोजक Happy

Submitted by अस्मिता. on 27 August, 2022 - 17:54 >> @ अस्मिता , सर्व धाग्यांच्या एकत्रित लिंक असणाऱ्या धाग्याचे काम चालू आहे. लवकरच प्रकाशित करू. धन्यवाद.

सगळे धागे रानोमाळ आहेत हो. काही ग्रुपकरुन त्यात टाका की. नवा गृप करायला अ‍ॅडमिनना सध्या वेळ नसेल तर प्लेस होल्डर म्हणून गेल्यावर्षीच्या गृप मध्ये टाका. मग हलवाहलवी करा. आधी धागे काढून ते कोणालाच दिसणार नसतील तर काही उपयोग नाही.
गृपमध्ये नवीन उघडायची सवय असल्याने सगळं गायब होतंय.

अमीतव,
दरवर्षी गणेशोत्सव ग्रूप गणेश चतुर्थीच्या दिवशीच आपण सुरू करतो. घोषणा धागे देखील संयोजन ग्रूपात प्रकाशीत केले जातात. संयोजक सर्व घोषणा एकत्रीत एका धग्यात प्रकाशीत करत आहेत.
मायबोलीवर नवीन दुवा वापरला तर सर्व्नवीन धागे देखील दिसतील.

मी नेहमी मायबोलीवर नवीन हा पर्यायच वापरतो.
त्याने मला ईतर गप्पांचे धागे वगैरे दिसत नाहीत जिथे मी जात नाही.
पण तरी मला या स्पर्धांचे धागे दिसत होते.
कदाचित मी संयोजक यांचे चाहते झालो असल्याने का?
बाकी मलाही प्रश्न पडलेला की कोणी त्यावर प्रतिसाद का देत नाहीये.

वा इवाना! खालील श्लोक त्याचं वर्णन करतो का बघा -

ऊर्ध्वशुंडम् अधःपादम् अश्वत्थम् दैवरूपकम् |
गात्राणि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ||

मराठीत
खाली पाय वरी सोंड, अश्वत्थी देव देखितो |
गात्रे जयाची पाने, ज्ञानी तो ह्यास जाणितो ||

Pages